पाकच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त

पाकच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त

►लष्कराने जारी केला व्हिडीओ, श्रीनगर, २३ फेब्रुवारी – संघर्षविरामाचे…

पाक, बांगलादेशात जाऊन पक्ष स्थापन करा

पाक, बांगलादेशात जाऊन पक्ष स्थापन करा

►कटियार यांचा ओवेसींवर प्रहार, नवी दिल्ली, २३ फेब्रुवारी –…

गीतांजली समूहाची १२०० कोटींची संपत्ती जप्त

गीतांजली समूहाची १२०० कोटींची संपत्ती जप्त

►आयकर विभागाची कामगिरी ►नीरव मोदीला जोरदार दणका, नवी दिल्ली,…

आता शिक्षकांनाच बंदुका द्याव्यात : ट्रम्प

आता शिक्षकांनाच बंदुका द्याव्यात : ट्रम्प

►गोळीबाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी उपाय, वॉशिंग्टन, २२ फेब्रुवारी –…

इम्रान खान तिसर्‍यांदा लग्नाच्या बेडीत

इम्रान खान तिसर्‍यांदा लग्नाच्या बेडीत

कराची, १९ फेब्रुवारी – पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार…

पाकच्या कारवाईने हाफिझ सईद चवताळला

पाकच्या कारवाईने हाफिझ सईद चवताळला

►नजरकैदप्रकरणी न्यायालयात जाणार, लाहोर, १६ फेब्रुवारी – पाकिस्तानने बेकायदेशीरपणे…

आता राज्यात पाच नाही, सहा लाख कोटींची कामे!

आता राज्यात पाच नाही, सहा लाख कोटींची कामे!

►४ लाख २७ हजार ८५५ कोटींची कामे मार्गी ►केंद्रीय…

बायोमेट्रिक कार्डधारकांनाच मिळणार स्वस्त दरात धान्य : हायकोर्ट

बायोमेट्रिक कार्डधारकांनाच मिळणार स्वस्त दरात धान्य : हायकोर्ट

मुंबई, २३ फेब्रुवारी – आधारकार्ड शिधापत्रिकेशी जोडणे अनिवार्यच असल्याचे…

सोहराबुद्दिन शेख दाऊदचाच हस्तक

सोहराबुद्दिन शेख दाऊदचाच हस्तक

►पळून जात असल्याने चकमकीत मारला गेला ►आताची सीबीआय तटस्थ…

काँग्रेसमुक्त भारत, काळाची गरज!

काँग्रेसमुक्त भारत, काळाची गरज!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | काँग्रेस राजवटीत शिक्षणक्षेत्रात…

काँग्रेसला काय धाड भरलीय?

काँग्रेसला काय धाड भरलीय?

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | शेखर गुप्ता…

राष्ट्रद्रष्टे : श्रीगुरुजी

राष्ट्रद्रष्टे : श्रीगुरुजी

॥ विशेष : डॉ. कुमार शास्त्री | श्रीगुरुजी आध्यात्मिक…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:48 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » उपलेख, संपादकीय » चौकशीअंती सगळेच उघड होणार!

चौकशीअंती सगळेच उघड होणार!

प्रासंगिक : बबन वाळके |

देशातून पाचशे आणि एक हजार रुपये मूल्याच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर विरोधी पक्षांनी नकारात्मक सूर लावला असला, तरी त्याची सकारात्मक बाजू पाहता, देशात आतापर्यंत पाच लाख कोटींपेक्षा अधिक नोटा जमा झाल्या आहेत. त्यापैकी पन्नास हजार कोटींच्या नोटा देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थेत जनतेने भरलेल्या करापोटी आल्या, हे विशेष!
या रकमा साधारणत: २१ नोव्हेंबरपर्यंतच्या आहेत. जुन्या नोटा बदलण्यासाठी अर्थमंत्रालयाने ३० डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. अजून दीड महिना बाकी आहे. तोपर्यंत हा आकडा अकरा लाख कोटींपेक्षा अधिक राहील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या जमा रकमेत प्रादेशिक परिवहन विभागाजवळ आलेल्या दंडाच्या रकमेचा समावेश नाही.
आपल्या देशात २०११ च्या गणनेनुसार एकूण महानगरपालिकांची संख्या ही २०५ आहे. दरम्यानच्या काळात आणखी काही महापालिका अस्तित्वात आल्या. या सर्व महापालिकांमध्ये जुन्या नोटांनी कर भरण्याची मुभा देण्यात आली आहे. सोबतच वीज मंडळात आणि ज्या खाजगी कंपन्यांकडे वीज मंडळाने काम सोपविले आहे, अशा सर्व वीज केंद्रातही पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.
एकट्या महाराष्ट्राचेच उदाहरण घेतले, तर महापालिका आणि नगरपालिका मिळून २१ नोव्हेंबरपर्यंत १०७४ कोटी २१ लाख रुपये विविध करांपोटी नागरिकांनी जुन्या नोटांच्या स्वरूपात जमा केले. यात नगरपालिकांचा वाटा १३६ कोटी ८४ लाख रुपये आहे. एकट्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत २१ नोव्हेंबरपर्यंत ३२२ कोटी ६ लाख रुपये जमा झाले. त्यापाठोपाठ पुणे महापालिकेकडे नागरिकांनी ११९ कोटी ६९ लाख रुपये भरले. नागपूर महापालिकेमध्ये फक्त २० कोटी ४ लाख तेवढे आले. नागपूर हे उपराजधानीचे शहर आहे. नुकतीच जी कराची देयके आली, त्यात मालमत्ता करात तिप्पट वाढ असलेली देयके देण्यात आली आहेत. यामुळे करवसुलीचा आकडा मोठा असेल अशी अपेक्षा होती. पण, तसे दिसत नाही. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जुन्या नोटांनी कर भरण्याची अंतिम मुदत २४ नोव्हेंबर आहे.
एक बाब मात्र नक्की की, कर मग तो कुठलाही असो, बहुतेकांची मानसिकता, नंतर भरू, अशीच असते. केंद्र सरकारने जर जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा बंद केल्या नसत्या, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेला पैसा हा कर म्हणून आला नसता. आज अनेक महापालिकांची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यात नागपूरचाही समावेश आहे. पण, मोदींनी एका मिनिटात निर्णय घेतला आणि करांचा मोठ्या प्रमाणात भरणा झाला. या आलेल्या रकमेतून महापालिका आणि नगरपालिकांना विकास कामे करता येणार आहेत; तसेच ज्या महापालिका आणि नगरपालिकांमध्ये पगार वेळेवर मिळत नव्हते, ती समस्याही या कररूपी पैशामुळे सुटणार आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगर्‍यात जाहीर सभेत सांगितले की, देशाच्या तिजोरीत आतापर्यंत पाच लाख कोटी रुपये आले आहेत. पाच लाख कोटींची रक्कम काही थोडीथोडकी नाही. नोटबंदीमुळे सरकार आणि नागरिक, दोघांनाही दिलासा मिळणार आहे. गेल्या दोन आठवड्यांत नोटा जमा करण्यासाठी लोकांनी बरीच गर्दी केल्यामुळे अनेक लोकांनी पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा आपल्या बँक खात्यात जमा केल्या नाहीत. आता गर्दी ओसरू लागल्याने आणखी नोटा बँकेत जमा होणार आहेत. ज्या वेळी नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला, त्या वेळी बाजारात असलेले चलन आणि बँकांमध्ये तसेच ज्या सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांना जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी मुभा देण्यात आली आहे, असा सर्व आकडा मिळून ३० डिसेंबरपर्यंत आलेल्या नोटांचे चलन आणि न जमा  झालेले चलन यातील तफावत कळणार आहे. या तफावतीतून देशात किती प्रमाणात काळा पैसा आहे, याचा अंदाज बांधला जाणार आहे. यानंतर पुढील मोहीम राबविण्यात येणार आहे. दुसरे म्हणजे, जेवढे चलन बँकांमध्ये आले, त्या अनुषंगाने नवीन चलन बाजारात आणले जाणार आहे. त्यामुळेच कदाचित पंतप्रधान मोदींनी ५० दिवसांची मुदत मागितली असावी.
आयकर विभागाने मोठे बिल्डर्स, ज्वेलर्स आणि अन्य संशयित प्रतिष्ठानांची झडती घेण्याचे सत्र आतापासूनच सुरू केले आहे. देशात दडवलेला काळा पैसा बाहेर काढण्याचा मोदी सरकारचा निर्धार आहे. एक बाब येथे लक्षात घेण्यासारखी आहे की, आगामी काही महिन्यात पाच राज्यांमध्ये विधानसभांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. महाराष्ट्रासह काही राज्यांत नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा धाडसी निर्णय घेतला, असेच म्हणावे लागेल. ज्या प्रकारे अन्य पक्षांचे उमेदवार मैदानात असतील, त्यासोबतच भाजपा आणि मित्रपक्षांचे उमेदवारही असणार आहेत. या नोटबंदीची सर्वात मोठी झळ विरोधी पक्षांना बसली असल्याचे त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांवरून दिसून येत आहे. ही झळ भाजपाच्याही काही उमेदवारांना बसू शकते. या सर्व बाबींचा अभ्यास मोदींनी केलाच असणार आणि तेव्हाच हा धाडसी निर्णय त्यांनी घेतला असणार. राजकारण स्वच्छ करण्याचा हा एक प्रयत्न आहे. दुसरी बाब म्हणजे, जे लोक नोटा जमा करून साडेचार हजार रुपये नेत होते, त्यांच्यावर आयकर व पोलिस विभागाची कडक निगराणी होती. यातून जो अहवाल आला, तो लक्षात घेता आधी साडेचार हजार रुपये जुन्या नोटांत बदलण्याची तरतूद रद्द करून केवळ दोन हजार रुपये करण्यात आली आहे. यापुढे फक्त खात्यातूनच पैसे काढण्याची मुभा देण्यात येणार आहे. सरकारने खात्यांमधून पैसे काढण्याची मर्यादा घालून दिलेली आहे. त्यामुळे खरे गरजू कोण आणि बनावट गरजू कोण, याचा पत्ता आतापासूनच लागणे सुरू झाले आहे. नागपूरचे उदाहरण यासाठी बोलके ठरावे. नागपुरात काही चौकात आधी मजुरांची गर्दी असायची. ती आता मुळीच दिसत नाही. या सर्व मजुरांना जुन्या नोटा बदलून बँकेतून नव्या नोटा आणण्याचे काम सोपविण्यात आले आहे. काही कंत्राटदार आपल्या मजुरांचा नोटा बदलवण्यासाठी वापर करीत आहेत. पगार हवा ना, मग जुन्या नोटा बँकेत द्या आणि बँकेतून नवीन नोटा आणा. तोच तुमचा पगार, असे काही व्यावसायिक दबक्या आवाजात बोलत आहेत. मध्यप्रदेशातील उज्जैन येथे तर कमालच झाली. अंबाराम या बँक ऑफ इंडियात खाते असणार्‍या मजुराच्या खात्यात तब्बल ९९ अब्ज रुपये जमा झाल्याचे निदर्शनास आल्याने आयकर विभागासोबतच पोलिसही चक्रावून गेले आहेत. विशेष म्हणजे अंबारामच्या खात्यात एवढे पैसे कुठून आले, हे त्यालाही माहीत नाही! आता त्याचे खाते सील झाले आहे. ९९ अब्ज म्हणजे ही काही छोटी रक्कम नाही. आता ही बँकेची तांत्रिक चूक आहे की, प्रत्यक्षात तेवढे पैसे अंबारामच्या खात्यात कुणी जमा केले, हे चौकशीअंती उघड होणार आहे. एवढे मात्र खरे की, काळा पैसा असलेले लहान मासे असोत की मोठे मासे, ३० डिसेंबरपर्यंत ते हातपाय मारतीलच. यात जे यशस्वी होणार नाहीत, त्यांच्या रकमा मातीमोल होणार आहेत, हे नक्की! आतापासूनच अडीच लाखापेक्षा अधिक रक्कम आलेल्या खात्यांची चौकशी सुरू झाली आहेे.

शेअर करा

Posted by on Nov 23 2016. Filed under उपलेख, संपादकीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उपलेख, संपादकीय (896 of 957 articles)


पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचा फटका ज्यांना बसला आहे, ते काळा पैसा जमा करणारे ...