ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक » छत्तीसगढ : तिरंगी लढतीचा भाजपाला फायदा!

छत्तीसगढ : तिरंगी लढतीचा भाजपाला फायदा!

श्यामकांत जहागीरदार |

छत्तीसगडमधील विधानसभा निवडणूक यावेळी तिरंगी होण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपा, काँग्रेस आणि अजित जोगी यांची जनता काँग्रेस व बसपाच्या मायावती यांची युती, अशी तिरंगी लढत होणार आहे. या तिरंगी लढतीचा फायदा भाजपाला मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. राज्यात १५ वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे आणि डॉ. रमणसिंह यांनी मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. यावेळीही भाजपा डॉ. रमणसिंह यांच्या नेतृृत्वात विधानसभा निवडणूक लढवत असून, राज्यातील ताज्या राजकीय घटनाक्रमामुळे लागोपाठ चौथ्यांदा ते मुख्यमंत्री होतील, याबाबत कुणाच्या मनात शंका राहिली नाही!
अजित जोगी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत नवा पक्ष स्थापन करणे आणि मायावती यांच्या बसपाने काँग्रेसशी आघाडी न करता अजित जोगी यांच्या नव्या पक्षाशी आघाडी करणे या ताज्या घटनाक्रमामुळे, राज्यातील राजकीय परिस्थितीत बदल झाला आहे. मायावती यांच्या निर्णयाने काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. बसपा आपल्याशी आघाडी करेल, अशी राज्यातीलच नाही, तर दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनाही पूर्ण खात्री होती, पण मायावती यांनी शेवटच्या क्षणी अजित जोगी यांच्या पक्षाशी हातमिळवणी करत राज्यातील काँग्रेसचा पंजा फ्रॅक्चर केला.
अजित जोगी राज्यातील लोकप्रिय नेते असले, तरी त्यांची प्रतिमा नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. अजित जोगी यांच्याशिवाय छत्तीसगढमध्ये काँग्रेसजवळ नाव घेण्यासारखा दुसरा कोणताही नेता नव्हता. पण, अजित जोगीच बाहेर पडल्यामुळे त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना आनंद झाला असला, तरी राज्यातील काँग्रेसचे भवितव्य मात्र अंधकारमय झाले आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांनी छत्तीसगड या नव्या राज्याची स्थापना केल्यानंतर, अजित जोगी यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. मात्र, त्यानंतर राज्यात झालेल्या सलग तीन निवडणुकांत ते काँग्रेसला सत्तेवर आणू शकले नाहीत. सनदी अधिकारी राहिलेले अजित जोगी आपल्या कामापेक्षा वादग्रस्त घटनांनीच नेहमी चर्चेत राहिले. सनदी अधिकारी असले, तरी जोगी यांची राजकारणात रुची होती. राजकारणात प्रवेश करण्यासाठी त्यांनी पद्धतशीर मोर्चेबांधणी केली होती.
जोगी रायपूरला जिल्हाधिकारी असताना राजीव गांधी इंडियन एअरलाइन्समध्ये वैमानिक होते. राजीव गांधी विमान घेऊन रायपूरला आले, तर आपल्याला त्यांची लगेच सूचना मिळाली पाहिजे, अशी व्यवस्था जोगी यांनी करून ठेवली होती. त्यानुसार ते राजीव गांधींसाठी आपल्या घरून चहा-नाश्ता घेऊन जात. १९८६ मध्ये काँग्रेसला मध्यप्रदेशातून राज्यसभेवर पाठवण्यासाठी अनुसूचित जाती-जमातीच्या एका नव्या चेहर्‍याची गरज होती. त्यानुसार पंतप्रधान राजीव गांधींनी अजित जोगी यांचे नाव निश्‍चित केले. अजित जोगींच्या घरी स्वत: राजीव गांधींनी दूरध्वनी केला. राजीव गांधींच्या सूचनेप्रमाणे मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असलेले दिग्विजयसिंह अजित जोगी यांच्या निवासस्थानी रात्रीच पोहोचले आणि दुसर्‍या दिवशी सकाळी जिल्हाधिकारी पदाचा राजीनामा देत अजित जोगी यांनी भोपाळ येथे राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरत राजकारणात प्रवेश केला. आदिवासी म्हणून राजकारणात प्रवेश केलेल्या अजित जोगी यांनी ख्रिश्‍चन धर्म कधी स्वीकारला, हे कुणाला कधी समजलेच नाही! त्यामुळेच त्यांच्या आदिवासी असण्यावर वारंवार प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले. प्रकरण उच्च न्यायालयातही गेले. राजकारणात कुणाशी कसे जुळवून घ्यायचे, यात जोगी हुशार होते. राज्यसभा सदस्य असताना, श्रीमती सोनिया गांधी दर रविवारी ज्या चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी जात त्याच चर्चमध्ये अजित जोगी बरोबर पोहोचत असत. याचा चांगला फायदा त्यांनी उचलला.
काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे यांनी १९९८ मध्ये एकदा एका विमानप्रवासात, माझ्याबरोबर दोन भावी मुख्यमंत्री प्रवास करत आहेत, असे विधान केले होते. त्यांचा रोख सुभाष यादव आणि अजित जोगी यांच्याकडे होता. त्यांनी छत्तीसगडचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजित जोगी यांचा उल्लेख केला होता. विशेष म्हणजे त्या वेळी वेगळ्या छत्तीसगड राज्याची घोषणाही झाली नव्हती! पण, छत्तीसगड राज्याची घोषणा झाल्यावर अजित जोगी त्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. मात्र, आपल्या मनमानी आणि एककल्ली कार्यपद्धतीमुळे अजित जोगी यांनी राजकारणात मित्रांपेक्षा शत्रूंचीच संख्या वाढवली. काँग्रेसमध्येही त्यांचे फारसे कुणाशी पटत नव्हते. अजित जोगी यांच्याशी झालेल्या मतभेदामुळेच विद्याचरण शुक्ल यांनी काँगेसचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
आपल्या मुलाला- अमित जोगी याला- राजकारणात पुढे आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे अजित जोगी अडचणीत आले. अमित जोगी याचा सरकारमधील तसेच पक्षाच्या कामातील हस्तक्षेप वाढत होता. ‘छत्तीसगडमधील संजय गांधी!’ अशी त्याची प्रतिमा निर्माण झाली होती. याचा परिणाम अजित जोगी यांच्या प्रतिमेवर होत गेला.
२००३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळू शकले नाही. त्या वेळी अजित जोगी यांनी एका भाजपा आमदाराला दूरध्वनी करत मुख्यमंत्रिपदाचे आमिष दाखवत काही आमदारांसह पक्षातून बाहेर पडण्याची सूचना केली होती, याची टेप बाहेर येताच मोठी खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे हा प्रकार आपण श्रीमती सोनिया गांधी यांच्या सूचनेवरून केला असल्याची कबुली देत जोगी यांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला होता. त्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते.
२००३ मध्येच मुख्यमंत्री असताना अजित जोगी आणि त्यांचा मुलगा अमित जोगी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष रामअवतार जग्गी यांच्या हत्येचा आरोप झाला. या प्रकरणात २००७ मध्ये जोगी पिता-पुत्राला तुरुंगातही जावे लागले. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात काँग्रेसचे अनेक नेते मारले गेले. या प्रकरणात संशयाची सुईही अजित जोगी यांच्यावर होती. २०१४ मध्ये अंतागढ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराला जोगी यांनी ऐनवेळी माघार घ्यायला लावली. त्याचीही टेप बाहेर आली. त्यावरून मोठे वादळ उठले.
सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर अजित जोगी एका अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांचा कंबरेखालचा पूर्ण भाग निकामी झाला. त्यामुळे अजित जोगी राजकीयदृष्ट्या संपले, असे अनेकांना वाटले. मात्र, त्यानंतरही जोगी यांनी हार मानली नाही. राजकारणातील त्यांची सक्रियता आणि प्रभाव कमी झाला नाही. आपल्या वागणुकीने जोगी यांनी काँग्रेस पक्षातील आपले महत्त्व कमी केले. त्यामुळेच संपुआच्या १० वर्षांच्या कार्यकाळात जोगी यांना फार काही मिळाले नाही.
जोगी यांचे काँग्रेसमध्ये आतबाहेर सतत सुरूच होतेच. २०१८ मध्ये काँग्रेसमध्ये परतण्याचा दृष्टीने अजित जोगी यांनी हालचाली सुरू केल्या. काँग्रेसने आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची जोगी यांची मागणी होती. मात्र, ती मान्य न झाल्यामुळे त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत जनता काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केली. अजित जोगी-मायावती युतीमुळे काँग्रेसचे नुकसान मात्र निश्‍चित होणार आहे. कारण, अजित जोगी यांच्या पक्षाला जी मते मिळणार ती काँग्रेसचीच राहणार आहेत.
९० सदस्यीय छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत २०१३ मध्ये भाजपाने ४१ टक्के मतांसह ४९ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसने ४० टक्के मतांसह ३९ जागा मिळवल्या होत्या. त्या वेळी भाजपाला १० जास्त मिळाल्या असल्या, तरी दोघांच्या मतांमध्ये एक टक्क्याचाच फरक होता. राज्यात त्या वेळी एक जागा बसपाला आणि एक अपक्षाला मिळाली होती. बसपाची मतांची टक्केवारी ४.३ होती. आता बसपाशी हातमिळवणी केल्यामुळे जोगी यांची ताकद वाढली आहे, याचा फटका काँग्रेसला बसणार आहे, तिरंगी लढतीत मतविभागणीचा थेट फायदा या वेळी भाजपाला मिळणार आहे.

https://tarunbharat.org/?p=64947
Posted by : | on : 4 Oct 2018
Filed under : उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक (458 of 1422 articles)


मौन पाळायला तासाभराचा वेळ अन् गांधीजयंतीचा मुहूर्त वेगळ्याने साधण्याची गरजच नव्हती काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना. अर्थात तेवढ्यापुरतेच, गरजेनुसार बापूंचे स्मरण होत असल्याने ...

×