ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » जगातील वन्यप्राण्यांचा विनाश…

जगातील वन्यप्राण्यांचा विनाश…

अत्याधुनिक जागतिक शैलीचा पुरस्कार करतानाच, आपण निसर्गाकडे कसे दुर्लक्ष केले आणि त्याचे भोग आपल्याला आता कसे भोगावे लागत आहेत, त्याची अनेक उदाहरणे जगभरातील अनेक देशांत आलेले महापूर, भूकंप, भूस्खलन, चक्रीवादळ, समुद्राची वाढती पातळी… अशा अनेक विपदांच्या रूपात पाहिली आहेत आणि आगामी भविष्यही काही सुरक्षित नाही, याचे इशारे आतापासूनच दिले जात आहेत. या सगळ्या नैसर्गिक आपत्ती मानवानेच निर्माण करून ठेवल्या नाहीत का? या आपत्तींमध्ये हजारो निष्पाप जीव आणि लक्षावधी कोटी रुपयांची हानी सोसावी लागत आहे. पण, या विपदांमध्ये आणखी एक मोठी विपदा सध्या समोर आली आहे आणि ती अतिशय गंभीर आहे. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड म्हणजेच डब्ल्यूडब्ल्यूएफने गेल्या ४० वर्षांचा आढावा घेऊन नुकताच एक अहवाल घोषित केला आहे. या अहवालानुसार, १९७० ते २०१७ या कालावधीत जगभरातील ६० टक्क्यांपेक्षा अधिक वन्यप्राणी, सरपटणारे प्राणी, पक्षी, जलचर हे नामशेष झाले आहेत. शिवाय अनेक दुर्मिळ जातीतील पक्षी, जलचर, प्राणीही नामशेष होण्याच्या मार्गावर असून त्यांचे आताच संरक्षण केले नाही तर ते फक्त फोटोत पाहण्यापुरतेच मर्यादित राहतील, असा इशाराही दिला आहे. यात लॅटिन अमेरिकन देशांमध्ये हे पक्षी-प्राणी-जलचर नामशेष होण्याचे प्रमाण याच काळात ९० टक्के आहे. २६ देशांचा यात समावेश आहे. उत्तर, मध्य आणि दक्षिण अमेरिका तसेच कॅरिबियनमधील फ्रेंच, स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषा बोलणारे हे ते देश आहेत. ऑस्ट्रियाच्या आंतरराष्ट्रीय अप्लाईड सायन्सेस संस्थेच्या पिएरो वास्किनी, त्यांचे ५९ संशोधक सहकारी मिळून ८० पानांचा हा अहवाल तयार केला आहे. या अहवालातील शब्द न् शब्द हा जगाच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे. वाढते औद्योगिकीकरण, मोठमोठ्या वसाहती, उंच इमारती, मोठेमोठे प्रकल्प यासाठी होणारी प्रचंड वृक्षतोड, परिणामी, वन्यप्राण्यांच्या अधिवासावर होणारे आक्रमण, मोठ्या प्रमाणावर होणारी वन्यप्राण्यांची शिकार यामुळे वन्यप्राण्यांची संख्या दिवसेंदिवस घटत गेली आणि या समस्येकडे आतापासूनच लक्ष दिले गेले नाही तर जे जिवंत आहेत, त्यांचाही अंत जवळ आहे. मानवाने समुद्रालाही सोडले नाही. समुद्रातील पाण्यात एका विशिष्ट स्थळी विशिष्ट जलचरांचा अधिवास असतो. पण, आता समुद्रातून तेलवाहिन्या, मोठमोठे पूल, रेल्वे, तेल उपसणारे प्रकल्प या सर्व बाबींमुळे जलचरांचेही अधिवास नष्ट होत गेले आणि त्यांचीही संख्या झपाट्याने कमी होत गेली. ग्लोबल वॉर्मिंगचा प्रकोप असाच सुरू राहिला, तर समुद्रातील जलचरांची संख्या ही सध्या असलेल्या संख्येपैकी आणखी ७० ते ९० टक्क्यांपर्यंत घटू शकते. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरस यांनी नुकतेच विधान केले आहे की, ‘‘आज जगापुढे सर्वात भीषण समस्या जर कोणती असेल तर ती ग्लोबल वॉर्मिंगची आहे! दोन टक्के जरी तापमान वाढले तर त्याचा मानवजीवनावर परिणाम तर होईलच, पण निसर्गाच्या सान्निध्यात राहणार्‍या सर्वांचाच विनाश होईल. आज विज्ञानाने आम्हाला याची जाणीव करून दिली आहे आणि आतापासूनच आम्हाला पावले उचलावी लागतील.’’ अमेरिकेने पॅरिस ग्लोबल समीटमधून आपले अंग काढून घेतल्याचे सर्वविदितच आहे. पण, भारताने मात्र आपल्या देशातील तापमान कमी करण्याच्या धोरणाचा तेवढ्याच मजबुतीने पुरस्कार केला आहे. वाढत्या औद्योगिकीकरणावर, ग्रीनहाऊस गॅसमुळे वाढत चाललेले प्रदूषण आतापासूनच रोखले नाही, तर आगामी काळात संपूर्ण जगालाच त्याचे भीषण परिणाम भोगावे लागणार आहेत. आताच अनेक मोठे बर्फाचे पर्वत वितळत आहेत. त्यातून निघणारे पाणी हे समुद्रात जाऊन मिसळत आहे. येणार्‍या दहा वर्षांत ही पातळी अधिक उंचावत जाऊन समुद्रकिनारी वसलेले अनेक छोटे देश समुद्राखाली गडप होतील की काय, अशी भीती आतापासूनच व्यक्त केली जात आहे. जग आज ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा गेल्या कित्येक वर्षांपासून करीत आहे आणि त्याचा मानवजातीवर काय भीषण परिणाम होऊ शकतो याकडे लक्ष वेधत आहे. जागतिक वन्यप्राणी संघटनेने या बाबींसोबतच वन्यप्राणी, जलचर, पक्षी, सरपटणारे प्राणी यांचाही विचार तेवढ्याच गांभीर्याने करण्याच्या गरजेवर भर दिला आहे. त्यासाठी आतापासूनच या सर्व जीवांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी युद्धपातळीवर उपाय योजण्याचे आवाहन केले आहे. अलीकडे संपूर्ण जगात प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे जलचरच नव्हे, तर वन्यप्राण्यांपुढेही एक नवीच समस्या उभी ठाकली आहे. काही महिन्यांपूर्वी पॅसिफिक महासागराच्या किनार्‍यावर अनेक महाकाय शॉर्क आणि व्हेल मासे मृत्युमुखी आढळून आल्याच्या घटनांमुळे प्लॅस्टिक किती घातक आहे, याचा प्रत्यय जगाला आला. केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील जनतेला नवनवीन सुविधा हव्या आहेत, त्यांना जगाचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत हवा आहे. पण, या सुविधांचा गैरवापर करण्याची वृत्ती त्यांच्यातून जात नाही. या शॉर्क आणि व्हेल माशांचे पोस्टमॉर्टम केले असता, त्यांच्या पोटात पाच-पाच क्विंटल प्लॅस्टिक आढळले! हे सर्वाधिक मोठे जलचर असूनही त्यांची ही स्थिती आहे, तर मग लहान जलचरांची काय स्थिती असेल, हे सांगणे न लगे! ते बिचारे समुद्राच्या आतच मरून पडले असतील. याचे कारण म्हणजे समुद्री प्रवासासाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा गैरवापर. लोकांजवळ असलेले प्लॅस्टिक, कचर्‍याच्या डब्यात न टाकता ते थेट समुद्रात भिरकावून देण्याच्या घटनांमुळे जलचरांचे नुकसान होत आहे. आणखी एका बाबीकडे जागतिक वन्यप्राणी संघटनेने लक्ष वेधले आहे. तापमान जर दीड ते दोन फॅरेनहिट वाढल्यास सध्या अस्तित्वात असलेले कोरल हे ८० ते ९० टक्के नामशेष होऊन जाईल. कोरल हे अनेक जलचरांचे निवासस्थान असते. तसे झाले तर तेथे आसरा घेणार्‍या जलचरांवरही मोठी आपत्ती कोसळल्याशिवाय राहणार नाही. गेल्या ५० वर्षांत आपण ऊर्जा, जलवाहिन्या, लाकूड, मासेमारी, अन्नप्रक्रिया केलेले पदार्थ, रासायनिक खते आणि कीटकनाशके, धातू, प्लॅस्टिक यांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला. औद्योगिक प्रकल्पांमध्ये होणार्‍या कोळशाच्या वापरामुळे प्रदूषणात मोठी भर पडत आहे. जगात निर्माण झालेल्या अब्जावधी मोटारी धावत असल्याने त्यातून प्रदूषण होत आहे. हे कुठेतरी थांबण्याच्या आणि त्यावर कडक प्रतिबंध आणण्याच्या गरजेवर संघटनेने भर दिला आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी आता जगभर विजेवर चालणारी वाहने निर्माण केली जात आहेत. राजधानी दिल्लीत प्रदूषण हे तर पाचवीलाच पूजले आहे! या सर्व समस्यांकडे आतापासूनच लक्ष दिले गेले नाही तर मनुष्याचाच नाही, तर वन्यप्राणी, जलचर, सरपटणारे प्राणी आणि पक्ष्यांचाही विनाश अटळ आहे!

https://tarunbharat.org/?p=66783
Posted by : | on : 31 Oct 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (39 of 729 articles)


पेठकर | काही कलाकृती या कालातीत असतात. त्यातली गंमत, काळ कुठलाही असो, अगदी सारखीच असते. काल, आज आणि उद्या या ...

×