ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » जनताच करेल काँग्रेसच्या भाग्याचा फैसला!

जनताच करेल काँग्रेसच्या भाग्याचा फैसला!

बरे झाले, रघुराम राजन खरे बोलले. आज देशातल्या बँकांची जी अवस्था झाली आहे, त्याला काँग्रेसच्या नेतृत्वातील संपुआचेच सरकार जबाबदार आहे, असे जे स्पष्टीकरण रघुराम राजन यांनी संसदीय समितीला दिले आहे, त्यावरून काँग्रेसचे पितळ उघडे पडले आहे. पेट्रोल आणि डीझेलच्या वाढलेल्या दराचा मुद्दा करून काँग्रेसने सोमवारी भारत बंदचे आयोजन करून, भाजपाच्या नेतृत्वातील सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण रघुराम राजन यांनी, काँग्रेसप्रणीत संपुआच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यांमुळेच बँकांचे बुडीत कर्ज वाढले आणि त्यामुळे एनपीएही वाढला, असे जे उत्तर संसदीय समितीला पाठविले आहे, त्यामुळे काँग्रेसच्या आंदोलनातली हवाच निघून गेली आहे! काँग्रेसच्या काळात झालेल्या घोटाळ्यांची चौकशीही धिम्या गतीने झाली आणि निर्णयही जाणीवपूर्वक विलंबाने घेतले गेले, त्याचा फटका बँकांना, पर्यायाने अर्थव्यवस्थेला बसला. काँग्रेसच्या काळात रुळावरून घसरलेली अर्थव्यवस्था सावरता सावरता मोदी सरकारची चार वर्षे निघून गेली आहेत. पेट्रोल आणि डीझेलचे भाव वाढण्यामागे काँग्रेसने अर्थव्यवस्थेला लावलेले ग्रहणही कारणीभूत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. सत्ता आल्यापासून भाजपाने राजकीय आघाडीवर सातत्याने शानदार कामगिरी केली. लोकसभेत मिळविलेल्या यशानंतर एकेका राज्यातून काँग्रेसला हद्दपार केले. दुसरीकडे, आर्थिक आघाडीवरही मोदी सरकारने दमदार कामगिरी केल्याचे समोर आल्याने, भारतीय जनता पार्टी आणि या पार्टीच्या पदाधिकार्‍यांचे तसेच सरकारमधील मंत्र्यांचे मनोबल निश्‍चितपणे वाढले आहे. एकाच वेळी राजकीय आणि आर्थिक आघाडीवर मिळालेले यश भाजपाला दुहेरी आनंद देऊन गेले आहे. आर्थिक आघाडीवर मिळालेले यश हे देशासाठीही दिलासा देणारे आहे. यालाही कारण आहे. नोटबंदी आणि जीएसटी यांमुळे अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन वाईट परिणाम झाला आहे, असा आरोप विरोधकांनी केला. शिवाय, पंजाब नॅशनल बँकेला फसवून हिरे व्यापारी नीरव मोदी पसार झाल्यापासूनही अर्थव्यवस्थेबद्दल आणि मोदी सरकारच्या हेतूबद्दल शंका घेतली जात होती. काळा पैसा तर आलाच नाही, उलट पीएनबी घोटाळ्यामुळे पांढरा पैसा देशाबाहेर गेला, असाही आरोप करण्यात आला. ही पृष्ठभूमी लक्षात घेतली, तर रघुराम राजन यांनी संसदीय समितीला पाठविलेले उत्तर आणि जीडीपीच्या दरात झालेली वाढ भाजपाचे मनोबल वाढविणारी आहे. नोटबंदी लागू झाल्यानंतर पहिल्या तिमाहीचा विकास दर हा ५.७ टक्के एवढा होता आणि त्यामुळे अर्थव्यवस्था रसातळाला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सरकारवर करण्यात आला होता. स्वत:ला अर्थतज्ज्ञ म्हणविणार्‍यांच्या एका गटाने तर जीएसटीच्या निर्णयाकडे नकारात्मक भावाने पाहिले होते. परंतु, गेल्या तिमाहीतले आर्थिक वाढीचे आकडे तपासले तर असे लक्षात येईल की, देशाची अर्थव्यवस्था एकदम रुळावर आहे. योग्य दिशेने प्रवास करते आहे. नोटबंदी आणि जीएसटी हे दोन अतिशय धाडसी निर्णय घेऊन मोदी सरकारने देशाचे भाग्य बदलण्याचाच प्रयत्न केला आहे, यावर आता शिक्कामोर्तब होण्यास वेळ लागणार नाही! जीडीपीच्या ताज्या आकडेवारीचा एक महत्त्वाचा पैलू हाही आहे की, आपली अर्थव्यवस्था आता जगात सगळ्यात वेगाने पुढे जाणारी ठरत आहे. शेजारच्या चीनमध्ये आर्थिक विकासाचा दर हा ६.३ एवढा असताना भारताचा विकास दर त्यापेक्षाही जास्त वाढल्याने, आर्थिक विकासाला गती मिळाली आहे आणि ही गती आता वाढतच जाणार आहे. पायाभूत क्षेत्रात अतिशय झपाट्याने कामं झाली आहेत. सिमेंट उद्योग असेल, बांधकाम क्षेत्र असेल, ऊर्जा विभाग असेल, कृषी क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये लक्षणीय सुधारणा होत असल्यानेच अर्थव्यवस्थेला गती मिळताना दिसत आहे. कृषी विकास दरातही तेजी येणे ही स्वागतार्ह बाब होय. मात्र, सर्वाधिक रोजगार देणार्‍या या क्षेत्रात ठोस मजबुती आली आहे, असे आताच म्हणणे थोडे धाडसाचे ठरेल. २०२२ सालापर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करायचे आहे, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी बोलताना पुन्हा एकदा भर दिला. तसे पाहता शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे काही सोपे लक्ष्य नाही. परंतु, सरकार त्यासाठी जिद्दीने कामाला लागले आहे. शेतकर्‍यांप्रमाणेच छोटे व्यापारी आणि व्यावसायिक हेही अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. जीएसटी लागू झाल्यापासून या लोकांना काही व्यावहारिक अडचणी जरूर येत आहेत. कर गोळा करण्यावरही याचा परिणाम झाला आहे. अपेक्षेनुरूप जीएसटीच्या माध्यमातून कर गोळा न होणे, हा तसा अर्थव्यवस्थेसाठी शुभसंकेत मानला जाऊ शकत नाही. ज्या व्यापार्‍यांची उलाढाल दोन कोटी रुपये आहे, ते जीएसटीतून सुटीचा लाभ घेत आहेत. पण, हे व्यापारी कराचा भरणा व्यवस्थित करीत आहेत की नाही, हे सरकारने तपासले पाहिजे. लघु आणि मध्यम उद्योग जे आहेत, त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत असल्याने हे उद्योग सुरळीत चालावेत, त्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये, हे सरकारने सुनिश्‍चित करण्याचा प्रयत्न केला, ही अभिनंदनीय आणि आनंदाची बाब होय. सरकार डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे, ही बाब समाधानकारक आहे. जीएसटीचे नेटवर्क आणखी सुलभ केले, तर त्याचा लाभ व्यावसायिकांनाही होईल आणि सरकारी तिजोरीतही भरभरून पैसा येईल, यात शंका नाही! आणखी एक बाब सरकारला दुर्लक्षित करता येणार नाही आणि ती म्हणजे आपली बँकिंग प्रणाली. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकारने अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या असल्या, तरी बँकिंग सेक्टरच्या संदर्भात जे अनेक गंभीर प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हिरे व्यापारी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेतून कर्ज घेऊन ज्याप्रकारे बँकेची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली आणि त्यामुळे बँकिंग प्रणाली कशी पोकळ आहे, ही बाब पुढे आली, त्याकडे सरकारला गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. बँकिंग प्रणाली ही आपल्या अर्थव्यवस्थेचा एक मोठा आधार मानली जाते. पण, आपल्या देशात या प्रणालीत गडबड-घोटाळे होताना दिसत असल्याने, त्याकडे प्राधान्याने लक्ष देत सरकारला या प्रणालीत आमूलाग्र बदल घडवून आणावे लागतील. अन्यथा, ही बँकिंग प्रणाली अर्थव्यवस्थेला मारक ठरेल. एका अंदाजानुसार, बँकांची लोकांकडे असलेली कर्जाची थकबाकी ही आठ लाख कोटी रुपये एवढी प्रचंड झाली आहे. नॉन प्रॉडक्टिव्ह अ‍ॅसेट अर्थात एनपीए जर एवढा वाढला असेल, तर बँकांचे आरोग्य बिघडल्याशिवाय राहणार नाही आणि बँकांचे आरोग्य बिघडले तर देशाच्या अर्थव्यवस्थेचेही आरोग्य बिघडेल. मग, अर्थव्यवस्था रुळावर येईल तरी कशी? एनपीएमध्ये भविष्यात आणखी वाढ होण्याचा धोका निर्माण झाला असतानाच, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी जो खुलासा केला आहे, त्याने काँग्रेसचा मुखवटा जनतेपुढे आणलाच आहे. आता काँग्रेसचा फैसला जनतेलाच करायचा आहे!

https://tarunbharat.org/?p=61712
Posted by : | on : 12 Sep 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (362 of 845 articles)


पेठकर | आता सणांची गाडी सुसाट सुटली आहे. ‘पोळा अन् पाऊस झाला भोळा’ असे म्हणतात. पर्यावरण चांगले होते तोवर पाऊस ...

×