ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » जय होऽ गांधीजी की!

जय होऽ गांधीजी की!

खरंतर मौन पाळायला तासाभराचा वेळ अन् गांधीजयंतीचा मुहूर्त वेगळ्याने साधण्याची गरजच नव्हती काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना. अर्थात तेवढ्यापुरतेच, गरजेनुसार बापूंचे स्मरण होत असल्याने देखाव्यापुरत्या आंदोलनालाही मुहूर्त शोधण्याची गरज जाणवणे तसे स्वाभाविकच म्हणा! शिवाय लोकहित जोपासण्याची नाटकं करायलाही त्याची गरज जाणवतेच. एरवी, कालपर्यंत ज्यांनी जनतेच्या प्रत्येकच प्रश्‍नावर मौन पाळले, अगदी जाणीवपूर्वक पाळले, कित्येक घोटाळ्यांवर तर बोलण्याचेही टाळले, त्यांनी आता गांधीजींच्या पुतळ्यापाशी बसून तासभर मौन राहण्याचे तसे औचित्यही उरत नाही. पण काय आहे ना, की सत्ता उपभोगण्याच्या नादात खरं बोलण्याची, खोट्याला विरोध करण्याची, सत्यासाठी झगडण्याची, अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची, त्याविरुद्ध ब्र काढण्याची, लोकहितास्तव रस्त्यावर उतरण्याची, मोर्चे काढण्याची, आंदोलनं उभारण्याची गरज वाटली नाही यातल्या कुणालाच कधी. हिंमत तर नाहीच झाली. इंदिरा अन् संजय गांधींसमोर त्या पक्षातले लोक कसे नांगी टाकायचे, त्यांच्यासमोर उभे राहताना कित्येकांची कशी त्रेधातिरपट उडायची अन् मग हुजरेगिरी करण्याचा मार्ग कसा बड्याबड्यांनी बिनदिक्कतपणे स्वीकारला, हा इतिहास विस्मरणात गेलेला नाही अद्याप कुणाच्याच. हीच परिपाठी आजतागायत सुरू आहे. नेत्यांनी तोंडून शब्द काढण्याचीच देर, की ते अलगद झेलण्यासाठी कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करायचे. पायघड्या अंथरायच्या. कुर्निसात करत जगायचे. चुकीला चूक, खोट्याला खोटे म्हणण्याचा प्रयत्न तर चुकूनही करायचा नाही. अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील हे ध्यानात ठेवायचे, ही रीत प्रचलित करणार्‍या काँग्रेसला आणि त्याचीच शकले करून सत्तेसाठी बाहेर पडलेल्या राष्ट्रवादीला व्यवस्थितपणे अंगवळणी पडली आहे. एव्हाना त्याचा पुरेसा सरावही त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना झाला आहे. त्यामुळे ना घोटाळ्यांची इथे कुणाला लाज वाटत, ना भ्रष्टाचाराविरुद्धची चीड कुणाच्या मनात उत्पन्न होत! मग कोट्यवधींचा कोळसा घोटाळा घडला, तरी कुणालाच त्याची खंत वाटली नाही अन् ए. राजापासून तर सुरेश कलमाडींपर्यंत खाबुगिरी करत कुणी जेलमध्ये जाऊन आलं, तरी कुणालाच त्यात काही वावगं वाटत नाही. उलट, तेच लोक अजूनही त्या पक्षाचे बडे नेते आहेत! अशोक चव्हाणांच्या कल्पनेतून ‘साकारलेल्या’ आदर्श घोटाळ्यापासून तर शरद पवारांच्या कृपेने घडून आलेल्या लवासा प्रकरणापर्यंत… कुणी केला होता जनतेचा विचार, सांगा? कुणाचे खिसे भरले होते त्या प्रकरणात? कुणाला स्मरण झाले होते जनहिताचे तेव्हा? मुंबईच्या आदर्श सोसायटीतले महागडे फ्लॅटस् कुणी लाटले होते? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चेल्याचपाट्यांनी की आम जनतेने? कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनात कलमाडींच्या माध्यमातून झालेल्या भ्रष्टाचारात कुणाकुणाचे हात होते? का कुणीच आडकाठी आणली नव्हती त्यात? कुणी आक्षेप नोंदवला होता? कुणी विरोध केला होता? कुणी केला होता निषेध? कुणी मत व्यक्त केले होते जाहीरपणे, की या सार्‍या गोष्टी जनहितविरोधी आहेत म्हणून?… नेत्यांपुढे शेपटं हलवत लाळघोटेपणा अन् चमचेगिरी करण्यात आयुष्यभर मशगूल राहिलेल्या तमाम दीडशहाण्यांना, आता सत्ता हातून गेल्यावर लोकहिताचे स्मरण होणे आणि निवडणुकीच्या मुहूर्तावर सर्वांनीच गांधीजयंतीचे औचित्य साधून सरकारविरुद्धचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी मौन पाळण्याची नौटंकी करणे… ही रीत राजकारणात शोभून दिसणारी असली, कदाचित तिथे त्याची नितान्त गरज जाणवत असली, तरी ती लोकांच्या पचनी पडतेच असे नाही. पण करणार काय? हे लोक तर जनतेला कायम मूर्ख बनवत अन् समजत आले आहेत. आताही तोच गोरखधंदा चाललाय् त्यांचा. ज्यांनी नेहरू-गांधी घराण्याच्या पलीकडे कधी सत्तेची केंद्रे निर्माण होऊ दिली नाहीत, पश्‍चिम महाराष्ट्राच्या पलीकडे कधी विकासाची कल्पना ज्यांना मांडता आली नाही, ते लोक आता मोदींच्या हातात सत्ता एकवटली असल्याचा, महाराष्ट्रात विकास खुंटला असल्याचा कांगावा करीत ऊर बडवीत आहेत. सरकार अपयशी ठरले असल्याची ओरड करीत आहेत. कालपर्यंत सत्ता चालवणे तर सोडाच, पण आता एका जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणेही ज्यांना अद्याप जमलेले नाही, ते तमाम नेते बापूंच्या पुतळ्याजवळ मौन पाळण्यासाठी जमलेत काल. तशी तर मौन राहण्याची सवय आहेच त्यांना. काल त्याची उजळणी झाली एवढेच. जनतेचे प्रश्‍न तडीस लागणे सोडा, कालपर्यंतच्या पापांचे प्रायश्‍चित्त झाले तरी पुरे, एवढ्या मौनाने. खरंतर त्यासाठीच आधी प्रयत्न करावे लागतील या दोन्ही पक्षाच्या धुरंदर नेत्यांना. बाकी काही म्हणा, निदान दोन ऑक्टोबरला तरी या नेत्यांना त्या महात्म्याचे स्मरण होते, हेही नसे थोडके! त्या दिवशी तरी राजघाटावर उत्सव साजरा होतो. कार्यकर्त्यांचा उरूस भरतो. एरवी, राजघाटाकडेही फिरकत नाही यांच्यातला कुणी! गांधीजींच्या विचारांच्या चिंधड्या उडवण्यातच वेळ जातो सारा. तसेही आचरणात गांधी आहे कुठे कुणाच्या? काँग्रेसाध्यक्षांना इतक्या वर्षांनंतर, गांधीजींच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या सेवाग्रामात येऊन अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तिकडे मुंबईतच जवळपासचाच पुतळा शोधून मौन धारण करावेसे वाटणे, याला पुढील वर्षी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे मुख्य असे कारण असल्याची बाब आता लपून राहिलेली नाही. येत्या काळात या दोन्ही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या मनातील जनतेबाबतचे प्रेम नको तेवढे उफाळून येणार आहे. हो! निवडणुकीच्या काळात फार गरज असते बरं त्याची! त्यामुळे या नौटंकीबाजांच्या नाटकांनी कुणी भेदरून जाण्याचे कारण नाही. त्याचे आश्‍चर्य वाटून घेण्याची गरज तर नाहीच नाही! आज गांधीजींचे स्मरण करीत त्यांनी मौन बाळगण्याचे निदान कौतुक तरी करता येईल; पण कालपर्यंत या देशाच्या अर्थकारणापासून तर न्यायापर्यंतच्या सर्वच व्यवस्थांचे लचके तोडले जात असताना, बघ्याची भूमिका स्वीकारत जे मौन यांनी पाळले होते, टु-जी-कोलगेट यांसारखे घोटाळे डोळ्यांदेखत घडत असताना तोंडं कुलूपबंद ठेवली होती, त्याचे काय करायचे, हे सांगितले पाहिजे ना त्यांनीच! सध्याचे सरकार अपयशी ठरले असेल, तर त्याची काय शिक्षा त्यांना द्यायची हे जनता ठरवेलच योग्य वेळ येईल तेव्हा. पण, जनतेला नागवत यांच्या नेत्यांनी यांच्या साक्षीने चैन केली, गांधीजींचे विचार पायदळी तुडवत ज्यांनी ग्रामीण भारताच्या कल्पनेची ऐसीतैसी केली, सत्य-अहिंसेची पाऽर वासलात लावली, त्याचे काय करायचे, हे कोण सांगणार? की आधीसारखे याही प्रकरणात मौनच पाळणार या दोन्ही पक्षांचे नेते? म्हणजे, आयुष्यभर ज्यांनी सत्याची कास धरली त्या गांधीजींच्या पुतळ्याजवळ बसूनही यांचा खोटारडेपणा कायमच! जय होऽ गांधीजीकी…!

https://tarunbharat.org/?p=64884
Posted by : | on : 3 Oct 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (323 of 845 articles)


पेठकर | एखादी घडना घडत असते. ती नुसतीच घटना असते. ती वाईट असते, चांगली असते. ते पाप असते किंवा पुण्य ...

×