हज सबसिडी बंद

हज सबसिडी बंद

►मुस्लिमांना प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार देणार ►नकवी यांची घोषणा, नवी…

चकमकीत मला ठार करण्याचा कट : तोगडिया

चकमकीत मला ठार करण्याचा कट : तोगडिया

►लवकरच पुराव्यांसह समोर येणार, अहमदाबाद, १६ जानेवारी – १०…

न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी दस्तावेज याचिकाकर्त्याला द्या

न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी दस्तावेज याचिकाकर्त्याला द्या

►सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश, नवी दिल्ली, १६ जानेवारी…

क्षेपणास्त्र डागल्याच्या संदेशामुळे गोंधळ

क्षेपणास्त्र डागल्याच्या संदेशामुळे गोंधळ

वॉशिंग्टन, १४ जानेवारी – अमेरिकेच्या हवाईक्षेत्रातील हवाई बेटावर क्षेपणास्त्र…

‘जम्मू-काश्मीरला जाणे टाळा’

‘जम्मू-काश्मीरला जाणे टाळा’

►अमेरिकेची पर्यटकांना सूचना, वॉशिंग्टन, ११ जानेवारी – अमेरिकेने भारतात…

ममतांच्या दौर्‍यातील संपादक ‘चमचे-चोर’?

ममतांच्या दौर्‍यातील संपादक ‘चमचे-चोर’?

लंडन, १० जानेवारी – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी…

भाजपाची तिरंगा रॅली

भाजपाची तिरंगा रॅली

►संविधान बचाव रॅलीला प्रत्युत्तर ►•रावसाहेब दानवे यांची घोषणा, मुंबई,…

ना. स. फरांदे कालवश

ना. स. फरांदे कालवश

पुणे, १६ जानेवारी – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधान…

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

सांगली, १६ जानेवारी – पश्‍चिम महाराष्ट्रात ‘रॉबिनहूड’ प्रमाणे आयुष्य…

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

॥ तरंग : दीपक कलढोणे | ‘हर्र बोला हर्र’…

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

॥ विशेष : मुकुल कानिटकर | एकीकडे जग भारताकडे…

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | हा वारस…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:12
अयनांश:
Home » उपलेख, बाळ अगस्ती, संपादकीय » ट्रम्प यांच्या विजयाने कंप का?

ट्रम्प यांच्या विजयाने कंप का?

मंथन : बाळ अगस्ती |

मुळात ट्रम्प यांच्या विजयाचे विश्‍लेषण केवळ अमेरिकेतील घटनांपुरते मर्यादित नाही. सगळ्या जगाला आयएसआयएस आणि ओसामा बिन लादेन यांसारख्या दहशतवादामुळे जिहादी दहशतवादाचे जे हिंस्र स्वरूप दिसले आहे, त्याची एक तीव्र नापसंतीची प्रतिक्रिया जगाच्या कानाकोपर्‍यात नोंदविली गेली आहे. ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेतील माध्यमांनी रान उठविले, त्यांचे चारित्र्यहनन करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, ट्रम्प यांनी जिहादी दहशतवादाबद्दल जी आक्रमक विधाने केली होती, त्याला अमेरिकन लोकांनी दिलेला प्रतिसाद, हे ट्रम्प यांच्या विजयाचे प्रमुख कारण आहे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचा झालेला ऐतिहासिक विजय हा सहानुभूतीपेक्षा दहशतवादी शक्तींना देशभक्त जनतेने मतपेटीतून दिलेले ते सणसणीत उत्तर होते. तसे ट्रम्प यांचा विजय हा दहशतवादाच्या विरोधात आक्रमक आणि सुस्पष्ट भूमिका घेण्यासाठी ट्रम्प यांना अमेरिकेतील जनतेने दिलेला हा आग्रही कौल आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी रिपब्लिकन पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्याने अनेकांना चांगलाच धक्का बसला आहे. पत्रपंडितांच्या मर्यादा पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत. भारतात दोन वर्षांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या वेळी एका टीव्ही वाहिनीने, भारतातील पहिल्या फळीतले दिल्लीतील १६ संपादक, पत्रकार यांना मतदान आणि मतमोजणी या दोन टप्प्यांच्या मध्ये एका कार्यक्रमात एकत्रित बोलावले होते आणि त्यांना निवडणूक निकालांचे अंदाज विश्‍लेषणासह विचारले होते. यापैकी एकाही पत्रकाराने भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त केला नव्हता. एक अपवाद वगळता सर्वांनी एनडीए मिळून दोनशेतीस ते दोनशेसाठपर्यंत जातील असे आकडे दिले होते. ट्रम्प विजयी होतील, असा अंदाजही कोणीच व्यक्त केला नव्हता. सगळी माध्यमे आणि आपल्यालाच जागतिक विश्‍लेषण अचूक करता येते, अशा तोर्‍यात असलेले भारतातील पत्रपंडित हिलरी क्लिटंनच विजयी होतील, असे पक्के मनात धरून आपले पत्र रंगवीत होते. या सगळ्यांना धक्का बसला. अमेरिकेच्या अध्यक्षपदावर ट्रम्प अगदी पुरेशी आघाडी मिळवून विजयी झाले. आपले अंदाज चुकले, हे मान्य न करता आता भारतातील तथाकथित डावे आणि पुरोगामी आपापल्या लाल पोथ्या काढून ट्रम्प विजयी झाले, तरी भारतातील हिंदुत्ववाद्यांनी खूश व्हायची गरज नाही इथपासून ते ट्रम्प भारतासाठी कसे संकट ठरतील, इथपर्यंत एक भयावह चित्र रंगविण्याच्या नादात आहेत. लोकशाहीचे मूल्य आपण मानतो, असे या लोकांचे ढोंगच होते, हे आता उघड होते आहे.
भारतातील लोकशाहीला जगातील सर्वात मोठी लोकशाही का म्हणतात, याचाही प्रत्यय ट्रम्प यांच्या विजयानंतर सगळ्या जगाला आला. ट्रम्प हे मोठ्या बहुमताने विजयी झाल्यानंतर अमेरिकेतील हिलरी समर्थकांना हा पराभव पचवता आला नाही. सर्व प्रमुख शहरांत ट्रम्प यांच्या विरोधात हे लोक रस्त्यावर येऊन निदर्शने करू लागले. ‘नॉट माय प्रेसिडेंट’ असे म्हणू लागले. भारतातल्या सत्तांतराच्या गावापासून ते देशापर्यंतच्या इतिहासात असे कधीही घडलेले नाही. अगदी सत्तेत असताना कालपर्यंत मस्तवाल लोकसुद्धा दणकून पराभव झाल्यानंतर शक्य तितक्या नम्रपणाचा भाव चेहर्‍यावर आणून म्हणतात की, ‘‘जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे.’’ इथे जनतेच्या एकेकाच्या एका मतातून अगदी रक्ताचा थेंबही न सांडता सत्तांतरे होतात. ती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जातात. जनतेचे मत हे सर्वोपरी मानले जाते. एकदा जनतेने कौल दिला की, त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करण्याचे धाडस इथे कोणी करत नाही. म्हणून भारतातील लोकशाही महान आहे. अटलजींच्या तेरा दिवसांच्या सरकारवरील अविश्‍वास प्रस्तावावर चर्चा चालू असताना लोकसभेत अटलजी बोलत असताना विरोधी सदस्य गोंधळ करू लागले. त्यांना भाजपाचे खासदार उठून ओरडून उत्तर देऊ लागले. तेव्हा लोकसभेचे सभापती गोंधळ शांत करण्याच्या प्रयत्नात भाजपा खासदाराला म्हणाले,
‘‘प्लीज सीट डाऊन, युवर प्राईम मिनिस्टर इज स्पीकिंग.’’ क्षणाचाही विलंब न करता स्व. प्रमोद महाजन आक्षेप घेत म्हणाले, ‘‘व्हॉट इज मीन बाय युवर प्राईम मिनिस्टर? ही इज प्राईम मिनिस्टर ऑफ नेशन.’’
हे फक्त भारतातच होऊ शकते.
ट्रम्प विजयी झाल्यामुळे भारताचा किती फायदा होणार की नाही होणार, हे भविष्यात कळेलच. जसे आता ट्रम्प विजयी झाले म्हणून कोणी अगदी हुरळून जाऊन हवन करणे गरजेचे नाही, तसे कोणी ट्रम्प विजयी झाल्याने भारतावर मोठे संकट येणार असल्याच्या आपल्या हिंदुत्वद्वेषाच्या ओकार्‍याही काढण्याची गरज नाही. ट्रम्प अध्यक्ष झाल्याने एका रात्रीत अमेरिकेचे भारत, पाकिस्तान यांच्याबाबतचे धोरण बदलेल, अशी अपेक्षा करणे बरोबर नाही. पण, म्हणून जागतिक राजकारणात काहीच बदल होणार नाही, असेही नाही.
पूर्वी अमेरिकेने भारत, पाकिस्तान यांना सतत खेळवत राहण्याचा धूर्त उद्योग खूप वर्षे केला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांनी दोन्ही देशांना भेटी द्यायच्या, दोन्ही देशांना संयमाने आणि चर्चेने प्रश्‍न सोडवा, असे फुकटचे सल्ले द्यायचे. जगातल्या कानाकोपर्‍यातला दहशतवाद संपवून टाकू, असे एकीकडे म्हणायचे आणि दुसरीकडे दहशतवाद पोसणार्‍या पाकिस्तानला पैसा, विमाने, शस्त्रास्त्रे, तंत्रज्ञान पुरवायचे; पाकिस्तानने जुजबी दहशतवादी पकडल्याचे नाटक केले की, पाकिस्तानची पाठ थोपटायची, असे उपद्व्याप भरपूर झाले आहेत. मात्र, मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर केवळ भारताची प्रतिमा जगात उंचावली असे नाही, तर दक्षिण आशियातील घटनांकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. व्यक्तिगत संबंधातून, सतत पाकिस्तानचा दहशतवाद जगासमोर मांडून मोदी यांनी जगाची दृष्टी बदलण्याला जगाला भाग पाडले आहे. ट्रम्प विजयी होण्यापूर्वीच अमेरिकेने पाकिस्तानबाबतची आपली भूमिका कठोर केली आहे. ट्रम्प विजयी झाल्यानंतर ओबामांच्या काळातील पाकिस्तानबाबतची ही अमेरिकेची भूमिका बदलण्याची शक्यता नाही आणि बदलली तर ती मवाळ न होता अधिक कडक होण्याचीच शक्यता आहे. हा भारताचा मोठा फायदा आहे.
मुळात ट्रम्प यांच्या विजयाचे विश्‍लेषण केवळ अमेरिकेतील घटनांपुरते मर्यादित नाही. सगळ्या जगाला आयएसआयएस आणि ओसामा बिन लादेन यांसारख्या दहशतवादामुळे जिहादी दहशतवादाचे जे हिंस्र स्वरूप दिसले आहे, त्याची एक तीव्र नापसंतीची प्रतिक्रिया जगाच्या कानाकोपर्‍यात नोंदविली गेली आहे. ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेतील माध्यमांनी रान उठविले, त्यांचे चारित्र्यहनन करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, ट्रम्प यांनी जिहादी दहशतवादाबद्दल जी आक्रमक विधाने केली होती त्याला अमेरिकन लोकांनी दिलेला प्रतिसाद हे ट्रम्प यांच्या विजयाचे प्रमुख कारण आहे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचा झालेला ऐतिहासिक विजय हा सहानुभूतीपेक्षा दहशतवादी शक्तींना देशभक्त जनतेने मतपेटीतून दिलेले ते सणसणीत उत्तर होते. तसे ट्रम्प यांचा विजय हा दहशतवादाच्या विरोधात आक्रमक आणि सुस्पष्ट भूमिका घेण्यासाठी ट्रम्प यांना अमेरिकेतील जनतेने दिलेला हा आग्रही कौल आहे.
ट्रम्प यांनी अमेरिकेतील रोजगाराबाबत व्यक्त केलेली मते आणि बाहेरून येणार्‍या नागरिकांना द्यावयाच्या व्हिसाबाबत मांडलेले मत, याचा बाऊ करत काही जण या दोन्ही गोष्टी भारतीयांना प्रतिकूल ठरतील, असे भडक चित्र रंगविण्याच्या प्रयत्नात आहेत. भारतीयांनी आपल्या कष्टाने आणि बुद्धिमत्तेने जगाच्या कानाकोपर्‍यात आपले स्थान निर्माण केले आहे. शिवाय भारत ही एक एकशेवीस कोटींची बाजारपेठ आहे. पोखरणच्या अणुचाचणीनंतर भारतावर अमेरिकेसकट अनेक देशांनी घातलेले आर्थिक निर्बंध भारतावर काही परिणाम करण्यापेक्षा निर्बंध घालणार्‍या देशांवरच विपरीत परिणाम करू लागले, तेव्हा सर्व देशांनी, भारताने मागणी न करताही हे निर्बंध स्वतःच उठविले. भारतीयांची ही ताकद आणि स्थान लक्षात घेता, ट्रम्प आणि भारत संबंधाबाबत जो बाऊ केला जात आहे तो मुद्दाम ठरवून ओढूनताणून केलेला वाटतो.
ट्रम्प यांनी इस्लामिक दहशतवादाबाबत कठोर भूमिका वेळोवेळी घेतली आहे. ट्रम्प विजयी होताच पाकिस्तानातील राजकीय विश्‍लेषकांनी पाकिस्तानला ही घटना जड जाणार, असे विश्‍लेषण केले आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबाबत सुधारणा, हा ट्रम्प यांचा एक कार्यक्रम असणार आणि त्यामध्ये आऊटसोर्सिंगवर तसेच अमेरिकेत बाहेरून येणार्‍यांवर बंधने आणतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. अर्थव्यवस्था हे आता बाजारपेठांचं युद्ध आहे. अमेरिकेचा पहिल्या क्रमांकाचा स्पर्धक आता चीन आहे. चीनला विरोध करताना भारताला दुखावणे अमेरिकेला परवडणारे नाही. चीनवर दबाव आणताना कोणत्याही मुत्सद्देगिरीत चीनच्या शेजारी देशाशी चांगले संबंध ठेवणे, हे प्राथमिक समीकरण असते. त्यामुळे भारताशी चांगले संबंध ठेवणे क्रमप्राप्त ठरेल. शिवाय सव्वाशे कोटींची बाजारपेठ असलेल्या भारताला दुखावणे सहजशक्य होणार नाही. या गोष्टीही लक्षात घेणे आवश्यक आहे.
ट्रम्प आणि त्यांची मुलगी इवांका यांनी नेहमी हिंदूंबद्दल चांगले मत व्यक्त केले आहे. इवांकाने तर हिंदूंनी जगाला शांतता शिकविली आहे, असे विधान केले होते. दिवाळी मंदिरात साजरी करण्यापर्यंत ही अनुकूलता दर्शविली होती. भारतातील हिंदुत्वविरोधकांना यामुळे ट्रम्प यांच्या विजयाची पोटदुखी जास्त आहे. ट्रम्प यांच्यावर ते उजवे असल्याचा शिक्का मारून त्यांची नकारात्मक प्रतिमा उभी करण्याचा या लोकांचा प्रयत्न आहे. मोदींना जितके शिव्याशाप दिले तितके ते उलटतच गेले. तसे ओढूनताणून ट्रम्प यांच्याबाबत प्रतिकूल विश्‍लेषण केले जात आहे. ट्रम्प यांच्या विजयाने कंप सुटणे हे यांच्या विश्‍लेषणक्षमतेचे, बुद्धिमत्तेचे निदर्शक नाही, तर कोत्या संकुचित वैचारिक अभिनिवेशाचे निदर्शक आहे.

शेअर करा

Posted by on Nov 12 2016. Filed under उपलेख, बाळ अगस्ती, संपादकीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उपलेख, बाळ अगस्ती, संपादकीय (842 of 885 articles)


गेल्या चार-पाच दिवसांत सर्व काही उलटेपालटे झाले आहे. निशाचर वटवाघळे स्वत:ला झाडांना उलटे टांगून घेतात म्हणे. इथे तथाकथित विद्वानांना, राजकीय ...