ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक » ठळक बातम्या, पुसट बातम्या…

ठळक बातम्या, पुसट बातम्या…

भाऊ तोरसेकर |

वाहिन्या असोत किंवा वर्तमानपत्र असो, त्यात बातम्या कमीअधिक प्रमाणात सारख्याच असतात. पण, आपापल्या अजेंडानुसार काही बातम्या ठळक केल्या जातात, तर काही बातम्या पुसट केल्या जातात. ठळक याचा अर्थ, तुम्ही कितीही टाळलीत तरी ती बातमी तुमच्या नजरेतून निसटू शकणार नाही, अशा रीतीने पेश केली जात असते आणि पुसट बातमी म्हणजे तुम्ही शोधून काढल्याशिवाय तुमच्या हाती लागणार नाही, अशी बातमी. तर यातून अजेंडा पुढे सरकवला जात असतो. तो अजेंडा अर्थातच पक्षीय राजकारणाचा असतो. म्हणजे असे, की कुठल्या पक्षाला कुठल्या बातमीचा लाभ वा तोटा होऊ शकतो, याला प्राधान्य देऊनच बातम्या पुसट वा ठळक केल्या जात असतात. उदाहरणार्थ- भाजपाचे आमदार राम कदम यांची जीभ घसरली व त्यांनी काही अतिशयोक्त विधान केले, तर त्याला ठळक प्रसिद्धी देऊन गहजब करायचा. मग विषय कुठलाही असो. भाजपाचा नेता कैचीत पकडला, की त्या पक्षाला तोंड देताना दमछाक होते. अर्थात नेता कुठल्याही पक्षाचा असो, त्याने चूक केली तर त्याचा कान पकडलाच पाहिजे. पण, चूक कुणाची आहे, त्यानुसार पक्षपात होता कामा नये. तसे होऊ लागले मग समजावे, हा अजेंडा आहे. महिला-मुलींविषयी राम कदम चुकले असतील, तर त्यांचा कडाडून निषेध व्हायला हवा. पण, ते भाजपाचे आमदार आहेत म्हणून कैचीत पकडले जाता कामा नयेत; तर त्यांच्या महिलाविषयीच्या चुकीच्या वक्तव्यासाठी त्यांचा कान पकडला पाहिजे. मग तसेच काही गैरलागू वक्तव्य किंवा कृत्य, अन्य कुठल्याही पक्षाच्या वा संघटनेच्या नेत्याकडून झाले, तरी त्यालाही तितक्याच अगत्याने रोखले पाहिजे व फैलावर घेतले पाहिजे. ते काम ठळक बातम्या करीत असतात. पण, जो निकष वा नियम हिंदू वा भाजपाच्या नेत्यांसाठी लावला जातो, तो अन्य धर्मीय वा पक्षांसाठी लावला जातो काय?
उदाहरणार्थ- केरळातील ख्रिश्‍चन साधक महिला म्हणजे नन यांनी एका वरिष्ठ धर्मगुरूविषयी बलात्काराची तक्रार केलेली आहे; तर त्याबद्दलच्या बातम्या तुम्हाला शोधून काढाव्या लागतील. घटनेला अडीच महिने गेल्यावर गदारोळ सुरू झाला. कारण माध्यमांची निष्क्रियता. तिथला सत्ताधारी पक्ष मार्क्सवादी आहे आणि त्यांच्याही एका नेत्यावर राम कदम यांच्यासारखेच गैरलागू वक्तव्य केल्याचा आक्षेप आहे. मग त्या विषयीच्या बातम्या पुसट कशाला होतात? कदमांची बातमी राष्ट्रीय बातमी होते आणि मार्क्सवादी आमदाराची बातमी दुर्लक्षित कशाला ठेवली जाते? या आमदाराने त्या नन म्हणजे ख्रिश्‍चन धर्मातील साध्वींना चक्क वेश्या म्हणून हिणवलेले आहे, तर त्याच्याविषयी नाजूक भूमिका घेतली जाते. कदमांना भाजपा कधी शिक्षा देणार म्हणून बातमीतच सवाल केला जातो. त्यांचे विधान बोलले जाण्यापासून २४ तासांच्या आत कारवाईसाठी बातम्याच आग्रह धरू लागतात. मार्क्सवादी आमदार असली मुक्ताफळे उधळून कित्येक आठवडे लोटले आहेत, पण कुठली वाहिनी वा वर्तमानपत्र कारवाईचा आग्रह धरताना दिसणार नाही. रामरहिम वा आसाराम यांच्यावर आरोप होताच, त्यांना कधी अटक होणार म्हणून जाब विचारणे सुरू होते. या बिशप वा ख्रिश्‍चन धर्मगुरूवर खुद्द पीडितेनेच आरोप केला आहे व तक्रारही केली आहे. त्याला दोन-तीन महिने उलटून गेल्यावरही साधी पोलिस चौकशीही सुरू होऊ शकलेली नाही. हा पक्षपात नजरेत भरणारा नाही काय? हे त्या त्या पक्षाच्या नेतृत्वाने वा संघटनेने केले तर समजू शकते. त्यांची बाजू लंगडी असते. पण, वर्तमानपत्र, वाहिन्या व पत्रकारांची अशी कुठली लाचारी असते, की त्यांना भाजपाबाबत कठोर व्हावे लागते? किंवा अन्य धर्मीय वा पक्षीय असतील तर नरम व्हावे लागते? ही बाब आता लपून राहिलेली नाही. भले, तिथे बसलेल्यांना ठळक व पुसट बातमी करून आपण पुरोगामी अजेंडा रेटत असल्याचे समाधान मिळत असेल, पण सामान्य लोक आता तितके बुद्धू राहिलेले नाहीत.
मागील काही वर्षांत मुख्य प्रवाहातील माध्यमांची विश्‍वासार्हता त्यामुळेच रसातळाला गेलेली आहे. खर्‍या पत्रकारितेपेक्षाही सोशल माध्यमांचा वरचष्मा त्यामुळेच वाढलेला आहे. यातल्या गमतीजमती किंवा भेदभाव सोशल मीडिया नसताना तर लपवला जात होता. अलीकडे अशी बारीकशीही बातमी कुठे हाती लागली, तर सोशल मीडियातून ती तत्काळ जगभर जाऊन पोहोचत असते. तेवढेच नाही, तर माध्यमांचा पक्षपातीपणा अशा लहानसहान बातम्यांतून चव्हाट्यावर आणला जात असतो. जाबही विचारला जातो. आपला खोटेपणा लपवता येणे अशक्य झाल्याने, या चोरांनी आता ‘ट्रोल’ नावाचा एक शब्द वापरात आणला आहे. यांच्या असल्या चोर्‍या वा लपवाछपवी चव्हाट्यावर आणणार्‍या सोशल मीडियातील जागरूक वाचक नागरिकांना ट्रोल म्हणून हिणवायला आरंभ केला आहे. त्याचा अर्थ असा की, यांनी वाटेल तो खोटारडेपणा बेछूट करीत राहावे, पक्षपाती बातम्यांची पेरणी करावी, पण त्यांना कोणी त्या विषयी जाब विचारता कामा नये. त्यांच्या खोटेपणा व भेदभावालाच न्याय समजून निमूट सहन करावे, असा आग्रह आहे. नसेल, तर तुमच्यावर ट्रोल म्हणून शिक्का मारून बेशरमपणा केला जातो. ज्या सोशल मीडियाची सेवा पुरवणार्‍या कंपन्या वा संस्था आहेत, त्यांच्याकडे सामूहिक रीतीने तक्रार करून सोशल मीडियाची खाती बंद करण्याचे डाव खेळले जात असतात. अर्थात, त्यापासून त्यांनाही पर्याय उरलेला नाही. अशा लोकांच्या अजेंडा पत्रकारितेने त्यांच्या हाती असलेल्या प्रभावी प्रसारमाध्यमांची विश्‍वासार्हता रसातळाला गेलेली आहे आणि ती टिकवण्यासाठी अशा अजेंडा संपादकांना वा पत्रकारांना नारळ देण्याखेरीज मीडिया हाऊसेसना पर्याय उरलेला नाही. मग अशा आपल्या नाकर्तेपणाचे खापर मोदी सरकारवर फोडून आणखी कांगावा केला जात असतो. अशा अनेक बेकारांनी आता पोर्टल वेबसाईट सुरू करून, तोच धंदा पुढे चालविला आहे.
२००२ सालात गुजरात दंगल झाली तेव्हापासून २०१४ पर्यंत त्याचे शेपूट पकडून, मिळतील तिथे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना तेच तेच प्रश्‍न विचारून हैराण करणारे पत्रकार काय वेगळे करीत होते? तेच काम आता त्यांना प्रश्‍न विचारणारे करीत असतात. अशा दिवट्यांनी मोदी वा भाजपा नेत्यांना दंगलीविषयी सातत्याने तेच तेच प्रश्‍न विचारणे किंवा बेछूट आरोप ही पत्रकारिता असते. मात्र, तसेच प्रश्‍न सामान्य लोकांनी, वाचकांनी सोशल मीडियातून विचारून भडिमार केला, तर ट्रोलिंग असते. कारण आता अजेंडा पत्रकारिता उघडीनागडी होऊन गेली आहे. पण, आपल्या भ्रमात जगणार्‍यांना अजून शुद्ध आलेली नाही. अशाच दिवाळखोरीने ‘टाइम्स नाऊ’ वा ‘रिपब्लिक’ या वाहिन्यांना लोकप्रियता लाभलेली आहे. कारण भाजपा असो किंवा अन्य कुठलाही पक्ष वा नेता, त्याला सारखेच कैचीत पकडण्याची जागरूकता या वाहिन्यांनी दाखवली आहे. ज्यांना तसा विवेक राखता आलेला नाही, त्यांचा बोर्‍या वाजला आहे. भाजपा वा हिंदुत्वावर टीका म्हणजेच पत्रकारिता, असल्या खुळेपणात रमणार्‍यांचा मूर्खपणा ज्यांना सोडता येणार नाही, त्यांना नामशेष होण्याखेरीज गत्यंतर नाही. गळचेपी वा अघोषित आणिबाणी, असला कांगावा त्यांना वाचवू शकणार नाही. तोच अजेंडा रेटून त्यांच्या पोर्टल वा वेबसाईटही जीव धरू शकणार नाहीत. रघुराम राजन यांनाही सत्य बोलणे भाग पडलेले आहे आणि त्यातून नोटबंदी वा एनपीए यांवरून गाजावाजा करणार्‍या पत्रकारितेचे थोबाड फुटलेले आहे. राजन यांच्या खुलाशाने केवळ काँग्रेस, युपीए, मनमोहनसिंग, चिदम्बरम् यांचेच वस्त्रहरण झालेले नाही, तर गेली दोन वर्षे खोटेपणाचा कळस करीत मोदी सरकारला मल्ल्या, नीरव मोदी वा अर्थव्यवस्थेवरून ट्रोल करणारी पत्रकारिताही गोत्यात आणली गेली आहे. त्यातून आपल्याला वाचवावे किंवा नाही, हे त्यांनीच ठरवायचे आहे. कारण आता सोशल मीडिया हे सामान्य नागरिकाच्या हाती सापडलेले भेदक हत्यार त्यांना रोखायला समर्थ झालेले आहे!

https://tarunbharat.org/?p=62000
Posted by : | on : 16 Sep 2018
Filed under : उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक (617 of 1519 articles)


लष्कराला ‘सर्जिकल स्ट्राईक्स’चे पुरावे मागणारे राहुल गांधी यांचा, विजय मल्ल्याच्या एका वाक्यावर एकदम विश्‍वास बसला आहे. हजारो कोटी रुपयांचा घोटाळा ...

×