ads
ads
तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

►हवाईदल प्रमुख धानोआ यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

►६८ टक्के लाभार्थ्यांनी घेतला फायदा, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

►एनआरसीमध्ये समावेश करण्याचा मुद्दा, गुवाहाटी, १८ नोव्हेंबर – राष्ट्रीय…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

१३ विधेयके सादर होणार

१३ विधेयके सादर होणार

►आजपासून मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ►मराठा आरक्षणाचे विधेयकही सादर…

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

►पुणे पोलिसांचा न्यायालयात दावा ►आठ दिवसांची पोलिस कोठडी, पुणे,…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:35 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक » तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी…

तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी…

श्यामकांत जहागीरदार |

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष मुत्तुवेल करुणानिधी यांना संसदेच्या दोन्ही सभागृहांनी बुधवारी श्रद्धांजली वाहिली आणि करुणानिधी यांच्या सन्मानार्थ दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. कोणीही म्हणेल यात आश्‍चर्य ते काय? मात्र यात आश्‍चर्य आहे. ते म्हणजे करुणानिधी संसदेच्या कोणत्याच सभागृहाचे कधीच सदस्य नव्हते!
सामान्यपणे दोन्ही सभागृहातील विद्यमान वा माजी सदस्याचे निधन झाले, तर त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. त्यातही विद्यमान सदस्याचे निधन झाले असेल, तर श्रद्धांंजली वाहून त्या सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले जाते. माजी सदस्यांचे निधन झाले असेल, तर श्रद्धांजली वाहून कामकाज सुरू ठेवले जातेे. मात्र, करुणानिधी यांच्यासाठी हा नियम शिथिल करण्यात आला. संसदेच्या कोणत्याच सभागृहाचे सदस्य नसताना संसदेने श्रद्धांंजली वाहण्याचा बहुमान आतापर्यंत फार मोजक्या मान्यवरांना मिळाला, त्यात करुणानिधी यांचा समावेश झाला आहे. आतापर्यंत लोकनायक जयप्रकाश नारायण, आचार्य विनोबा भावे तसेच जनरल अरुणकुमार वैद्य यांना संसदेने श्रद्धांंजली वाहिली होती. करुणानिधी यांच्या निधनाने दक्षिण भारताच्या राजकारणातील एक मोठे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. आधी जयललिता आणि आता करुणानिधी यांच्या निधनाने तामिळनाडूच्या राजकारणात प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे. तामिळनाडूचे राजकारण नेहमीच द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन प्रादेशिक पक्षांभोवतीच फिरत राहिले आहे. सुरुवातीचा काही काळ तामिळनाडूच्या राजकारणात काँग्रेसचा थोडाफार प्रभाव होता, पण नंतर द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पक्षांनी राज्याच्या राजकारणात आघाडी घेतली, ती मात्र कधीच काँग्रेसला मोडून काढता आली नाही. भाजपाची स्थितीही यापेक्षा वेगळी नव्हती.
सामान्यपणे तामिळनाडूत आलटूनपालटून द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांची सत्ता राहिली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांनी आपल्या फायद्यासाठी कधी काँग्रेसशी तर कधी भाजपाशी आघाडी केली. मात्र, ही आघाडी फक्त केंद्राच्या राजकारणापर्यंतच मर्यादित ठेवण्याचे पथ्य या दोन्ही पक्षांनी पाळले. त्यामुळे तामिळनाडूत काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही राष्ट्रीय पाातळीवरील पक्षांना कधीच आपले हातपाय पसरता आले नाही. संपुआ सरकारमध्ये द्रमुक सहभागी झाला, तसेच अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील रालोआच्या सरकारमध्येही द्रमुकचा सहभाग होता. हीच स्थिती जयललिता यांच्या अण्णाद्रमुकची होती. या दोन्ही नेत्यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी भाजपा आणि काँग्रेस यांचा सोयिस्कर वापर करून घेतला. यासाठी या दोन्ही पक्षांना दोष देता येणार नाही. कारण त्या वेळी भाजपा आणि काँग्रेस यांची तशी राजकीय गरजही होती.
करुणानिधी यांचा मृत्यू हा तसा धक्कादायक म्हणता येणार नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. द्रमुकचे अध्यक्ष असले तरी सक्रिय राजकारणातून त्यांनी जवळपास निवृत्ती घेतली होती. आपल्या मुलाला- एम. के. स्टॅलिन याला त्यांनी आपला उत्तराधिकारी घोषित केले होते. यावरून त्यांच्या कुटुंबात वादंगही माजले होते. पण, स्टॅलिन यांनी आपल्या हुशारीने द्रमुकची सूत्रे हातात घेतली, द्रमुकवर आपली पूर्ण पकड बसवली आहे. आता बापसे बेटा सवाई सिद्ध करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे.
करुणानिधी यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी चेन्नईला गेले. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला करुणानिधी यांच्या निधनाची दखल घ्यावी लागली, यात त्यांचे मोठेपण सामावले आहे. दक्षिण भारतातील विशेषत: आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूच्या राजकारणाचे वेगळेच वैशिष्ट्य आहे. त्यातही तामिळनाडूच्या राजकारणावर पूर्णपणे चित्रपट अभिनेत्यांचा प्रभाव आहे. करुणानिधी चित्रपट कथालेखक होते, तर एम. जी. रामचंद्रन आणि नंतर त्यांच्या उत्तराधिकारी बनलेल्या जयललिता हे तामीळ चित्रपटातील प्रचंड लोकप्रिय असे नायक आणि नायिका होते.
तामिळनाडूच्या नेत्यांच्या लोकप्रियतेचा अन्य सर्व राज्यातील तसेच केंद्रातील नेत्यांनाही नेहमीच हेवा वाटत राहिला आहे. एम. जी. रामचंद्रन, जयललिता आणि करुणानिधी यांना जेवढी लोकप्रियता मिळाली तेवढी राष्ट्रीय राजकारणात आपली पूर्ण हयात घालवलेल्या नेत्यांनाही कधी मिळाली नाही. त्यामुळे आपल्या नेत्याचा मृत्यू झाला तर तामिळनाडूची जनता शब्दश: वेडीपिशी होते. अनेक समर्थक आत्महत्याही करतात. हे चूक की बरोबर हे सांगणे कठीण आहे, पण ही तामिळनाडूच्या राजकारणातील वस्तुस्थिती म्हणावी लागेल. द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे तामिळनाडूच्या राजकारणातील दोन प्रमुख पक्ष असले, तरी ते एकमेकांचे तेवढेच कट्टर विरोधकही आहेत. एकेकाळी तामिळनाडूत द्रमुक हा एकमेव पक्ष होता. अण्णादुराई यांच्या निधनानंतर करुणानिधी यांनी द्रमुकचे नेतृत्व स्वत:कडे घेतले. करुणनिधींच्या नेतृत्वात एम. जी. रामचंद्रन यांची द्रमुकमध्येे घुसमट होत होती, त्यामुळे त्यांनी द्रमुकमधून बाहेर पडत अण्णाद्रमुक हा स्वत:चा वेगळा पक्ष काढला. पुढे या दोन्ही पक्षांतील खुन्नस वाढत गेली.
चेन्नईच्या मरिना बीचवर अण्णादुराई, एम. जी. रामचंद्रन आणि जयललिता यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले, मात्र याच रांगेत करुणानिधी यांचा अंत्यसंस्कार करण्यास राज्य सरकारने नकार दिला. त्यामुळे स्टॅलिन यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर मरिना बीचवर करुणानिधी यांच्या अंत्यसंस्काराचा मार्ग मोकळा झाला.
तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद पाचवेळा भूषवणार्‍या करुणानिधी यांनी सलग ५० वर्षे द्रमुकचे अध्यक्षपद भूषवण्याचा विक्रमही केला आहे. करुणानिधी १३ वेळा विधानसभेवर निवडून आले, हाही एक विक्रमच म्हणावा लागेल. हे दोन्ही विक्रम अन्य नेत्याच्या नावावर नाहीत. वयाच्या ८२ व्या वर्षी म्हणजे २००६ मध्ये करुणानिधी तामिळनाडूचे पाचव्यांदा मुख्यमंत्री झाले. २०११ द्रमुकचा पराभव करत जयललिता यांचा अण्णाद्रमुक सत्तेवर आला. २०११ मध्ये करुणानिधी स्वत: तर जिंकले, पण त्यांच्या पक्षाला फक्त २२ जागांवर समाधान मानावे लागले. २०१६ ची निवडणूक करुणानिधी लढलेच नाहीत.
तामिळनाडूच्या राजकारणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तेथील नेत्यांवर मग त्या जयललिता असो की करुणनिधी, यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. अटक व नंतर खटलेही चालवण्यात आले, पण याचा जयललिता असो की करुणानिधी, यांच्या लोकप्रियतेवर कधी परिणाम झाला नाही. त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच गेली. जयललिता आणि करुणानिधी या दोघांनीही आपापली सत्ता असताना एकदुसर्‍यावर राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली.
तामिळनाडूच्या राजकारणात आता मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आधी जयललिता यांचे निधन झाले, त्यानंतर करुणनिधी यांचे. या दोन्ही नेत्यांची बरोबरी करेल, असा एकही नेता आज द्रमुक वा अण्णाद्रमुक पक्षात नाही. त्यामुळे द्रमुक वा अण्णाद्रमुक पक्षाचे काय होणार, हा तामिळनाडूच्या राजकारणातील मोठा गंभीर प्रश्‍न झाला आहे. रजनीकांत आणि कमल हसन या लोकप्रिय चित्रपट अभिनेत्यांनी आपले राजकीय पक्ष काढले आहेत. मात्र, हे दोन्ही करुणानिधी आणि जयललिता यांची जागा कधी घेऊ शकतील, असे वाटत नाही.
या दोन्ही पक्षांची ताकद द्रमुक वा अण्णाद्रमुकला आव्हान देण्याइतपत नाही. त्यामुळे आता संधीचा फायदा काँग्रेस आणि भाजपा या राष्ट्रीय पक्षांनी उचलला पाहिजे. तामिळनाडूत आपली ताकद वाढवण्याची चांगली संधी या दोन्ही पक्षांना चालून आली आहे. प्रादेशिक राजकारणाच्या अस्मितेतून तामिळनाडूची सुटका केली पाहिजे. मात्र, यासाठी या दोन्ही राष्ट्रीय पातळीवरील पक्षांना द्रमुक वा अण्णाद्रमुक यांचा पदर धरावाच लागणार आहे, त्याशिवाय कोणताही पर्याय त्यांच्यासमोर नाही.

https://tarunbharat.org/?p=59418
Posted by : | on : 9 Aug 2018
Filed under : उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक (336 of 1333 articles)


इमरान खान यांच्या नेतृत्वातील ‘पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ’ अर्थात पीटीआय या पक्षाला सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यामुळे पीटीआयचेच सरकार स्थापन होईल ...

×