ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » उपलेख, रविंद्र दाणी, संपादकीय, स्तंभलेखक » तामिळनाडूत आता नवी समीकरणे!

तामिळनाडूत आता नवी समीकरणे!

रवींद्र दाणी |

करुणानिधी व जयललिता हे तामिळनाडूच्या राजकीय रंगमंचावरील दोन महानायक! परस्परांचे कट्टर राजकीय शत्रू. करुणानिधी समर्थकांनी विधानसभेत जयललितांचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. त्याचा बदला जयललिताने, करुणानिधींना मध्यरात्री झोपेतून जागे करून, अटक करून चुकविला होता. आता हे दोन्ही महानायक काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर, तामिळनाडूच्या राजकीय रंगमंचावर कोणत्या कलाकारांचा प्रवेश होतो, हे दिसणार आहे.
निर्णायक भूमिका
देशात संमिश्र सरकारांचे युग असताना, तामिळनाडूने निर्णायक भूमिका बजावली आहे. वाजपेयींच्या सरकारला बहुमत दिले जयललिताने आणि ते सरकार पाडले तेही जयललितानेच. युपीए सरकारमध्येही तामिळनाडूने महत्त्वाची भूमिका बजावली होती. राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाच्या भूमिका बजावणार्‍या तामिळनाडूत राष्ट्रीय राजकीय पक्षांची भूमिका मात्र नेहमीच दुय्यम राहिली आहे. काँग्रेसने कधी द्रमुक, तर कधी अण्णाद्रमुक यांच्यासोबत युती केली. भाजपाने या राज्यात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न तर केला, पण अद्याप तिला फारसे यश मिळालेले नाही. राज्यात प्रादेशिक पक्षांचा दबदबा राहिला आहे.
स्टॅलिन वारसदार
करुणानिधीचे सुपुत्र स्टॅलिन हे द्रमुकचे नवे नेते राहणार आहेत. रशियन हुकुमशहा जोसेफ स्टॅलिनच्या मृत्यूनंतर चार दिवसांनी करुणानिधी यांना लाभलेल्या या मुलाचे नाव त्यांनी स्टॅलिन ठेवले. स्टॅलिनसोबत अजागिरी व मुलगी कनिमोझी हे अन्य दोघे राजकारणात आहेत. मात्र, पक्षावर पकड स्टॅलिनची राहिली आहे. स्टॅलिनने काँग्रेसशी युती करण्याचा स्पष्ट संकेत दिला आहे. या युतीत आता कमल हसन सामील होऊ शकतात. कमल हसन यांची तामिळनाडूत चांगली लोकप्रियता आहे. त्याचा फायदा या युतीला मिळू शकतो.
अण्णाद्रमुक
तामिळनाडूत अण्णाद्रमुकचे सरकार असले, तरी त्या पक्षाजवळ आता नेता नाही. राज्य सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या चिखलात अडकलेले आहे. संपूर्ण पक्ष व सरकार दोन गटात विभागले गेले आहे. अशा स्थितीत २०१९ मध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जायचे, हा एक मोठा प्रश्‍न अण्णाद्रमुकसमोर राहणार आहे. आज अण्णाद्रमुकमध्ये फूट पडली नाही, याचे कारण म्हणजे या सरकारला मोदी सरकारचा पाठिंबा आहे. केवळ या एका कारणामुळे सध्या हा पक्ष कायम आहे. जलललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकला भवितव्य नाही, असे साधारणत: मानले जाते.
रजनीकांतची भूमिका
अभिनेता रजनीकांतची भूमिका हाही एक महत्त्वाचा घटक ठरणार आहे. रजनीकांत यांची लोकप्रियता कमल हसन यांच्यापेक्षा जास्त आहे. रजनीकांत यांचा ओढा भाजपाकडे असू शकतो. पण, केवळ त्यांच्या लोकप्रियतेवर राज्यात भाजपाला फार मोठी कामगिरी बजावता येणार नाही.
तामिळनाडूत लोकसभेच्या ४० जागा आहेत. आंध्रप्रदेशच्या विभाजनानंतर तामिळनाडू हे दक्षिणेतील सर्वात मोठे राज्य ठरले आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहता, तामिळनाडू पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे.
राफेलचा मुद्दा
राफेलचा मुद्दा गाजणार, असा अंदाज या स्तंभात वर्तविण्यात आला होता. त्यानुसार काँग्रेस पक्षाने राफेलचा मुद्दा जोरात उपस्थित करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत माजी सरंक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांनी या सौद्याचे सारे पैलू सांगितले. अँटोनी म्हणजे काँग्रेसचे मनोहर पर्रीकर! अँटोनी यांची प्रतिमा स्वच्छ राहिलेली आहे. त्यांनी बैठकीत माहिती दिल्यानंतर दुसर्‍या दिवशी काँग्रेस कार्यकर्त्यांनी, सरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. लगेच अरुण शौरी, यशवंत सिन्हा यांनी एक पत्रपरिषद घेत राफेलचा मुद्दा उपस्थित केला आणि शुक्रवारी या प्रश्‍नावर संसदेत गदारोळ होत, या सौद्याची चौकशी करण्यासाठी एक संयुक्त सांसदीय समिती नेमण्याची मागणी पक्षाने केली. काँग्रेसने, राफेललाच बोफोर्स करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे दिसते. या सार्‍या वादात केंद्रबिंदू फ्रान्सची डसाल्ट कंपनी नाही, तर भारतातील रिलायन्स कंपनी ठरत आहे. त्याहीपेक्षा अनिल अंबानी हा एक केंद्रबिंदू ठरत आहे.
तीन प्रश्‍न
राफेल सौद्यात तीन प्रश्‍न विचारले जात आहेत. पहिला प्रश्‍न आहे किमतीचा. प्रारंभी विमानांची किंमत ६०० कोटी असताना नंतर ती १६०० कोटी कशी झाली? दुसरा प्रश्‍न, रिलायन्सचे आगमन कसे झाले? आणि तिसरा प्रश्‍न, प्रारंभी १२६ विमानांचा सौदा असताना, फक्त ३६ विमानांचा सौदा कसा करण्यात आला? सरकारने सार्‍या तांत्रिक बाबी बाजूला सारून, याचे स्पष्टीकरण करून टाकावे, जेणेकरून काँग्रेसला या सौद्यावर बोट ठेवता येणार नाही.
तलाक विधेयक
ट्रिपल तलाक विधेयक या अधिवेशनात पारित होऊ शकले नाही. सरकारने विधेयकात काही दुरुस्त्या केल्या आहेत. त्यानंतर विधेयक पारित होईल, असे मानले जात होते. त्यासाठी आवश्यकता पडल्यास, अधिवेशनाचा कालावधी वाढविला जाईल, असेही संकेत सरकारमधून दिले जात होते. मात्र, गोंधळ- गदारोळात तलाक विधेयक पारित करणे योग्य ठरणार नाही, असा समंजस विचार सरकारने केला आणि विधेयक पारित न होता अधिवेशनाची समाप्ती झाली. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन काहीही कामकाज न होता संपले होते. त्या तुलनेत या अधिवेशनात थोडेफार कामकाज होऊ शकले. आता हे अधिवेशन या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन असेल की एक हिवाळी अधिवेशन होईल, असा एक प्रश्‍न विचारला जात आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, संसदेचे हिवाळी अधिवेशन होईल. त्यात लेखानुदान मागण्या पारित करून नंतर निवडणुकींची घोषणा होईल. डिसेंबर महिन्यात निवडणुका न होण्याचे आणखी एक कारण म्हणजे, निवडणूक आयोगाच्या तयारीचा अभाव. आयोगाजवळ, व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल- व्हीव्हीपीएटी उपकरणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यानंतर जानेवारी महिन्यात अलाहाबादला कुंभमेळा आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षाव्यवस्था करावी लागेल. जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिन
सोहळा असतो. यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या सार्‍या घटना पाहता, लोकसभा निवडणूक मार्च महिन्यात होण्याची चिन्हे आहेत. त्यासोबतच मध्यप्रदेश, राजस्थान व अन्य राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेतल्या जातील.

https://tarunbharat.org/?p=59704
Posted by : | on : 13 Aug 2018
Filed under : उपलेख, रविंद्र दाणी, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, रविंद्र दाणी, संपादकीय, स्तंभलेखक (615 of 1418 articles)

Pm Modi Indian Flag
संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यात मोदीजी कमालीचे यशस्वी ठरले आणि तेही, ना आँख झुका ...

×