ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » उपलेख, श्याम पेठकर, संपादकीय, स्तंभलेखक » तुम्ही डिजिटल संन्यास घेताय का?

तुम्ही डिजिटल संन्यास घेताय का?

श्याम पेठकर |

अलीकडे खूप अस्वस्थ वाटतं. चिडचिड होते. संतापही येतो. आपल्याविरुद्ध कटकारस्थानं चाललीय्, असं वाटतं. आपल्याबद्दल कुणीच सकारात्मक विचार करत नाही, आपले कुणी मित्र नाहीत, असंही वाटतं… हे मनोगत नाही. ही समूहाची आंतरिक भावना आहे, मात्र ते व्यक्तींनाही लागू होतं. अर्थात, व्यक्तींचाच समूह होतो म्हणून मग समूहाचे जे काय अवतार असतात ते व्यक्तींच्या सबकॉन्शस माईंडचीच निर्मिती असते. आपल्या अस्वस्थतेची कारणं माणसं आता शोधू लागली आहेत. आपल्या मनात ही जी काय उलथापालथ, घालमेल होत आहे, त्याची नेमकी कारणं शोधायला लागलीत माणसं. ही कारणं वैयक्तिक आयुष्यात शोधली जातात. कुठे काही चुकलं काय? कुणाचं चुकलं? की आपल्यातच काही दोष निर्माण झाला आहे… असे असंख्य प्रश्‍न डोक्यात पिंगा घालायला लागतात. कारण ही अस्वस्थता मानवी असते आणि ती मानवी संबंधातूनच येत असते. कुणीच आपलं नाही अन् आपल्या विरोधात कटकारस्थाने सुरू आहेत, या भावनेतून आजूबाजूला वावरणार्‍या माणसांबद्दल उगाच संशय निर्माण होत राहतो. त्यातून पुन्हा अस्वस्थता काळ, काम, वेगाने वाढत जाते. ही स्किझोफ्रनिक अवस्था आहे. वाईट आहे हे…
मात्र हे खरेच आहे की, अशी अस्वस्थतेची अवस्था हा साधारण सार्वजनिक भाव होतो आहे. त्याची कारणं प्रत्यक्ष आयुष्यात शोधली जातात, कुटुंब, आप्त, स्नेही यांच्यात शोधली जातात अन् गुंता अधिकच वाढत जातो. सारेच कसे नकोसे वाटू लागते. कुणाला भेटू नये, कुणाशीच बोलू नये, असे वाटायला लागते. नॉशिया निर्माण होतो. हे जहर आता सपाट्याने पसरू लागले आहे. त्याची नेमकी कारणं ज्यांना सापडतात ते मग ऑफलाईन होऊ लागले आहेत. आपल्या नैसर्गिक आयुष्यात काहीच गडबड नाही. जी काय गडबड आहे ती भासमान आयुष्यात होते आहे. आता आपण समांतर अशी दोन आयुष्यं जगायला लागलो आहोत. एक सामान्य जीवन आहे आणि दुसरे हे भासमान आयुष्य आहे. त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वात दुभंग निर्माण होतो आहे. भासमान आयुष्य हे ऑनलाईन आहे. त्यामुळे ऑफलाईन आयुष्यात मोठी ढवळण आली आहे. ऑनलाईन जे कोण मित्र म्हणून जोडले जातात अन् मग शत्रू वाटू लागतात, त्यांना आपण कधी भेटलोदेखील नसतो. त्यांचा साधा स्पर्शही आपल्याला झालेला नसतो. तुमच्या गरजांच्या पलीकडे हे संबंध निर्माण झालेले आहेत अन् आता ते हाताबाहेर गेले आहेत. फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, ट्वीटर, इन्स्टाग्राम अन् काय काय… यावर आपल्याशी कुणी जुळावे, यावर आपले काही नियंत्रण राहिले नाही. आपल्याला जे काय सांगायचे आहे, बोलायचे आहे ते ज्यांना सांगायचे आहे आणि ज्यांच्याशी बोलायचे आहे ते त्यांच्यापुरतेच सीमित राहात नाही. ते तसे ठेवण्यावर आपले काहीच नियंत्रण नाही. व्हॉटस्अ‍ॅपच्या कुठल्या ग्रुपवर आपल्याला कुणी घेतले की, मग त्या ग्रुपमधल्या इतर सदस्यांशी आपला पूर्वी संबंध नसतो. त्यांच्याशी आपली नाळ जोडलेली नसते. ज्यांची माती सारखी असते तेच मित्र होऊ शकतात, मात्र आता फेसबुकवर लोक एकाच मातीचे, जॉनरचे नसतानाही ‘फ्रेंड’ होतात. तुमच्या कुठल्याही मतांवर टीका, कॉमेंट, समीक्षा करण्याचे अधिकार त्यांना मिळतात. तुम्ही समूहाशी बोलत असता अन् तिकडून प्रतिसाद मात्र वैयक्तिक येत असतो. ते सारेच मग वैयक्तिक पातळीवर येते अन् त्यामुळे आपण अस्वस्थ राहतो आहोत, हेही आपल्या लक्षात येत नाही, कारण तो सोशल मीडिया आहे, असेच आपल्याला वाटत राहते.
आता त्यावरचा उतारा काही लोकांनी शोधून काढला आहे. डिजिटली डिटॉक्सेशन असे त्याला म्हणतात. आपल्या देशात आणि आपण ज्या सामाजिक पर्यावरणात राहतो त्यात हे ऑनलाईन भासमान जग आता अलीकडे आले आहे. त्यामुळे डिजिटली डिटॉक्सेशन ही टर्मही आपल्या आयुष्यात तशी उशिराने आली आहे. जगाच्या पातळीवर ती फार आधी आली. स्वरा भास्कर या गायिकेने तिचे ट्वीटरचे आकाऊंट डिअ‍ॅक्टिव्हेट केले. ती त्यापासून दूर झाली. बंद केले तिने ते. फरहान अख्तरही आता ऑफलाईन झाला आहे. शरीरातील विष बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला ‘डिटॉक्सेशन’ असे म्हणतात. आपण आधी सकाळी उठल्यावर काय करायचो? अंथरुणातून बाहेर पडलो की ‘कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती…’ म्हणत आपल्या हाताचे दर्शन घेतले जायचे. मग जमिनीवर पाय ठेवण्याच्या आधी ‘विष्णूपत्नी नमोस्तूभ्यम्, पदास्पर्शे क्षमस्वमे’ म्हणत तिची माफी मागायचो. तेव्हा सारवणाची जमीन असायची खाली. आता मातीचा अन् आपला हा प्रभातीचाच नव्हे तर एकुणच संपर्क संपल्यालाही दशके लोटली आहेत. आता तर आपण सकाळी उठलो की मोबाईल हाती घेतो आधी. तो या अस्वस्थतेचा प्रभातस्पर्श असतो. अशांततेच्या लाटांच्या लोंढ्यांना आपण मार्गच करून देतो सकाळीच. खासगी आयुष्य, एकान्त, प्रायव्हसीसाठी आपण एकीकडे भांडतो आहोत. वैयक्तिक माहिती हा संवैधानिक हक्क आहे, त्यासाठी न्यायालयात खटले दाखल केलेत आपण अन् सकाळी उठल्याबरोबर आपण आपले खासगीपण संपवीत असतो. कुणाचे गुड मॉर्निंग आले, मग त्याने जो काय मॅसेज पाठविला त्यातून त्याला काय सांगायचे आहे अन् त्याहीपलीकडे जाऊन त्याला हेच सांगायचे आहे, माझी खोडच काढायची आहे, असे आपल्याला कुरतडणारे अर्थही अनेक जण लावून घेतात. समाजमाध्यमे हा आता परवलीचा शब्द झाला आहे आणि त्यातून निर्माण होणारे विशाल संबंध जोपासण्याची, सांभाळण्याची आपली ताकदच नाही. सामान्य माणसांची तर नाहीच, अगदी सेलिब्रेटींचीही नाही. रोज तुमच्या दाराशी अनोखळी माणसांचे लोंढे आले अन् त्यांनी अगदी, ‘सुप्रभात’ केले, तरीही ते नकोसे होईल. आता तर माणसे त्यांना काय काय वाटते ते तुम्हाला नकोसे वाटत असले, तरीही तुम्हाला सांगत सुटलेली असतात. सकाळी उठल्यापासून हा गोंधळ सुरू होतो. त्यात एकतानताही नसते. अगदी कुणाचा वाढदिवस आहे पासून कुणी मेले इथवर माहिती येऊन पडत असते. प्रत्येकच घटना ही प्रत्येकच व्यक्तीसाठी दखलपात्र नसते. असावीच असेही काही नसते. कुठेतरी अपघात झालेला असतो. त्याची छायाचित्रांसह भीषणता तुमच्या मेंदूवर आदळत असते. त्याला तुमची परवानगीही नसते, तरीही हे होत राहते. त्यातच कुणी फाजील विनोद सेंड करत असतो. कुणी कविता सांगतो अन् कुणी घडलेल्या एखाद्या घटनेवर त्याचे भाष्य तुमच्यापर्यंत पोहोचवितो. त्यात तुम्ही कधीमधी मग आपले मत मांडता अन् त्यावर लोक तुटून पडत असतात… यातून मेंदू कसा चेंदून जात असतो. त्यामुळे जस्टिन बीबरनेही त्याचे मीडिया अकाऊंटस् काही काळासाठी डिअ‍ॅक्टिव्हेट केले. एड शीरनही दूर झाला ऑनलाईन जगतापासून. आता ही मंडळी मोबाईल, लॅपटॉप या उपकरणांपासून दूर राहणार आहेत. थोडक्यात, ही मंडळी डिजिटल संन्यास घेत आहेत. आता ऑक्सफर्डच्या डिक्शनरीतही डिजिटल डिटॉक्सेशन या शब्दाला स्थान देण्यात आले आहे. इतका हा शब्द आता रूढ झाला आहे. मान्यवरांना तर सतत ट्रोलिंगला सामारे जावे लागते आहे. समोरासमोर माणसे एकमेकांशी तंटत नव्हती, नाहीत, असे नाही, मात्र आता कधीही न भेटलेली अन् ज्यांना आपल्या आयुष्याशी काहीही देणेघेणे नाही, अशीही माणसं ट्रोलिंग करू लागली आहेत. इतकं सतत कुणाच्या तरी नजरेखाली असणं, अगदी सीसी टीव्ही कॅमेरा लागल्यागत आपल्या हालचालींवरच नव्हे, तर विचारांवर, विचारांच्या शैलीवर अनेकांचा वॉच असणं, हे भीषणच आहे. आता अनेक सेलिब्रेटी हा असा डिजिटल संन्यास घेत आहेत, त्यांच्या बातम्या होतात. सामान्य माणसेही त्यांना डिजिटल डिटॉक्सशन ही टर्म माहिती नसतानाही असला संन्यास घेतात. डिजिटल अ‍ॅडिक्शन हादेखील आता रोग झालेला आहे. आपले खासगी आयुष्य संपत असल्यानेच अस्वस्थता निर्माण होते. आता या डिजिटल वर्ल्डचे फायदे कमी अन् तोटेच जास्त जाणवू लागले आहेत. त्यापासून दूर होणे, हाच त्यावरचा उपाय आहे…! ‘टाईम टू लॉग ऑफ’ ही चळवळ जगांत सुरू झाली आहे. अगदी पैसे घेऊन हे प्रशिक्षण दिले जाते आहे.

https://tarunbharat.org/?p=60749
Posted by : | on : 29 Aug 2018
Filed under : उपलेख, श्याम पेठकर, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, श्याम पेठकर, संपादकीय, स्तंभलेखक (761 of 1613 articles)


गांधींना अचानक पंतप्रधान व्हावे लागले होते. इंदिराजींची हत्या झाली आणि काँग्रेसमध्ये त्या काळात नरसिंह राव, सीताराम केसरी यांच्यासारखे दिग्गज होते, ...

×