भाजपाच्या ‘मिशन २०१९’चा श्रीगणेशा

भाजपाच्या ‘मिशन २०१९’चा श्रीगणेशा

•►अमित शाह यांनी दिले ३५० जागांचे लक्ष्य, नवी दिल्ली,…

उषाताई चाटी कालवश

उषाताई चाटी कालवश

►आज मोक्षधाम येथे होणार अंत्यसंस्कार, नागपूर, १७ ऑगस्ट –…

राहुल गांधी भाषण करत नाहीत, केवळ रडतात: रविशंकरप्रसाद

राहुल गांधी भाषण करत नाहीत, केवळ रडतात: रविशंकरप्रसाद

►भाजपा, संघावरील आरोपांचा घेतला खरपूस समाचार, नवी दिल्ली, १७…

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

►•वैज्ञानिकांच्या अभ्यासातील निष्कर्ष, मेलबर्न, १७ ऑगस्ट – आपल्या भूतलावर…

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

►स्वातंत्र्यदिनी पाकच्या उलट्या बोंबा, इस्लामाबाद, १४ ऑगस्ट – काश्मीरसह…

अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकून बेचिराख करू

अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकून बेचिराख करू

►कोरियाच्या जनतेचे धमकावणारे प्रत्युत्तर, प्यॉंगयॉंग, १० ऑगस्ट – आमच्या…

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मीच राहणार

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मीच राहणार

►मुख्यमंत्री फडणवीस यांचे सूतोवाच,• प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवेच, मुंबई, १७…

राज्य मंत्रिमंडळात कोरे, शेलार यांची वर्णी शक्य

राज्य मंत्रिमंडळात कोरे, शेलार यांची वर्णी शक्य

मुंबई, १३ ऑगस्ट – राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले…

पं. दीनदयालजींच्या विचारातूनच शाश्‍वत विकासाकडे वाटचाल: मुख्यमंत्री

पं. दीनदयालजींच्या विचारातूनच शाश्‍वत विकासाकडे वाटचाल: मुख्यमंत्री

►विधानसभेत उपाध्याय यांच्या कार्याचा गौरव, मुंबई, १० ऑगस्ट –…

स्वातंत्र्यदिन,काश्मिरी जनता आणि दहशतवाद…!

स्वातंत्र्यदिन,काश्मिरी जनता आणि दहशतवाद…!

मकरंद कुळकर्णी | काश्मिरी जनतेने भारतीय लष्कराच्या क्षमतेवर विश्‍वास…

निर्गुणाचा शोध निर्गुणात हरपला…

निर्गुणाचा शोध निर्गुणात हरपला…

•तरंग : दीपक कलढोणे | २० एप्रिल १९३९ रोजी…

३७० कलम संपले तर?

३७० कलम संपले तर?

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | नाक दाबले की…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » उपलेख, एस. एन. पठाण, संपादकीय, स्तंभलेखक » तोंडी तलाक मुस्लिम स्त्रीला गुलामगिरीत लोटणारी पद्धत

तोंडी तलाक मुस्लिम स्त्रीला गुलामगिरीत लोटणारी पद्धत

दखल : एस. एन. पठाण

इस्लाम धर्मात एखादा पुरुष आपल्या पत्नीला तीन वेळा तोंडी, तलाक-तलाक- तलाक, असे म्हणून तिच्यापासून कायमची फारकत घेतो. इस्लाम धर्मीयांनी हिंदुस्थानात रूढ केलेली ही अन्यायकारक पद्धत पवित्र कुराण अथवा हजरत पैगंबर यांच्या विचारांशी पूर्णपणे विसंगत आहे. रूढ झालेली ही चुकीची पद्धत २१ व्या शतकात मानवतेच्या भूमिकेतून सुधारणावाद्यांच्या आग्रहामुळे कायमची हद्दपार होणार असेल, तर प्रत्येक मुस्लिम स्त्री-पुरुषाने त्याचे स्वागतच करावयास हवे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व महाराष्ट्र मुस्लिम बुद्धिजीवी मंचाचे अध्यक्ष डॉ. एस. एन. पठाण यांनी या बाबतीत स्पष्टपणे मांडलेले आपले विचार…

इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांनी त्या काळी अरबस्तानात गुलामांचे हाल पाहून त्यांना, ‘स्वातंत्र्य द्या’ असा पुकार केला व गुलामगिरीचे उच्चाटन करून जगामध्ये श्रेष्ठ दर्जाची सामाजिक सुधारणा केली. एवढेच नव्हे, तर आपल्या आतेबहिणीचे लग्न एका गुलामाशी लावून अपूर्व मनोधैर्य दाखवले. समतेच्या आणि बंधुत्वाच्या तत्त्वापुढे आपले श्रेष्ठ घराणे आतेबहिणीच्या लग्नाच्या आड त्यांनी येऊ दिले नाही. म्हणूनच आज मशिदीमध्ये प्रार्थनेच्या वेळी एखाद्या बादशहाच्या शेजारी एखादा मजूर देखील उभा राहतो, तर जेवणाच्या पंक्तीला सरदाराशेजारी फाटके कपडे घातलेला हमाल बसलेला आढळून येतो.
तोंडी तलाक अमानवीय
समता, न्याय, प्रेम, सदाचार आणि मानवता इ. सुंदर तत्त्वाचा अंतर्भाव झालेल्या या इस्लाम धर्मात एखादा पुरुष आपल्या पत्नीला अगदी किरकोळ कारणावरून केवळ क्रोधामुळे तीन वेळा तोंडी तलाक देऊन जिच्याबरोबर कायमचे जीवन कंठायचे अशा आपल्या पत्नीशी त्वरित फारकत घेत असेल, तर इस्लाममधील ही अमानवी रूढ प्रथा कुणीही संवेदनशील माणूस, आपली बहीण किंवा मुलगी हिच्या बाबतीत घडणार्‍या या तोंडी तलाकमुळे दुःखित झाल्याशिवाय राहाणार नाही. हजरत पैगंबरांनी गुलामगिरीचे उच्चाटन केले. असे असताना तोंडी तलाक देण्याची ही पद्धत पुन्हा स्त्रियांना गुलामगिरीकडे नेणारी नाही काय? पवित्र कुराणच्या शिकवणीशी व हजरत पैगंबरांच्या उपदेशांशी हे पूर्णपणे विरोधी आहे, याचा विसर समाजाला कसा पडला, याबद्दल आश्चर्य वाटते!
स्त्रियांच्या सन्मानास सर्वोच्च स्थान
हजरत पैगंबर यांच्या जन्माआधी स्त्रियांची फारच वाईट अवस्था होती. पुरुषांच्या लहरीप्रमाणे वागणारी किंवा वागवली जाणारी एक चैनीची बाब यापलीकडे स्त्रियांना किंमत नसे. मुलगी जन्मास आली की अरब लोक तिला ठार मारून टाकीत. स्त्रियांशी दयाळूपणे वागा, अशी आज्ञा पैगंबरांनी आपल्या शिष्यांना  दिली. स्त्रीच्या सन्मानासाठी पवित्र कुराणमधे ‘अन्निसा’ या नावाने एक स्वतंत्र अध्याय समाविष्ट आहे.
पवित्र कुराणची शिकवण
‘‘त्यांच्याशी (स्त्रियांशी) दयाळूपणे वागा. जर तुम्ही त्यांचा द्वेष कराल तर ज्यात परमेश्वराने चांगुलपणा भरला आहे अशा व्यक्तीचा द्वेष केल्यासारखे होईल.’’
पवित्र कुराण, ४ः१९
ह. पैगंबर म्हणत, ‘‘जो आपल्या पत्नीशी अत्यंत दयाळूपणाने वागतो, तो तुमच्यामधील सर्वात चांगला सद्गृहस्थ असे मी मानतो.’’
स्त्री जातीविषयी वाटणारा आदर अत्युच्च शिखरास जावा म्हणून हजरत पैगंबर म्हणतात,
‘‘मातेच्या पायाखाली स्वर्ग आहे. ’’
स्त्रियांचे हक्क पायदळी तुुडविण्याचा पुरुषांना काडीमात्र हक्क नाही. या बाबतीत पवित्र कुराणमध्ये उल्लेख आला आहे की,
‘‘जितके पुरुषांचे स्त्रियांवर हक्क आहेत, तितकेच स्त्रियांचे पुरुषांवर आहेत.
पवित्र कुराण २ः२२५
तोंडी तलाक व विसंगती
स्त्रियांच्या उच्च सन्मानाची शिकवण देणार्‍या पवित्र कुराणमध्ये ‘तोंडी तलाक’ ही अमानवीय, अन्यायकारक, स्त्रियांना गुलामगिरीच्या गर्तेत ढकलणारी पद्धत असूच शकत नाही. एकदा हजरत पैगंबर यांच्या हयातीत त्यांच्या एका शिष्याने अत्यंत अपवादात्मक स्थितीत त्याच्या पत्नीस अत्यंत उद्वेगाने तीन वेळा दिलेला तोंडी तलाक पैगंबरांना सांगितला. त्यावर हजरत पैगंबर रागावले व उठून उभे राहिले. तोंडी तीन वेळा तलाक म्हणजे उघडपणे पवित्र कुराणच्या विरोधाची भूमिका आहे, असे ते म्हणाले. परंतु पुढे त्यांच्यानंतर दुर्दैवाने हीच पद्धत रूढ झाली.
तलाक व पवित्र कुराण
समग्र स्त्रीजातीला सन्मान देणार्‍या इस्लाम धर्मात पवित्र कुराणमध्ये तलाकची कोणती पद्धत आहे? असा प्रश्न अनेकांना पडेल. पवित्र कुराणमधे एकूण तलाक तीन वेळा सांगितला असला, तरी प्रत्येक तलाकमधे एक महिन्याचे अंतर असते. या काळात पत्नीने पती बरोबरच राहावयाचे असते व या काळात पतीचे पत्नीबरोबर शारीरिक संबंध येता कामा नये, याची काळजी घ्यायची असते. या काळात पतीने राग, द्वेष कमी करून पत्नीबरोबर जुळवून घ्यायचे असते. अशीच कृती पत्नीकडून सुद्धा अपेक्षित असते. त्या दोघांना शक्य होत नसेल तर मग त्यांनी आपला प्रतिनिधी देऊन त्यांच्या मार्फत तलाक होऊ नये, असा प्रयत्न करायचा असतो. दोन तलाकनंतर जर पती-पत्नीमध्ये राजीखुशी झाली, तर हे दोन तलाक आपोआप रद्द होतात. पवित्र कुराणमध्ये प्रत्येक तलाकनंतरचा हा एकूण तीन महिन्यांचा काळ (इद्दत) मात्र अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. लग्नामध्ये ठरलेली मेहेरची एकूण रक्कम पत्नीला द्यायची असते. एवढे सर्व होऊनही जर पती-पत्नीमधील द्वेष, क्रोध कमी होत नसेल तर मात्र तीन तलाकनंतर पती-पत्नीला फारकत घ्यायला पूर्ण परवानगी असते. तलाकनंतर पत्नी आपल्या वडिलांच्या घरी जाते. तेथे वडिलांनी तिच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारावी व वडिलांच्या संपत्तीमधील ठरावीक हिस्सा मुलीला द्यायचा असतो.
मुस्लिम स्त्रीची ससेहोलपट
पवित्र कुराणमधे दिलेली पद्धत न पाळता, द्वेष व क्रोधापोटी तोंडी तलाक देऊन आज अनेक मुस्लिम स्त्रियांना वार्‍यावर सोडल्याचे दिसून येते. तलाकपीडित स्त्रीच्या वडिलांची परिस्थिती गरिबीची असेल व आवश्यक तेवढे तिचे शिक्षण नसेल तर या स्त्रीला आपले जीवन जगणे कठीण जाते. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करताना तिची फार ससेहोलपट होते. अशा ‘तलाकपीडित’ अनेक मुस्लिम स्त्रियांचा प्रश्न आज समाजामध्ये दिसून येतो. तलाक झालेल्या स्त्रीला मुस्लिम समाज व्यवस्था व कुटुंब जरी स्वीकारत असले, तरी या तलाकपीडित स्त्रीला पुन्हा दुसरा विवाह करून पुन्हा नव्याने संसार उभा करताना फार दिव्यातून जावे लागते. अशा वेळी तोंडी तलाकला कामयचा फाटा दिल्यास व पवित्र कुराणमधील खरी पद्धत रूढ झाल्यास, मुस्लिम समाजातील अनेक तरुणींचे संसार वाचतील. आज मुस्लिम तरुणींमध्ये सुधारणांचे वारे वाहत असून त्या आधुनिक शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहू पाहात आहेत, हेही ध्यानी घ्यावयास हवे.
मुस्लिम समाजाने पाठिंबा द्यावा
तोंडी तलाक पद्धत कायद्याने बंद झाल्यास मुस्लिम समाजाचाच फायदा होणार आहे. केवळ आमच्या धर्मात ढवळाढवळ नको असा ढोल वाजवून आपण समग्र मुस्लिम स्त्रियांचे नुकसान तर करत नाही ना?
आज जॉर्डन, मोरोक्को, इजिप्त, इराक, सीरिया, पाकिस्तान आणि सुदान या देशांनी हा बदल स्वीकारला आहे. भारतसुद्धा यात मागे राहणार नाही, असाच आमचा प्रयत्न असला पाहिजे व समग्र मुस्लिम समाजाने यास पाठिंबा द्यावयास हवा.

शेअर करा

Posted by on Oct 26 2016. Filed under उपलेख, एस. एन. पठाण, संपादकीय, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उपलेख, एस. एन. पठाण, संपादकीय, स्तंभलेखक (1039 of 1053 articles)


तीनदा तलाकच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार केंद्र सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात मुस्लिम महिलांबाबतचा दुजाभाव, त्यांना हिनत्वाची वागणूक आणि त्यांना अधिकार ...