कायदा मोडणार्‍यांना संरक्षण देऊ नका : सर्वोच्च न्यायालय

कायदा मोडणार्‍यांना संरक्षण देऊ नका : सर्वोच्च न्यायालय

►गोरक्षणाबाबत खंडपीठासमोर सुनावणी , नवी दिल्ली, २१ जुलै –…

व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्‍चित

व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्‍चित

►उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २१ जुलै –…

रामनाथ कोविंद मंगळवारी राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारणार

रामनाथ कोविंद मंगळवारी राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारणार

►प्रणव मुखर्जी यांना उद्या संसदेत निरोप , तभा वृत्तसेवा…

पाकिस्तानची आर्थिक रसद बंद

पाकिस्तानची आर्थिक रसद बंद

►अमेरिकेचे दोन दिवसात दोन धक्के, वॉशिंग्टन, २१ जुलै –…

चिनी प्रसारमाध्यमे म्हणतात, स्वराज संसदेत खोटे बोलल्या

चिनी प्रसारमाध्यमे म्हणतात, स्वराज संसदेत खोटे बोलल्या

►चीनची भारताला पुन्हा युद्धाची धमकी, बीजिंग, २१ जुलै –…

शरीफ यांच्याविरोधातील सुनावणी संपली

शरीफ यांच्याविरोधातील सुनावणी संपली

►आता निकालाची प्रतीक्षा, इस्लामाबाद, २१ जुलै – पनामा पेपर्स…

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा कर्जमाफी घोटाळा?

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा कर्जमाफी घोटाळा?

►मुंबईतील दीड लाख शेतकर्‍यांना कर्ज माफी ►२८७ कोटी वाटले,…

विश्‍वजित कदम, अविनाश भोसले यांच्या कार्यालयांवर धाडी

विश्‍वजित कदम, अविनाश भोसले यांच्या कार्यालयांवर धाडी

►आयकर विभागाची कार्यवाही, पुणे, २१ जुलै – उद्योजक अविनाश…

आता उसाला लागंल ठिबक सिंचन!

आता उसाला लागंल ठिबक सिंचन!

मुंबई, १८ जुलै – यापुढे जर शेतकर्‍यांना ऊस लागवड…

इतिहास घडवणारी भेट

इतिहास घडवणारी भेट

अनय जोगळेकर | इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले…

दलित की भारतीय?

दलित की भारतीय?

रमेश पतंगे | खरे सांगायचे, तर आता राजकारणातून दलित…

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | जमाते पुरोगामीची देशातल्या…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 06:03 | अस्त: 19:01
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » त्रास नेमका कुणाला?

त्रास नेमका कुणाला?

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचा फटका ज्यांना बसला आहे, ते काळा पैसा जमा करणारे लोक हादरून गेले आहेत. या देशातील सर्वसामान्य माणसाला त्रास जरूर होत आहे, पण त्याविरुद्ध त्यांची काहीही नाराजी नाही. बँकांसमोर आणि एटीएमसमोर लागलेल्या रांगांना भेटी द्यायच्या, रांगांमधील लोकांना होणारा त्रास जाणून घ्यायचा, टीव्हीच्या छोट्या पडद्यावर झळकायचे आणि आपली राजकीय पोळी शेकायची, असला घाणेरडा उद्योग काही लोकांनी चालविला आहे. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी काल सकाळीच दिल्लीतल्या एका एटीएमसमोरील रांगेजवळ गेले, तिथल्या लोकांशी ते बोलले अन् निघून गेले. त्यानंतर रांगेतल्या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या, त्या बोलक्या होत्या. राहुल गांधी आले, त्यांनी आम्हाला काय समस्या आहेत हे विचारले, पण तोडगा काहीच सांगितला नाही, आम्हाला होणारा त्रास कमी कसा होईल याबाबत त्यांच्याकडे काहीच उपाय नव्हता, असे रांगेतल्या लोकांनी सांगितले. ही बाब लक्षात घेतली, तर राहुल गांधी आणि त्यांच्या कॉंग्रेस पक्षाची नौटंकी लक्षात येते. लोकसभेत आणि राज्यसभेत नोटबंदीच्या मुद्यावरून जो गोंधळ घातला जात आहे, तो अनाठायी आहे. सरकार चर्चेस तयार आहे, सरकारच्या वतीने अर्थमंत्री बोलण्यास तयार आहेत. पण, सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच यावे आणि सरकारची भूमिका विशद करावी, असा विरोधी पक्षांचा अट्‌टहास आहे. तो योग्य नाही. सरकार जर चर्चेसच तयार नसते, तर विरोधकांनी गोंधळ घालणे समजण्यासारखे होते. पण, मुळात विरोधी पक्ष चर्चेला घाबरत आहेत. त्यांना चर्चा नकोच आहे. त्यामुळे गोंधळ घालून संसदेचे कामकाज ठप्प पाडण्याचा उद्योग त्यांनी चालविला आहे. पैसे काढण्यासाठी, जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आज देशभरातील बँकांपुढे अजूनही रांगा लागल्या आहेत, हे सत्य आहे. पण, या रांगांमध्ये उभे असलेले लोक हे सगळेच गरीब आहेत, सगळेच गरजू आहेत, असे समजण्याचे कारण नाही. या रांगांचे वास्तव आपल्या व्यवस्थेचे वाभाडे काढणारे आहे. ज्यांनी मोठ्या प्रमाणात काळा पैसा जमा केला आहे, तो पांढरा करण्यासाठी ही मंडळी कामाला लागली आहे. वाम मार्गाचा अवलंब केला जात आहे. दिवसाला कुठे दीडशे, कुठे दोनशे, तर कुठे तीनशे रुपये रोजाने भाडोत्री माणसे रांगांमध्ये उभे करून जुन्या नोटा बदलवून घेण्याचा गोरखधंदा तेजीत आहे. त्यामुळेच सरकारने साडेचार हजार रुपयांची मर्यादा कमी करून दोन हजार रुपयांवर आणली, बोटावर शाई लावण्याचा उपाय अंमलात आणला, हे लक्षात घेतले पाहिजे. कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांना रांगेतल्या लोकांची एवढीच काळजी आहे, तर त्यांनी अशा भाडोत्री लोकांना हुडकून पोलिसांच्या हवाली केले पाहिजे. ज्यांनी या भाडोत्री लोकांना रांगांमध्ये उभे केले आहे, त्यांना हुडकून काढत त्यांच्याकडील काळा पैसा सरकारी तिजोरीत जमा करण्याच्या कामी सरकारला मदत केली पाहिजे. पण, ते तसे करणार नाहीत. कारण, काळा पैसा जमवण्यात त्यांचीही आघाडी आहे. ज्यांनी चिटफंडात मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवून घोटाळे केलेत तीच मंडळी टीका करीत आहेत, असा प्रहार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला, तो योग्यच आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी, दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी आणि देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी मोदी सरकारने पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेऊन मोठ्या परिवर्तनाचे संकेत दिले आहेत. देशाच्या आयुष्यात असे निर्णय फार कमी वेळा घेतले जातात. कारण, अशा कठोर निर्णयामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत होते. परंतु, राष्ट्रहिताला प्राधान्य देणारे नागरिक अशा निर्णयांनी विचलित होत नाहीत, हेही देशाने अनुभवले आहे. विचलित होणारे कोण आहेत, नोटाबंदीला विरोध करणारे कोण आहेत, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मोदी यांनी एका झटक्यात जे केले, ते आजवरच्या कोणत्याही पंतप्रधानाला करता आले नव्हते. काळा पैसाधारकांच्या तिजोरीतला मोठा पैसा सरकारच्या तिजोरीत आणण्याचे फार मोठे राष्ट्रकार्य मोदी यांच्या हातून घडले आहे आणि त्यामुळेच मोदी यांच्या राजकीय विरोधकांच्या पोटात दुखू लागले आहे. विरोधकांचा ‘नोटशूळ’ कशामुळे आहे, हे आता सामान्य जनतेच्याही लक्षात आले आहे. काळ्या धनाच्या विरोधात असा ‘सर्जिकल स्ट्राईक’ यापूर्वी कधीही झाला नव्हता. ज्याच्याकडे राजकीय इच्छाशक्ती आहे आणि देशहितासाठी कोणताही त्याग करण्याची ज्याची तयारी असते, असाच नेता ‘सर्जिकल स्ट्राईक’ करू शकतो. मोदींच्या एका निर्णयाने देशभक्त कोट्यवधी सामान्य लोकांची मान सन्मानाने उंचावली आहे. सत्तेत येण्याआधीपासून नरेंद्र मोदी काळ्या पैशांबाबत बोलत होते. सत्तेत येऊन त्यांना अडीच वर्षे झाली आहेत. सत्तेत आल्यापासून तर त्यांनी काळ्या पैशांबाबतची मोहीम तेज केली होती. पण, मोदी काय करत आहेत, हे कुणी लक्षातच घेतले नाही. राजकीय विरोधक मोदींवर टीका करीत राहिले. मोदींनी कासवगतीने काळ्या पैशांविरुद्ध प्रक्रिया सुरू ठेवली अन् अचानक ८ नोव्हेंबरच्या रात्री पाचशे व हजारच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घोषित करून काळ्या पैसावाल्यांना हादरा दिला, तर सामान्यजनांना सुखद धक्का दिला. जनतेला त्रास होत असला, तरी जनतेने सरकारचा निर्णय स्वीकारला आहे. जी बाब आम आदमीला क्षणात लक्षात आली, ती त्यांच्या नेत्यांच्या पचनी पडू शकली नाही, हे या देशाचे दुर्दैवच म्हटले पाहिजे. ज्या आम आदमीच्या खिशात काहीच नाही, तो आम आदमी दोन हजार आणि चार हजारांसाठी रांगेत उभा राहून देशहितासाठी कष्ट सोसत आहे, सरकारच्या निर्णयाची प्रशंसा करीत आहे. पण, आम आदमी पार्टी, तृणमूल कॉंग्रेस, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी, कॉंग्रेस आदी पक्षांचे नेते ज्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत, संसदेत गोंधळ घालत आहेत, ते पाहिले तर असे वाटते की, यांचे सगळे काही लुटले गेले आहे!  मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे देशाची केवळ अर्थव्यवस्थाच सुधारेल असे नव्हे, तर या समाजात आणि देशातही परिवर्तन येणार आहे. आम आदमीला रांगेत उभे राहण्याच्या दु:खापेक्षा जास्त आनंद या गोष्टीचा आहे की, काळा पैसाधारकांच्या भरलेल्या तिजोरीतील धन सरकारी तिजोरीत येणार आहे आणि त्यातून देशाचा विकास होणार आहे. आपल्याकडे असलेल्या काळ्या पैशांतून आपण सरकारही खरेदी करू शकतो, असा उर्मट भाव ज्यांच्या मनात होता, त्यांना आता नोटबंदीनंतर रडायला खांदा मिळेनासा झाला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. आर्थिक उदारीकरणानंतर समाजात एक नवीच संस्कृती पाय पसरवू लागली होती. लाचखोरी, करचोरी आणि अन्य चुकीच्या मार्गाने रातोरात श्रीमंत झालेले लोक आपल्या संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन करू लागले होते. त्यामुळे प्रामाणिक माणसाला अशा समाजात गुदमरल्यासारखे झाले होते. अशा प्रामाणिकांना मोदी सरकारने फार मोठा दिलासा दिला आहे. आज संसदेत जे गोंधळ घालत आहेत, ते बावचळले आहेत. काळ्या पैशांशिवाय राजकारण करणार तरी कसे, असा प्रश्‍न त्यांना सतावत आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलन करत दिल्लीच्या विधानसभेत धडक देणारे आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल आणि ‘मॉं, माटी और मानुष’ अशी भाषा करणार्‍या ममता बॅनर्जी यांचा सध्याचा व्यवहार आणि त्यांच्याकडून सरकारवर होत असलेले आरोप वाचलेत, तर नोटबंदीचा राजकारणावर किती प्रभाव पडला आहे, हे सहज लक्षात येते.

शेअर करा

Posted by on Nov 22 2016. Filed under अग्रलेख, संपादकीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अग्रलेख, संपादकीय (465 of 525 articles)


सर्वसाक्षी : श्याम परांडे | हिंदू धर्माचा अभ्यास करण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या माध्यमांपैकी एक लोंटार म्हणजे ताडपत्रावरील लिखाण. ताडपत्रे आणि बांबूच्या ...