ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक » दगडफेके, वकील, साहित्यिक…

दगडफेके, वकील, साहित्यिक…

भाऊ तोरसेकर |

काश्मिरातले भाजपा-पीडीपी संयुक्त सरकार कोसळले आणि नंतरच्या काळात तिथे लष्करी कारवाईत होणार्‍या दगडफेकीला मोठा आळा बसला. शासकीय यंत्रणेत बसलेल्या जिहादी सहानुभूतिदारांना चाप लावला गेला आणि त्याचे परिणाम त्वरेने दिसून आलेले आहेत. आणखी एक गोष्ट इथे मुद्दाम नमूद केली पाहिजे. महबुबा सरकार गेले आणि शासनयंत्रणा राज्यपालांच्या माध्यमातून पूर्णपणे केंद्राच्या अखत्यारित आली. मग हुर्रियत नावाचा बागुलबुवा संपुष्टात आला. गेल्या दोन महिन्यांत आपल्याला दगडफेकीचे प्रकार आणि हुर्रितचा तमाशा फारसा बघायला मिळालेला नाही. कारण कुठलेही युद्ध अनेक पातळ्यांवर किंवा आघाड्यांवर लढवले जात असते. त्यात फक्त सैनिकच नसतात, तर हत्याराशिवायही सेनेला लढायला हातभार लावणारे अनेक घटक कार्यरत असतात. अनेकदा त्यांना तुम्ही सैनिक वा सेना दलाचेही म्हणू शकत नसता. पण, तेही युद्ध प्रयासातले महत्त्वाचे घटक असतात. जो नियम खर्‍या युद्धाला लागू होतो, तोच गनिमी वा घातपाती युद्धालाही लागू होतो. त्यात नुसतेच सैनिक असून भागत नाही, तर अशा विविध घटकांची जाळी उभारावी लागतात. त्यात हेरखाते येते तसेच सामग्री वा रसद पुरवणाराही मोठा घटक आवश्यक असतो. नक्षली वा जिहादी युद्ध त्याला अपवाद नाही. म्हणूनच हुर्रियत वा दगडफेके यांच्याकडे सामान्य नागरिक वा जमाव म्हणून बघता येत नाही. ते राजकीय संघटनाही नसतात, तर ज्यांच्यावर हल्ला करतात, त्यांचे शत्रुसैन्य म्हणूनच त्यांच्याकडे बघावे लागत असते. त्यांनाही तशीच वागणूक द्यावी लागत असते. जे काम काश्मिरात दगडफेके करतात, तेच नक्षली युद्धामध्ये शहरी पांढरपेशे नक्षलवादी करीत असतात. प्रत्यक्ष युद्ध लढणार्‍यांना मदत वा घातपात, अशी जबाबदारी त्यांना पार पाडायची असते. ते ज्या बाजूचे असतात, त्यांच्या विरोधातील कारवाईत अडथळे आणणे, हे त्यांचे काम असते.
काश्मिरात भारत सरकार वा कुठला राजकीय पक्ष जिहादी मुजाहिदीनांशी दोन हात करत नाही. ते काम स्थानिक पोलिस, तपासयंत्रणा वा भारतीय लष्कराचे जवान करीत असतात. त्यांना स्थानिक पातळीवरील विविध प्रशासकीय संघटना वा अधिकारी-कर्मचारी मदतही करीत असतात. नेमके तेच काम जिहादींना संकटातून सोडवून आणण्यासाठी दगडफेके व हुर्रियतचे लोक करीत असतात. हुर्रियतवाले कुठलेही शस्त्र हाती घेत नाहीत, तर युवकांची व लोकांची माथी भडकावण्याचे काम करतात. त्यातून जो प्रक्षोभ माजवला जातो, त्याच्या परिणामी चकमकीत गुंतलेल्या भारतीय जवानांवर दगडफेकरूपाने होत असतो. अशा युवकांना प्रवृत्त करण्यापासून आवश्यक ते पैसे वा साहित्य पुरवण्याचेही काम हुर्रियतसारख्या संघटना पार पाडत असतात. साहजिकच अशा कुठल्याही पांढरपेशा हुर्रियतवाल्याचा थेट हिंसाचारात सहभाग आहे, असे कागदोपत्री वा पुराव्यानिशी सिद्ध करणे कायदा-प्रशासनाला शक्य होत नाही. वरकरणी ही माणसे सभ्य, सुसंस्कृत, सुशिक्षितच असतात. पण, त्यांच्या कामामधून हिंसाचाराला चालना मिळत असते. त्याला युद्धशास्त्रामध्ये रसद पुरवणारी यंत्रणा म्हटले जाते. शत्रूच्या सैन्याला हैराण करून सोडले की, मग त्याला लढणे अशक्य होऊन जाते. पर्यायाने समोरच्या शत्रूला उसंत मिळते वा शिरजोर होणेही शक्य होते. तेच काम हुर्रियत व दगडफेके करतात. इथे नक्षली युद्धात शहरातले अनेक समर्थक लोक साळसूदपणे पांढरपेशे राहून त्या घातपाती युद्धाला हातभार लावत असतात. विविध कार्यक्रमांतून वा प्रयत्नांतून पैसे जमा करणे, छुप्या घातपात्यांचे सुसूत्रीकरण, अशा जबाबदार्‍या त्यांच्याकडून पार पाडल्या जात असतात. छुप्या युद्धात गुंतलेल्यांना उजळमाथ्याने समाजात वावरता येत नाही. फोन वगैरेने संपर्क साधणेही अशक्य असते. ती कामगिरी अशा पांढरपेशा लोकांकडून पार पाडली जाते.
याखेरीज आणखी एक युद्धाची आघाडी अशीच कार्यरत असते, तिचे काम कायदेशीर व लोकशाही संसदीय मार्गाने शत्रूला हैराण करून सोडणे. त्यात वकील, विचारवंत, साहित्यिक, पत्रकार, कलावंत इत्यादींचा समावेश होत असतो. समाजाची दिशाभूल करणे वा बेदिली माजवण्यापासून गैरसमजांचे धुके निर्माण करण्याच्या कामी अशा फळीला जुंपलेले असते. थोडक्यात, लोकशाही वा कायद्याने दिलेल्या सवलतींचा उपयोग शासनाच्याच विरोधात करून कायद्याच्या शासनालाच नामोहरम व बेजार करून टाकण्याचे काम त्यांनी करायचे असते. गुजरात दंगलीपासून कुठल्याही राज्यातील नक्षली जिहादींच्या बाबतीत सातत्याने न्यायालयाचे अडथळे उभे करणारी एक प्रचंड फळीच आपल्याला आढळून येईल. याकुब मेमन, अफ़जल गुरू यांच्या फाशीत अडथळे आणताना तेच लोक पुढे सरसावलेले दिसतील. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या काळात मोदींना विविध चौकश्या वा खटल्यात गुंतवून बदनाम करण्याच्या मोहिमा त्यांनीच चालविलेल्या दिसतील. तशाच वकील-विचारवंतांना आपापल्या वाहिन्या वा वर्तमानपत्रातून वारेमाप प्रसिद्धी देणारे ठरावीक पत्रकार-संपादक आढळून येतील. तेच मग पाकिस्तानशी बोलणी करण्याचा हट्ट वा काश्मीर पाकला देऊन टाकावा, असा आग्रह धरताना दिसतील. तेच इशरत जहाँच्या न्यायासाठी आकाशपाताळ एक करताना दिसतील. हे सर्व करताना ते कधी नक्षलवादी डरकाळ्या फोडणार नाहीत वा कुठल्या राजकीय विचारांचा डंकाही पिटणार नाहीत. मानवाधिकार, नागरी अधिकार असले मुखवटे लावून वावरताना दिसतील. पण, ते ज्यांच्या बाजूने उभे राहतात वा ज्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, त्यावरून त्यांची राजकीय जात लक्षात येऊ शकते. ती काश्मिरातील दगडफेक्यांची असते किंवा नक्षली समर्थकांचीच असते. हे आता सामान्य लोकांनाही समजू लागलेले आहे. पण, माध्यमात किंवा वैचारिक क्षेत्रात वावरणार्‍या नक्षली हस्तकांना अजून ही भामटेगिरी चालेल, अशी आशा आहे.
पोलिसांनी सनातनच्या चार-पाच लोकांना पकडले वा त्यांच्या घरावर धाडी घातल्या, तर जेव्हा त्यांना कोर्टात हजर केले, तेव्हाच त्यांचे वकील काही करू शकलेले होते. पण, कालपरवा शहरी नक्षली म्हणून चार-पाच लोकांची धरपकड झाली, तेव्हा अटक होण्यापूर्वीच अनेक हायकोर्टात व थेट सुप्रीम कोर्टात डझनावारी वकील धावलेले होते. एकाहून एक नामवंत वकिलांची कोर्टात, नक्षलींना धक्काही लागू नये म्हणून झुंबड उडालेली होती. तीच झुंबड याकुब मेमनला फाशीतून वाचवण्यासाठी झाली होती. थोडक्यात, काश्मिरात भारतीय सेनेच्या जवानांना चकमकीच्या काळात मागून धोंडे मारणारे दगडफेके आणि इथे शहरी भागातल्या नक्षली व जिहादी विरोधातल्या कायदेशीर कारवाईत अडथळे उभे करणार्‍यात नेमका काय फरक आहे? कोणी त्या अटकेतील संशयितांना गोळ्या झाडत नव्हता, की कोठडीत बंद करून चाबकाचे फटकारे मारत नव्हता. निदान कोर्टात हजर करण्यापर्यंत तरी संयम नको काय? पण, आधीच एक फळी कोर्टात पोहोचली आणि दुसरी माध्यमांच्या कॅमेर्‍यात घुसून थेट पोलिस व शासनालाच गुन्हेगार ठरवू लागली. अशा भडिमाराला उत्तर देण्याइतकी सरकारचीही सज्जता नसावी, यातून नक्षली समांतर शासन यंत्रणा किती खोलवर रुजलेली व पसरलेली आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. समाजजीवनाची किती क्षेत्रे व विभागात या लोकांनी आपले बस्तान बसवलेले आहे, त्याची कल्पना येऊ शकते. काश्मिरात दगडफेक्यांचा आभास उभा केला जातो आणि इथे सभ्य मुखवटे लावून नक्षली कारवाया चालतात. त्याच्या सूत्रधारांना नुसता धक्का लागला, तरी किती उंदीर बिळातून बाहेर आले, त्याची यातून साक्ष मिळालेली आहे. यातला फरकही लक्षात येऊ शकतो. ज्या वकिलांची फी मोठ्या कंपन्यांनाही परवडणार नाही, ते वकील अशा नक्षलींच्या बचावासाठी कोर्टात धावले. मग हा किती मोठा पैशाचा खेळ असेल…?

https://tarunbharat.org/?p=61021
Posted by : | on : 2 Sep 2018
Filed under : उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक (554 of 1414 articles)


विधि आयोगाने, २०१९ साली होणार्‍या लोकसभा निवडणुकीसोबत राज्य विधानसभांच्या निवडणुका घ्याव्यात, अशी शिफारस गुरुवार ३० ऑगस्टला केली आहे. लोकसभा व ...

×