जमिनीसोबतच समुद्रातील हालचालींवरही कार्टोसॅटची नजर

जमिनीसोबतच समुद्रातील हालचालींवरही कार्टोसॅटची नजर

►बहुतांश उपग्रह पृथ्वीपासून जवळच्याच अंतरावर, नवी दिल्ली, २६ जून…

नवे शिक्षण धोरण समितीच्या अध्यक्षपदी कस्तुरीरंगन

नवे शिक्षण धोरण समितीच्या अध्यक्षपदी कस्तुरीरंगन

नवी दिल्ली, २६ जून – नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा…

अडवाणींची स्वत:हून माघार

अडवाणींची स्वत:हून माघार

►चिन्मयानंद यांची माहिती, नवी दिल्ली, २५ जून – भाजपाचे…

माझे सरकार निष्कलंक

माझे सरकार निष्कलंक

►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, वॉशिंग्टन, २६ जून – माझ्या…

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ड्रंकर ड्रायव्हर्स’ची नावे!

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ड्रंकर ड्रायव्हर्स’ची नावे!

क्विन्सटाऊन, २६ जून – न्यूझीलंडमध्ये मद्यपानाच्या विरोधात मोहीम चालवणार्‍या…

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

►आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटणार • •►‘मोदी, मोदी’च्या घोषणांनी…

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

►शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घतले नाही तर बघतो!, नाशिक, २५…

शेतकर्‍यांचे चांगभले!

शेतकर्‍यांचे चांगभले!

►३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी ►देशाच्या इतिहासातील सर्वात…

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद/कोल्हापूर, २४ जून – पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 05:56 | अस्त: 19:02
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » दलाल कोण?

दलाल कोण?

सैनिकांच्या रक्ताची सरकार दलाली करत असल्याचा घाणेरडा आरोप करणारे आता माजी सैनिकाच्या आत्महत्येचे तितकेच घाणेरडे राजकारण करत आहेत. सरकारच्या विरोधात ठोस मुद्दे कोणतेही नसल्याने विरोधी पक्ष सरकारला कोणत्याही छोट्या घटनेचे निमित्त करून कांगावखोरपणा करत घेरण्याच्या प्रयत्न सुरुवातीपासून करत आहेत. या देशातील इलेक्ट्रॉनिक माध्यमे सनसनाटी पत्रकारितेच्या मागे लागलेली असल्याने विरोधी पक्षांची कांगावखोर आणि बिनबुडाची भूमिका ते लगेच तितक्याच किंचाळ्या ठोकत लोकांसमोर आणतात. असा आव आणला जातो की आता सरकार प्रचंड अडचणीत आले आहे. प्रत्यक्षात त्या घटनेचे तपशील पुढे येऊ लागले की मग लक्षात येते की हा कांगावा अक्षरशः निरर्थक होता. पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटचा विषय असो, हैदराबादचा रोहित वेमुलाचा विषय असो की जेएनयूचा विषय असो या सगळ्या विषयांत हाच घटनाक्रम राहिला आहे. आता दिल्लीत माजी सैनिकांच्या वन रँक वन पेन्शन या विषयात चाललेल्या आंदोलनाचा संबंध एका माजी सैनिकाच्या आत्महत्येशी लावून ज्या प्रकारचे भडक राजकारण कॉंगे्रसचे पप्पू राहुल गांधी आणि दिल्लीचे आक्रस्ताळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले ते पाहता चीड व्यक्त करावी की कीव करावी अशी परिस्थिती आहे. दिल्लीत वन रँक वन पेन्शन या विषयात माजी सैनिकांचे आंदोलन चालू आहे. वास्तविक या विषयात आजपर्यंतच्या कॉंग्रेसी सरकारांनी जी चालढकल केली होती तसे न करता नरेन्द्र मोदी यांच्या सरकारने निर्णय घेतला आणि त्या योजनेत अनेक माजी सैनिक वन रँक वन पेन्शनचा फायदाही घेत आहेत. त्यातील काही जणांंच्या तपशिलाबाबत वाद आहेत. त्याबाबत चर्चा, मागण्या, तोडगा अशा क्रमाने विषय चालू आहे. मात्र, या विषयावर राहुल गांधी यांच्या ताबेदारीत जे युपीएचे सरकार राज्य करत होते, त्यांनी जे केले नव्हते ते मोदी सरकारने केले आहे. मात्र, जे काम झाले आहे ते नाकारायचे आणि विषय नकारात्मक करून ओरड करायची अशा प्रकारे राहुल गांधी आणि केजरीवाल ही मंडळी प्रत्येक विषयाचे राजकारण करत आहेत.
पाकिस्तानच्या विरोधात सर्जिकल स्ट्राईकनंतर सगळ्या देशात अभिमानाची लाट उसळली होती. मात्र, विरोधी पक्षांना या देशहिताच्या विषयातही आपली पोटदुखी लपवता आली नाही. युपीएच्या काळात सीमेवरच्या सैनिकांचे शिरकाण होत होते तेव्हा निर्लज्जपणे निष्क्रिय राहिलेली मंडळी या सरकारने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतरही आपल्या सैन्यावर शंका काढत होती. अविश्‍वास दाखवत होती. राष्ट्रीय पप्पू राहुल गांधी यांनी तर सैनिकांच्या रक्ताची दलाली अशी भाषा वापरून राजकीय द्वेषाच्या पोटी सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा सोडल्याचेच जणू दाखवून दिले. युवराजांचे उद्गार असल्याने त्यावर कोणी कॉंग्रेसी खुलासा करण्याची किंवा माफी मागण्याची हिंमत करू शकला नाही. उलट संजय निरुपमसारखे खुजे लोक पुरावे मागत त्या निर्लज्जपणाचे सार्वत्रीकरण करण्याचा प्रयत्न करू लागली. आता हरियाणाचे माजी सैनिक रामकिसन ग्रेवाल यांनी आत्महत्या करताच त्याचा संबंध वन रँक वन पेन्शनशी जोडून कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी थेट राममनोहर लोहिया रुग्णालयात जाऊन तेथील कामकाजात अडथळा आणू लागले असता त्यांना अटक करावी लागली. आता अशी माहिती पुढे आली आहे की रामकिसन ग्रेवाल यांना वन रँक वन पेन्शन लागू झालेली होती. त्याचे लाभ ते भिवानी बँकेतून उचलत होते. भिवानी बँकेतील कर्मचार्‍यांकडून त्यांना मिळणार्‍या लाभाच्या रकमेच्या गणितात काही त्रुटी झाल्याने त्यांना काही रक्कम कमी मिळाली त्याबाबत त्यांनी तक्रार केली होती आणि त्याचे निराकरण करण्याची प्रक्रिया चालू होती. वन रँक वन पेन्शन या योजनेशी त्यांच्या नाराजीचा, बँकेच्या त्रुटींचा काहीही संबंध नव्हता.
अशीही माहिती पुढे आली आहे की, रामकिसन हे १९६६ मध्ये टेरिटोरियल आर्मीमध्ये सामील झाले. १९७९ पर्यंत तेथे राहिले. या तेरा वर्षांच्या काळात ते फक्त सहा वर्षेच सक्रिय सेवेत राहिले. नंतर ते १९८० मध्ये डिफेन्स सिक्युरिटी कोअरमध्ये रुजू झाले तेथे त्यांनी २४ वर्षे नोकरी केली. पेन्शनसाठी टेरिटोरियल सेवेत पंधरा वर्षांची सक्रिय सेवा आवश्यक आहे. ग्रेवाल यांनी दोन्ही संस्थेत पेन्शनसाठी आवश्यक किमान सेवाकाल प्रत्येकी पंधरा वर्षे जर काम केले असते, तर त्यांना दोन्ही सेवेबद्दल वेगवेगळे निवृत्तीवेतन मिळाले असते. मात्र, टेरिटोरियल आर्मीत त्यांचा सेवाकाळ फक्त सहा वर्षेच होता. त्यामुळे त्यांना डिफेन्स सिक्युरिटी कोअरमधील सेवेचे निवृत्तीवेतन मिळत होते. हे निवृत्ती वेतन वन रँक वन पेन्शन या योजनेनुसारच त्यांना मिळत होते. मात्र, त्यांच्या आत्महत्येचा उपयोग करून अतिशय संकुचित राजकारण खेळले जात आहे. राजकीय फायद्यासाठी आपण कितीही खाली घसरू शकतो, कोणत्याही पातळीवरची हलकी भाषा वापरू शकतो हे राहुल गांधी यांनी जणू आता दाखवून देण्याचा चंगच बांधला आहे. देशविरोधी घोषणा देणार्‍या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी ते विद्यापीठात गेले. हैदराबादला रोहित वेमुलाच्या आत्महत्येचे राजकारण करण्यासाठी तेथे जाऊन उपोषणाला बसले, पुण्यात फिल्म इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांच्या अत्यंत चुकीच्या आंदोलनास भेट देऊन तेथेही सरकारविरोधी वक्तव्ये केली. केंद्र सरकारच्या विरोधात बोलणारे कोणीही असोत आणि त्यांची बाजू कितीही लंगडी, असमर्थनीय असो तरीही ते सरकारचा विरोध करत आहेत ना मग विरोधी पक्ष म्हणून त्याचे भांडवल करत त्या चुकीच्या भूमिकेचे समर्थन करणारच अशी राहुल गांधींची भूमिका दिसते आहे. सर्जिकल स्ट्राईकसारख्या विषयात सरकारला ‘खून की दलाली’ असे म्हणणारे स्वतः मात्र आता सैनिकांच्या आत्महत्येवर राजकारणाच्या पोळ्या भाजण्यासाठी सरसावले आहेत. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले आहे की सरकारने वन रँक वन पेन्शन योजना बोलल्याप्रमाणे लागू केली आहे. लाखो माजी सैनिक त्याचा लाभ घेत आहेत ज्यांच्या वैयक्तिक समस्या आहेत त्याबाबत त्वरेने सोडविण्याची कारवाई चालू आहे. असे असताना स्वतःच्या सरकारच्या काळात काहीही न करणारे निष्क्रिय विरोधी पक्ष आता छोट्या छोट्या प्रकरणांची खुसपटे काढून सरकारला बदनाम करण्यासाठी कांगावखोर राजकारण करत असतील, तर त्यांचा हा कांगावा जनतेने ओळखला पाहिजे. या अशा प्रकरणातील सत्य समजावून घेऊनच मत बनविले पाहिजे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी केवळ सनसनाटी म्हणून अशा नकारात्मक बातम्या देताना या प्रकरणातील सत्य बाजू लोकांसमोर ठेवले तर त्यांची विश्‍वासार्हता वाढेल. तुम्ही करता ती दलाली नाही काय? असा सवाल या नतद्रष्ट नेत्यांना विचारला पाहिजे!

शेअर करा

Posted by on Nov 4 2016. Filed under अग्रलेख, संपादकीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अग्रलेख, संपादकीय (442 of 470 articles)


दिलीप करंबेळकर| माणसामध्ये असलेली आत्मजाणीव हा प्राणी आणि माणूस यांच्यामध्ये झालेला क्रांतिकारी बदल आहे. माणसामधली ही आत्मजाणीव अनेक अंगांनी विकसित ...