ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » दिग्विजयी मौन!

दिग्विजयी मौन!

बहुगुणी अभिनेता प्राण यांच्या एका चित्रपटात एक छान गाणे होते. या चित्रपटात त्यांची चरित्र अभिनेत्याची भूमिका होती. ‘हम बोलेगा तो बोलोगे की बोलता हैं…’ असे त्या गाण्याचे बोल होते आणि चित्रपटाचे नाव ‘कसौटी’ होते. १९७४ साली रीलीज झालेला हा चित्रपट होता. अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांची त्यात प्रमुख भूमिका होती. आता कुणी म्हणेल की, वृत्ती आणि प्रवृत्तीत काय फरक असतो? तर ‘त्ती’ ला ‘त्ती’ जोडून र्‍हाईम करण्यासाठी अशी शब्दरचना केली आहे. तरीही वृत्ती ही अनुस्यूत असते, ती जन्मजात असू शकते अन् एखाद्याला कुणी उद्युक्त केल्यावर तो जे वागतो त्याच्या अंत:प्रेरणेला प्रवृत्ती म्हणतात… (जमलं बुवा स्पष्टीकरण!) तर राजेहो, विषय गाणे नाही, मात्र प्रवृत्ती आहे. आता हा चित्रपट आला तेव्हा दिग्विजय सिंह काय करत होते हे त्यांनाच माहिती आहे. विकिपीडियावरही त्यांची ही माहिती नाही. आता मात्र ते काहीच करत नाहीत. म्हणजे बोलणे आणि बोलतच राहणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य, मात्र आता त्यांनी बोलणेही सोडले आहे. असं म्हणतात की, पुरुष त्यांचे लग्न झाल्यावर बोलणे कमी करतात आणि ऐकणे वाढवितात. संसार सुखाचा करायचा असेल, तर असे करणे अत्यंत आवश्यक असते, हे अनुभवींचे बोल आहेत. खरेखोटे (नवर)देवाला माहिती! दिग्विजय सिंहांचे तर दुसरे लग्न झाले आहे. आधीची वैवाहिक कारकीर्द त्यांनी चांगली निभावली आणि नंतर नियतीने एकटेपण आणण्याच्या आधीच त्यांनी दुसरी साथ शोधून ठेवली होती. अर्थात ते त्यांचे खासगी जीवन आहे. त्यावर भाष्य करण्याचे काही कारण नाही. एक मात्र नक्की की, त्यामुळे ते बर्‍यापैकी मौन झाले. दुसरे लग्न आणि त्यांच्या राजकीय पक्षाची सत्ता जाणे, असा विलक्षण योगायोग जुळून आला. त्यामुळे त्यांच्या पक्षातल्या सार्‍यांचेच शब्द हरविले होते. काय बोलावे, हेच त्यांना सुचत नव्हते. गेली साडेतीन-चार वर्षे त्यांची वाचाच गेली होती. आता निवडणुका जवळ आल्यावर त्यांना वाचा सिद्ध करावीच लागली. आताही गप्प बसले तर मग पुन्हा उठूच शकणार नाहीत, हेही त्यांना कळले. पक्ष सत्तेत असताना दिग्विजयांचे वाग्बाण सटासट सुटत होते. असेही म्हणतात की, असे वाच्चाळपण त्यांना पक्षानेच दिले होते. म्हणजे तुम्हीच काहीबाही बोलत जा, अशी जबाबदारी दिली होती. त्यामुळे दिग्विजय सिंह अगदी विदुषकी वाटावे, असे पंचेस काढत होते. आरोप करत होते. पहिल्या दोन टर्म यामुळे बर्‍या गेल्या, असे पक्षालाही वाटले. नंतर मात्र पराभवांची मालिकाच लागली अन् मग त्याची कारणे शोधणे सुरू झाले. आता काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांची कधीही अन् काहीही चूक नसते. कारण ते गांधी आहेत. राहुलचे सगळेच कसे बरोबरच असते. त्यामुळे पक्षात काही वाईट झाले तर ते दुसर्‍या कुणाच्या चुकीनेच होत असते. आता पराभव वाट्याला यायला लागल्यावर कुणाचे चुकले, याचा तपास काढल्यावर काँग्रेसपंडितांच्या अथक अभ्यासान्ती(!) असा निष्कर्ष काढण्यात आला की, हे सगळे दिग्विजय सिंहांच्या बडबडीमुळे झाले आहे. त्यामुळे त्यांची मुस्कटदाबी करण्यात आली. बोल बोल नार्‍या असलेल्या अन् बोलूनच पक्षाचा दिग्विजय साकारणार्‍या सिंहांना आता बोलणे बंद करावे लागले आहे. आता त्यांच्या मध्यप्रदेशात निवडणुका असताना त्यांच्याकडे त्यांच्या या प्रदेशाची जबाबदारी देण्यात आली नाही. इतकेच काय, त्यांचे कटआऊटदेखील राहुल गांधी यांच्या सभेच्या आधी आऊट करण्यात आले. आता यामागे कुणाचा कट आहे, याचा शोधही दिग्विजय सिंहांना घेता आला नाही. आपला पत्ता श्रेष्ठींनीच कट केला, हे न कळण्याइतके ते दूधखुळे नाहीत. राजकारणात मुरलेले आहेत. पक्षही त्यांना चांगलाच कळला आहे. एकेकाळी ज्यांचा पक्षात वट होता त्यांचा पत्ता असा कट करून टाकण्यात आला. काँग्रेसमध्ये हे काही नवे नाही. पक्षाच्या राजकीय प्रवासाची अशी समृद्ध अडगळ काँग्रेसमध्ये आहे. कधीकाळी काँग्रेसमध्ये अशांना प्रतिष्ठित पूर्णविराम देण्याची जागा राज्यपालपद होते. मात्र, आता सत्ता नसल्याने तेही ते करू शकत नाहीत. जेव्हा सत्ता नसते, तेव्हा मत्ताही जाते आणि मग अशांच्या वाट्याला केवळ लत्ता येते. दिग्विजय सिंहांच्या वाट्याला ती आली आहे. (लत्ता) हा लत्तप्रसादही त्यांना गोडच मानून घ्यावा लागणार आहे. कारण मध्यप्रदेशात त्यांचा काहीच वट नाही. त्यामुळे त्यांनीच आता मान्य करून टाकले आहे की, ‘‘मी आता काहीच बोलणार नाही, कारण मी बोललो की काँग्रेसची मते जातात. तरीही शत्रुत्व विसरून आपण आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे.’’ मौन धारण करण्याआधी ते हे जे काय बोलले त्यावरूनही आता त्यांच्या राज्यात काँग्रेसची मते जायची ती जाणारच आहेत. त्यांच्या जिभेला किती धार आहे, हे त्यांच्या मौनामुळेही कळणार आहे. आता त्यांच्या या मौनाचा फायदा झालाच तर तो भाजपालाच होणार, असेही राजकीय पंडित म्हणू लागले आहेत. म्हणूनच की काय, मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनी दिग्विजयांच्या मौनाला दाद दिली आहे. इतकेच काय, काँग्रेसशी इंटेरिम काडीमोड घेणार्‍या बसपाच्या सर्वेसर्वा मायावतींनीही त्यांचे हे मौन म्हणजेही पक्षाच्या विरोधातला कट आहे, कारण त्याचा फायदा झालाच तर तो भाजपाला होणार असल्याचे भाकीत करत, ते (दिग्विजय) भाजपासाठीच काम करत असल्याचा आरोप करून टाकला. आता दिग्विजय सिंहांनी मायावतींना भाजपाची ‘ब’ टीम म्हणून संभावना केली होती. मायावती म्हणतात की, दिग्गीराजाच भाजपाची ब टीम आहेत. मागे राहुल गांधींविषयी दिग्गीराजा म्हणाले होते, ‘‘राहुल गांधी हे अन्यायाच्या विरोधात लढणारे नेते असले, तरीही त्यांच्यात सत्ताधारी नेतृत्वाचे गुण नाहीत.’’ तेव्हाच त्यांच्या तोंडाच्या मापाचे कुलूप काँग्रेसवाले शोधणार, हे नक्की झाले होते. मधल्या काळात विपश्यनेसारखी त्याहीपेक्षा महत्त्वाची कामे असल्याने राहुल गांधी यांनी ही कुलूपशोध मोहीम राबविली नाही. नंतर मध्यप्रदेशातीलच कार्यकर्त्यांनी दिग्गीराजाच्या मापाचे कुलूप पक्षश्रेष्ठींना दिले. (खरेतर काँग्रेसमध्ये अनेक मोठे नेते राहुल यांच्या तोंडाच्या मापाचे कुलूप शोधले पाहिजे, या मताचे आहेत. कारण, राहुल बोलले की पक्षाची मते जातात, हे गेल्या चार वर्षांत वारंवार सिद्ध झाले आहे.) आता दिग्गीराजा गप्प बसणार आहेत. त्यामुळे आता कलगीतुर्‍याचा फड रंगणार नाही. ‘मौनम् सर्वार्थ साधनम्,’ असे म्हणतात. त्यात किती तथ्य आहे, हे आता दिसेल. मरणात खरोखरो जग जगते… यात थोडी सुधारणा करून दिग्गीराजा म्हणतील, मौनात खरोखर जग बोलते… त्यांचे हे मौन बोलकेच आहे, हेही खरे! तरीही ते काहीच बोलणार नाहीत. आता जगच काय ते बोलत राहील अन् पक्षाला मुका मार देत दिग्गीराजा म्हणतील, ‘दुनिया चाहे कुछभी बोले, कुछ नही बोलेगा… क्योंकी, हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है…’ ही कसौटीच आहे!

https://tarunbharat.org/?p=66120
Posted by : | on : 21 Oct 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (234 of 787 articles)


तोरसेकर | काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाच राज्यातील विधानसभा जिंकण्यासाठी प्रत्येक महत्त्वाच्या अशा स्थानिक मंदिरांना भेटी व देवदर्शनाचा सपाटा ...

×