कायदा मोडणार्‍यांना संरक्षण देऊ नका : सर्वोच्च न्यायालय

कायदा मोडणार्‍यांना संरक्षण देऊ नका : सर्वोच्च न्यायालय

►गोरक्षणाबाबत खंडपीठासमोर सुनावणी , नवी दिल्ली, २१ जुलै –…

व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्‍चित

व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्‍चित

►उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २१ जुलै –…

रामनाथ कोविंद मंगळवारी राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारणार

रामनाथ कोविंद मंगळवारी राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारणार

►प्रणव मुखर्जी यांना उद्या संसदेत निरोप , तभा वृत्तसेवा…

पाकिस्तानची आर्थिक रसद बंद

पाकिस्तानची आर्थिक रसद बंद

►अमेरिकेचे दोन दिवसात दोन धक्के, वॉशिंग्टन, २१ जुलै –…

चिनी प्रसारमाध्यमे म्हणतात, स्वराज संसदेत खोटे बोलल्या

चिनी प्रसारमाध्यमे म्हणतात, स्वराज संसदेत खोटे बोलल्या

►चीनची भारताला पुन्हा युद्धाची धमकी, बीजिंग, २१ जुलै –…

शरीफ यांच्याविरोधातील सुनावणी संपली

शरीफ यांच्याविरोधातील सुनावणी संपली

►आता निकालाची प्रतीक्षा, इस्लामाबाद, २१ जुलै – पनामा पेपर्स…

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा कर्जमाफी घोटाळा?

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा कर्जमाफी घोटाळा?

►मुंबईतील दीड लाख शेतकर्‍यांना कर्ज माफी ►२८७ कोटी वाटले,…

विश्‍वजित कदम, अविनाश भोसले यांच्या कार्यालयांवर धाडी

विश्‍वजित कदम, अविनाश भोसले यांच्या कार्यालयांवर धाडी

►आयकर विभागाची कार्यवाही, पुणे, २१ जुलै – उद्योजक अविनाश…

आता उसाला लागंल ठिबक सिंचन!

आता उसाला लागंल ठिबक सिंचन!

मुंबई, १८ जुलै – यापुढे जर शेतकर्‍यांना ऊस लागवड…

इतिहास घडवणारी भेट

इतिहास घडवणारी भेट

अनय जोगळेकर | इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले…

दलित की भारतीय?

दलित की भारतीय?

रमेश पतंगे | खरे सांगायचे, तर आता राजकारणातून दलित…

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | जमाते पुरोगामीची देशातल्या…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 06:03 | अस्त: 19:01
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » दुटप्पी थयथयाट!

दुटप्पी थयथयाट!

सध्या सोशल मीडियावर एक विनोद भरपूर फिरतो आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना म्हणतात, ‘‘अमितजी बाण चलाओ.’’ त्यावर अमित शहा विचारतात, ‘‘मोदीजी लेकिन किसपर चलाना है बाण?’’ या प्रश्‍नाला मोदी उत्तर देतात, ‘‘आप उसकी फिक्र मत करो. आप सिर्फ बाण चलाओ. केजरीवाल अपनेआप उछलकर बाण के सामने आ जाएँगे!’’ हा विनोद सर्वांपर्यंत पोहोचण्याच्या आत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच नोटबंदीचा बाण सोडला आणि फक्त केजरीवालच नव्हे, तर अनेक विरोधी पक्ष, मित्रपक्ष स्वयंस्फूर्तीने ‘उछलकर’ या बाणाच्या समोर आलेले दिसत आहेत. सगळ्या पक्षांची नोटबंदीच्या बाणाने चांगलीच पंचाईत केली आहे. सामान्य जनतेला या निर्णयाचा खूप त्रास होत असूनही सामान्य जनता खूष आहे. धनदांडग्यांचा दाबून ठेवलेला काळा पैसा आता आपोआप एकतर बाहेर येईल किंवा जिथल्या तिथे जळून जाईल, यामुळे जनता खूष आहे. देशाची अर्थव्यवस्था सुधारणार असेल, तर चार दिवस रांगेत उभे राहू, चार दिवस काटकसरीने काढू, पण एकदा होऊनच जाऊ द्या, असे लोक म्हणत आहेत. मात्र, जे झोपेतही मोदी नाव घेतले की दचकून उठतात, ते आता जागेपणीच दचकले आहेत! हा निर्णय जाहीर झाल्यानंतर तीस तास, चाळीस तास या लोकांना या निर्णयावर काय प्रतिक्रिया द्यावी, हेसुद्धा सुचत नव्हते! नंतर जेव्हा टीव्ही वाहिन्यांनी गावोगावी बँकांसमोर लागलेल्या रांगा दाखवायला सुरुवात केली, तेव्हा या लोकांनी डोळ्यांत मगरीचे अश्रू आणत सामान्य जनतेचा कैवार घेतल्यासारखे करत, नोटबंदीला विरोध करायला सुरुवात केली. कोणतीही रांग म्हटले की, लोक त्रस्तच होतात आणि सरकारला, सत्तेतील पक्षाला शिव्या देऊ लागतील, असा सरधोपट विचार करून जनतेच्या आधी ही मंडळी सरकारपक्षाला शिव्या देऊ लागली. नरेंद्र मोदी यांच्या झंझावातामुळे ज्यांना सत्तेतून अज्ञातवासात जावे लागले किंवा ज्यांनी काही सुपार्‍या घेऊन भारतात राजकारण प्रवेश केला होता, त्यांना फक्त एका शहरापुरतेच मर्यादित राहावे लागले अशी मंडळी या निमित्ताने बृहन्नडेचा नाच करू लागली आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या नोटबंदीच्या बाणाच्या समोर येऊन काही बालिश विधाने केली आहेत. ज्या त्या राजकीय निर्णयात आणि प्रक्रियेत पैशाचा घोटाळाच  होतो, हा बहुधा त्यांचा स्वतःचा अनुभव दिसतो. त्यामुळे त्यांनी या नोटबंदीमध्ये,  सामान्य नागरिकांचा पैसा नरेंद्र मोदी त्यांचे मित्र असलेल्या उद्योजकांना देत आहेत, असा एक अत्यंत सवंग आणि बलिश आरोप केला आहे. सामान्य जनता रांगा लावून पैसे बँकांमध्ये भरते आहे ते दान म्हणून भरते आहे की देणगी म्हणून भरते आहे, असे केजरीवाल यांना म्हणायचे आहे की काय? हे पैसे या सामान्य जनतेच्या खात्यांवर तरी जमा होत आहेत किंवा त्यांना नोटा बदलून तरी मिळत आहेत. मग ते पैसे अन्य कुणाला देण्याचे गणित कसे काय तयार होते? नोटबंदीच्या विरोधात उतरलेल्यांचे प्रत्येकाचे हिशोब वेगळे आहेत. ममता बॅनर्जी एकदम जणू त्यांच्याच नोटा हरवल्यासारख्या चवताळून उठल्या आहेत. त्याची अनेक कारणे आहेत. खरे म्हणजे भाजपा हा त्यांचा राजकीय स्पर्धकच नाही, तरीही त्या इतक्या निकराने का विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत? पश्‍चिम बंगालमध्ये मोठ्या संख्येने असलेल्या मुस्लिमांच्या गठ्ठा मतदानासाठी ममता बॅनर्जी, कम्युनिस्ट आणि कॉंग्रेस यांच्यात नेहमीच स्पर्धा लागलेली असते. नरेंद्र मोदी यांना अगदी किंचाळ्या आवाजात विरोध करणे, हे मुस्लिम मतांसाठी केलेले मार्केटिंग आहे. त्यामुळे भाजपाच्या केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर आल्याने त्यांना गमवायचे काहीच नाही. पश्‍चिम बंगालमध्ये बर्‍यापैकी समर्थन मिळवत, अलीकडे राजकारणात पुढे चाललेल्या भाजपाला रोखण्याचेच काम त्यातून थोडेफार झाले तर तेही ममतादीदींना हवेच आहे. वैचारिकदृष्ट्या भाजपाविरोधी असलेली मते कम्युनिस्टांकडे न जाऊ देता आपल्याकडे वळविण्यासाठी हा आक्रस्ताळेपणा करणे, ही त्यांची अपरिहार्यता आहे. नॅशनल कॉन्फरन्सचा राजकीय आधार भारतीय जनता पक्षाने जम्मू आणि काश्मीरमध्ये हिसकावला आहे. त्यामुळे ते तर भाजपा सरकार जे करेल त्याच्या विरोधात बोलत राहणे अगदी सहजशक्य आहे. मायावती यांचा राग नरेंद्र मोदी यांच्यावर आहे. मोदीलाटेने अगदी अलीकडे उत्तरप्रदेशात राज्य करणार्‍या मायावती यांना जबरदस्त धक्का देत, लोकसभेतील त्यांचा आकडा शून्यावर आणून ठेवला. त्यामुळे जनतेचा कळवळा असल्यासारखे दाखवत, मोदी यांना संधी मिळेल तेथे विरोध करणे, हे समोर आलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता त्यांना गरजेचेच आहे. काही राजकीय पक्षांच्या भूमिका मात्र भुवया उंचावणार्‍या आहेत. समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस हे या विषयावर अजून गप्प आहेत. नितीशकुमार यांनी तर नोटबंदीच्या निर्णयाला अगदी भक्कम पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत मित्रपक्ष म्हणून सामील असलेल्या शिवसेनेने मात्र पहिल्या दिवसापासून मोदी यांना आणि नोटबंदीच्या विषयाला विरोध सुरू केला आहे. रोज प्रसारमाध्यमांना शिवसेनेच्या मुखपत्रावरून बातमी करण्याची वेळ येते आहे. मोदीलाटेने विधानसभेत आपला हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावून नेला, हे शिवसेनेचे वैफल्य अजून गेलेले दिसत नाही. त्यामुळे गेले अनेक महिने एकीकडे तर सत्तेत राहायचे, लाल दिव्यांच्या गाड्या फिरवायच्या आणि दुसरीकडे रोज मोदी, भाजपा, संघ यांच्यावर आगपाखड करणारी टीका करत राहायची, असा दुहेरी आणि दुटप्पीपणा चालला आहे. आता सामान्य नागरिक हे गृहीत धरून आहे की, हे अशीच टीका करणार. एकतर सत्तेतून बाहेर पडा आणि टीका करा, मात्र सत्तेत राहून अशी टीका करण्याला काही अर्थ नाही, असे लोक उघडपणे म्हणू लागले आहेत. केजरीवालपासून सेनेपर्यंत या सगळ्या टीकाकारांची दुटप्पी भूमिका आहे. भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे, असे म्हणायचे. काळा पैसा बाहेर आला पाहिजे, असा सुविचार रोज सांगायचा आणि काळा पैसा बाहेर काढणारे पाऊल सरकारने उचलले की, आधारहीन तर्क लावत सरकारच्या निर्णयावर टीका करत किंचाळत सुटायचे. सामान्य जनतेची गैरसोय होत असल्याची ओरड करायची. मात्र, सामान्य जनताच गैरसोय सहन करून काळा पैसा बाहेर आला पाहिजे, असे म्हणत आहे, त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करायचे, आपली राजकीय ओळख झाकायची आणि सोयीने अगदी विरुद्ध कपडे घालून थयथयाट करणार्‍यांना बृहन्नडेची उपमाही देता येत नाही, कारण बृहन्नडेने वेळ आल्यावर आपली ओळख दाखवत शस्त्रे काढून सत्याची लढाई जिंकली होती. असा प्रकार येथे होण्याची सुतराम शक्यता नाही. हे सगळे असत्याच्या बाजूने, काळाबाजारवाल्यांच्या हितासाठी थयथयाट करत आहेत.

शेअर करा

Posted by on Nov 18 2016. Filed under अग्रलेख, संपादकीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अग्रलेख, संपादकीय (469 of 522 articles)


मुक्तविचार : दिलीप करंबेळकर | आठवड्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा क्रांतिकारक निर्णय ...