ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » उपलेख, संपादकीय, सुनील कुहीकर, स्तंभलेखक » दुटप्पी, नाटकी माणसांच्या बाजारात…

दुटप्पी, नाटकी माणसांच्या बाजारात…

सुनील कुहीकर |

लडखडाई बुढियाको उठाने
बाजार मे कोई ना झुका;
गोरीका झुमका क्या गिरा
पुरा बाजार घुटनोंपे आ गया…!
हीच रीत आहे जगाची. स्वार्थी. कालसापेक्ष. स्वत:च्या समस्यांचा सरेआम बाजार मांडायला, स्वत:च्या दु:खाचे जाहीर प्रदर्शन भरवायला तयार असणारे, त्याचा बाऊ करायला कायम सरसावणारे लोक इतरांच्या वेदनेची मात्र खिल्ली उडवण्यासाठी टपलेले असतात. इतरांच्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी पुढाकार घेतला, तरी भेदाभेदाच्या भिंती उभ्या राहिलेल्या असतात इथे कित्येकांच्या मनात. समोरची व्यक्ती, तिचा हुद्दा, तिच्या गाठीशी असलेली पैशाची ताकद, तिच्या सभोवताल एकवटलेले सत्तेचे बळ, यावर अवलंबून असते त्या फुंकरीतून झळकणार्‍या मायेच्या नौटंकीची तीव्रता. मग बळेबळेच दु:खाची लकेर चेहर्‍यावर उमटवायची की ढसाढसा रडत अश्रुपात घडवायचा, हे सारं सारं त्या समोरच्या व्यक्तिमत्त्वावर, त्याच्या दृश्य-अदृश्य ताकदीवर ठरते. त्यातही स्वत:च्या हिताला बाधा पोहोचणार असेल, तर मग त्याची ताकदही थिटी पडते अन् नौटंकीही बाद ठरते अनेकदा. मग मनाची तयारी होते ती निकराच्या लढाईची. मर्यादांची सारी बंधने तुटून पडतात. आणि हो! जर का लढाई दुसर्‍यासाठीची असेल, तर मात्र त्याच बंधनांचा, त्याच मर्यादेचा बाऊ होतो. कल्पनेपलीकडच्या पातळीवर, जमेल तेवढ्या कारणांसह त्याचा बाजार मांडला जातो. इवली इवलीशी, तद्दन फालतू, आधारहीन कारणंही पुरेशी ठरतात अशा वेळी आपल्या चुकीच्या वर्तणुकीच्या समर्थनार्थ.
इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलेला ओसामा बिन लादेन, सौदीत डॉक्टर म्हणून कार्यरत राहिलेला मोशरी अल् अंजी, फैझलबिन शामन या उच्च शिक्षितांनी धर्माच्या नावाखाली कुठल्याशा जिहादाकरिता पुकारलेल्या लढ्याच्या भूमिकेमागील… इतर सारी दर्जेदार, कर्तबगार, बकुबगार माणसं सोडून, सुमार कुवतीच्या राहुलकडे काँग्रेसचे नेतृत्व सोपविण्याच्या हट्टामागील… मी-टू चे फॅड अवतरल्यानंतर अलीकडे कित्येकांना वीस-वीस, तीस-तीस वर्षांपूर्वीच्या विस्मरणात गेलेल्या घटनांचे आता अचानक होऊ लागलेल्या स्मरणामागील… शेजारच्या घरात झालेल्या भांडणातील शब्दन्शब्द कान देऊन ऐकणार्‍या, पण रस्त्यात डोळ्यांदेखत घडलेल्या अपघातील जखमींना मदत करायचे सोडून ब्याद टाळण्यासाठी तेथून पलायन करणार्‍यांच्या तसल्या वागण्यामागील, एरवी साळसूदपणाचा आव आणत वागणार्‍या अन् ओल्या पार्टीत दारूची झिंग चढली, की बेताल वागणार्‍या सेलेब्रिटीजच्या धिंगाण्यांमागील… झाडून सारी यंत्रणा पायाशी लोळण घेत असताना, गुन्ह्याचं बांडगुळ मानगुटीवर असलं, तरी अंगाला हात लावण्याची कुणाचीही बिशाद नसताना, विजय माल्याने हा देश सोडून पळून जाण्यामागील कारणांचे तरी कुठे समर्थन करता येईल कुणाला? पण, ज्याचे त्याचे वागणे चालले आहे, त्याच्या त्याच्या तालावर. त्याच्या त्याच्या मर्जीनुसार. लटक्या समर्थनाच्या जोरावर.
परवा एक धक्कादायक बातमी झळकली. सध्या सर्वदूर रेतीचा उपसा करण्यावर बंदी असताना काही हुशार मंडळी, नियम खुंटीवर टांगत रेतीसंकलनाचे काम करीत होते. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणार्‍या एका तहसीलदाराला त्या कंत्रांटदारानी रेतीच्या टिप्परवरून अक्षरश: फरफटत नेल्याची, बिहारादी प्रांतात शोभून दिसावी, अशी घटना परवा स्वत:ला सभ्य म्हणवणार्‍या मराठमोळ्या परिसरात घडून आली. मन सुन्न झालं. रेतीसंकलनावर बंदी काही त्या तहसीलदाराच्या पातळीवर घालण्यात आलेली नव्हती. तो तर बिचारा केवळ न्यायालयाच्या आदेशाचं, सरकारच्या सूचनेचं पालन करायला निघाला होता. पण, तहसीलदारासारख्या पदावर काम करणार्‍या एका ‘तुच्छ’ अधिकार्‍याने दस्तुरखुद्द रेती कंत्राटदाराला अडविण्याचा प्रयत्न करावा, हा त्या कंत्राटदाराच्या इभ्रतीवर घाला घालणारा प्रकार असल्याने, त्यात त्याला स्वत:चा अपमान जाणवणे, त्यातून त्याचा त्रागा होणे स्वाभाविकच नाही का? एरवी त्या कंत्राटदारानेही पर्यावरणरक्षणावर भाषणं केली असती चारचौघांसमोर. पण, ‘बात धंदेपे आ गयी’ म्हटल्यावर पर्यावरणाला कोण विचारतो? आणि गोष्ट व्यक्तिगत फायद्याची असेल, तर त्याच्यापुढे देश, समाजबिमाज काही महत्त्वाचं नसतं, हा ‘धंद्याचा उसूल’ नाही का? त्यांना आडवा येणारा तहसीलदारही खरंतर त्याचे कर्तव्यच बजावत होता. पण, यांच्या धंद्याच्या तुलनेत त्याचे सरकारी नियम कवडीमोल ठरले. यांच्या पैशाच्या गुर्मीपुढे त्याच्या हुद्याची उंची कमी पडली. म्हणूनच ती फरफट तहसीलदाराच्या वाट्याला आली. बहुधा म्हणूनच या लोकशाहीप्रधान देशात अशी घटना घडू शकली. पैशाच्या पलीकडे दुसरी कुठलीच लायकी नसलेले लोक प्रशासनातील एका अधिकार्‍याची अशी धिंड काढू शकले… यात सर्वात लाजिरवाणी बाब कोणती आहे, ठाऊक आहे? हा तमाशा बघणार्‍या एकाही मर्दाला हा प्रकार थांबवावासा वाटला नाही. एकालाही त्यात वावगे काही वाटले नाही. हो! प्रश्‍न धंद्याचा असला की, पर्यावरण गेले चुलीत अन् नियम गेले खड्ड्यात, असेच काहीसे वागणे असते इथे लोकांचे. खिशात पैसा असलेल्या माणसाला कायदा पायदळी तुडवण्याचा अधिकार आपसूकच प्राप्त होत असल्याचा गैरसमज करून बसलेत लोक. पैशाच्या बळावर अंगात आलेल्या मस्तीचे असे जाहीर प्रदर्शन घडविण्याचा अलिखित परवाना त्याला समाजानेच बहाल केलेला असतो पुष्कळदा. त्याच्या आड कुणीच यायचं नसतं. अगदी तहसीलदार-कलेक्टरनेसुद्धा नाही. जो आड येईल त्याचे असेच हाल होतील, हे समाजानेदेखील मान्य करून टाकलं आहे एव्हाना. म्हणूनच सारा समाज असल्या घटनांकडे निर्विकारपणे बघू शकतो… चकार शब्द न काढता. निषेधाचा चिरका स्वरदेखील उमटत नाही कुणाच्याच तोंडून.
इथे सगळ्यांचं असंच आहे बघा. स्वत:च्या बाबतीत प्रत्येक जण प्रॅक्टिकल असतो. व्यवहारी असतो. तिथे नियमांचा अडसर नको की, सामाजिक बंधनांची चौकट नको! पण, हे स्वातंत्र्य प्रत्येकाला स्वत:पुरतंच अपेक्षित असतं. इतर सर्वांनी नियमांच्या चाकोरीत वावरावं, ही त्याची अपेक्षा असते. शहाणपणाचे सारे डोस त्याने इतरांसाठी राखून ठेवलेले असतात. काळ आणि परिस्थितिनुरूप सतत बदलत राहणार्‍या राजकारण्यांच्या भूमिकेबाबत फार गांभीर्याने विचार करण्याची गरज नसली, तरी इतर अनेक क्षेत्रातली माणसंही तशीच वागू लागली आहेत आताशा. तिही परिस्थिती बघून भराभरा रंग बदलण्यात तरबेज होऊ लागली आहेत. सभ्यतेचे सारे संकेत, चारित्र्याच्या सार्‍या चौकटी, मानवी वर्तणुकीच्या सार्‍या अपेक्षा मातीमोल ठरविण्यात आता त्यांचाही वाटा ‘मोलाचा’ ठरू लागला आहे… बहुधा म्हणूनच की काय, पण राजकीय आणि सिनेजगतातल्या नट-नट्यांची आता बाहेर येऊ लागलेली प्रकरणे माध्यमांच्या लेखी ‘खूप गाजत’ असली, तरी सामान्यजनांच्या दृष्टीने कवडीचीही किंमत नाही त्याला. हे असे, वेळ-काळ पाहून आपल्यावरील ‘अन्यायाला’ वाचा फोडण्याकरताही मुहूर्त शोधणार्‍यांबद्दल कोण गंभीर असणार आहे?
कधीकधी तर असा प्रश्‍न पडतो की, या समाजातली ही तीच माणसं असतील का, जी या हातचं त्या हातालाही कळू नये अशा पद्धतीच्या दानाची संकल्पना मांडतात, त्याचे समर्थन करतात अन् स्वत: केलेल्या तीनशे एमएल रक्ताच्या दानाची मात्र जगभर जाहिरात करतात? ही तीच माणसं आहेत, जी एरवी राजकारण्यांच्या नावाने कडाकडा बोटे मोडतात अन् नेमके मतदानाच्या दिवशी मतदानाला जाण्याचे टाळतात? ही तीच मंडळी असेल जी अन्यायाविरुद्ध आसूड ओढण्याचा आवेश जगजाहीर करते अन् स्वत:वरील अत्याचार मात्र निमूटपणे सहन करते? पाश्‍चात्त्य जगातील मुक्त जीवनाच्या संकल्पनेचे समर्थन करणारी अन् स्वत:च्या घरातील महिलांनी मात्र डोक्यावर पदर घेतला पाहिजे, अशी अपेक्षा बाळगणारी मंडळीही हीच असते बहुतांशी. दुटप्पी. नाटकी… सत्तेसमोर कुर्निसात करणारी. निर्बलांसमोर मर्दुमकी दाखवणारी…

https://tarunbharat.org/?p=66966
Posted by : | on : 3 Nov 2018
Filed under : उपलेख, संपादकीय, सुनील कुहीकर, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, संपादकीय, सुनील कुहीकर, स्तंभलेखक (60 of 1335 articles)


रामजन्मभूमीवर भव्य मंदिर व्हावे, ही भारतातील हिंदू समाजाचीच नव्हे, तर या देशावर, या देशातील मातीवर, या देशाच्या संस्कृतीवर, या देशाच्या ...

×