ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » दुष्काळाची त्वरित दखल!

दुष्काळाची त्वरित दखल!

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारने राज्यातील १८० तालुके दुष्काळसदृश म्हणून जाहीर केले आहेत. याने संबंधित शेतकर्‍यांना निश्‍चितच दिलासा मिळणार आहे. यंदा पाऊस सर्वदूर पुरेशा प्रमाणात पडला नाही. त्यामुळे काही भागात दुष्काळाची स्थिती उद्भवू शकते, हे लक्षात येताच विलंब न लावता शासनाने ज्या तालुक्यांमध्ये कमी पाऊस पडला असे १८० तालुके दुष्काळसदृश जाहीर केलेत. आता या तालुक्यांना बर्‍याच सवलती, सूट व अधिक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे या तालुक्यांतील शेतकर्‍यांना दुष्काळी स्थितीचा सामना करताना निश्‍चितच आधार मिळणार आहे. या संदर्भात फडणवीस सरकारने तडफेने जी पावले उचललीत, त्यासाठी त्यांचे अभिनंदन करायला हवे! राज्यातील फडणवीस यांचे सरकार असो वा केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार, शेतकर्‍यांच्या संदर्भात कुठलीही समस्या उद्भवली की, ताबडतोब निर्णय घेण्यात येत आहेत, हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे. आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या सलग १५ वर्षांच्या कारभाराचा काय अनुभव होता? जरा आठवून बघा. शेतकर्‍यांच्या संदर्भात अडचणीची स्थिती आली की, ते सरकार काहीच करत नसे. खूप आदळआपट केली की मग कुठे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार, उपकार केल्यासारखे काहीतरी थातुरमातुर घोषणा करायचे. राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा-शिवसेनेचे सरकार आल्यापासून हे असले संतापजनक प्रकार बंद झाले आहेत. शेतकरी, गरीब, वंचित लोकांच्या समस्या प्राधान्याने व तडफेने सोडविणे सुरू झाले आहे. आधीच्या सरकारलाही हे असे करता आले असते. घरी शेती असली आणि शेतकर्‍याच्या घराण्यात जन्म झाला म्हणून, शेतकर्‍यांच्याप्रती सहानुभूती, संवेदना असतेच असे नाही, हे या मंडळींनी नेहमीच दाखवून दिले आहे. सत्तेचा उपयोग आपली व आपल्या बगलबच्चांची घरे पैशाने भरण्यासाठीच असतो, या संस्कारातून आलेल्या, वाढलेल्यांकडून तशी अपेक्षाही करायला नको म्हणा! परंतु, पंधरा वर्षे सतत या काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या नालायक सरकारला बोडख्यावर बसविणारे मतदारही तितकेच दोषी आहेत. कर्माच्या सिद्धान्तानुसार त्याची फळेही भोगलीच पाहिजे. केवळ दुसरे चांगले, संवेदनशील, स्वच्छ, पारदर्शी, प्रामाणिक सरकार निवडून आणले म्हणजे होत नाही. त्यामुळे, ‘आता आम्ही तुम्हाला निवडून दिले ना, मग करा, काय करायची ती जनहिताची कामे’ असला शहाजोगपणा निरर्थक ठरतो. त्यातही मतदारांनी भाजपाला निर्भेळ बहुमत दिले नाही. शिवसेनेची कुबडी घ्यायला लावली. भाजपाला निर्भेळ बहुमत मिळाले असते, तर आज राज्याचे चित्र निश्‍चितच अधिक उजळ आणि आश्‍वासक दिसले असते, यात शंका नाही! असो. मुद्दा हा आहे की, हे सरकार सत्तेत आल्यापासून शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यात कुठलीही हयगय झालेली नाही. हे शेतकर्‍यांनी तरी समजून घेतले पाहिजे. शेतकर्‍यांचे मूलभूत प्रश्‍न एका दिवसात सोडविणे शक्य नाही. त्यासाठी सातत्याने प्रामाणिक व नेमक्या प्रयत्नांची गरज असते. काँग्रेस-राकाँच्या १५ वर्षांच्या काळात सिंचन, वीज यासाठी काडीचेही प्रयत्न झाले नाहीत. १५ वर्षांचा काळ थोडका नाही. एक निश्‍चित लक्ष्य ठेवून प्रयत्न झाले असते, तर आज शेतकर्‍यांची स्थिती बर्‍यापैकी सुस्थिर राहिली असती. हां, पण नेत्यांची श्रीमंती मात्र पटीत वाढली नसती. सत्तेत येताक्षणीच फडणवीस सरकारने शेतकर्‍यांच्या मूळ समस्यांवर लक्ष घालावयास सुरुवात केली. सिंचनाचा प्रश्‍न प्राधान्याने सोडविणे गरजेचे होते. आधीच्या सरकारने राज्याच्या डोक्यावर करून ठेवलेले प्रचंड कर्ज, तसेच रिकामा खजिना, यामुळे सिंचनाचा प्रश्‍न सोडविण्यावरती खूप मर्यादा आल्या होत्या. परंतु, मनात ठाम इच्छा असेल तर मार्ग गवसतोच. फडणवीस सरकारने मोठ्या धरणांच्या मागे न लागता, जलयुक्त शिवार ही संकल्पना राबविण्यास सुरवात केली. प्रारंभी या योजनेची खिल्ली उडविण्यात आली. परंतु, आज चार वर्षांनंतर त्याची फळे शेतकर्‍यांना चाखायला मिळत आहेत. विजेचेही तसेच. शेतकर्‍यांना दिवसा, पुरेशा दाबाने वीजपुरवठा करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारून आता फक्त शेतकर्‍यांसाठी सौर ऊर्जा वाहिनी तयार करण्यात आली आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना दिवसा पूर्ण दाबाने वीज उपलब्ध होणार आहे. हे सर्व करीत असताना, निसर्गही फडणवीस सरकारची परीक्षा बघत होता. २०१५ व २०१६ असे लागोपाठ दुष्काळ पडले. परंतु, फडणवीस सरकार त्याने डगमगून गेले नाही. हे सरकार शेतकर्‍यांच्या मागे खंबीर उभे राहिले. निधीची कमतरता भासू दिली नाही. शेतकर्‍यांसाठी जे करणे आवश्यक आहे आणि जे करू शकतो, ते तत्काळ करण्याचे धोरण अवलंबिले. त्याचा परिणाम असा झाला की, राज्यातील शेतकरी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभा राहिला. जिल्हा परिषदा, नगरपंचायती, नगरपालिका यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाने जे अभूतपूर्व यश प्राप्त केले, ती शेतकर्‍यांच्या समाधानाची एकप्रकारे पावतीच होती. या सर्व धडपडीमुळे काही लोकांची, विशेषत: स्वत:ला शेतकर्‍यांचे ठेकेदार मानणार्‍यांची फारच पंचाईत झाली. त्यांना शेतकर्‍यांना भडकविण्यास इंधनच मिळेनासे झाले. शरद जोशी यांनी शेतकर्‍यांचा विश्‍वासघात केल्यापासून शेतकर्‍यांचे प्रभावशाली आंदोलन उभे करणे जवळजवळ अशक्यच होऊन बसले होते. त्याचा गैरफायदा काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने अचूक उचलला. शेतकरी हतबल झाला होता. त्याचे शोषण सुरूच होते; परंतु तो काही करण्याच्या मन:स्थितीतच नव्हता. लाल बावट्यांनाही या सरकारने गुंडाळून ठेवले होते. परंतु, फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकर्‍यांचे दिवस पालटले. शेतकरी आता भूलथापांना बळी पडत नाही, असे दिसताच, लाल बावट्यांनी बळेबळे शेतकर्‍यांना भडकविणे सुरू केले. परंतु, फडणवीस सरकारने त्यांनाही अत्यंत सहानुभूतिपूर्ण वागणूक देऊन, त्यांच्या मागण्यांची दखल घेतली. फडणवीसांना शेतकर्‍यांचे काय समजते, असे हिणवले जात होते. परंतु, फडणवीस यांनी शेतकर्‍यांसाठी जे काही केले, त्याने या मंडळींच्या थोबाडीतच बसली आहे. फडणवीस सरकारच्या काळातील हा तिसरा दुष्काळ आहे. याही वेळेस हे सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार हे निश्‍चित! पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील राज्यातील शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. दुष्काळाने खचून जाऊ नका. केंद्र सरकार तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे आहे, याची खात्री दिली. दुष्काळाच्या झळा पूर्णपणे निरस्त करणे कुणालाच शक्य नाही; परंतु राज्यातील फडणवीस व केंद्रातील मोदी सरकार, शब्दाला जागणारे असल्यामुळे त्या झळा जवळपास सुसह्य होतील, यात शंका नाही!

https://tarunbharat.org/?p=66416
Posted by : | on : 25 Oct 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (282 of 843 articles)


जहागीरदार | सीबीआय ही देशातील सर्वोच्च तपासयंत्रणा आहे. आपले तपासकौशल्य आणि कार्यक्षमता यासाठी ती ओळखली जाते. त्यामुळेच ज्या वेळी कोणत्याही ...

×