ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » दुष्काळाला मिठी मारूया…

दुष्काळाला मिठी मारूया…

एका एका काळात एक एक लाट येते. त्याला आपण सोप्या मराठीत फॅड असे म्हणतो. कधीकधी त्याला ट्रेंडही म्हणायचे. कधीकाळी टॅटूचे फॅड आले होते. सेल्फीचेही फॅड सध्या ओसरलेले नाही. आता मी टू ची लाट आली आहे. गेल्या पंधरवड्यापासून दणक्यात आरोप सुरू आहेत. अगदी वरच्या पातळीवर सुरू झालेली ही लाट गावखेड्यापर्यंतही पोहोचली आहे. अशा वातावरणात मग एक सेन्सेशन तयार होते. ब्रेकिंग असे काही तयार झालेले असते. त्यात मग लोक तहान-भूकही विसरतात. आपल्या आयुष्याच्या काय समस्या आहेत, हे विसरून सार्‍यांना नाना पाटेकर ते अमिताभ बच्चन यांचे काय होणार याचीच चिंता लागून राहिलेली असते. त्यांचेही बरोबर आहे. समस्या आणि प्रश्‍न यातही काही नाविन्य हवेच असते. त्याच त्या समस्या चघळून बेचव वाटायला लागले असते. रस्ता नाही, पाणी नाही, वीज नाही… या समस्या काही आजच्या नाहीत. आपल्या आजोबांच्या काळापासून त्या तशाच आहेत. त्यावर बरीच चर्चा झडली आहे आणि मंथन झाले आहे. बाकी होते ते तसेच आहे. त्यात काही बदल झालेला नाही. शेतीविषयक समस्या निर्माण झाल्या. त्यावरही खूप चर्चा झाली. सिनेमे, नाटके झाली. त्यांना पुरस्कार मिळाले. समस्या मात्र आहे तशीच आहे. आता शेतकर्‍याने आत्महत्या केली तर त्यात वाईट वाटते; पण सेन्सेशन वाटेनासे झाले आहे सामान्यांना. त्यामुळे नवे काही हवे असते. नवे काही होत राहतेच. आता तर आम्हाला जागतिक पातळीवरचेही असे ब्रेकिंग पुरत असते. म्हणजे ट्रम्पने अमेरिकेत ग्रीन कार्ड देणे बंद केले, हेही आम्हाला गावखेड्याच्या टपरी चर्चेसाठी आवश्यक असणारे मटेरियल झालेले आहे. मध्येच कोण कुठली नटी कुठल्यातरी नटाबरोबर लग्न करणार असते. टीव्हीवर त्यांच्या प्रेम प्रकरणाचा तारीखवार आढावा घेतला जात असतो. त्या निमित्ताने चित्रपट क्षेत्रातील अशा जोड्यांच्या कहाण्या सांगितल्या आणि दाखविल्या जातात. आता गावखेड्यापर्यंत टीव्ही आलेला आहे. त्यामुळे कापसावर बोंडअळी पडली या आपल्याशी निगडित बातमीपेक्षा दक्षिण
आफ्रिकेच्या टांझानिया बेटांवर विमान पडले, ही बातमी शेतकरी दिवसभर बघतात. ते बघताना यंदा पाऊस कमी पडला, त्यामुळे आतापासूनच नद्या आटल्या आहेत. ऐन दिवाळीच्या दिवसांतच गावात पाणी नसणार, हेही तो विसरत असतो. माणसे अशी नसत्या बातम्यात अडकली असताना काही चलाख लोक मात्र वास्तव काय, त्या समस्या काय आणि त्या समस्यांचे संधीत कसे रूपांतर करायचे, याच्या योजना आखत असतात. आता बघाना, यंदा दुष्काळ पडणार आहे. तसे मुख्यमंत्र्यांनीही सांगितले आहे की मराठवाड्यात ११४ तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. केंद्र सरकारची चमू अशा वेळी आढावा घेण्यासाठी येत असते आणि मग दुष्काळ जाहीर केला जातो. दुष्काळ ही समस्या आहे; पण तिचे संधीत रूपांतर करता येत असते. अर्थात हे काही चलाख लोकांनाच माहिती आहे. त्यामुळे आतापासून ती मंडळी दुष्काळाचा सामना करण्यासाठी म्हणण्यापेक्षा दुष्काळाला मिठी मारण्यासाठी तयार आहेत. एकतर आपल्या भागात दुष्काळ जाहीर व्हायला हवा. त्यासाठी परिश्रम करावे लागतात. डोके लावावे लागते. असा काही एकाएकी दुष्काळ जाहीर होत नसतो. एकतर आपल्या भागाची पावसाची सरासरी कमी आहे, हे सिद्ध करावे लागते. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद पातळीपासून ते बघावे लागते. वर्तमानपत्रात जमिनीला भेगा पडल्याच्या अन् नद्या, तलाव अन् असलाच तर एखादा प्रकल्प कसा कोरडा पडला आहे, हे दाखविण्यासाठी जमिनीला भेगा पडलेले फोटो छापून आणावे लागतात. आता तशी स्थिती असलीच पाहिजे असे काहीच नसते. या आधीचे काही फोटो संग्रही असावे लागतात. नाहीच तर अगदी आसाममधील ते फोटो असले तरीही चालते. कुणीही वर्तमानपत्रात फोटो पाहून सत्य नेमके काय, हे बघायला येत नाही. सरकारी अधिकारीदेखील नाही. पत्रकार तर अजिबातच नाही. अधिकारी येणारच असले तर त्यांची बडदास्त ठेवायची. नाहीतर त्यांना, ‘‘साहेब प्यायला पाणीही नाही तिकडे, कशाला येता… आम्ही बघून घेतो ना काय ते. तुम्ही चिल्ड व्हा या हटेलात.’’असा प्रेमाचा, आपुलकीचा सल्ला द्यायचा असतो. मग साहेब येत नाहीत. ‘चिल्ड’ वातावरणात बसून अहवाल तयार करतात. डोक्यावर सात हंडे घेऊन पाण्याला निघालेल्या बायकाचे फोटो त्याला जोडले जातात. मग त्या बायका राजस्थानातल्या असल्या तरीही चालते. कारण तसले ट्राईब्स या भागातही आहेत, असे ठोकून देता येत असते कुणी विचारलेच तर. मग आपल्या शेतातल्या विहिरीला पाणी असेल तर साहेब तपासणीला येणार असतील त्या काळात त्यातले पाणी शेताला सोडून द्यायचे. त्यासाठी रात्रभर पंप चालवायचा. म्हणजे ती विहिर अधिग्रहित केली जात नाही. हाडं वर आलेली गुरे तयार ठेवायची. गावाच्या वाटेवर काही मेलेली गुरे टाकून द्यायची. आपल्याकडे मात्र चारा तयार ठेवायचा अन् जमतील तितकी गुरे एकत्र करून त्यांच्या समोर तो टाकायचा. म्हणजे दुष्काळ जाहीर झाला की चारा छावण्या आपल्यालाच भेटत असतात. गावापर्यंत पाणी येत असले, पाईपलाईन असली तर त्यात बिघाड करून ठेवायचा. म्हणजे पंधरा दिवस झाले पाणी नाही. पाणी का नाही? तर गावाला जिथून पाणी पुरवठा केला जातो तिथेच पाणी नाही. असलेच तर गावापर्यंत यावे इतका जोर नाही पाण्यात, असे दृश्य निर्माण करावे लागते. सरपंचाला संवादाची स्क्रीप्ट तयार करून द्यावी लागते. गेली चार वर्षे पावसाळ्याचे चार महिने असलेच तर जेमतेम पाणी असते. नंतर आम्ही चार चार कोस जाऊन पाणी आणत असतो, असे तो सोहबांना सांगतो. साहेबांनाही तो नेमके काय सांगणार याहीपेक्षा त्याने काय सांगितले पाहिजे, हे माहीत असते. तो मग सरपंच अन् गावकरी तांत्रिकदृष्ट्या बयाणात काही चुकत असतील तर त्यांना करेक्ट करत असतो. टँकरवाल्यांची त्या आधीच मिटींग घेतली जावी याची खरबरदारी घ्यायची असते. म्हणजे टँकर लावले तर एका दिवसांत किती फेर्‍या होतात, कराव्या लागतील याची आकडेमोड करून वरपासून खालपर्यंत निधीचे समन्यायी वाटप कसे झाले पाहिजे, यावर आधीच चर्चा करून ठेवावी लागते. मग दुष्काळ जाहीर होतो. तो झाला की मग हिशेब विचारणे हे अमानवी असते. आपल्या माणसांना दुष्काळाची कामे द्यायची असतात. दुष्काळी गावापर्यंत रस्ते तयार करण्यापासून तर आरोग्याच्या सोयी पुरविण्यापर्यंत सारीच कामे असतात. टँकर तर आपल्याच माणसांचे असावे लागतात… इतकी खबरदारी घ्यायची तर मग हे असे टॅटू ते मिटू मध्ये कसे रमता येणार? एकदा का परिसरांत दुष्काळ जाहीर झाला की पैशाचा झरा आपल्या घरातच बदाबदा पडत असतो. कामे सुरू असतात दुष्काळी अन् मग आपण दूर कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी अंगावर टॅटू काढत बसायचे असते. याला दुष्काळाला मिठी मारणे म्हणतात…

https://tarunbharat.org/?p=65690
Posted by : | on : 14 Oct 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (303 of 845 articles)


तोरसेकर | नाचता येईना अंगण वाकडे, अशी उक्ती आहे आणि काँग्रेस पक्ष प्रत्येक बाबतीत तसेच राजकारण करायला निघालेला आहे. म्हणून ...

×