आनंदीबेन पटेल मध्यप्रदेशच्या राज्यपाल

आनंदीबेन पटेल मध्यप्रदेशच्या राज्यपाल

नवी दिल्ली, १९ जानेवारी – गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन…

विनोद राय हेच टू-जी घोटाळ्याचे सूत्रधार

विनोद राय हेच टू-जी घोटाळ्याचे सूत्रधार

►ए. राजा यांच्या पुस्तकातील आरोप, नवी दिल्ली, १९ जानेवारी…

सर्वोच्च न्यायालयातील सुनावण्यांचे थेट प्रक्षेपण व्हावे

सर्वोच्च न्यायालयातील सुनावण्यांचे थेट प्रक्षेपण व्हावे

नवी दिल्ली, १९ जानेवारी – सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वाच्या सुनावण्यांचे…

आयएसआयनेच केले कुलभूषणचे अपहरण : बलूच नेत्याचा गौप्यस्फोट

आयएसआयनेच केले कुलभूषणचे अपहरण : बलूच नेत्याचा गौप्यस्फोट

दिल्ली, १९ जानेवारी – पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील…

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे पॉर्नस्टारशी संबंध उघड

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे पॉर्नस्टारशी संबंध उघड

न्यू यॉर्क, १९ जानेवारी – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प…

सायबेरियात हाडे गोठविणारी थंडी; भुवया, दाढीवरही साचला बर्फ

सायबेरियात हाडे गोठविणारी थंडी; भुवया, दाढीवरही साचला बर्फ

►पारा उणे ६७ अंश सेल्सियसपर्यंत, मॉस्को, १८ जानेवारी –…

मराठी मनाने साहित्य, संस्कृती जपली : मुख्यमंत्री

मराठी मनाने साहित्य, संस्कृती जपली : मुख्यमंत्री

•► ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे वणीत थाटात उद्घाटन,…

समाज परिवर्तनासाठी सर्वांचा हात हातात हवा : सरसंघचालक

समाज परिवर्तनासाठी सर्वांचा हात हातात हवा : सरसंघचालक

ग्रामीण प्रतिनिधी, पंढरपूर, १८ जानेवारी – समाजाच्या परिवर्तनासाठी सर्वांचा…

अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्का आरक्षण

अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्का आरक्षण

►राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, मुंबई, १७ जानेवारी – राज्यातील अनाथ…

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

॥ तरंग : दीपक कलढोणे | ‘हर्र बोला हर्र’…

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

॥ विशेष : मुकुल कानिटकर | एकीकडे जग भारताकडे…

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | हा वारस…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:

देणे समाजाचे

सुनील कुहीकर

त्या दोघांनी मिळून आरंभलेल्या एका उपक्रमाला आता तीन वर्षे झाली होती. यंदाचा कार्यक्रम अगदी पंधरा दिवसांवर आला होता. तयारी जवळपास पूर्ण होत आलेली. अशात एक दु:खद घटना घडली. आयोजक दाम्पत्यापैकी दिलीप गोखले यांची साथ अर्ध्यावर सुटली होती. वीणा गोखले यांच्यावर तर आभाळच कोसळलेले. धीर देणारे लोक सभोवताल असले, तरी आतून खचलेलं मन सावरणं जिकिरीचंच होतं. बरं, म्हटलं तर कारण असं होतं की जाहीर झालेला कार्यक्रम रद्द केला असता तरी कुणी काही म्हटलं नसतं. पण वीणा गोखले यांनी त्या कठीण प्रसंगातही स्वत:ला सावरलं. जाहीर झालेला कार्यक्रम ठरल्यानुसार होणारच, असा निर्धार नव्यानं व्यक्त झाला. सारेच कामाला लागले. झपाट्याने. आयोजन यशस्वीपणे पूर्णत्वास जाईपर्यंत ते झपाटलेपण कायम होते. जग जिंकण्याच्या इराद्यानं सरसावलेली मंडळी ती. तेवढ्या कठीण प्रसंगीही हार मानली नाही, ते इतर वेळी कुठे मागे राहाणार होते? आणि आता तर साथीला उभे राहाणार्‍या माणसांची संख्याही वाढतेय् हळूहळू…
पुण्याच्या या गोखले दाम्पत्याला दोन मुली. जुळ्या. एक सावनी, दुसरी पुरवी. पुरवीच्या वाट्याला जन्मत:च आलेल्या अपंगत्वाच्या दृष्टीने मदतीच्या ठरतील अशा संस्थांचा शोध सुरू झाला. एखाद्या संस्थेला भेट देऊन झाली, सल्लामसलतीसाठी कुणाशी त्या संस्थेबाबत बोलावं तर लक्षात यायचं की, अनेकांना त्या संस्थेबाबत काहीच माहीत नसायचं. यांनी तर त्या संस्थेला प्रत्यक्षात भेट दिलेली असायची. त्यांचं कामही बघितलेलं असायचं. पण लोकांशी बोलावं तर ते या संस्थेबाबत, त्यांच्या कामाबाबत पूर्णपणे अनभिज्ञ! यातून निकड जाणवली ती, असल्या दुर्लक्षित राहिलेल्या संस्था, त्यांचे काम लोकांपर्यंत पोहोचविण्याची. या गरजेतून साकारला एक लोकोपयोगी, अनुकरणीय उपक्रम. यंदा एक तप पूर्ण झाले. ‘देणे समाजाचे’ असे त्या उपक्रमाला लाभलेले छानसे नाव एव्हाना पुणेकरांच्या परिचयाचे झालेले.
आज तपपूर्तीच्या उंबरठ्यावर मागे वळून पाहताना लक्षात येतं की अतिशय साधीशी वाटणारी भन्नाट अशी ती कल्पना होती. एका गृहोपयोगी वस्तूंची प्रदर्शनी बघून तसलंच एक प्रदर्शन सामाजिक संस्थांसाठी आयोजित करण्यात आलं. तसलेच स्टॉल्स इथेही उभारले गेलेत. फरक फक्त एवढाच की, इथे खरेदी-विक्रीचा विषय नव्हता. प्रामाणिकपणा आणि चोख काम एवढ्या निकषांवर आयोजकांनी निवडलेल्या वेगवेगळ्या संस्थांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी यायचं. कुठल्याही शुल्काविना त्यांना देण्यात आलेल्या स्टॉल्समधून आपल्या संस्थेच्या कामांची, उपक्रमांची माहिती त्यांनी लोकांना द्यायची. आजवरच्या कामांचा लेखाजोखा मांडायचा. पुढील नियोजनाचा आराखडा सादर करायचा. तीन दिवसांच्या या कार्यक्रमात निदान पाच हजार पुणेकर सहभागी होतात. काहीही विकत घ्यायचे नसताना, वेगवेगळ्या स्टॉल्सला भेटी देतात. लोकांचे सामाजिक उपक्रम समजून घेतात. आस्थेने त्यांची चौकशी करतात. खिशातला पैसा खर्च करून वेगवेगळ्या संस्थांना मदत करतात. बरं ही मदत दरवेळी पैशाचीच असावी लागते असे नाही. खूप लोक सेवा प्रदान करण्याच्या इराद्याने एखाद्या संस्थेच्या शोधार्थ या प्रदर्शनीला भेट देतात. कुणाला वस्तू द्यायच्या असतात, तर कुणाला कपडे, तर कुणाला आपल्याकडे असलेल्या कलागुणांचा उपयोग समाजासाठी करायचा असतो. पण, योग्य प्लॅटफॉर्म न मिळाल्याने अनेकदा त्यासाठीचा मार्ग गवसला नाही. अशीही मंडळी या उपक्रमाला भेट देऊन जाते. एकूण काय, तर समाजसेवक आणि त्यासाठीच्या आश्रयदात्यांचा मेळ घालून देण्याचा हा छोटासा प्रयत्न असतो.
कुणी कुठल्याशा पाड्यावर आदिवासींच्या सेवेत गुंतलेलं, तर कुणी पर्यावरण रक्षणाचा पण करून बाहेर पडलेलं. कुणी अंध, अपंग, निराश्रितांच्या सेवेत स्वत:ला वाहून घेतलेले, तर कुणी पारध्यांच्या सेवेत. कुणी प्रदूषणाच्या समस्येने बाधित झालेल्यांची चिंता वाहतोय्, तर कुणी एचआयव्हीग्रस्तांची. या सेवेसाठी कुणी शहरातल्या झोपडपट्टीत बस्तान मांडलेले, तर कुणी आडवळणावरची दुर्गम वस्ती जवळ केलेली. निर्व्याज प्रेम करणार्‍या माणसांच्या तप, साधनेतून या धडपडीला आकार मिळत असला, तरी लोकाश्रयाअभावी तो संघर्ष अजून लोकांपर्यंत पोहोचलेला नसल्याचे चित्र अनेक संस्थांच्या बाबतीत नजरेस आले, तेव्हा या उपक्रमाची गरज अधिकच प्रकर्षाने जाणवत गेली. दिलीप आणि वीणा गोखले यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या उपक्रमाची व्याप्तीही एव्हाना रुंदावत गेलेली. मदतीला सरसावलेल्या हातांची संख्याही हळूहळू वाढते आहे. या उपक्रमात सहभागी होणार्‍या सामाजिक संस्थांसोबतच दात्यांची संख्याही वर्षागणिक दुणावते आहे. गेल्या पितृपक्षात पार पडलेल्या यंदाच्या उपक्रमात वेगवेगळ्या दात्यांनी जवळपास पन्नास लक्ष रुपयांची मदत वेगवेगळ्या संस्थांना केल्याची बातमी आशा पल्लवीत करणारी आहे. एरवी माणसांचा एकमेकांवरचा विश्‍वासच उडत चालला असताना दाते सापडणे आणि दात्यांना दान करण्यासाठी सत्पात्र सापडणे या दोन्ही बाबी तशा अवघडच. पण, ‘देणे समजाचे’ या गोखले दाम्पत्याने आरंभलेल्या उपक्रमातून अनेकांना एक उत्तम मार्ग गवसला आहे. दानाचाही आणि देणग्या मिळवण्याचाही.
नावाजलेल्या, प्रसिद्धी पावलेल्या संस्थांचा तितकासा प्रश्‍न नसतो. त्यांना तर विदेशातूनही देणग्या येतात. पण प्रसिद्धीचा तो स्तर गाठण्यास अद्याप अवकाश असलेल्या नवख्या संस्था आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला पैशाअभावी येणारा संघर्ष, अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी चाललेली त्यांची धडपड… त्या धडपडीला मदतीचा हात देण्याचा एक प्रयत्न म्हणजे ‘देणे समाजाचे’ नावाचा हा उपक्रम. आजवर महाराष्ट्रातल्या कानाकोपर्‍यात काम करणार्‍या जवळपास १३० संस्थांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्यात आलेले यश, ही या उपक्रमाची जमेची बाजू. दिलीप गोखले यांच्या पश्‍चात वीणा गोखले यांनी तो अव्याहतपणे चालविण्याचा विडा उचललेला. खरं तर त्यांचा व्यवसाय पर्यटनाचा. पण या सामाजिक कार्यासाठी निदान तीन महिने तरी तो व्यवसाय पूर्णपणे बंद असतो. आयोजनाचा हेतू शुद्ध आणि कारण भावनिक. त्यामुळे त्या तीन महिन्यांच्या काळात होणार्‍या व्यावसायिक नुकसानीचे गणित मांडत बसण्याची गरज इथे कुणालाच वाटत नाही. त्यात कुणी वेळ दवडतही नाही.
लवकरच डॉक्टर होणार असलेली मुलगी सावनी गोखलेही आता या आयोजनात हिरिरीने सहभागी होते. अनिता पटवर्धन आणि अन्य मित्र-मैत्रीणींचाही त्याला हातभार लागतो. सहभागी करून घेण्यापूर्वी स्वत: जाऊन संबंधित संस्थेच्या कामाची पाहणी करण्याच्या नियमाला मात्र कुठल्याही परिस्थितीत फाटा नाहीच. निवड झालेल्या संस्थांचे पदाधिकारी तीन दिवसांच्या या कार्यक्रमात सहभागी होतात. प्रत्येक संस्थेला सलग दोन वर्षे सहभागी होण्याची संधी असते. दुर्गम भागात काम करणार्‍या संस्थांच्या कामाची माहिती यानिमित्ताने शहरी लोकांपर्यंत पोहोचते. इच्छुक दाते पुढे येतात. त्यांना आवडलेल्या कामासाठी संबंधित संस्थांना जमेल तेवढी मदत ते करतात. काही दाते सरसकट सर्वांना थोडेथोडे पैसे देऊन निघून जातात. कुठलाही हिशेब न मांडता… तीन दिवसांनी इथनं बाहेर पडताना वेगवेगळ्या संस्थांच्या पदाधिकार्‍यांच्या चेहर्‍यावर दिसणारा आनंद, कधी शब्दांतून तर कधी त्यांनी पाठीवर ठेवलेल्या थरथरत्या हातांवरून व्यक्त होणार्‍या त्यांच्या मनातील कृतज्ञतेच्या भावना… हीच या कार्यक्रमाच्या आयोजकांची ‘कमाई’… त्यासाठीच तर सारी धडपड चाललेली असते. शेवटी काय, समाजाचे देणे महत्त्वाचे…

शेअर करा

Posted by on Oct 29 2016. Filed under उपलेख, संपादकीय, सुनील कुहीकर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उपलेख, संपादकीय, सुनील कुहीकर (875 of 892 articles)


भारतातील जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून कुमक घेऊन फुटीरतावादी कारवाया करणार्‍या लोकांनी पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या गुलाम काश्मीरमध्ये काय चालले आहे, याचा थोडा ...