ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:

धडधाकटांचे अपंगत्व

भाऊ तोरसेकर |

राजकारणात अनेकदा आपला तोटा करून घेताना शत्रूला मोठा करणारे धूर्त जगाने बघितले आहेत. किंबहुना धूर्तपणाच्या आहारी गेलेल्या नेत्यांनी शत्रूच्या शत्रूला मित्र बनवताना, आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्याचा मूर्खपणा अनेकदा केलेला आहे. अशाच मूर्खांमुळे जगाच्या इतिहासाला विचित्र वळणेही मिळालेली आहेत. चंद्राबाबू नायडूंची नोंद अशा इतिहासात अगत्याने केली जाईल. कारण आज त्यांनी काँग्रेस पक्षाची कास धरताना आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे. ज्या पक्षाचा जन्मच मुळात तेलगू अस्मिता जपण्यासाठी काँग्रेसच्या विरोधात झालेला होता, त्याच काँग्रेसला नवे जीवदान देण्यासाठी नायडू आपल्या पक्षाचा बळी द्यायला निघाले आहेत. पाच वर्षांपूर्वी याच नायडूंनी आंध्रच्या विभाजनाला विरोध करताना काँग्रेसला तेलगू भाषिकांचा शत्रू ठरवून भाजपाशी युती केलेली होती. पण या वर्षाच्या पूर्वार्धात त्यांनी आपला पवित्रा बदलला आणि उर्वरित आंध्राला मोदी सरकारने विशेष राज्याचा दर्जा दिला नाही म्हणून शत्रू ठरवले. आता आपल्या पायाखालची वाळू सरकू लागल्याचे जाणवताच नायडूंनी काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर राव यांच्या स्थानिक पक्षाला पराभूत करण्यासाठी गेल्या आठवड्यात त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि नवी युती तेलंगणासाठी केली. त्यात काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षाला सहभागी करून घेतले. त्यामुळे चंद्रशेखर राव यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले यात शंकाच नाही. वेगळ्या तेलंगणासाठी उपोषण करून मागणी पदरात पाडून घेतल्यानंतर राव यांनी नंतर तिथल्या निवडणुकाही जिंकल्या होत्या आणि मनमानीही भरपूर केली. मात्र पाच वर्षांनी आपला करिष्मा टिकून नसल्याची शंका आल्याने त्यांनी मुदत संपण्यापूर्वीच विधानसभा बरखास्त केली व मध्यावधी निवडणुकांचा मार्ग स्वत:हून मोकळा केला. त्यात भर म्हणून आपल्या स्वार्थासाठी नायडूंनी अशी खेळी केली आहे. पण त्यांना काय लाभ होणार आहे?
आंध्रचे विभाजन करताना सोनियांनी हे एक मोठे राज्य काँग्रेसच्या हातून गमावले होते. वास्तविक आंध्रने २००४ सालात काँग्रेसला दिल्लीची सत्ता पुन्हा मिळवून देण्यात मोठा हातभार लावला होता. त्यातही राजशेखर रेड्डी यांचे कर्तृत्व मोठे होते. त्यांनी एकत्रित आंध्रप्रदेशात सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळवून दिल्या व त्यावेळी राव यांच्या विभाजनवादी तेलगंणा समितीलाही सोबत घेतलेले होते. पण त्यांना दिलेला शब्द सोनियांनी पाळला नाही आणि २००९ च्या निवडणुकीत राजशेखर रेड्डींनी तेलंगणा समितीलाही हरवून एकत्रित आंध्राची सत्ता पुन्हा काँग्रेसला मिळवून दिली होती. मात्र अल्पावधीतच त्यांचे अपघाती निधन झाले आणि त्यांच्या पुत्रानेच पुन्हा सत्तेवर दावा केला, तो सोनियांनी जुमानला नाही. तिथून काँग्रेसचा आंध्रातील र्‍हास सुरू झाला होता. रेड्डीपुत्राची नाराजी ओढवून घेत सोनियांनी त्यांच्या मागे आयकर खात्याचा ससेमिरा लावला आणि तरीही त्याने काढलेला वेगळा पक्षच जिंकताना दिसल्यावर आंध्रचे विभाजन करून तिथली काँग्रेस जमीनदोस्त करून टाकली. काँग्रेसने हे विभाजन केले आणि आंध्रात काँग्रेस संपलीच. पण वेगळ्या केलेल्या तेलंगणातही काँग्रेसला स्थान उरले नाही. ती मागणी घेऊन दीर्घकाळ लढलेल्या तेलंगणा समितीला लोकांनी भरभरून मते दिली आणि दोन्ही जागी काँग्रेस नामशेष होऊन गेली. चंद्राबाबू विभाजनाचे विरोधक होते. त्यामुळे उर्वरित आंध्रात त्यांना विजय सोपा झाला होता. पण पुरेसा आत्मविश्‍वास नव्हता. म्हणूनच त्यांनी अखेरच्या क्षणी भाजपाशी युती करून लोकसभा-विधानसभेत चांगले यश मिळवले. अर्थात त्यांनी युती केली नसती, तर रेड्डीपुत्राने आंध्रची सत्ता मिळवली असती. कारण दोघांना तुल्यबळ मते मिळाली होती आणि केवळ भाजपा सोबत असल्यामुळेच नायडूंचा तेलगू देसम पक्ष काठावरचे बहुमत घेऊन सत्तेवर आलेला होता. आता त्याचीही शाश्‍वती राहिलेली नाही.
चार महिन्यांपूर्वी उर्वरित आंध्रला विशेष दर्जा देण्याच्या मागणीवरून रेड्डीपुत्र जगनमोहन याने आपल्या पक्षाच्या लोकसभेतील खासदारांना सामूहिक राजीनामे द्यायला भाग पाडले आणि चंद्राबाबूंची कोंडी केली. त्यांनाही त्याच मागणीसाठी एनडीएतून बाहेर पडावे लागले. पण ते केल्यावर त्यांना भाजपामुळे मिळणारी मते वाया गेलेली आहेत आणि स्वबळावर आंध्रात लढण्याची वेळ आलेली आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांची होती तितकी लोकप्रियता शिल्लक राहिलेली नाही आणि उद्या तेलंगणानंतर आंध्रातही त्यांना काँग्रेसची तुटपुंजी मते सोबत घेतल्याखेरीज जिंकण्याची शाश्‍वती उरलेली नाही. पण तसे करताना त्यांना आपल्याच काही मतांवर पाणी सोडावे लागणार आहे आणि काँग्रेसची मते त्यांना मिळतीलच, अशी कुठलीही हमी नाही. कारण त्यांचा पक्षच मुळात काँग्रेसमुक्त आंध्रासाठी जन्माला आलेला होता. आता त्याच काँग्रेसशी हातमिळवणी केल्यावर काय होईल? असलेली हक्काची मते दुखावली गेली आहेत आणि काँग्रेसची बहुतांश मते आधीच रेड्डीपुत्र खाऊन बसलेला आहे. त्यामुळे तिथून काही हाती येण्याची बिलकुल शक्यता नाही. तेलगंणातील निकाल कसेही लागले, तरी त्यात नुकसान नायडूंच्याच पक्षाचे होणार आहे. तिथे राव यांना काँग्रेस-नायडू आघाडीने पराभूत केले व सरकार बनवले; तर ती आघाडी आंध्रातही पुढे चालवावी लागेल आणि त्यात लाभ काँग्रेसचा आहे. कारण तिला रेड्डीपुत्राला आव्हान उभे करणे शक्य होईल आणि त्यासाठी तेलगू देसमची काही मते मिळून जातील. त्यातून काँग्रेसला त्याही राज्यात नवे जीवदान मिळू शकेल. मात्र चंद्राबाबू कायमचे परावलंबी होऊन जाणार आहेत. त्यासाठीच मग आता त्यांनी राज्यात सत्ता जाणार असेल, तर देशाच्या राजकारणात टिकून राहण्याची धडपड चालविली आहे. द्रमुक व देवेगौडांना हाताशी धरून ते आपले राष्ट्रीय राजकारणात स्थान निर्माण करू बघत आहेत.
मागील आठवड्यात चंद्राबाबूंनी दिल्लीत जाऊन शरद पवार, फारूख अब्दुल्ला, राहुल गांधी अशा नेत्यांना शाली घातल्या होत्या. या आठवड्यात दक्षिणेतील द्रमुक व देवेगौडांना हाताशी धरून वेगळी प्रादेशिक पक्षांची राष्ट्रीय आघाडी उभारण्याचा प्रयत्न चालविला आहे. हे करताना चंद्राबाबूंना बावीस वर्षांपूर्वीचा घटनाक्रम आठवला असेल. वाजपेयींचे तेरा दिवसांचे सरकार बहुमत शाबीत करू शकले नाही, तेव्हा खिचडी सरकार स्थापन झाले होते, देवेगौडा पंतप्रधान झाले आणि त्यांना पुढे करणारे किंगमेकर चंद्राबाबूच होते. मात्र ती सरकारे फार टिकू शकली नाहीत आणि कोसळल्यावर मध्यावधी निवडणुका झाल्या. तेव्हा हेच किंगमेकर भाजपाच्या वळचणीला येऊन बसलेले होते. त्यांनीच तत्कालीन फेडरल फ्रन्टला लाथ मारून वाजपेयी सरकारला पाठिंबा दिलेला होता. त्यामुळेच त्यांना आता किंगमेकर होण्याचे डोहाळे लागलेले असतील, तर त्यासाठी लोकसभेत व आपल्या राज्यात निदान आपली हुकूमत असावी लागते, हे विसरून चालणार नाही. तेव्हा देवेगौडा व नायडू आपापल्या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि लोकसभेत त्यांच्या पक्षाचे निदान राज्यातून निवडून आलेले बहुसंख्य खासदार होते. आज दोघांतही आपापल्या राज्यातही बहुसंख्य खासदार निवडून आणण्याची क्षमता नसल्याने आघाडीच्या मागे पळावे लागते आहे. तेव्हा त्यांच्या तशा खिचडी सरकारला पाठिंबा देण्यासाठी डाव्यांचे पन्नास तरी खासदार होते. आज त्यांचीही पुरती दुर्दशा झालेली आहे. म्हणजे लुळेपांगळे एकत्र येऊन स्वत:ला पहिलवान म्हणून घोषित करू बघत आहेत. खरे तर असे दुबळे विकलांगही मोठी हिंमत करून आपल्या अपंगत्वावर मात करण्याचा कायम प्रयत्न करीत असतात. उलट नायडू, देवेगौडा वा अन्य विरोधक आहेत, ते धडधाकट असूनही मानसिक दुबळेपणाने ग्रासलेले आहेत. मेहनतीने शक्य असलेली कामेही त्यांना लबाडीने धूर्तपणे करून विजय मिळवायचा आहे. पण तो जुगार असतो आणि त्याची मोठी किंमत नंतरच्या काळात मोजावी लागते. डाव्यांपासून काँगे्रसपर्यंत अनेकांना ती मोजावी लागली आहे. पण अक्कल येतेय कुठे?

https://tarunbharat.org/?p=67410
Posted by : | on : 11 Nov 2018
Filed under : उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक (426 of 1509 articles)


आणि फैजाबाद ही जुळी शहरे आहेत आणि जिल्ह्याचे नाव आहे फैजाबाद. आत्ता परवा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत दिवाळी ...

×