ads
ads
प्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक

प्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक

►महिला पत्रकार बसू यांची साक्ष, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर…

आलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर

आलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर

►सीबीआय विरुद्ध सीबीआय, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – केंद्रीय…

कुशवाह शरद यादवांच्या तंबूत?, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा

कुशवाह शरद यादवांच्या तंबूत?, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा

नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – केंद्रात मंत्री असलेले राष्ट्रीय…

रोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे

रोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे

►अमेरिकेची भूमिका, वॉशिंग्टन, १२ नोव्हेंबर – बांगलादेशातून म्यानमारला रोहिंग्यांचे…

पंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना

पंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना

लंडन, १० नोव्हेंबर – घोटाळ्याच्या गर्तेत अडकलेल्या पंजाब नॅशनल…

अफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार

अफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार

►भारत, पाक व तालिबान एकाच मंचावर, मॉस्को, ९ नोव्हेंबर…

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

►चाचपणी सुरू केली ►राफेल प्रकरणी राकाँच्या भूमिकेने नाराज, मुंबई,…

पुन्हा भारनियमनाचे चटके नाही

पुन्हा भारनियमनाचे चटके नाही

►ऊर्जामंत्री बावनकुळे यांची ग्वाही, नागपूर, ११ नोव्हेंबर – राज्यात…

सुधीर मुनगंटीवार देशातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री

सुधीर मुनगंटीवार देशातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री

►हत्तीसारखे डौलाने चाला, टीकेची पर्वा करू नका ►नितीन गडकरी…

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

॥ विशेष : धनश्री बेडेकर | हिंदू धर्मात निसर्गचक्राला…

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते…

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | देशात किंवा कदाचित…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:32 | सूर्यास्त: 17:49
अयनांश:
Home » उपलेख, गजानन निमदेव, संपादकीय, स्तंभलेखक » ध्येयमार्गावरील निर्धारपूर्ण दमदार वाटचाल…

ध्येयमार्गावरील निर्धारपूर्ण दमदार वाटचाल…

गजानन निमदेव |

समस्या निर्माण झाल्या की आपण परिस्थितीला शरण जातो. जिथे मर्यादा असतात तिथे आपण तडजोड स्वीकारतो. जिथे अडथळे येतात तिथे आपण काम करणेच थांबवतो. जिथे दु:ख वाट्याला येते तिथे आपण हताश होऊन जातो. परंतु, जिद्द, चिकाटी, परिश्रम करण्याची तयारी, समर्पणभाव, कामाप्रति निष्ठा, आत्मविश्‍वास या अंगीभूत गुणांच्या आधारे आणि बालपणी मिळालेल्या संस्कारांमुळे या सगळ्या समस्यांवर मात करून स्वत:ला सिद्ध करणार्‍या अनेक महिला आपल्या समजात, राज्यात अन देशात आहेत. कांचन नितीन गडकरी ह्यांचे व्यक्तिमत्त्वही असेच आहे. परिस्थितीला शरण जाऊन पराभव स्वीकारणार्‍यांमध्ये त्यांचा समावेश नाही.
जीवनात जे काही करायचे आपण ठरविले आहे, ते करण्यासाठी आवश्यक परिश्रमाची, जिद्दीची, चिकाटीची, समर्पणाची तयारी ज्याच्याकडे आहे, ती व्यक्ती कधीही पराभूत होत नाही. ध्येयमार्गावर निर्धारपूर्वक अढळपणे चालणार्‍या व्यक्तीला कोणीही रोखू शकत नाही. रामटेकमध्ये जन्माला आलेली एक सामान्य मुलगी ते देशाच्या राजकारणात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा आपल्या कर्तृत्वाने उमटविणार्‍या एका दमदार राजकीय नेत्याची तेवढीच कर्तृत्ववान व प्रतिभाशाली पत्नी हा कांचन गडकरी यांचा प्रवास अन्य महिलांसाठी निश्‍चितच प्रेरणादायी ठरावा. नितीन गडकरी यांची पत्नी एवढीच त्यांची ओळख नाही. नागपूरच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, सांगीतिक अशा सर्वच क्षेत्रात त्यांचा प्रभावी वावर आहे. ज्या क्षेत्रात म्हणून त्यांनी प्रवेश केला, त्या क्षेत्रात त्यांनी स्वत:चे कर्तृत्व गाजविले अन स्वत:सोबतच त्या क्षेत्रालाही प्रतिष्ठा मिळवून दिली, हा त्यांच्यातील गुण वाखाणण्याजोगा आहे.
शेवटच्या श्‍वासापर्यंत परिस्थितीशी दोन हात करून लढण्याची क्षमता असलेले व्यक्तिमत्त्व सगळ्यांनाच लाभत नाही. पण, कांचन गडकरी ह्यांना ते लाभले आहे. त्यांचे पती नितीन गडकरी हे राजकारणात आहेत, केंद्रातल्या सत्तेत मंत्रिपदावर आहेत किंवा आधी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते म्हणून जो राजाश्रय कांचन गडकरी यांना लाभला, त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलले, असे जर कोणी म्हणणार असेल तर तो त्यांच्यावर अन्याय ठरेल. कारण, ज्या कुटुंबात त्या जन्माला आल्या, त्या कुटुंबातच त्यांना समाजसेवेचे बाळकडू मिळाले. कांचन गडकरी यांचे वडील कमलाकर तोतडे हे एमबीबीएस डॉक्टर होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्पित असे स्वयंसेवक होते. रामटेक येथे त्यांचा मोठा वाडा होता. हा वाडाही मोठा वैशिष्ट्यपूर्ण. थोर महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या वाड्याने अनेक महत्त्वपूर्ण घटनाक्रम अनुभवले. या वाड्यात वरच्या भागात काँग्रेसचे कार्यालय होते, तर खाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे. दोन भिन्न विचारधारा असलेल्या संघटनांची कार्यालये या वाड्याने अनुभवली. या वाड्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक पदाधिकारी जसे येऊन गेलेत, तसे राष्ट्रपिता महात्मा गांधी हेसुद्धा भेट देऊन गेलेत. त्यामुळे अनेक घटनांचे साक्षीदार ठरलेल्या वाड्यात राहण्याचे भाग्य कांचन गडकरी यांना लाभले. त्यांचे वडील डॉ. कमलाकर तोतडे हे रामटेकचे नगर संघचालक होते. त्यामुळे संघाच्या लोकांचा त्यांच्या घरी सतत राबता असायचा. वडील सेवाभावी वृत्तीचे होते. तोच गुण कांचन गडकरी यांच्यातही अनुभवायला मिळतो.
समाजकार्याचे बाळकडू घरीच मिळाल्याने विवाहानंतर नागपुरातील उपाध्ये रोडवरील महाल भागात राहणार्‍या गडकरींच्या कुटुंबात दाखल झालेल्या कांचन वहिनींना वातावरणाशी जुळवून घेताना फार कष्ट पडले नाहीत. नितीन गडकरी यांच्या मातोश्री दिवंगत भानुताई गडकरी यांनी कांचन वहिनींना सातत्याने प्रोत्साहनच दिले. स्वत: श्रीमती भानुताई गडकरी ह्या श्रीमती सुमतीताई सुकळीकर यांच्यासमवेत भारतीय जनसंघाचे काम करायच्या. श्रीमती भानुताई म्हणजेच कांचन वहिनींच्या सासूबाई ह्या स्वत:च सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असल्याने कांचन गडकरी यांच्यावरही कधीच कोणती बंधनं आली नाहीत. गडकरी कुटुंबातील शिस्त सांभाळून जे जे म्हणून करण्याची इच्छा झाली, जे जे म्हणून करता येणं शक्य आहे, ते सगळं करण्यासाठी सासूबाईंनी कायम प्रोत्साहन दिल्याचं कांचन गडकरी नम्रपणे मान्य करतात. सासूबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभावही त्यांच्यावर पडल्याचे त्या नाकारत नाहीत. मुळात आडात असेल तरच पोहर्‍यात येणार ना! बस्स, तसेच कांचन गडकरी यांचे आहे. त्यांच्यात मुळातच अनेक गुणविशेष होते. लहानपणापासून त्यांना उत्तम संस्कार मिळाले. डॉक्टर वडिलांच्या मार्गदर्शनातच त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलत अन बहरत गेले अन लग्न करतानाही सार्वजनिक जीवनात काम करणाराच नवरा मिळाला. सासूबाईसुद्घा राजकीय अन सामाजिक क्षेत्रात समर्पित भावनेने कार्यरत असणे हा त्यांच्यासाठी दुग्धशर्करा योगच होता.
आयुष्यात संधी प्रत्येकालाच मिळते. पण, संधीचं सोनं करणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. कांचन गडकरी यांनी संधीचं सोनं करण्यात यश मिळवलं. जी म्हणून कामं करण्याची संधी मिळाली, ती न दवडता त्यांनी सर्व अडथळ्यांवर मात करून प्रत्येक काम यशस्वी केलं. सार्वजनिक जीवनात वावरताना अनेक पथ्यही पाळावी लागतात. सर्वप्रकारचं पथ्यपालन करून कांचन गडकरी यांनी समाजकारणही केलं आणि आपला संसारही व्यवस्थित सांभाळला. राजकारणी माणसाची पत्नी होणं, त्यातही नितीन गडकरींसारख्या नेत्याची पत्नी म्हणून सांसारिक आणि अन्य जबाबदार्‍या पार पाडणं सोपं नाही. नितीन गडकरी हा अतिशय जिंदादिल, दिलदार आणि दमदार राजकीय नेता आहे. भारतात त्यांच्यासारखे उदारमतवादी नेते फारच थोडे. नितीन गडकरी स्वत: खवय्ये आहेत आणि इतरांना खाऊ घालतानाही त्यांना कमालीचा आनंद होतो. घरी येणार्‍यांना ही खाऊपिऊ घालण्याची कसरत करताना कांचन वहिनींची दमछाक झाली नसती तरच नवल. शिवाय, नितीन गडकरी हे राजकारणात आहेत म्हणजे येणार्‍याजाणार्‍यांना नुसता चहाफराळ करणे एवढेच जबाबदारी कांचनवहिनींना पार पाडावी लागत असेल असा आपला समज असेल तर तो खोटा आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, असे जे आपल्याकडे म्हटले जाते, ते कांचन गडकरी यांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. आज केंद्रीय मंत्री असलेल्या नितीन गडकरी यांच्या प्रत्येक यशापयशात आणि सुखदु:खात कांचन गडकरी यांची साथ त्यांना समर्थपणे लाभली आहे.
नितीन गडकरी यांच्या घरी गेल्यावर कुठे परक्या घरी आपण आलो आहोत असे कधीच जाणवत नाही. येणार्‍याजाणार्‍यांचे आतिथ्य करण्याचे कांचन गडकरी यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. गडकरी हे महालातील त्यांच्या वाड्यावर असतात, तेव्हा तर भेटायला येणार्‍यांची रीघ लागलेली असते. खाजगी जीवन असे काही त्यांना लाभत असेल यावर माझा तरी विश्‍वास नाही. नितीनजी असोत वा नसोत, त्यांच्या वाड्यावर कायम चाहत्यांचा राबता असतो. वाड्यावर मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी, लोकांच्या गर्दीतच हरवलेले नितीन गडकरी, त्यांचे देशव्यापी दौरे अशा सगळ्या वातावरणातही कांचन गडकरी यांनी एक आदर्श गृहिणी म्हणूनही जीवनात यश मिळविले आहे. कुठेही सत्तेचे वा श्रीमंतीचे प्रदर्शन नाही की अवडंबर नाही. सगळे काही सामान्य असल्यासारखीच गडकरी कुटुंबातील सदस्यांची वागणूक. याचे सगळे श्रेय जाते ते कांचन गडकरी यांनाच!
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करताना नितीन गडकरी यांच्या राजाश्रयाचा कोणताही लाभ न घेता त्यांनी पदे मिळविली आणि टिकविली, ही बाब महत्त्वाची आहे. १८ डिसेंबर १९८४ रोजी कांचन तोतडे यांचे नितीन गडकरी यांच्याशी लग्न झाले आणि त्या सौ. कांचन गडकरी झाल्या. पतीचं राजकारण आणि सासूबाईंचं समाजकारण सांभाळत असतानाच कांचन गडकरी घरची जबाबदारीही समर्थपणे सांभाळू लागल्या. आपल्यातील कलागुणांच्या आधारे कांचन गडकरी समाजकारणाचा एकेक उंबरठा पार करत यशोशिखरावर चढण्याचा प्रयत्न करीत होत्या. नागपूरच्या सामाजिक जीवनात शिक्षण, संस्कृती, आरोग्य, अर्थकारण, संगीत अशा सर्वच क्षेत्रात त्या काम करीत आहेत, हे उल्लेखनीय! पतीचे राजकारण, कुटुंबाची जबाबदारी सांभाळत समाजजीवनात अन्य अनेक जबाबदार्‍या सांभाळणार्‍या कांचन गडकरी यांचे मन:पूर्वक अभीष्टचिंतन!

http://tarunbharat.org/?p=60210
Posted by : | on : 21 Aug 2018
Filed under : उपलेख, गजानन निमदेव, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, गजानन निमदेव, संपादकीय, स्तंभलेखक (273 of 1312 articles)


नरेंद्र मोदी यांचे लालकिल्ल्याहून दिलेले पाचवे भाषण निव्वळ पाच वर्षांतील कामगिरीचा आढावा घेणारे नव्हते, तर पुढच्या काळात भारत कोणत्या उंचीवर ...

×