ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » नक्षलसमर्थकांना चपराक!

नक्षलसमर्थकांना चपराक!

सर्वोच्च न्यायालयाने परवा पाच अर्बन नक्षलवाद्यांना दिलासा देण्याचे सपशेल नाकारून त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा केल्याने, नक्षलवादी आणि नक्षलसमर्थकांना जबरदस्त चपराक बसली आहे. स्वराज अभियानाचे प्रमुख योगेंद्र यादव यांचे नेते अ‍ॅड. प्रशांत भूषण, रोमिला थापर यांसारख्या तथाकथित विद्वान लोकांनी, या पाच जणांच्या घरावर केवळ धाडी घातल्या म्हणून केवढा गहजब केला होता. हे लोक कसे समाजसेवक, गरीब-आदिवासींचे कैवारी आहेत, हे सांगण्यासाठी देश तोडण्याची मनीषा बाळगून असणारे सारे नक्षलसमर्थक दिल्लीत एकत्र आले होते. दिल्लीत सर्वोच्च न्यायालय आहे, हे पाहून मग काही लोक पुढे सरसावले आणि रोमिला थापर, प्रभात पटनायक, देवकी जैन, सतीश देशपांडे व माजा दारूवाला यांनी याचिका दाखल केली. हे लोक स्वत:ला मानवतावादी आणि समाजसेवक समजतात. रोमिला थापर तर इतिहासतज्ज्ञ आहेत. त्यांनी या नक्षलवाद्यांचा, माओवाद्यांचा इतिहास लिहून काढला असता, नक्षली कसे आदिवासींना क्रूरपणे ठार मारतात, यांना चीन आणि नेपाळमधून कशी शस्त्रे मिळतात, याचा इतिहास सांगितला असता, तर त्यांचे सर्वांनी स्वागतच केले असते. पण, नक्षल्यांचे समर्थक बनून त्यांनी नवा इतिहास रचला. यासाठी त्या नेहमी स्मरणात राहतील. अटक करण्यात आलेले लोक कोण आहेत, त्यांचे नक्षल्यांसोबत कसे संबंध आहेत, ते कुणासाठी शहरांमध्ये बसून काम करीत आहेत, हे प्रो. साईबाबाला जन्मठेप झाली, तेव्हाच अधिक स्पष्ट झाले होते. असे आणखी कितीतरी साईबाबा देशात लपले आहेत. पन्नास वर्षांत लोकशाही सत्ता उलथवून कम्युनिस्टांचे राज्य आणण्याची स्वप्ने पाहणार्‍या नक्षलवाद्यांच्या विचारांशी याचिकाकर्त्यांचे विचार का मिळतेजुळते आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयात काही काळ या पाच आरोपींना दिलासा मिळालाही. पण, महाराष्ट्र पोलिसांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली, तेवढ्याच जोमाने बाजू मांडली आणि शेवटी यांच्या अटकेचा मार्ग आपल्या पदरात पाडून घेतला. २८ डिसेंबरला जेव्हा तीन सदस्यीय पीठापुढे हे प्रकरण सुनावणीसाठी आले, तेव्हा न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले होते की, केवळ सरकारी धोरणांचा विरोध, असंतोष म्हणून यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे कुठेही दिसत नाही. पोलिसांनी जे काही पुरावे गोळा केलेले आहेत, त्यात या विरोधमताचा लवलेशही नाही. हे प्रकरण अशा संघटनेशी संबंधित आहे, ज्यावर देशात प्रतिबंध आहे. त्या संघटनेचे संबंध या आरोपींशी जुळले असल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची बाब सकृद्दर्शनी खरी वाटते. त्यामुळे तपास होऊ द्यावा. यात आता आम्ही हस्तक्षेप करणार नाही. हा निर्णय दोन विरुद्ध एक असा दिला गेला होता. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी वेगळे मत नोंदविले. त्यांचे म्हणणे होते की, एफआयआरच रद्द करावा व एसआयटी नियुक्त करावी. त्याच्या तपासाचे नियंत्रण या कोर्टामार्फत व्हावे. हे प्रकरण वेगळी विचारधारा आहे, म्हणून ते दडपले जाऊ शकत नाही. याच चंद्रचूडसाहेबांनी यापूर्वी न्यायासनावरून असे मत व्यक्त केले होते की, असंतोष हा प्रेशर कूकरसारखा असतो. त्याचा दाब वाढल्यास त्याचा स्फोट होऊ शकतो. म्हणजे नेमके काय होऊ शकते, याचा खुलासा त्यांनी केला नाही. देशात हे पाचच जण असे आहेत का, ज्यांच्या मनात असंतोष आहे? नक्षल्यांनी ज्या गरीब-आदिवासी-दलित यांची हत्या केली त्यांच्या मनात तर यापेक्षाही अधिक असंतोष आहे. त्याची मात्र दखल न्या. चंद्रचूड यांनी घेतलेली दिसत नाही. प्रशांत भूषण आणि कंपनीला नेमके हेच हवे होते. पण, त्यात त्यांना यश आले नाही. त्याच कालावधीत प्रशांत भूषण यांनी रांची येथे असे विधान केले होते की, सर्वोच्च न्यायालयातदेखील प्रचंड भ्रष्टाचार आहे. हा एकप्रकारे न्यायालयावर दबाव आणण्याचाच प्रकार होता. पण, तोसुद्धा सफल झाला नाही. नजरकैदेची मुदत आणखी चार आठवडे वाढवून देतानाच, आरोपींना खालच्या कोर्टात जाऊन जामीन मिळविता येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. पण, त्यात आरोपींना आणि त्यांच्या चाहत्यांना यश आले नाही. या आरोपींचा अर्ज फेटाळल्यानंतर लागलीच पुणे पोलिसांनी अटकेची कारवाई सुरू केली. या पाच लोकांकडून जप्त करण्यात आलेले लॅपटॉप, मोबाईल, शेकडो पत्रे यांच्याबाबत तपास होईल. लॅपटॉपमध्ये जी कागदपत्रे आहेत, त्याची तपासणी न्यायसहायक प्रयोगशाळेमार्फत करण्याचे काम सुरू आहे. या पाच आरोपींच्या समर्थकांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पुनरिक्षण अर्ज दाखल केला असता, तोसुद्धा कोर्टाने फेटाळून लावला आहे. आता वरवरा राव हे तेवढे उरले आहेत. हैदराबाद हायकोर्टाने गेल्या गुरुवारी वरवरा राव यांची नजरकैद आणखी तीन महिन्यांनी वाढवून दिली आहे. त्यांनाही अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पाच आरोपींच्या कारवाईवरून एक चांगले झाले. कोणते नक्षलसमर्थक, अर्बन नक्षल शहरात बसलेले आहेत, हे जनतेला कळले. कोणते राजकीय पक्ष नक्षलसमर्थक आहेत, हेही स्पष्ट झाले. दिवटे राहुल गांधी यांनी तर या आरोपींना एनजीओ म्हटले होते. त्यांना अक्कल नाही, हे समजू शकते. पण, त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना? काँग्रेसच्या काळातच सीपीआय माओवादी संघटनेवर बंदी आणली गेली. त्या वेळी तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल केले होते, ते एकदा राहुल गांधी यांना नेऊन कुणीतरी दाखविले पाहिजे. ‘भारत तेेरे टुकडे होंगे’ म्हणणार्‍यांच्या व्यासपीठावर जाण्यास त्यांना मज्जाव करायला हवा होता. देश तोडणार्‍यांच्या मदतीने काँग्रेसला सत्ता हस्तगत करायची आहे, असा त्याचा साधा सरळ अर्थ आहे. या देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली जो हैदोस सुरू आहे, त्याला कुठेतरी थांबविण्याची गरज आहे. राष्ट्रद्रोहाची व्याख्या नव्याने करण्याची गरज आहे. मागे विधि आयोगाने हे काम हाती घेतले होते. पण, त्याचा अहवाल अद्याप यायचा आहे. नक्षलवादी निष्पाप आदिवासींच्या हत्या करतात, पोलिसांवर सशस्त्र हल्ले करतात; तर तिकडे काश्मीरमध्ये दगडफेकीत आपल्या जवानाला शहीद व्हावे लागते. हे कुठेतरी थांबले पाहिजे. राहुल गांधी यांना राफेलची किंमत माहीत नाही आणि ते वाट्टेल तसे आरोप करीत सुटले आहेत. देशाची संरक्षणविषयक गुपिते उघड करण्याची त्यांची मागणी आहे. हे थांबायलाच हवे. अन्य देशांमध्ये जाऊन संरक्षणविषयक बाबींविषयी शब्द काढून पाहा, जन्मभर जेलची हवा खावी लागेल! म्हणून राष्ट्रद्रोहाचा कायदा तातडीने करण्याची गरज आहे. प्रतिबंधित संघटना, नक्षलवादी, दहशतवादी यांच्यासोबत संबंध ठेवणार्‍यांनाही या कायद्याच्या परिघात आणले पाहिजे; तरच देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा मजबूत राहील!

https://tarunbharat.org/?p=66691
Posted by : | on : 29 Oct 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (274 of 843 articles)


दाणी | सीबीआयमधील गृहयुद्धात सर्वोच्च न्यायालयाने एक संतुलित आदेश देत, ‘न्यायाची तलवार’ टांगती ठेवली आहे. सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या ...

×