ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » नावात बरेच काही आहे…!

नावात बरेच काही आहे…!

अयोध्या आणि फैजाबाद ही जुळी शहरे आहेत आणि जिल्ह्याचे नाव आहे फैजाबाद. आत्ता परवा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत दिवाळी साजरी करताना घोषणा केली की, यापुढे फैजाबाद जिल्ह्याचे नाव अयोध्या राहील. यावर अपेक्षित प्रतिक्रिया आल्यात. सेक्युलर, लिबरल आणि दरबारी पत्रकार, विचारवंत संतापाने लालीलाल झालेत. सामान्य मुसलमानांना वाटले की, ‘हमारे कर्मों का फल आखिर हमें मिलही गया।’ सेक्युलरांचा युक्तिवाद- नाव बदलल्याने काय होणार? विकासाची कामे केली पाहिजे, हा आहे. कधी काळी शेक्सपियरने म्हटले होते की, नावात काय आहे? त्याचा आधार घेऊन ही मंडळी जागच्या जागी उड्या मारत असतात. भारतात तरी नावाला फार महत्त्व आहे. आपल्या एकूणच भौतिक व आध्यात्मिक जीवनात ‘नाम’ अत्यंत महत्त्वाचे असते. नाव केवळ एक ओळख नसते. नावासोबत त्याचा इतिहासही येत असतो. नाव संस्कारही करत असतो. भक्तिमार्गात तर नामजपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून फैजाबादचे अयोध्या, अलाहाबादचे प्रयागराज करणे, याला फार महत्त्व आहे. पूर्वी भारताने अवकाशात उपग्रह सोडणे सुरू केले तर हीच मंडळी, या पैशात कितीतरी गरिबांची गरिबी दूर करता येणे शक्य आहे, अशी कोल्हेकुई करत होती. आता सरदार पटेलांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारला, तर या पैशात भारताच्या चार अंतराळ मोहिमा होऊ शकतात, असे म्हणत आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनलाही यामुळेच विरोध आहे. गरिबांच्या नावावर कुठल्याही योजनेला आंधळा विरोध करणे, हेच या मंडळींचे ध्येय राहिले आहे.
फैज म्हणजे यश, कीर्ती. हिंदूंवर मिळवलेल्या यशाचे प्रतीक म्हणून अयोध्येचे फैजाबाद नामांतर करण्यात आले. हे नामांतर मुस्लिम राजांना लहर आली म्हणून केलेले नाही. जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. जशा भारतातील लाखो मशिदी, जाणीवपूर्वक मंदिरांना तोडून त्याच जागेवर उभारण्यात आल्या, तसेच हे नामांतर आहे. हिंदूंना सतत जाणीव होत राहावी की, ते पराजित आहेत, आम्ही जेते आहोत. एवढेच नाही, तर त्यांचा स्वाभिमान चिरडला जावा, त्यांच्या तन-मनात गुलामी भिनावी, हाही यामागे हेतू होता. मुस्लिम आक्रमकांच्या हिंसाचाराने, अत्याचाराने सर्वसामान्य हिंदू भयभीत झाला होता. त्यामुळे त्याच्या भावनांवर, श्रद्धांवर, प्रतीकांवर हा जो मुस्लिम-आघात होत होता, तो ते निमूटपणे, नाइलाजाने सहन करत राहिले. १९४७ साली मुस्लिमांना धर्माच्या नावावर आपल्या मातृभूमीचा काही भाग तोडून दिल्यावर जो काही हिंदुस्थान राहिला, त्यात तरी या अपमानाच्या, पराभवाच्या, स्वाभिमानावर व श्रद्धेवर आघात करणार्‍या सर्व खुणा पुसल्या जातील, अशी त्याची स्वाभाविक इच्छा आणि अपेक्षा होती. हिंदुस्थानच्या दुर्दैवाने तसे घडले नाही. त्या चुकांचे प्रायश्‍चित्त म्हणून आता हे नामांतर होत आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. या देशातील यच्चयावत हिंदू आपल्या स्वाभिमानावर, धर्मनिष्ठेवर, श्रद्धेवर, सनातन प्रतीकांवर एकजूट झाला, तर हा देश पुन्हा एकदा जगात तेजाने तळपू लागेल, याची जाणीव या सेक्युलरांपासून मुसलमानांपर्यंत सर्वांना आहे. त्यामुळेच असले काही घडण्याची पुसटशीदेखील शक्यता कुठे दिसली की, ही काकदृष्टीची मंडळी त्यावर तुटून पडतात. हे घडू देत नाहीत. त्यांना असला प्रकार म्हणजे इतिहासाची तोडमोड वाटते. जे काही या देशात झाले, त्याचा बदला हिंदूंनी घेऊ नये, असे त्यांना वाटते. त्यासाठी ही सेक्युलर मंडळी मुसलमानांनी या देशात जे अनन्वित अत्याचार केलेत, हिंसाचार केला, बाटवाबाटवी केली, बलात्कार केलेत, ते समोर येऊ देत नाहीत. मुसलमान किती शांतताप्रिय आहे, सर्वधर्मसमभाववाले आहे, याचे फसवे दाखले सतत देत राहतात. परंतु, ज्यांनी मुसलमानांचा दहशतवाद अनुभवला आहे, ते ही सारवासारव कशी मानणार? शतकानुशतके या देशातील हिंदूंचा स्वाभिमान चिरडण्यात आला. आता हा हिंदू स्वाभिमानाने जागृत होत आहे. त्याचे एक लहानसे प्रतीक म्हणून फैजाबादच्या नामांतराकडे पाहिले पाहिजे. फैजाबादचे अयोध्या असे नामकरण झाल्यानंतर, देशातील इतरही शहरांची नावे बदलविण्याच्या मागण्या पुढे येत आहेत. अहमदाबादचे कर्णावती, हैदराबादचे भाग्यनगर, उस्मानाबादचे धाराशिव, औरंगाबादचे संभाजीनगर अशी ही यादी लांबत आहे. ती लांबतच जाणार. जोपर्यंत या देशात परकीयांच्या आक्रमणाची शेवटची खूण पुसली जाणार नाही, तोपर्यंत या मागण्या होत राहणार आणि त्या पूर्ण करायला हव्यात. नाव बदलल्याने गरिबांच्या खिशात जास्तीचे चार पैसे पडणार आहेत का? शेतकर्‍यांचे प्रश्‍न सुटणार आहेत का? विकासाची कामे होणार आहेत का? असले प्रश्‍न हिंदूंच्या तोंडावर फेकण्यात येतील. अयोध्येचे नाव फैजाबाद असतानाच्या ७० वर्षांच्या काळात, किती गरिबांच्या खिशात चार पैसे पडलेत? शेतकर्‍यांचे किती प्रश्‍न सुटलेत? विकासाची गंगा शेवटच्या व्यक्तीपर्यंत का नाही पोहचली? या प्रश्‍नांची उत्तरे या सेक्युलर व मुसलमान लोकांनी आधी द्यायला हवी. हिंदूंना उत्तर देण्याची गरज नाही. या देशाचे धर्माच्या नावावर तुकडे करणार्‍या मुसलमानांबाबत प्रत्येक हिंदूच्या मनात एक विशेष प्रकारची कडवी भावना आहे. कायदे करून ही भावना नाहीशी करता येणार नाही. उलट प्रतिक्रियाच उमटण्याची शक्यता आहे. नाव बदलविणे, मंदिरे तोडून तिथेच मशीद उभारणे, हेच जर या मुसलमान आक्रमकांचे एकमेव काम होते, तर आता नावांना बदलविणे प्राधान्याने व्हायला हवे. शतकानुशतकांच्या गुलामगिरीमुळे पिचलेल्या, दबलेल्या शोषित, वंचित हिंदू समाजाची ही भावना सर्वांनी (विशेषत: सेक्युलर व मुसलमानांनी) समजून घ्यायला हवी. तसे झाले नाही, तर खवळलेल्या हिंदू समाजाच्या आडाख्यात कोण येईल, याची काही शाश्‍वती नाही. हा सर्व खेळ केवळ निवडणुकी समोर ठेवून खेळला जात असल्याचा, ठेवणीतला आरोप होत असतो. राजकीय पक्षांनी निवडणुकीत जिंकण्यासाठी डावपेच का म्हणून आखू नयेत? इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसवाल्यांनी, निवडणुकीत सहानुभूतीची लाट निर्माण व्हावी म्हणून काय काय नाही केले? कवी सुरेश भट यांनी याचे मार्मिक वर्णन केले आहे-
‘संपून राख गेली, हाडे विकून झाली;
ते मागतात आता, आपापली दलाली!’
या देशाचा स्वाभिमान जागृत होत असेल, या देशाचा राष्ट्रीय समाज असलेला हिंदू एकजूट होत असेल आणि याचा कुणी राजकीय फायदा घेत असेल, तर त्याला अडविणारे तुम्ही कोण? तुम्हीही या ना मैदानात! तुम्ही घ्या फायदा! पण, आता या जागृत हिंदूंना अडविणे कुणालाच शक्य होणार नाही. जो कुणी मध्ये हात घालेल, त्याचे हात पोळल्याशिवाय राहणार नाहीत! फैजाबादचे अयोध्या म्हणून झालेले नामांतर, हेच सांगत आहे…

https://tarunbharat.org/?p=67337
Posted by : | on : 10 Nov 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (256 of 845 articles)


कुहीकर | लाख सांगूनही, न्यायालयाचा आदेश धुडकावून लोकांनी परवा रात्री उशिरापर्यंत फटाके का फोडलेत ठाऊक आहे? स्वत:साठीची सोय निर्माण करण्यासाठी ...

×