ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » नॅशनल हेराल्ड आणि सोनिया-राहुल

नॅशनल हेराल्ड आणि सोनिया-राहुल

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्याभोवती आयकर आणि अंमलबजावणी संचालनालयाचा फास अधिकच घट्ट होत आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा मोठा शेअरवाटा असलेल्या यंग इंडिया प्रा. लि.च्या २०११-१२ या वर्षाच्या आयकराबाबत पुन:तपासणीचे अधिकार कायद्यानुसार आयकर विभागाला आहेत, असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्यामुळे हे मायलेक गोत्यात आले आहेत. या दोघांनीही यास विरोध केला होता, पण तो फेटाळून लावण्यात आला. आधीच एका केसमध्ये हे मायलेक जामिनावर मुक्त आहेत. लपवालपवी केली की ती आणखी उजागर होत जाते, तसाच हा प्रकार. ताज्या प्रकरणात १५४ कोटींची आय लपविण्याचा आरोप आयकर विभागाने केला आहे. तसेच जुन्या आयकर आकारणीच्या वेळी राहुल गांधी यांनी आपण कंपनीचे संचालक असल्याची बाब दडवून ठेवली होती, ही बाबही समोर आली. त्यामुळेच आयकर विभागाने यंग इंडियाच्या सर्व संचालकांना नोटीस पाठविल्या होत्या. हे शुक्लकाष्ठ लावले आहे, धुरंधर नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी! स्वामी यांच्या कार्यशैलीचे एक वैशिष्ट्य आहे. आधी ते पुरावे गोळा करतात आणि नंतरच ते पुढचे पाऊल टाकतात. या प्रकरणातही तसेच झाले. राहुल-सोनियाची त्या वेळी सत्ता होती. सत्तेचा दुरुपयोग करण्याचे अनेक घोटाळे यापूर्वी उघडकीस आलेले आपण बघितले. तसाच हाही घोटाळा पचून जाईल, असे त्या वेळी राहुल-सोनियाला वाटले असेल. पण, त्यांना माहीत नव्हते की, गाठ सुब्रमण्यम स्वामींसोबत आहे! त्या वेळी स्वामी हे भाजपात नव्हते. त्यांचा वेगळा पक्ष होता. आता एकीकडे राहुल-सोनियाचे वकील थोर अर्थतज्ज्ञ पी. चिदम्बरम् आहेत, तर दुसरीकडे सुब्रमण्यम स्वामी. या चिदम्बरम् यांचे पुत्र यांनीही असाच एक आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या बापलेकाची कीर्तीही पसरली आहे. असो. तर हे यंग इंडिया किंवा नॅशनल हेरॉल्ड प्रकरण एवढे साधे नाही. त्यासाठी थोडे मागे जावे लागेल. देशाचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डोक्यातून प्रसवलेले हे अपत्य. स्वातंत्र्यापूर्वीच त्यांनी २० नोव्हेंबर १९३७ रोजी असोसिएटेड जर्नल्स प्रा. लि. नावाची एक कंपनी काढली. या कंपनीच्या मार्फत इंग्रजीत नॅशनल हेरॉल्ड, उर्दूत कौमी एकता आणि हिंदीत नवजीवन ही दैनिके सुरू केली. स्वातंत्र्यलढ्याला चालना मिळावी, हा यामागचा उद्देश. पण, १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनाच्या वेळी ही दैनिके इंग्रजांनी बंद पाडली. स्वातंत्र्यानंतर प्रारंभीच्या काळात या कंपनीचे प्रबंध संचालक नेहरूंचे जावई फिरोज गांधी हे होते. त्यांच्या कार्यकाळात कंपनी डबघाईस आल्याने ती विकण्याचाही घाट घातला गेला होता. पण, नेहरू म्हणाले होते, आनंद भुवन विकेन, पण कंपनी बंद होऊ देणार नाही. असा हा सारा प्रवास. मार्च २०१० पर्यंत नोंदीनुसार असो. जर्नल्सचे १०५७ भागधारक होते. मार्च २०१२ पर्यंत काँग्रेस नेते मोतीलाल वोरा हे कंपनीचे अध्यक्ष-प्रबंध संचालक होते. पण, २०१० पासूनच कंपनी डबघाईस आल्यामुळे तिची मालकी यंग इंडियाकडे देण्यात आली व सर्व समभाग यंग इंडियात वळविण्यात आले. याला भागधारकांनी आक्षेप घेतला. काहींनी आम्हाला सर्वसाधारण सभेचे निमंत्रण मिळाले नसल्याची, तर काहींनी आम्हाला विश्‍वासात न घेता परस्पर आमचे समभाग वळविण्यात आल्याच्या तक्रारी केल्या. या तक्रारकर्त्यांमध्ये माजी कायदेमंत्री शांती भूषण आणि माजी मुख्य न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांचाही समावेश होता. असो. जर्नल्सने प्रारंभीच्या काळात दिल्ली, लखनौ, भोपाळ, मुंबई, इंदोर, पाटणा, पंचकुला या ठिकाणी जागा घेऊन ठेवल्या होत्या व तेथे इमारती उभारल्या होत्या. आता त्याची किंमत ५० अब्ज रुपयांपेक्षा अधिक आहे. दिल्लीतील ६ मजली हेरॉल्ड हाऊसची इमारतच १० हजार चौरस मीटर जागेवर बांधण्यात आली असून, ती बहादूरशाह जफर या महागड्या भागात आहे. यंग इंडियाने कंपनी सुरू करताना भागभांडवल केवळ ५० लाख दाखविले होते. १३ डिसेंबर २०१० रोजीच राहुल गांधी यंग इंडिया कंपनीचे संचालक झाले होते. या कंपनीत ७२ टक्के शेअर्स हे सोनिया-राहुल यांचे होते. १२ टक्के मोतीलाल वोरा आणि ऑस्कर फर्नांडिस व उरलेले सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांच्या नावे होते. १ नोव्हेंबर २०१२ रोजी सुब्रमण्यम स्वामी यांनी मेट्रोपोलिटन कोर्टात खाजगी अर्ज दाखल करून असो. जर्नल्स ही पब्लिक लि. कंपनी असताना, त्याची मालकी यंग इंडिया या खाजगी कंपनीकडे सोपविण्यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला. तेथून हे शुक्लकाष्ठ सुरू झाले. सध्या आयकर विभागाला जो २०११-१२ चे पुनर्निधारण करण्याचा अधिकार मिळाला आहे, त्याचे मूळ म्हणजे, २०१० साली असो. जर्नल्सला काँग्रेस पक्षाने ९० कोटी २५ लाख रुपये बिनव्याजी कर्जाने दिले होते, जे अद्याप परत केले गेले नाहीत. तसेच असो. जर्नल्सची ५० अब्ज रुपयांची संपत्ती बळकावण्याचा हा कुटिल डाव असल्याचा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी कोर्टात केला. या संपत्तीच्या जागेवर पासपोर्ट कार्यालय लक्षावधी रुपयांनी भाड्याने दिले गेले आहे. एखाद्या राष्ट्रीय राजकीय पक्षाने अशा पद्धतीने बिनव्याजी कर्ज देणे संशयास्पद असून, हा लोकप्रतिनिधी कायद्याचा भंग असून या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशीची त्यांनी मागणी केली. कोर्टाने सांगितले की, सकृद्दर्शनी आरोपात तथ्य दिसत आहे. काँग्रेसने अशी भूमिका घेतली की, आम्ही फक्त नॅशनल हेराल्डचे पुनरुज्जीवन करण्यासाठी निधी दिला. यात आमचा व्यावसायिक उद्देश नाही. पण, मेट्रोपोलिटन कोर्टाने त्यांची बाजू फेटाळून लावली. प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात गेले. या केसच्या सुनावणीसाठी सोनिया, राहुल, वोरा, फर्नांडिस यांना अनेकदा समन्स पाठविण्यात आले. पण, ते तारखांवर उपस्थित झाले नाहीत. शेवटी उच्च न्यायालयाकडून या सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. दरम्यानच्या काळात २०१४ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, यात मनी लॉण्डरिंग झाल्याचे लक्षात आले. तसा अहवाल विभागाने सादर केला आणि नव्याने तपास सुरू केला. असा हा सारा मामला. राहुल गांधी या प्रकरणावर गप्प का आहेत? आज ५० अब्ज रुपयांची संपत्ती कमी होते का? पण, सत्तेत असताना आपले कुणी काहीच बिघडवू शकत नाही, या गुर्मीत असलेल्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा हा विविध न्यायालयात उघड झालेला कागदोपत्री व्यवहार आहे. हे प्रकरण राजकीय नाही, तर कोट्यवधींच्या घोटाळ्याचे आहे. स्वत: घोटाळे करून दुसर्‍यावर आरोप करणार्‍या या मायलेकाचे पितळ उघडे पडले आहे!

https://tarunbharat.org/?p=62102
Posted by : | on : 17 Sep 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (244 of 737 articles)


विजय | भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, तथ्यांच्या आधारावर विरोधकांचा खोटेपणा आणि कारस्थान उद्ध्वस्त करा, असे ...

×