ads
ads
राहुल गांधींचे आरोप खोटे

राहुल गांधींचे आरोप खोटे

►दसाँ एव्हिएशनच्या सीईओचे स्पष्टीकरण ►रिलायन्स कंपनीला आम्ही निवडले, नवी…

असोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली

असोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली

►नॅशनल हेरॉल्ड इमारत रिकामी करण्याचे प्रकरण, नवी दिल्ली, १३…

दरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी

दरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी

नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर – भारतातून दरवर्षी सुमारे १…

आंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला

आंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला

►रोहिंग्या प्रकरण ►नऊ वर्षांपूर्वी दिला होता पुरस्कार, नेईपिडॉ, १३…

स्टॅन ली यांचे निधन

स्टॅन ली यांचे निधन

►स्पायडर मॅन, हल्क यांचे जनक, न्यू यॉर्क, १३ नोव्हेंबर…

तुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता

तुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता

मुंबई, १३ नोव्हेंबर – अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी…

मंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ!

मंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ!

►कुणी ‘ब्र’ देखील काढला नाही : मुनगंटीवारांचा दावा, मुंबई,…

प्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख!

प्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख!

►कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण, मुंबई, १३ नोव्हेंबर – कोरेगाव…

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

►चाचपणी सुरू केली ►राफेल प्रकरणी राकाँच्या भूमिकेने नाराज, मुंबई,…

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

॥ विशेष : धनश्री बेडेकर | हिंदू धर्मात निसर्गचक्राला…

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते…

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | देशात किंवा कदाचित…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:32 | सूर्यास्त: 17:49
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » पंतप्रधानांचा निर्धारी संवाद!

पंतप्रधानांचा निर्धारी संवाद!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लालकिल्ल्याहून दिलेले पाचवे भाषण निव्वळ पाच वर्षांतील कामगिरीचा आढावा घेणारे नव्हते, तर पुढच्या काळात भारत कोणत्या उंचीवर पोहोचू शकतो, याची दिशा दाखवणारा तो देशवासीयांशी साधलेला मुक्त संवाद होता. पंतप्रधानांनी युपीएच्या काळात झालेला धोरण लकवा कायमचा नाहीसा झाल्याची ग्वाही देतानाच, २०२२ पर्यंत एखाद्या भारतीय अंतराळवीराला अंतराळात पाठविण्याचे भारताचे प्रयत्न सुरू झाल्याचे स्पष्ट करून, भारत आता कोणत्याच क्षेत्रात पिछाडीवर राहणार नसल्याचे भाकीतच केले. भारत ७२ वा स्वतंत्रता दिवस साजरा करीत असताना, मोदींनी सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील कामगिरीचा आढावादेखील घेतला. २०१९ ची लोकसभा निवडणूक दृष्टिपथात आली असताना त्यांनी, सरकारने केलेल्या कामांची जंत्रीदेखील देशवासीयांपुढे ठेवली. एकप्रकारे ते सरकारचे प्रगतिपुस्तकच होते! पंतप्रधानांच्या भाषणाने जनतेमध्ये विशेषतः भाजपाच्या कार्यकत्यार्र्ंमध्ये नव्या उत्साहाचा संचार झालेला आहे. येणार्‍या निवडणुकीत प्रचार कुठल्या दिशेने राहील, याची रंगीत तालीमदेखील याला म्हणता येऊ शकते. पंतप्रधान देशाच्या विकासावर बोलले, राजकारणावर बोलले, त्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला आणि देशाच्या पायाभूत सुविधांचीही यादी केली. देशाच्या सर्वांगीण विकासाबाबत बोलताना त्यांनी काश्मीरचा मुद्दादेखील सोडला नाही. या राज्यात बंदुकीची ‘गोळी’ अथवा ‘गाली’ देऊन नव्हे, तर लोकांना विश्‍वासात घेऊन त्यांच्याशी गळाभेट करून, या समस्येवर तोडगा काढण्याचे संकेतही त्यांनी दिले. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या झालेल्या विकासाचेही पाढे त्यांनी यावेळी वाचले. तब्बल ८२ मिनिटांच्या भाषणात त्यांनी देशाला भेडसावणार्‍या अनेक विषयांना स्पर्श केला. देशातील लोकांना भेडसावणार्‍या आरोग्यविषयक समस्यांची त्यांना जाण होतीच. लोकांच्या या अपेक्षांची पूर्ती करीत त्यांनी, येणार्‍या २५ सप्टेंबरला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतिदिनी, पंतप्रधान जन आरोग्य अभियान सुरू करण्याची घोषणा केली. देशातील तब्बल ५० कोटी गरीब लोकांना या योजनेचा लाभ मिळू शकेल, त्यांच्यावर स्वस्तात उपचार होऊ शकतील, अशी व्यवस्था केली जाणार आहे. या अंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराचा लाभ रुग्णांना मिळू शकणार आहे. पंतप्रधानांच्या कार्यशैलीची गती पाहता, आपण गेल्या सरकारच्या पावलाने चाललो असतो, तर आजची स्थिती गाठण्यासाठी कितीतरी वर्षे लागली असती, हे निश्‍चित! गेल्या चार वर्षांत झालेला विकास आणि बदलांचा अनुभव देशातील जनताही घेत आहे. आकाश, पृथ्वी बदललेली नाही. ना नदी-नाल्यांची दिशा बदललेली आहे. पण, ‘देश बदल रहा हैं, आगे बढ रहा हैं’ याचा अनुभव तुम्ही-आम्ही घेऊ शकत आहोत. रस्ते निर्माणाच्या क्षेत्रातील भारताच्या गतीची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे. आजवर कधीही हमरस्त्याशी जोडली न गेलेली खेडी आज देशाच्या मूळ प्रवाहात आल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे. शैक्षणिक, कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ, क्षेत्रातील बदल किंवा माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील, या सार्‍याची नोंद घेतली जाऊ शकत आहे. सरकार कामे करीत आहे, म्हणून सरकारबद्दलच्या अपेक्षादेखील वाढत आहेत. पण, त्यादेखील पूर्ण करण्याचे आश्‍वासन पंतप्रधानांनी लालकिल्ल्याच्या मंचावरून दिले. जम्मू-काश्मीरबाबत केंद्र सरकारला असलेली चिंता जगजाहीर आहे. खोर्‍यातील घुसखोरी, आतंकवाद, हिंसाचार, दगडफेक, बंद, जाळपोळ याबाबत तोडगा काढण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. सरकारची तीच भूमिका कायम असून, लवकरच या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना प्रारंभ करणार आहे. या माध्यमातूनलोक आपला मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. ही घोषणा या राज्यातील जनतेचा सरकारमधील लोकसहभाग वाढविणारी ठरणार आहे. लोकसभेच्या १४ वेळा निवडणुका झाल्या, तथापि, जम्मू-काश्मीरमध्ये केवळ तीन-चार वेळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या आहेत. त्यामुळे सरकारी निर्णयात जम्मू-काश्मीरच्या जनतेचा सहभाग अत्यल्प आहे. तो वाढविण्याच्या दिशेने टाकलेल्या सरकारच्या पावलाचे स्वागतच करायला हवे. मोदींच्याच भाषेत सांगायचे झाले, तर त्यांना मनाचे कुठलेही साचलेपण नको आहे. ते थांबणारे नाही, ना कुणापुढे वाकणारे आहेत. या देशातील बालके आजही कुपोषणाचे बळी ठरत असल्याची त्यांना चिंता आहे. देशाचा विकास हव्या त्या गतीने होत नसल्याची व्याकुळता त्यांच्या डोळ्यांत वाचता येते. त्यासाठी तत्परतेने पावले उचलण्याची त्यांची धडपड न कळत्यालाही टिपता येते. त्यांच्याच कार्यकाळात त्रिपुरा, मेघालय आणि अरुणाचलच्या कितीतरी भागांमध्ये आतंकवाद कायमचा समाप्त झाला. देशाला भेडसावणारी नक्षलवादाची समस्या आटोक्यात येण्यासाठी मोदींचाच कार्यकाळ बघावा लागला. देशातील शंभराहून अधिक जिल्ह्यांमध्ये असलेली नक्षलवादाची झळ आता केवळ ३० जिल्ह्यांपुरती सीमित झाली आहे. देशात शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना आलेले, हे यशच आहे. मोदींचे सरकार तिहेरी तलाक बंद करणारा कायदा तयार करणार आहे. पण, काही लोकांचा विरोध असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. काँग्रेससह समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस, बिजू जनता दल यांसारख्या लोकांना देशातील व्यवस्थांचे होणारे भारतीयीकरण खटकत आहे. शैक्षणिक स्तरावर संस्कृतची, जी भारतीय भाषांची जननी आहे, तिचा केला जाणारा पुरस्कार या देशाची संस्कृती, परंपरा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने टाकलेले पाऊल ठरले आहे. मुस्लिम महिलांना न्याय मिळवून दिल्याशिवाय मोदी स्वस्थ बसणार नाहीत, हे आता जगजाहीर झाले आहे. देशात फसवणुकीचे वातावरण अनेक वर्षांपासून दृष्टिपथात होते. पण, त्याबाबत कठोर पावले उचलण्याची कुणाची ताकद नव्हती. बोलत सारेच होते, पण या मुद्यावरून लोकांची नाराजी पत्करण्यास कुणी तयार नव्हता. पण, मोदींनीच जनतेची नाराजी स्वीकारण्याची तयारी केली आणि भ्रष्टाचार समाप्त करण्यासाठी अनेक पावले टाकली. आधार कार्डचा योग्य वापर व्हावा म्हणून ती बँक खात्यांशी जोडली गेली. त्यामुळे दलालांच्या हातात जाणारे ९० हजार कोटी रुपये वाचले. शिष्यवृत्तीची रक्कम ऑटोमॅटिक बेनिफिट ट्रान्सफरमुळे योग्य खाती जमा होऊ लागली. उत्तरप्रदेशमधील मदरशांमध्ये पटावर नसलेल्यांंच्या नावे शिष्यवृत्तीचा लाभ उचलला जात होता. सरकारच्या नजरेत ही बाब आली आणि सरकारने उत्तप्रदेशातील मदरशांमध्ये आढळणारा घोटाळा धाड मारून जप्त केला. अनेक घोटाळे उघडकीस आल्यामुळे सरकारची कोट्यवधींची बचत झाली आहे. १५ ऑगस्टच्या भाषणातील सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे पंतप्रधानांची येणार्‍या काळात भारतीय अंतराळवीराला अवकाशात पाठविण्यासाठी कटिबद्ध असल्याची! सरकारचा हा निर्णय विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात टाकलेले निर्धारी पाऊल ठरल्याशिवाय राहायचे नाही!

http://tarunbharat.org/?p=60159
Posted by : | on : 20 Aug 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (159 of 715 articles)


दाणी | ६५ वर्षांपूर्वीचा कालखंड! १९५३ च्या सुमारास दिल्ली महानगरपालिकेच्या एका वार्डाची पोटनिवडणूक होत होती आणि भारतीय जनसंघाने प्रथमच आपला ...

×