ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:10
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » परतीचा पाऊस…

परतीचा पाऊस…

‘बेभरवशाचा’ या शब्दाचा वास्तवात अनुभव घ्यायचा असेल, तर तो दरवर्षीच्या पाऊसमानानेच घ्यावा लागतो. पाऊस आणि बेभरवसा हे समानार्थी शब्द झाले आहेत. यंदाच्या मान्सूनचा अंदाज देशी आणि परदेशस्थ हवामान संस्थांनी उत्तम पावसाळा असेल, असाच लावला होता. वास्तवात मात्र तसे घडले नाही. केरळात मान्सून मृगनक्षत्राच्या आधीच दाखल झाला आहे, असे सांगण्यात येत होते. त्यामुळे मृगनक्षत्राच्या आधीच पाऊस दाखल होणार, अशी आवई उठली होती. रोहिणी चांगल्या बरसल्या; पण मृगाच्या पर्वावर पाऊस मात्र आला नाही. तो २२ ते २७ जूननंतरच आला. गेल्या चार वर्षांपासून हे असेच सुरू आहे. साधारण २२ जूननंतरच पावसाला सुरुवात होते. तीही समाधानकारक नसते. पेरण्यांसाठी किती वाट बघायची, असा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर असतो. त्यामुळे मृगाच्या आसपास बरसणार्‍या पावसाला दाद देत शेतकरी पेरण्या आटोपतात अन् मग पाऊस दडी मारतो. यंदाही ते तसेच झाले. यंदा सरासरीपेक्षा चांगला पाऊस होईल, असा अंदाज होता. तो सपशेल खोटा ठरला आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या, मराठवाड्याला लागून असलेल्या भागांत पावसाने तडन दिली. मराठवाड्यात तर लातूर, परभणी, नांदेड आणि बीड या जिल्ह्यांत आतापासूनच पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था आहे. पश्‍चिम विदर्भात कोरड आहे. आता सारीच भिस्त परतीच्या पावसावर होती. या पावसाचा खरिपाच्या पिकांना फायदा होण्याचे काही कारण नाही. आतावर पडलेल्या पावसाने राज्याच्या काही भागांत जमिनीत जी काय ओल आहे त्यावर पिके तगली आहेत. पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांत समाधानकारक नव्हे, पण बरा पाऊस पडला आहे, तरीही धरणे भरलेली नाहीत. सप्टेंबरमध्ये राज्याच्या आंतरभागात पाऊस असेल, असा अंदाज वर्तविण्यात आलेला होता. गणेशविसर्जनाच्या पर्वावर पावसाचा दणका असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीचा पाऊस चांगला येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानुसार काही प्रमाणात परतीचा पाऊस चांगला आला. मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागात पावसाची कृपा झाली. त्यामुळे किमान पिण्याच्या पाण्याची समस्या काही प्रमाणात सुटली. यंदा मात्र २१ सप्टेंबरनंतर आठवडाभर पाऊस असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. हा महिना निम्मा सरल्यानंतरही राज्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. विदर्भात वातावरण तयार झाले. पूर्व विदर्भात काही जिल्ह्यांत पाऊस पडला, पश्‍चिम विदर्भातही तुरळक पाऊस होता. महाराष्ट्रात आतापर्यंतचा पाऊस हा एकूण अपेक्षित सरासरीपेक्षा खूपच कमी नोंदला गेला. त्यामुळे परतीच्या पावसाकडे नजर लागली होती. आता परतीचा पाऊसही अंदाज वर्तविण्यात आला तसा काही पडला नाही. मराठवाड्याच्या पर्जन्यमानाचा परिणाम विदर्भातही होत असतो. कारण विदर्भाचा बराचसा भाग मराठवाड्याला लागून आहे. पिकेही सारखीच घेतली जातात. गेल्या दोन वर्षांत मराठवाड्यात बर्‍यापैकी पाऊस पडला. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या मराठवाड्यात पुन्हा ऊसाचे पीक घेणे सुरू झाले. यंदा पुन्हा पावसाने फटका दिला आहे. मराठवाड्यामध्ये एकूण सरासरीच्या १३ टक्के पाऊस कमी आहे. मध्य महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीहून कमी पाऊस पडला आहे. काही जिल्ह्यांनी सरासरीहून अधिक पाऊसमान गाठल्याने राज्याची एकूण सरासरी चांगली दिसत आहे. पर्जन्यमानाचे हे असंतुलन धोकादायक आहे. काही भागांत चांगला पाऊस असतो अन् त्याच वेळी त्याला लागून असलेल्या भागात चक्कऊन पडलेले असते. यवतमाळ जिल्ह्यात धुवांधार पाऊस असताना अमरावतीत केवळ ढगाळ वातावरण अन् अकोल्यात तर पावसाळा असल्याचीही चिन्हे नाही, अशी विचित्र अवस्था असते. विदर्भामध्ये अमरावतीत २५ टक्के, तर बुलडाण्यामध्ये २७ टक्के पाऊस सरासरीहून कमी झाला. वर्ध्यामध्येही २६ टक्के पाऊस सरासरीहून कमी आहे. उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाने सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे निम्मे राज्य कोरडे आहे. आकडेवारीनुसार राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी २१ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठादेखील सरासरी ६६ टक्के आहे. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. आता सारीच भिस्त परतीच्या पावसावर होती. यंदा अधिक महिना आल्याने परतीच्या पावसाचे दिवस अलीकडे आलेत. सप्टेंबरात परतीचा पाऊस चांगला येईल, हा अंदाज खोटा ठरला आहे. आता तो आला नाही तर दुष्काळाचे सावट उभे राहण्याची शक्यता आहे. राज्यातील २५४ तालुक्यांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. जलसंपदा विभागाने विभागवार आढावा घेतला आहे. त्यानुसार कोकण आणि पुणे या विभागांमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. कोकण विभागातील धरणे सुमारे ९२ टक्के, तर पुणे विभागातील धरणे सुमारे ८७ टक्के भरली आहेत. नागपूर विभागातील धरणांमध्ये सुमारे ४९ टक्के, अमरावती विभागात सुमारे ५७ टक्के आणि नाशिक विभागातील धरणांमध्ये सुमारे ६४ टक्के पाणीसाठा झाला आहे. नागपूरमध्ये पाण्याचे विविध ३८४ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा झाला आहे. अमरावती विभागातही काळजीचे वातावरण आहे. अमरावती परिसरात विविध ४४५ प्रकल्प आहेत. त्यांपैकी खडकपूर्णा धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. नळगंगा धरण सुमारे १८ टक्के, पेनटाकळी धरण सुमारे १९ टक्के आणि उर्ध्व वर्धा धरण हे निम्मे भरले आहे. काटेपूर्णा, अरुणावती आणि पूस ही धरणे भरली असल्याने या भागातील नागरिकांना आधार मिळाला आहे. यंदा चांगला पाऊस झाला असता, तर त्याचा नजीकच्या भविष्यात चांगला फायदा झाला असता. शासनाने जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली आहेत. बजाज, पाणी आणि नाम फाऊंडेशनसारख्या संस्थांनीही जलसंधारणाच्या कामांना गती दिली. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, आमीर खान यांच्यासारखी वलयांकित व्यक्तिमत्त्वं या कामात उतरल्याने जनजागृती झाली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या वर्षीपासून वृक्षलागवड ही चळवळच करून टाकली. कोट्यवधी झाडे लावण्यात आली आहेत. म्हणतात की, जमीन वाढविता येत नाही, तिचे काही कारखान्यात उत्पादन करता येत नाही तसेच पाण्याचेही आहे. कृत्रिम पावसाचा प्रयोग करून पाहण्यात आला. समुद्राचे पाणी शुद्ध करून वापरण्याचाही प्रयोग झाला, मात्र त्यामुळे फार काही साधले गेले नाही. त्यामुळे आभाळाचीच माया आवश्यक असते. यंदा ती झाली नाही. लावलेली झाडे जगायला हवी आणि कारखान्यांतून होणारे वायुप्रदूषण कमी झाले पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करणे तेवढेच आपल्या हातात आहे…

https://tarunbharat.org/?p=62623
Posted by : | on : 25 Sep 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (218 of 724 articles)


कहू | लोकसभेच्या निवडणुकांचे नगारे वाजू लागले आहेत. देशातील विभिन्न राज्यांमधील परिस्थिती पाहता कुठे प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत, तर कुठे ...

×