हरिद्वारमधील ब्रह्मकुंडात वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन

हरिद्वारमधील ब्रह्मकुंडात वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन

►अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती, वृत्तसंस्था हरिद्वार,…

मुंबई स्फोटातील टकलाला संपुआच्याच काळात पासपोर्ट

मुंबई स्फोटातील टकलाला संपुआच्याच काळात पासपोर्ट

►सीबीआयच्या आरोपपत्रातील माहिती, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १९ ऑगस्ट –…

राजघाट परिसरात वाजपेयी यांचे भव्य स्मारक उभारणार

राजघाट परिसरात वाजपेयी यांचे भव्य स्मारक उभारणार

नवी दिल्ली, १८ ऑगस्ट – दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी…

दाऊदच्या खजिनदाराला लंडनमध्ये अटक

दाऊदच्या खजिनदाराला लंडनमध्ये अटक

वृत्तसंस्था लंडन, १९ ऑगस्ट – मार्च १९९३ च्या मुंबई…

शहा मोहम्मद कुरेशी पाकचे विदेश मंत्री

शहा मोहम्मद कुरेशी पाकचे विदेश मंत्री

►मुंबई हल्ल्याच्या काळातही याच पदावर ►मंत्रिमंडळावर मुशर्रफ यांची सावली,…

युनोचे माजी महासचिव कोफी अन्नान कालवश

युनोचे माजी महासचिव कोफी अन्नान कालवश

वृत्तसंस्था संयुक्त राष्ट्रसंघ, १८ ऑगस्ट – संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी…

दाभोळकर हत्येत शिवसेनेचा नेता?

दाभोळकर हत्येत शिवसेनेचा नेता?

►माजी नगरसेवकाला अटक ►अंदुरेच्या चौकशीतून समोर आले नाव, मुंबई,…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

अटलजी: अनंत, अथांग

अटलजी: अनंत, अथांग

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्याच्याबद्दल लोकांकडून अगदी…

स्वयंसेवक अटलजी

स्वयंसेवक अटलजी

॥ आदरांजली : मदनदास देवी | स्वयंसेवकत्व हा आपल्या…

मेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त!

मेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त!

॥ आदरांजली : दि. भा. घुमरे | पंतप्रधानपदाच्या सर्वोच्च…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:47
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » पवारांच्या उलट्या बोंबा!

पवारांच्या उलट्या बोंबा!

मराठा समुदायाला एकाकी पाडण्याचा सरकारचा डाव असल्याचा नवा जावईशोध, स्वनामधन्य नेते शरद पवार यांनी लावला आहे. त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिकच द्यायला हवे, एवढे हे संशोधन मोलाचे आहे. पण, या शोधाचे मूळ मात्र त्यांनी सांगितलेले नाही. बहुतेक त्यांचे गाईड राहुल गांधी आणि कम्युनिस्ट असावेत. तर, त्यांनी एक खुले पत्र मराठा आंदोलकांना लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, ‘राज्यकर्ते आणि हितसंबंधी घटक या आंदोलनाला बदनाम करणे, तसेच मराठा आणि अन्य बहुजन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. मराठा समाजाला एकाकी पाडण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांची ही योजना यशस्वी होऊ देता कामा नये, याची पक्की खूणगाठ आंदोलकांनी ठेवली पाहिजे. त्यांच्या या खेळीला आंदोलकांनी बळी पडू नये…’ हा आणखी एक नवा साक्षात्कार शरद पवारांना झाला. या पत्रातून निव्वळ राजकारणाचा घाणेरडा वास तेवढा येत आहे. स्वत: जातीयवादाचे प्रवर्तक असताना आता तोच प्रयोग ते पुन्हा करू पाहात आहेत. महाराष्ट्राची जनता पवारांचे गतकालीन प्रताप काही विसरलेली नाही. म्हणूनच तर त्यांनी आपले साहेबपण गमावले आहे. या जातीय धोरणामुळेच त्यांच्या पक्षाची पुरती पीछेहाट झाली आहे आणि होत चालली आहे. आणखी एक प्रश्‍न. हे पत्र त्यांनी मराठा आंदोलकांना उद्देशून लिहिलेले आहे. मराठा आंदोलक म्हणजे कोण? ज्यांनी सांगलीत शाळकरी मुले आणि प्रवासी असताना, बस पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता ते आंदोलक, की ज्यांनी मुख्यमंत्र्यांना विरोध म्हणून वारकर्‍यांमध्ये साप सोडून देण्याची धमकी दिली होती ते आंदोलक, याचाही उलगडा पवारसाहेबांनी केला असता, तर फारच बरे झाले असते. म्हणजे ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ झाले असते. मराठा आंदोलनाचे नेते म्हणतात, हिंसाचार करणारे आमचे लोक नाहीत. त्यांना अटक करा, सीआयडी चौकशी करा आणि पवारसाहेब मराठा आंदोलकांना उद्देशून पत्र लिहितात. आहे की नाही गंमत! या पत्रावर बारकाईने लक्ष घातले की, ज्या लोकांनी औरंगाबादेच्या वाळुंज एमआयडीसीमध्ये प्रचंड धुडगूस घातला, जाळपोळ केली, तोडफोड केली त्यांना उद्देशून हे पत्र लिहिल्याचे सहज लक्षात येते. मग हे लोक कोण आहेत, हे लोक राष्ट्रवादीचे आहेत काय, असाही संशय त्यातून बळावतो. कारण, याच पत्रात पवारांनी म्हटले आहे- ‘राज्यातील औद्योगिक क्षेत्रास राज्यातील आंदोलनाची झळ बसणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. अशा आंदोलनाने राज्यातील उद्योगधंद्यातील गुंतवणूक थांबेल आणि बेरोजगारीचा प्रश्‍न अधिक गंभीर होईल.’ याचा अर्थ काय? आंदोलनाचे नेते म्हणतात, यांची सीआयडी चौकशी व्हावी. पवार म्हणतात, औद्योगिक क्षेत्रात हिंसाचार नको. याचा अर्थ स्पष्ट आहे. या आंदोलनामागे काही राजकीय शक्ती आहेत, असा संशय अनेक वक्त्यांनी यापूर्वीच वाहिन्यांवर व्यक्त केला आहे. याचा पुरावा म्हणजे, आंदोलक अजित पवार, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वागत करतात. पण, आदिवासी खासदार हिना गावीत यांच्या मोटारीची तोडफोड मात्र करतात. विशेष म्हणजे त्या वेळी हिना गावीत या कारमध्ये होत्या. याचा अर्थ काय लावावा, हे पवारांनीच जनतेला समजावून सांगायला हवे. कारण, या हिंसक आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळाच संदेश गेला आहे. मराठा मूक क्रांती मोर्चाला राज्यातील सर्व जनतेने पाठिंबा दिला होता, त्यांच्या शिस्तीचे कौतुक केले होते. पण, मूठभर समाजकंटकांनी त्यावर पाणी फेरले आहे. पवारांनी आपल्या पत्रातून या विषयावरही भाष्य केले आहे. ज्या वेळी हे जाळपोळीचे, तोडफोडीचे प्रकार सुरू होते, त्या वेळी त्यांना कुणीच अटकाव का केला नाही? पवारांनी त्यांना समजूतदारपणाचे चार शब्द का सुनावले नाहीत? आता मात्र चोहोबाजूने मराठा समुदायाविषयी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊन विरोधाचे सूर उमटू लागले तेव्हा कुठे पवार झोपेतून खडबडून जागे झाले. पवारांचे हे घृणित राजकारण जनतेला समजत नाही का? पवारांना हे माहीतच असेल, जे पेराल तेच उगवेल! विषारी बीज पेरल्यानंतर कोणती फळे आली, हे जनता उघड्या डोळ्यांनी पाहात आहे. राहिला प्रश्‍न मराठा क्रांती मोर्चाचा. आज अशी स्थिती आहे की, त्यांचे नियंत्रण आंदोलनावरून सुटून गेल्याचे दिसत आहे. काही लोक त्यांचे ऐकण्याच्या तयारीत नाहीत. हेच ते काही लोक मनमानी करीत आहेत आणि जाळपोळ, हिंसाचार माजवीत आहेत आणि मराठा समाजाला बदनाम करीत आहेत. वास्तव तर हे आहे की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधीलच काही नेत्यांनी आपल्या कुटिल राजकारणाकरिता मराठा क्रांती मोर्चात फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. मराठा समाजाने यापासून सावध राहायला हवे आणि डोळसपणे सर्व राजकीय पक्षांकडे पाहायला हवे. राहिला प्रश्‍न मराठा समुदायाला बहुजन समुदायापासून तोडण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा पवारांचा जावईशोध. या आरोपात काहीही तथ्य नाही. अन्य समुदाय हे शांत आहेत. विनाकारण नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करून पवारांनी आपली उंची स्वत:च कमी करून घेतली आहे. प्रारंभी म्हटल्याप्रमाणे हा पवारांचा राजकीय आणि जातीयवादी डाव आहे. पण, आजतरी तो त्यांच्यावरच उलटलेला दिसतो, हे त्यांच्या पत्रावरून सहज लक्षात येते. पवारांनी या पत्रात आणखी एक गोष्ट स्पष्ट केली आहे. पवार म्हणतात, ‘गोखले अर्थशास्त्र संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात, मराठा समाजात आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचे प्रमाण ४६ टक्के आहे आणि हे ‘पूर्वी’ समोर आलेलेच आहे. ‘वर्षानुवर्षे’ मराठा समाजात आणि विशेषत: युवकांच्या मनात राग साठणे हे नैसर्गिक असले तरी जाळपोळ, दगडफेक, आत्महत्या करणे हा मार्ग नक्कीच नाही.’ याचा अर्थ, काँग्रेसच्या काळात या आत्महत्या झाल्या आहेत. त्या वेळी तर पवार काँग्रेससोबत होते, देशाचे कृषिमंत्री होते. तेव्हा त्यांनी दखल का घेतली नाही? वर्षानुवर्षे म्हणजे ते चार वेळा मुख्यमंत्री असतानाचाही काळ त्यात आला. तेव्हा मात्र याच मराठा समुदायाच्या मतांवर सत्ता काबीज केली, सत्तेचा आनंद लुटला, महालमाड्या उभ्या केल्या, शिक्षणसंस्था काढल्या, सहकार क्षेत्र ताब्यात घेतले, पण मराठा समाजाला वार्‍यावर सोडून दिले. तेव्हा समाजाची आठवण झाली नाही. लाज वाटायला पाहिजे. मराठा समुदायाने एक खूणगाठ बांधून ठेवावी. आरक्षण मिळणार असेल तर ते केवळ देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातच! त्यासाठी मुख्यमंत्री स्वत: मेहनत घेत आहेत. न्यायालयीन निवाडे, मार्ग यावरही समाजाच्या धुरिणांनी विचार व्यक्त केले आहेत. हा प्रश्‍न न्यायालयाच्या कक्षेत आहे. शरद पवारांना खर्‍या अर्थाने मराठा समुदायाला आरक्षण मिळावे असे वाटत असेल, तर शासनाच्या प्रयत्नात खोडा घालू नये. सहकार्य करावे, एवढेच तूर्त सांगावेसे वाटते…

http://tarunbharat.org/?p=59706
Posted by : | on : Aug 13 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (15 of 797 articles)


रवींद्र दाणी | करुणानिधी व जयललिता हे तामिळनाडूच्या राजकीय रंगमंचावरील दोन महानायक! परस्परांचे कट्टर राजकीय शत्रू. करुणानिधी समर्थकांनी विधानसभेत जयललितांचे ...

×