ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » पवारांच्या विधानाचा अन्वयार्थ!

पवारांच्या विधानाचा अन्वयार्थ!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेलबाबत एक विधान केले. त्यावरून सध्या काँग्रेस आणि अन्य पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. काय म्हणाले पवार? पवार एवढेच म्हणाले की, ‘‘राफेल करारात वैयक्तिक रीत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेतूबद्दल काहीही शंका नाही, असे या देशातील जनतेला वाटते. विरोधकांनी राफेलमधील तांत्रिक माहिती सार्वजनिक करण्याची केलेली जी मागणी आहे, त्या मागणीत काहीही अर्थ नाही.’’ पवारांच्या या विधानावरून एकच वादळ उठले. राष्ट्रवादीचे खासदार तारिक अन्वर यांनी ताबडतोब राजीनामाही देऊन टाकला. सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना, आम्ही तारिक अन्वर यांच्यावर विश्‍वास टाकला, पण त्यांनी विश्‍वासघात केला, असे विधान केले. काँग्रेसमध्ये तर चाहोबाजूने वादळ उठले. कारण, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राफेलवरून आरोपांची राळ उडवीत असताना पवारांचे विधान आले आहे. एकतर राहुल गांधी यांना राफेल कराराबाबत काहीही माहिती नाही. सात ठिकाणी त्यांनी राफेलच्या किमती वेगवेगळ्या सांगितल्या. त्यांना, शस्त्रसंभारासहित विमान आणि केवळ विमान यातील फरकही कळत नाही. सर्वांत महत्त्वाचा मुद्दा हा की, राहुल गांधी यांच्या पक्षाला राफेल करार करण्यासाठी बराच कालावधी मिळाला असताना हा करार का झाला नाही, याचे उत्तर राहुल देत नाहीत. रॉबर्ट वाड्रा याला कारणीभूत आहेत, असा जो आरोप भाजपाने केला, त्यात तथ्य नाही, असे कसे म्हणता येईल. राहुल गांधी केव्हा काय विधान करतील, याचा नेम नसल्याने, कुणीही विरोधी पक्ष त्यांना जवळ करायला तयार नाही. राहुलच्या बाष्कळ विधानांमुळे आपल्याच पक्षाचे नुकसान होईल, असे विरोधकांना वाटते. महागठबंधन पूर्णपणे गोत्यात आले आहे. हा सगळा गदारोळ सुरू असतानाच, शरद पवारांनी बॉम्बगोळा टाकला. वास्तविक पाहता, शरद पवार काहीही चूक बोलले नाहीत. ते संरक्षणमंत्री होते. विमानांचे सौदे कसे होतात, कोणती माहिती सार्वजनिक करायची असते व कोणती नाही, याचे भान पवारांना आहे. त्यामुळेच त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधानांबद्दल त्यांनी एखाद्या सुजाण राजकारणी नेत्याला शोभेल, अशाच शब्दांत विधान केले. पण, काँग्र्रेसला मोठीच मिरची झोंबली. एकप्रकारे त्यांच्या मोदी बदनामीच्या मोहिमेवर पाणी फेरले गेले. राहुल गांधी पंतप्रधानांना उद्देशून जे शब्द वापरीत आहेत, त्याने राजकारणातील शुचिता पार धुळीस मिळाली आहे. राहुलचे पंतप्रधानांवर नीचतम पातळीवर आणि वैयक्तिक रीत्या केलेले आरोप अनेक विरोधी नेत्यांनाही पटलेले नाहीत. राजकारणात वावरताना काही मर्यादा पाळाव्या लागतात. त्या सर्व मर्यादांचे राहुलने उल्लंघन केले आहे. ही बाब शरद पवारांनाही पटलेली नाही, असे एकूणच दिसते. राहुल गांधी आगामी पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहात आहेत. अशा माणसाच्या हाती सत्ता सोपविणे विरोधकांना कदापि मान्य नाही. तशीही काँग्रेसची शक्ती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. उत्तरप्रदेशात मायावतींना काँग्रेस नको आहे. छत्तीसगडमध्ये मायावतींनी अजित जोगी यांच्या बंडखोर काँग्रेससोबत युती केली, तर मध्यप्रदेशातही २२ जागी आपले उमेदवार उभे केले. सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती, अन्यथा ज्याने त्याने आपले पाहून घ्यावे, अशी भूमिका मायावतींनी घेतली आहे. त्यांना मध्यप्रदेशात अर्ध्या जागा हव्या आहेत आणि त्या द्यायला काँग्रेस तयार नाही. तिकडेे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणतात, राहुल अजून ज्युनिअर आहे. त्याला शिकण्यासाठी काही अवधी लागेल. तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणतात, राहुल हे देशातील सर्वात मोठे विदूषक! हा सारा खेळ विरोधक उघड्या डोळ्यांनी पाहात आहेत. राहुल गांधी यांना वाटते, मोदींवर वैयक्तिक प्रहार केले, खालच्या पातळीवरून आरोप केले तर लोक आपल्याला मत देतील. राहुल गांधी मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत. मते मिळण्याऐवजी मते कशी गमावली जातील, याचा पुरेपूर बंदोबस्त स्वत: राहुल गांधीनींच करून ठेवला आहे! त्यामुळे काँग्रेसमध्येही प्रचंड अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीची ताकद केवळ महाराष्ट्रापुरती आहे. पुढे निवडणुका आहेत. अशा समयी शरद पवारांनी मोदींना बळ मिळेल असे विधान केल्यामुळे, राजकीय पंडितांच्याही भुवया उंचावल्या आहेत. आजच्या घडीला पवारांएवढा अनुभवी नेता कुणीही नाही. त्यांनी अनेक उन्हाळे, पावसाळे बघितले आहेत. त्यामुळे ते बोलतात तेव्हा मापून तोलून बोलतात. त्यातही संरक्षण आणि देशाच्या सुरक्षेच्या प्रश्‍नावर एक माजी संरक्षणमंत्री म्हणून त्यांच्या विधानाला मोठी किंमत आहे. काँग्रेस नेते ए. के. अ‍ॅण्टोनी हेही संरक्षणमंत्रिपदावर राहिलेले आहेत. संरक्षण करारातील तांत्रिक माहिती कधीच उघड केली जात नाही, हे अ‍ॅण्टोनी यांना माहीत आहे. संसदेत काँग्रेसने हीच भूमिका घेतली होती. आता मात्र राहुल राफेलच्या किमतीवरून रान उठवीत आहेत. वाढलेली किंमत सांगितली तर ती कशी वाढली, हे सांगावे लागेल. कोणत्या अस्त्रांमुळे किंमत वाढली, हे सांगावे लागेल. शत्रुपक्ष तर टपून बसलेलाच आहे. उपलब्ध माहितीनुसार राफेल विमानात मोदी सरकारने पंधरा सुधारणा केल्या आहेत. त्यात अत्याधुनिक असे इस्रायलनिर्मित पायलट हेल्मेट आहे. एका हेल्मेटचीच किंमत तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे! अशा कित्येक अत्याधुनिक सुधारणा, मोदी सरकारने केलेल्या करारात समाविष्ट आहेत. काँग्रेस शासनकाळात त्या वेळी कोणतीच सुधारणा नव्हती. त्या वेळी केवळ विमानाची किंमत ठरविण्यात आली होती. त्यात शस्त्रसंभाराचा काहीही उल्लेख नव्हता. त्या वेळी युरोचा दरही फार कमी होता. म्हणून राहुल गांधी वारंवार जी किंमत सांगत आहेत, ती शस्त्रसंभाराविना विमानाची किंमत आहे. पवारांना ही बाब माहीत आहे. संपुआच्या काळात फक्त १८ विमाने येणार होती. रालोआच्या काळात दुप्पट येणार आहेत. ही माहिती संरक्षणतज्ज्ञांना माहीत आहे. पण, काँग्रेसचा वायुसेनेवर विश्‍वास नाही. हा करार कसा झाला, किती रक्कम लागली, याचा अहवाल सीएजीकडे जाणारच आहे, हे काँग्रेसला माहीत आहे. त्यामुळे ते संयुक्त संसदीय समितीची मागणी करीत आहेत. या मागणीत काहीही अर्थ नाही. राहुल गांधी यांना राजकारणात पाय रोवायचे असतील, तर शरद पवारांसारख्या जुन्याजाणत्या आणि अनुभवी नेत्याचा सल्ला घ्यावा आणि नंतरच विधाने करावीत. कारण, तेच तेच घोकून आपला गळा बसविणार्‍या राहुलच्या विधानांना आता जनता आणि काँग्रेसही कंटाळलेली दिसत आहे. काँग्रेसची ही अखेरची अस्तित्वाची लढाई आहे. या लढाईत जर जागा ५० च्या वर पोहोचू शकल्या नाहीत, तर मग मात्र काँग्रेसच्या पतनाला सुरुवात झालीच म्हणून समजा! मग काही काँग्रेस पुन्हा उभी होऊ शकणार नाही, याचे भान राहुलने ठेवावे…

https://tarunbharat.org/?p=64739
Posted by : | on : 1 Oct 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (273 of 791 articles)


दाणी | सर्वोच्च न्यायालयाने दोन महत्त्वाचे निवाडे दिले. एक निवाडा आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल आहे, तर दुसरा प्राचीन आस्थेबद्दल. या दोन्ही निवाड्यांचे ...

×