ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » पाठचं, पोटचं आणि गाठचं…

पाठचं, पोटचं आणि गाठचं…

एकदम तत्वचिंतकाच्या थाटात लेखाची सुरुवात करून वाचकांना घनगंभीर करून टाकायचे आणि आपण किती थोर लेखक आहोत, आपल्या चिंतनाची उंची किती मोठी आहे, याचा भपका मारायचा अशी सध्या फॅशन आली आहे. त्यामुळे आपणही तसेच काही करू या. आता मी माझं आणि आपलं म्हणजेही माझंच, अशी मनोवृत्ती बळावत चालली आहे. सार्वजनिक जीवन म्हणायचं आणि त्याचं पार खासगीकरण करून टाकायचं, असं करत आपण सार्वजनिक जीवनाचं खासगीकरण करून टाकलं आहे. तसाही खासगीकरणाचा ट्रेंड आहेच. आता मोठ्या व्यक्तींच्या बाबत त्यांचं सर्वच सार्वजनिक असतं असे मानले जाते, त्यामुळे लोक त्यांच्या खासगी आयुष्यात डोकावले की माणसे, ‘माझं खासगी आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य वेगळं ठेवा’ असा घोषा लावतात. मात्र त्यांना फायदे घ्यायचे असतात तेव्हा, माझं वैयक्तिक असं काहीच नाही, जे काय आहे सार्वजनिकच आहे, असंही म्हणतात. यांची मनोवृत्ती, ‘आपलं ठेवायचं झाकून अन् दुसर्‍याचं पहायचं वाकून’ अशीच असते. त्यामुळे ते आपल्याला झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांची सार्वजनिक मिळकतही वेळ पडली की ते वैयक्तिक करून टाकतात. त्यांचा मतदारसंघ हा खरंतर सार्वजनिक असतो. मात्र दोन टर्म निवडून आले की मग त्यांचा तो वैयक्तिक हक्काचा भाग होतो. मग त्यांच्या नंतर त्यांची बायको, मुलगा, सून अशा वारसांनाच तो मिळावा, असा त्यांचा हट्ट असतो. तितक्यात ते थांबत नाही. पक्षात आणि राजकारणात वजन वाढत गेलं की त्यांचा मतदारसंघ हा त्यांचाच असतो आणि मग आजूबाजूचे त्यांच्या प्रभावक्षेत्रातले मतदारसंघही त्यांचेच होतात. (कारण तिकिट कुणाला द्यायचं हे ते ठरवितात अन् त्यांना हव त्याला तिकिट नाही दिलं की मग ते त्याला आपल्या पक्षाचा असूनही पाडतात.) अशा मतदारसंघात ते त्यांचा मुलगा फीट करतात. त्याचवेळी आणखी स्पेस असली तर पुतण्याला जमवितात. महिलांसाठी आरक्षित झाला तर त्यात सूनेला संधी देतात… एकूण काय की यांचे कधी वैयक्तिक असते अन् कधी सार्वजनिक होते तेच कळत नाही. मग काही पक्षांच्या बाबतही असेच होते. माझ्यानंतर कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला की मुलगा की पुतण्या? मुलगी की पुतण्या असा प्रश्‍न पडतो अन् अवघे आयुष्य सार्वजनिक अन् तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या उद्धारासाठीच घालविलेले हे महान नेते सर्वांना संभ्रमात टाकतात. मग ज्यांनी तो पक्ष वाढविण्यासाठी पाण्याचा पदार्थ अन् रक्ताचा घाम केला असतो त्यांना हा अन्याय वाटतो. बरे ते या बडे भय्यांनी किंवा साहेबांनी मान्यच केले असते. हा पक्ष माझा नाहीच, तो कार्यकर्त्यांच्या घामातून आणि निष्ठेतून वाढला आहे, असे ते म्हणतच आले असतात; पण वारस ठरविताना मात्र, आपल्या पोटच्यालाच ठरविले जाते. त्यातून मग अन्याय करण्यात आल्याची भावना ज्यांच्यात निर्माण होते ते साहेबांवर निष्ठा आहे, साहेब आमचा विठ्ठल आहे, आमचा देव, अम्मा आमच्या चामुंडा देवी आहे, भय्या आमचे रामजी आहेत, असे म्हणत वेगळा पक्ष काढतात. मग एकाच विचाराचे, एकाच पोताचे दोन पक्ष होतात. त्यांचे प्रेरणास्थान मात्र एकच तो नेता असतो. त्याने तो पक्ष निर्माण केला असतो अन् त्याच्याच कल्पनेतून तो वाढविला असतो. त्याचे जास्तीतजास्त फायदेही त्याचे त्यालाच झालेले असतात. हे वेगळे झालेले पक्ष त्या नेत्याच्या पाठीराख्यांचे, मतदारांचे धृवीकरण करतात. मग कधीतरी पुन्हा ते पक्ष एकत्र यावेत यासाठी जुनी माणसे प्रयत्न करतात, कारण धाकल्याकडे जावे की मोठ्याकडे हेच त्यांना कळत नाही. कुठला झेंडा धरावा, तेच कळत नाही. त्यामुळे दोन झेंडेच एकत्र यावेत असे जुन्यांना वाटते. त्यांचे आयुष्यच मुळात कुणाचेतरी झेंडे धरण्यात अन् कुणाच्यातरी टोप्या घालण्यात गेलेले असते. त्यामुळे साहेब बदलले तरीही झेंडा मात्र हवा असतो या कार्यकर्त्यांना. देशातल्या मोठ्या पक्षानंच ही पद्धत रूढ केली आहे. त्यांच्यापासून वेगळे व्हायचे आणि पुन्हा त्यांच्या सोबत बसायचे. देशातल्या जुन्या राष्ट्रीय पक्षानेच ही सृजन प्रक्रिया राजकारणात आणली. काय बरं त्या पक्षाचं नाव? बघा! वर्तमान राजकारणात त्यांचं नावही आठवेना होतं. अगदी सामान्य मतदारांच्याही स्मरणातून हे नाव गेलेलं आहे. त्यातून बारामतीचे साहेब अनेकदा फुटून निघाले अत्यंत स्वाभिमानाने अन् पुन्हा त्यांच्यासोबतच सरकारात बसले. हे केवळ इकडेच होते असे नाही. काश्मिर ते कन्याकुमारी ते तसेच होते. तामीळनाडूत अम्मांना त्यांचा पोटचा वारसच नसल्याने तिकडे त्यांच्या पक्षाची समस्याच निर्माण झाली आहे. पोटचा, पाठचा काहीच नसल्याने गाठचे सार्‍यांना दिसत आहे अन् त्याच्यासाठी धिंगाणा सुरू झाला आहे. नेताजींचं वय झालं हे असं होतं. मोठ्या कष्टाने उभा केलेला पक्ष अन् मग त्याचं काय करायचं, असा सवाल असतो. पुस्तकांचे, गाण्यांचे, चित्रपटांचे कॉपीराईटस् आपल्यांच्या नावाने करता येतात; पण राजकीय पक्षांचे काय? त्यांचे असे कॉपीराईट करता येत नाहीत; पण ते असतातच. म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा म्हणून मिरविणारा पक्षदेखील एकाच घराण्याची जहागीर असल्यागत सार्‍यांनाच वाटते. तिकडे उत्तर प्रदेशात नेताजींची हीच स्थिती झालेली आहे. त्यांच्या समोर पोटचं की बाजूचं असा सवाल नव्हता. काका मला वाचवा, असा सवाल नव्हता. लव-कुश की लक्ष्मण, असा मामला होता. पोटचं की पाठचं असा प्रश्‍न होता. अखेर पाठचं पाठिशी राहतं त्यामुळे ते दिसत नाही. पोटचं समोरच असतं त्यामुळे ते लाभाच्या वाटणीत चटकन् दिसतं. आता महाभारतापासून हेच सुरू आहे. वाटणी करायची असली की मग सारेच कसे धृतराष्ट्र होत असतात. पुत्रप्रेमानं आंधळे होतात. तरीही नेताजींनी भावाच्या बाजूने लढाई केली. तरीही पोटचं ते पोटचंच. भाऊ अखेर बाहेर पडला. मुलाने नेताजींना पक्षाचा अध्यक्ष केले. मग तो स्वत:च अध्यक्ष झाला. नेताजीला इकडूनही बोलवेना अन् तिकडूनही. आता भाऊ शिवपालने नवा पक्ष काढला. नेताजींचे अनेक खंदे समर्थक लक्ष्मणाच्या मागे गेले. नेताजींना पोरगा सांभाळायचा की भाऊ, असा प्रश्‍न पडला. पोरगा ऐकेना म्हणून ते मग भावाकडे गेले. वयाने मोठा आहे तू, तू तरी समजूतदारपणा दाखव… भाऊ म्हणाला, तुम्हीच आमचे आदर्श आहात. ‘तुमही हमार राम है’, असे म्हणत शिवपालने त्यांनाच आपल्या पक्षाकडून उमेदवारी ऑफर केली. आता ज्या पक्षाचा झेंडाच ज्या नेत्याने निर्माण केला, अनेकांच्या हातात तो दिला त्याच्याच समोर प़्रश्‍न पडला आहे की कोणता झेंडा घेऊ हाती? असं म्हणतात की, जेव्हा पोटचं कामी येत नाही, पाठचं येत नाही तेव्हा गाठचं कामी येतं. नेताजींना ही म्हण वापरात असली तरी कुणीतरी सांगायला हवी. त्यांच्या पोटचंही त्यांचं राहिलं नाही, पाठचंही त्यांच्या सोबत नाही, तेव्हा गाठी काही बांधलं आहे की नाही, याचा विचार करा. गाठी आजवर नकळत घडलेली जनतेची सेवा असेलच तर स्वत:चाच नवा पक्ष काढावा नेताजींनी.

https://tarunbharat.org/?p=67039
Posted by : | on : 4 Nov 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (29 of 727 articles)


तोरसेकर | मागील आठवड्यात विशाखापट्टणम विमानतळावर जगनमोहन या विरोधी पक्षनेत्यावर चाकूहल्ला झाला होता. विमानतळावर कडेकोट बंदोबस्त असतो आणि तिथे प्रवेश ...

×