ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » पार्टी गई तेल लेने…

पार्टी गई तेल लेने…

काँग्रेस पक्षाच्या कार्यप्रणालीबाबत विरोधी पक्ष तर नाराज आहेतच, पण, स्वपक्षीय कंटाळले का, त्यांचा काँग्रेसवर भरवसा नाही का, असा नवाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांंची सध्या रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेस अस्तित्वासाठी प्रचंड संघर्ष करीत आहे. राहुल गांधी मोदींनाच लक्ष्य करून, मोदींवर वाट्टेेल तसे आरोप करीत आहेत. महागठबंधन तयार करण्यात ते नापास झाले आहेत. बहेन मायावतींनी त्यांना मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पहिला दणका दिला. त्यामुळे अखिलेश यादव यांनीही अंग काढले. कोणत्याच पक्षाला काँग्रेस वरचढ व्हावी असे वाटत नाही, तरीही काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. प्रादेशिक पक्ष आणि त्यांचे मुख्यमंत्री स्वत:च्या नेतृत्वाची काळजी घेत आहेत. त्यामुळे ते जेवढ्या जागा देतील, त्यावरच मुकाट समाधान मानण्याशिवाय पर्याय नाही. तसा प्रवाह आतापासूनच सुरू झाला आहे. महागठबंधन अयशस्वी झाल्यापासून त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते आता सारवासारव करायला लागले आहेत. सलमान खुर्शीद तर बोलूनही गेले की, स्वबळावर काँग्रेसला आगामी लोकसभेत सत्ता मिळू शकत नाही. अन्य पक्षांच्या मदतीनेच त्यांना थोडातरी आधार मिळू शकतो. तिकडे पी. चिदम्बरम् यांनीही नेमके याच वेळी एक विधान केले. राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहणार नाहीत. त्यांची पंतप्रधान होण्याची इच्छा आहे. पण, पहिला अग्रक्रम हा भारतीय जनता पक्षाला रोखण्याचा आहे. प्रादेशिक पक्षांमधून जर कुणीही पंतप्रधान होत असेल, तर त्याला काँग्रेसचा पाठिंबा राहील, असे राहुल गांधी यांनी स्वत:च म्हटले होते, याचीही आठवण चिदम्बरम् यांनी करून दिली आहे. पण, सध्या माहोल विधानसभा निवडणुकांचा आहे. त्यापैकी दोन तरी विधानसभेत आपली सत्ता आणायची, यासाठी राहुल गांधी हे जंग जंग पछाडत आहेत. हे तर ठरलेच आहे की, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस, भाजपा आणि बसपा यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. पण, या सर्व रणधुमाळीत मध्यप्रदेशातील एका नेत्याने संपूर्ण काँग्रेसचे लक्ष वेधून घेतले आहे. जितू पटवारी त्यांचे नाव. ते मध्यप्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आहेत आणि इंदोरमधून राऊ विधानसभेची निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी आपल्या प्रचारसभेत बोललेले एक वाक्य सध्या खूपच व्हायरल झाले आहे. जितू पटवारी म्हणाले, ‘‘मेरा खयाल रखना, मेरी इज्जत बचाना, व्होट मुझे देखकर देना, पार्टी गई तेल लेने…’’ या त्यांच्या वाक्याची दखल सर्व वाहिन्यांनीही घेतल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडणे स्वाभाविक आहे. पटवारी यांच्या विधानावरून मध्यप्रदेशात काय स्थिती असेल, याची थोडीफार कल्पना यावी. याचा अर्थ, काँग्रेसचे उमेदवार काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून प्रचार करीत नसून ते स्वत:च्या विजयासाठी वैयक्तिक मते मागत आहेत. अशीच स्थिती अन्य उमेदवारांची आहे काय, याचा शोध आता काँग्रेस घेत आहे. एकेक जण आपल्याच पक्षाच्या विरोधात बोलत आहे. आता पटवारींनी असे उद्गार का काढावेत? त्यांना पक्षाची साथ नाही का? इंदोर भागात काँग्रेसचा ग्राफ खाली आहे का? म्हणूनच ते ‘‘मेरी इज्जत बचाओ,’’ असा नारा देत फिरत आहेत का? बिचारे राहुल, आपण हिंदूंच्या विरोधात नाही, याचे दर्शन घडविण्यासाठी हिंदू मंदिरांना प्रदक्षिणा घालत आहेत, मी जनेवूधारी हिंदू आहे, असे ठोकून देत आहेत. पण, पक्षाचे लोक मात्र वेगळ्याच मार्गाने जात असल्याचे जाणवते. त्यांना आपल्या राष्ट्रीय अध्यक्षावर विश्‍वास राहिला नाही का? पटवारी यांचा मतदार काँग्रेसविरोधी झाला का? अनेक प्रश्‍न आहेत. राममंदिराचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. राहुल हिंदू मंदिरात जात आहेत, पण राममंदिराच्या मुद्यावर ते चकार शब्द काढायला तयार नाहीत. प्रवक्ते म्हणतात, कोर्ट निर्णय देईल तो मान्य करू. पक्षाचे एक नेते व वकील कपिल सिब्बल यांनी तर सर्वोच्च न्यायालयात अशी भूमिका घेतली होती की, २०१९ च्या निवडणुकीनंतरच राममंदिरावर सुनावणी व्हावी. सुप्रीम कोर्टाने त्यांना झापले, हे बरेच झाले. तर असा हा एकूण मामला. काँग्रेसला राजस्थानात आपली सत्ता येईल, असे वाटत आहे. मुख्यमंत्री कोण, हे मात्र त्यांनी घोषित केलेले नाही. तेथे सचिन पायलट आणि माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत असे दोन नेते आहेत. पण, काँग्रेसने अजून पत्ते उघड केलेले नाहीत. राहुल गांधी यांनी मात्र ‘बातों बातों में’ सचिन पायलटकडे इशारा केला आहे. त्यामुळे गहलोत गट नाराज होणे स्वाभाविक आहे. याचा परिणाम किती होईल, हे निकालानंतर स्पष्ट होईल. वास्तविक पाहता, राहुल गांधी यांना नवी पिढी आणि जुनी पिढी यांचा संगमच घडविता आला नाही. त्यामुळेच, दिग्विजय सिंह, गुलाम नबी आझाद, सलमान खुर्शीद यांसारख्या नेत्यांना त्यांनी बाजूला सारले आहे. दिग्विजयबद्दल तर पक्षाच्या नेत्यांनीच राहुलचे कान भरले होते- सिंह यांना प्रचारात उतरवू नका. मते मिळण्याऐवजी मते घटतील! राजकारणात चांगले मुरलेल्या सिंह यांना हे कळले आणि त्यांनी स्वत:च घोषित केले की, आता पक्षाला माझ्या प्रचाराची गरज नाही. दिग्विजय सिंह हेही राहुल गांधींसारखे केव्हा काय बोलतील याचा नेम नाही. पण, गुलाम नबी आझाद? ते तर मुस्लिम चेहरा आहेत. पण, आताशा त्यांनाही वाळीत टाकण्यात आले आहे. ते म्हणाले, ‘‘आधी ८० टक्के हिंदू उमेदवार प्रचारासाठी बोलवायचे. आता दहा टक्केही बोलावत नाहीत.’’ राहुल गांधींनी सध्या हिंदू कार्ड वापरल्यामुळे ते मुस्लिम नेत्यांना प्रचारासाठी बोलावत नाहीत, हे पाहून राहुलच्या पावलावर पाऊल टाकून हिंदू उमेदवारही बोलावत नाहीत, असा संदेश अल्पसंख्य समाजात जाऊ शकतो. गुलाम नबी यांनी आपली खंत व्यक्त करण्यासाठी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे व्यासपीठ वापरले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. आता पटवारी बोलले. ही सारी विधाने पाहता, काँग्रेसमधील नव्या-जुन्यांचा अंतर्गत संघर्ष तर उफाळून येणार नाही ना, असे वाटायला लागते. सोनिया गांधी काहीच बोलायला तयार नाहीत. ज्या नेत्यांनी आपली सारी हयात काँग्रेसमध्ये काढली, सुखदु:खात साथ दिली, त्यांना आता जर बहिष्कृत करण्यात येत असेल, तर मग आगामी काळात काँग्रेस पक्षाचे चित्र वेगळेच दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिल्लीचे नेते आणि स्थानिक नेते यांच्यातील अंतर्गत संघर्ष हा नागपूरपासून दिल्लीपर्यंत अजूनही कायम आहे. सर्वच राज्यांत तो अजूनही उफाळतो आहेेच. तो निवडणुकीआधीच शमविला जायला हवा होता. पण, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असेच म्हणावे लागेल. आगामी पाच राज्यांच्या निवडणुका अशा वातावरणात काँग्रेस लढवीत आहे. फक्त प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांवर त्यांची मदार आहे. राहुलला हिंदू मतांकडे पाहण्याचा सल्ला देणारे ए. के. अँटनी, पी. चिदम्बरम् यांसारख्या नेत्यांचे हिंदी बेल्टमध्ये कोणतेही काम नाही. या पाच राज्यांत काँग्रेसला किती यश मिळते, ते पाहायचे…

https://tarunbharat.org/?p=66343
Posted by : | on : 24 Oct 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (232 of 791 articles)


पेठकर | आम्हाला खूप पुढे असलेलं, म्हणजे आमच्या आवाक्याच्या बाहेर असलेलं आणि मग खूप मागे पडलेलं, म्हणजे आवाक्यात होतं पण ...

×