ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » पितृपक्षातली अतृप्त काकचर्चा

पितृपक्षातली अतृप्त काकचर्चा

आता पितृपक्ष संपतो आहे. घरोघरी पितरांना जेवू घालण्याचे, त्यांना तृप्त करण्याचे कार्यक्रम सुरू आहेत. हा सण मानला जातो. माणूस मेला की त्याचे काय होत असते? त्याच्या वासना तशाच राहतात का? अतृप्त राहिलेल्या इच्छांसाठी तो अशरिरी रूपात कायम राहतो का? काय आहे की वासनांची भूतं होतात, असे म्हणतात. जिवंतपणी म्हातार्‍या बापाने जिलबी मागितली तर, ‘बुड्याला या वयात खाय खाय सुटली’ असा त्रागा करणारे बाप मेल्यावर वेळी उधार पैसे घेऊन त्याच्या नावाने जिलबीचे ताट ठेवतात… कावळ्याला पिंडदान करतात. या दिवसात कावळ्यांची चंगळ असते… त्यावर दोन कावळे बोलत होते. आता टीव्ही, मोबाईल, युट्यूब या माध्यमांपासून दूर असल्याने अस्मादिकांना कदाचित प्राण्यांचे अन् पक्षांचेही बोलणे कळत असावे. पुण्यात काही लोकांनी वीस कुत्र्यांना चक्क पेट्रोल टाकून जाळून मारले तेव्हा इतर कुत्री त्यावर काय बोलत होती, तेही सांगितले होते. कुत्र्यांना माणसांनी पेट्रोल टाकून जाळून टाकले अन् खर्‍या अर्थाने आदमी की मौत मारा उनको… कारण माणसं आपल्या सुनांना हुंड्यासाठी जाळून मारतात अन् आपल्या प्रिय, आदरणीय व्यक्तिलाही ती मेल्यावर जाळतातच… असो. तर सांगायचे हेच की माणसं जगण्याचे बहाणे शोधण्यासाठी मरणाचेही सोहळे करतात… ‘पितरांना जेवण देण्याच्या या दिवसात हुंड्यासाठी छळून मारलेल्या सुनेच्या नावाने ताट वाढत असतील का लोक?’ हा प्रश्‍न खरेतर कावळ्यांना पडला होता. ज्यांना आयुष्यभर खायला धड मिळाले नाही, जगत असताना कुणी खायलाही दिले नाही, त्यांच्या नावाने का बरे ताट वाढून जगणार्‍या भुकेल्यांना खायला घालत नाहीत ही माणसं, असा प्रश्‍न त्या कावळ्यांना पडला होता. त्यातला एक कावळा दुसर्‍याला म्हणाला, ‘‘मस्त मजा आहे ना आपली? खूप खायला मिळत आहे अन् आपण चोच मारली नाही तर ही मंडळी वाट बघत राहतात आपली…’’ त्यावर तो दुसरा कावळा म्हणाला, ‘‘अरे काय ते… आपल्याला ते हवेच असते असे नाही ना… मला तर पार अजीर्ण झालं आहे खाऊन खाऊन!’’ त्यावर पहिला कावळा म्हणाला, ‘‘अरे परवा त्या पिंपळाच्या पलीकडे असलेल्या मोठ्या घरातून बाहेर एक ताट वाढून ठेवण्यात आले. आता आपले सगळेच कावळे बेटे तेच ते खाऊन कंटाळले असल्याने तिकडे जातच नव्हते. एक भुकेला माणूस मात्र आला अन् त्याला इतके ताजे ताटभर अन्न पाहून खूपच आनंद झाला. तो खायला बसला तर त्या घरातली माणसे धावली त्याच्या अंगावर अन् इतरवेळी कावळे उडवून लावावेत, असे त्याला हाकलून लावले…’’ त्या कावळ्याची ही कहाणी ऐकून प्रश्‍न पडला, ‘आपल्या पितरांच्या रूपात कावळे येतील, यापेक्षा माणसाच्या रूपात ते येऊ शकतात, असे का नाही वाटत माणसांना?’ ते कावळे फारच मार्मिक असे बोलत होते. त्यातला एक कावळा म्हणाला, ‘‘अरे माझा चुलत भाऊ आहे ना तो डोमकावळा, चकणा बेटा… तो तिकडे गावाबाहेर असलेल्या वृद्धाश्रमाच्या अंगणात असलेल्या झाडावर राहतो.’’, ‘‘हो, माझाही एक मित्र तिकडेच रहायला गेला आहे नुकताच. तिकडे म्हणे डबल बेडरूमची घरटी खूपच स्वस्त आहेत…’’ दुसरा म्हणाला. ‘‘रीअल इस्टेटच्या धंद्यात खूपच मंदी आली आहे रे, त्यामुळे आता वेल फर्निश्ड घरटीही मोक्याच्या ठिकाणी असूनही विकली जात नाहीत… ते सोड, मी वेगळेच सांगत होतो. तिकडे खूप म्हातारे आहेत. त्यांच्या मुलांनी त्यांना सोडून दिले आहे तिथे. परवा त्यातली एक म्हातारी तिच्या मुलाशी फोनवर बोलत होती. एकदा तरी भेटून जा, असे म्हणत होती. इथे जे काय देतात खायला ते चांगले नसते रे… मला माझ्याच हातची उकडपेंडी करून खायची आहे, एकदा घरी घेऊन जाना मला…, असे म्हणत ती रडत होती म्हातारी अन् तिला वाटत होते पोर एकतंय माझं, तर तिकडून तिच्या लेकाने फोन कापून टाकला होता.’’ कावळ्यांचं हे बोलणं ऐकून मनात विचार आला, आता ती म्हातारी मेल्यावर पुढच्या वर्षी हा पोरगा नक्कीच उकडपेंडीचे ताटच्या ताट तिच्या नावाने तयार करेल अन् रस्त्यावर झाडाखाली ठेवेल तेव्हा ज्या कावळ्याने त्यांचे हे संभाषण ऐकले असेल, त्याला त्या ताटाला चोच लावायची तरी इच्छा होईल का? आता हे कावळे असा संवाद साधत असताना त्यांची कावकाव ऐकून आणखी काही कावळे तिकडे आले. दुपारची वेळ असल्याने बाकी शांतता होती. ते कावळे खात्यापित्या वस्तीतले असल्याने माणसे पितृपक्षातले वडा-पुरणाचे जेवण करून झोपली होती. या दिवसात बरेच खायला मिळते अन् तेही ताजे, आग्रहाने खायला देतात माणसे म्हणून कावळ्यांना सुस्ती असते. दुपारची काककुक्षी आटोपून चहाच्या वेळी हे कावळे बाहेर पडले होते. सुखवस्तू कावळे होते ते. त्यातला एक म्हणाला, ‘‘त्या तिकडे तो जुना वाडा आहे ना, तिथे राहतो मी झाडावर. आता ते आजी-आजोबा गेले, दोन वर्षे झालीत. त्यांची मुले आलीत अमेरिकेहून अन् त्यांनी तो वाडा विकला आहे. तिथे आता फ्लॅटस्कीम उभी राहणार आहे… त्यामुळे माझा फ्लॅट असलेले झाड तोडले जाणार असल्याचे मी ऐकले आहे.’’ त्यावर नव्यानेच आलेल्या आणखी एका कावळ्याने म्हटले, दुसर्‍या ठिकाणी आतापासून मुक्काम हलव ना तुझा…’’ त्यावर तो पहिला कावळा म्हणाला, ‘‘अरे मला त्याची चिंता नाही. आजवर त्या आजी-आजोबा या दिवसात त्यांच्या पितरांना म्हणजे आई-वडिलांना ताट वाढायचे. ते गेले…’’, ‘‘म्हणून तुझी उपासमार झाली काय?’’ एकाने विचारले. ‘‘नाही, मला प्रश्‍न पडला आहे की अमेरिकेत असलेली यांची मुले यांच्या नावाने तिकडे ताट वाढत असतील का?’’ हे कावळे बेटे एकदम अमेरिकेत पोहोचले होते. अमेरिकेत असलेले भारतीय आवर्जून आपले सगळेच सण साजरे करतात. वेळ पडली तर भारतात असलेले नाही करत; पण तिकडे गेलेले करतात… मात्र, अमेरिकेत असे ताट वाढले असले तरीही तिकडच्या कावळ्यांना अशी सवय असेल का? की मग इकडचे काही कावळेही खास पिंडाला शिवण्यासाठी तिकडे न्यावे लागत असतील? आत्ता पंधरा दिवसांपूर्वीच बातमी वाचली होती की, फ्रान्समध्ये माणसांनी खराब केलेला बगिचा स्वच्छ करण्यासाठी प्रशिक्षित कावळ्यांचा वापर केला जातो आहे… तसे प्रशिक्षण दिलेले कावळे पाश्‍चात्य देशात गेलेले भारतीय सुपुत्र वापरत असतील का? त्यातला एक कावळा म्हणाला, ‘‘अरे! जी मुलं माय-बाप मेल्यावरही इकडे अन्त्यसंस्कारासाठीही येत नाहीत. स्काईपवर अंन्त्यसस्कार पाहतात केवळ… ते काय तिकडे पितरांना या दिवसात जेवू घालणार आहेत?’’, ‘‘खरेच आहे. हे आजी-आजोबा मेलेत ना, तेव्हा जोहान्सबर्गला अन् न्यूयॉर्कला असलेला… दोन्ही मुलं आली नव्हती. गावातल्याच नातेवाईकांनी उरकले सगळे. नंतर मात्र वाडा विकून पैसा मिळविण्यासाठी दोघेही आले होते… पुढच्या जन्मी कुणाच्याही पिंडाला शिवणारे कावळेच होतील ते!’’ त्या कावळ्यांची कावकाव अजूनही डोक्यात कल्ला करते आहे… पण विचार करावा अशीच कावकाव आहे ती! करा ना विचार…

https://tarunbharat.org/?p=65165
Posted by : | on : 6 Oct 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (261 of 791 articles)


तोरसेकर | चारपाच महिन्यांपूर्वी कर्नाटकातल्या निवडणुका ऐन रंगात आलेल्या होत्या आणि सगळेच प्रमुख पक्ष आवेशात प्रचाराला लागलेले होते. त्यात मग ...

×