ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » पुलकित दिवाळी…

पुलकित दिवाळी…

यंदाची दिवाळी संपत असताना एक आनंदपर्व, पुलंचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले. अवघ्या महाराष्ट्राचं हे लाडकं व्यक्तिमत्त्व! महाराष्ट्रच नव्हे तर जगाच्या पाठीवर जिथे कुठे मराठी माणूस असेल तिथे पुलं नावाचा हा अक्षय आनंद पोहोचला आहे. मागे एक व्यंगचित्र पाहिल्याचं अजूनही स्मरणात आहे. टुंड्रा प्रदेशाचे चित्र काढले होते आणि तिथे गरम कपडे घातलेला तो माणूस, पुलंचे बटाट्याची चाळ वाचतो आहे आणि हसतो आहे… दिवाळी नंतरचे हे वर्ष पुलकित करून टाकणारे आहे. पुल एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व होते. ते काय नव्हते? खणखणीत वक्ते, उत्तम लेखक, संवेदनशील अभिनेते, कायम सुरात असलेले गायक, संगीतकार, गीतकार, पटकथाकार, कथाकथनकार, सामाजिक चळवळे, चित्रपट निर्माते, समीक्षक… काय नव्हते पुलं, असा प्रश्‍नच आहे. त्यांनी मराठी जनतेचं सारं भावविश्‍व व्यापून टाकलं होतं. आताही पुलंच्या पलिकडे जाता येत नाही. आपल्या हयातीतच दंतकथा होण्याचं भाग्य काही लोकांच्या वाट्याला येत असतं. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन ही ती मंडळी आहेत. पुलं हे सचिन, दीदी आणि बिग बी मिळून जे काय तयार होईल ते होते. ते कोट्याधीशच होते. म्हणजे त्यांच्या कोट्या अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत. अनेकदा तर असे व्हायचे की लोक ऐकीव अशा कोट्याही पुलंच्याच आहेत म्हणूृन ठोकून द्यायचे. आता व्हॉटस्अ‍ॅपच्या जमान्यात पुलं असते तर त्यांना रोजच स्पष्टीकरण द्यावं लागलं असतं की, ही कोटी माझी नाही रे बाबा… पुणेकरी पाट्या आता जगात प्रसिद्ध झाल्या आहेत; पण सर्वात आधी पुलंनीच त्याकडे लक्ष वेधले. जोशी शेजारी राहतात का हे येथे विचारू नये… अशी पाटी अन् गल्लो गल्ली असलेले सोन्या मारोतीपासून बैठ्या गणेशापर्यंतची वैशिष्ट्येही त्यांनी हेरली. पुण्याचे कावळेही काव काव करताना अत्यंत प्रमाण भाषेतच करतात, असे पुलंच म्हणू जाणे! पुलंनी महाराष्ट्रभर दौरे केले. मराठी रसिक जिथे आहे तिथे पुलं पोहोचले नाही, असे झाले नाही. ज्या गावात गेले तिथे लोक त्यांना घरी बोलावत. त्यांचा दौरा ठरला की त्या गावातली मंडळी पुलंनी आपल्या घरी यावे यासाठी आयोजकांकडे लकडा लावत. पुल म्हणजे हास्याचा अखंड धबधबाच आहे, असे लोकांना वाटे. त्यामुळे अनेकदा लोक, तुमच्या घरी तर वहिनी सतत हसतच राहत असतील… असेही त्यांना म्हणत. एकदा ते असेच एकाजणाकडे जेवायला गेले. आता पुल हे चांगले खवय्येदेखील होते. त्यामुळे त्या घरच्या बाईंनी अगदी रमून स्वयंपाक केला. पुलंना अगदी आग्रहाने खाऊ घातले. पुल अगदी मन लावून जेवत होते. जेवताना ते एकही शब्द बोलले नाही. अखेर न राहवून बाईंनी विचारलेच, स्वयंपाक चांगला नाही झाला का? जेवण आवडलं नाही का? पुल म्हणाले, असं का विचारता? बाई म्हणाल्या, काहीच बोलले नाही तुम्ही… पुलं म्हणाले, स्वयंपाक इतका रुचकर झाला की मी अवाक् झालो आहे… आता नेमके काय? पुल म्हणाले, मी इतका जेवलो की आता मला वाकताही येत नाही ! असे खूप किस्से आहेत. आता अशाच कोट्या करणारे आचार्य अत्रेदेखील होते; पण आचार्य अत्रेंच्या कोट्या टोचणार्‍या, चिमटे काढणार्‍या तर पुलंच्या गुदगुल्या करणार्‍या. तरीही दोघांच्या कोट्या एकमेकांच्या नावावर खपल्या आहेत. विदर्भातल्या पुसद या गावी गेल्यावर, मी पुसत पुसत पुसदला आलो… असे नेमके कोण म्हणाले, अत्रे की पुलं हे कळायला मार्ग नाही, कारण आता दोघेही हयात नाहीत. अर्थात ही अत्र्यांची कोटी होती. हृदयनाथ मंगेशकरांच्या सौभाग्यवती या दामुअण्णा मालवणकर यांची लेक. जुन्या काळातील विनोदी अभिनेते दामुअण्णा ज्यांना माहिती आहेत त्यांना भारती मंगेशकरांना पाहिल्यावर अचंबा वाटेल की दामुअण्णांची लेक इतकी देखणी! तसाच तो त्या काळातही तो प्रश्‍न पडला होता. दामुअण्णा चकणे होते… तसे पुलंना समकालीनही होते. अशीच चर्चा निघाल्यावर पुलं म्हणाले, ही पोर दामुअण्णांचा डोळा चुकवून आलेली दिसते… तेव्हा या कोटीवर जो काय हशा पिकला होता तो आताही सुरूच आहे. पुलंचे असे खूप किस्से आहेत. त्यांची पात्रे अजूनही मराठी माणसाच्या मनांत घर करून बसली आहेत. हरितात्या, नारायण, सखाराम गट्टाणे… ही पात्र पुलंनी लिहून अजरामर केलीच; पण त्याहीपेक्षा ती त्यांच्या तोंडून ऐकताना अगदी जिवंत व्हायची. अजूनही युट्युबवर सर्च केलं की पुलंची कथाकथने सापडतात. दिवाळीला आनंदात भर टाकण्यासाठी पुलंच्या ध्वनिफिती समाजमाध्यमांवर व्हायरल होतात. त्यांच्या काळांत समाजमाध्यमे नव्हती; पण आजही पुलंइकडे व्हायरल इन्फेक्शन झालेले लेखक नाहीत… त्यांची प्रवास वर्णने, अपूर्वाई आणि पूर्वरंगनंतर परदेशात जावून आल्यावर आपणही काहीतरी नक्कीच लिहिले पाहिजे, असे महाराष्ट्रातील लोकांना वाटायला लागले. त्यामुळे प्रवासवर्णने उदंड झाली. त्यांची बटाट्याची चाळ वाचले नाही, असा पुस्तके वाचणारा मराठी माणूस दुर्मिळच. हेही खरेच की आता पुस्तके वाचणारा मराठी माणूसच दुर्मिळ झाला आहे. कधीकधी वाटते की, आताच्या फ्लॅटस्कीमच्या युगांत पुलं असते तर त्यांनी बटाट्याच्या ऐवजी कांदा टॉवर नावाने असे खेळकर पुस्तक लिहिले असते… पुलंचे मराठी माणसावर कधीही न फिटणारे ऋण आहे. आधीच्या काळांत कर्ज घेणे किंवा कुणावर कर्ज असणे, ही नामुश्कीची बाब मानली जायची. आता लग्नापासून बारशापर्यंत अन् घरापासून शिक्षणापर्यंत कुठलीच गोष्ट कर्जाशिवाय पार पडत नाही. मात्र त्याही काळांत पुलंनी महाराष्ट्रावर आपल्या प्रतिभेचे कर्जच करून ठेवले अन् आता तर त्याचे व्याजही इतके झाले आहे की ते कर्ज नंतरच्या अनेक पिढ्या फिटणारे नाही अन् मराठी माणसालाही ते फेडता यायचे नाही. ‘नाचरे मोरा अंब्याच्या वनांत…’, या एकाच गाण्याचे कर्ज इतके ते कसे फेडणार? त्यांचे चित्रपट, गाण्याच्या मैफली अन् बाबा आमटेंपासून अनेक समाजसेवकांच्या कार्याची दखल घेत त्यांची ओळख सार्‍या जगाला करून देण्याची त्यांची तळमळ अभेद्यच आहे. आमट्यांच्या महारोग्यांच्या गावाला आनंदवन हे नाव पुलंनीच दिले. तिथे दरवर्षी मैत्र मेळावा भरविण्याची कल्पनाही त्यांचीच. आनंदवनहून आल्यावर त्यांनी बाबा आमटेंना एक पत्र लिहिले होते, त्यात लिहिले होते, मी दौर्‍यावरून आलो की सुनिता (त्यांच्या श्रीमती) माझी बॅग तपासायची आणि मी काय काय विसरून आलो, हे मोठ्याने सांगायची. आनंदवनहून आलो की मात्र ती माझी बॅग तपासतही नव्हती, कारण तिला माहिती होतं, आनंदवनहून येताना मी कुठली वस्तू नाही, तर मी मलाच तिथे विसरून आलेलो असायचो… आणिबाणीत रस्त्यावर उतरणार्‍या पुलंपासून त्यांची खूप रूपं आहेत. ‘आहे मनोहर तरी…’ मध्ये सुनिताबाईंनी दाखविलेले पुलं वेगळेच. वर्षभर आपण असे पुलकित होत राहणार आहोत. पुलंच्या आठवणीत चेहर्‍यावर स्मीत फुललं असताना डोळे मात्र पाणावलेले असतील…

https://tarunbharat.org/?p=67412
Posted by : | on : 11 Nov 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (252 of 843 articles)


तोरसेकर | राजकारणात अनेकदा आपला तोटा करून घेताना शत्रूला मोठा करणारे धूर्त जगाने बघितले आहेत. किंबहुना धूर्तपणाच्या आहारी गेलेल्या नेत्यांनी ...

×