ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » फडणवीसांचा दूरदर्शी संवाद!

फडणवीसांचा दूरदर्शी संवाद!

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सारा महाराष्ट्र ढवळून काढला जात आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंतची भूमी या आंदोलनाने जागवली गेली आहे. राज्यघटनेतील अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या तरतुदींमुळे प्रत्येक समाजाला नव्हे, या देशातील प्रत्येक नागरिकाला सरकारकडे मागण्या करण्याचा जसा अधिकार मिळालेला आहे, त्याच अधिकाराचा वापर करून, सकल मराठा समाजाने एकजुटीने आरक्षणाची मागणी केली आहे. राज्य सरकारच्या कानावर त्यांचा आवाज गेलेला नाही असे नाही, पण कुठलीही गोष्ट तत्काळ कुणालाही मिळत नसते. आणि आरक्षणाच्या मागणीसाठी तर घटनात्मक तिढा निर्माण झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कुठलेही आरक्षण ५० टक्क्यांच्या वर जाता कामा नये. अशा परिस्थितीत मराठ्यांना जर आरक्षण द्यायचे झाले, तर ते देताना निश्‍चितच राज्यघटनेने घालून दिलेल्या तरतुदींचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचेच असेल, तर त्यांना आजघडीला अन्य मागासवर्गीयांच्या आरक्षणातील तुकडा तोडून द्यावा लागणार आहे. पण, अन्य मागासवर्गीयांचा त्यास विरोध आहे. हे माहीत असूनही फडणवीस सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. पण, तो कायद्याच्या कसोटीवर खरा ठरला नाही. उच्च न्यायालयाने तो फेटाळून लावला. त्यामुळे मराठा समाज विशेषतः मुख्यमंत्र्यांवर नाराज आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काहीच करायचे नसून, ते वेळकाढूपणा करीत आहेत, असा मराठ्यांचा सकल आक्षेप आहे. पण, तो खरा नाही. मुख्यमंत्र्यांनी, आमचे शासन मराठ्यांना आरक्षण देण्यास कटिबद्ध असल्याची घोषणा केली असून, त्यासाठी सरकारने मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून या प्रक्रियेला वेग आणला आहे. आजवर मराठ्यांचे मोर्चे शांततापूर्ण मार्गाने निघाले आणि त्यांनी मोर्चे कसे निघावे, याचा आदर्शही घालून दिला. पण, सरकार काहीच करत नाही, अशी भावना झाल्याने अथवा मराठी नेतृत्वाने त्यांच्या मनात भरवल्याने राज्यभरात जाळपोळ, रास्ता रोको, दूध रस्त्यावर उलटवणे, भाज्या फेकणे अशा आंदोलनाच्या रूपातून रोष व्यक्त होऊ लागला. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या अग्रपूजेचा मान मुख्यमंत्र्यांचा असतो. पण, मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात प्रवेश केला तर यात्रा उधळून लावण्याचा, प्रसंगी यात्रेत साप सोडण्याचा इशारा देण्यात आल्याने, मुख्यमंत्री स्वतःच मोठेपणा दाखवून पंढपूर दौर्‍यापासून दूर राहिले. हा दौरा टाळून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे मनसुबे पार उधळून लावले. पण, मराठा मोर्चा अजूनही आपल्या आंदोलनावर ठाम आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी सह्याद्री वाहिनीवरून संवाद साधत मराठ्यांना शांत करण्याचे आणि त्यांना दिलासा देण्याचे केलेले प्रयत्न त्यांच्या दूरदर्शित्वाची प्रचीती आणून देणारे ठरले आहेत. राज्यकर्त्यांसाठीदेखील अभिव्यक्तीसाठी असलेल्या मंचाचा योग्य उपयोग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून घेतला आहे. पूर्वीच्या काळी राज्यातील बिकट परिस्थितीत राजा दरबार बोलावून प्रजेशी संवाद साधत असे. आज संवादाची माध्यमे बदलल्याने आणि संवाद गतिशील झाल्याने दूरचित्रवाणीचे ङ्गमन की बातङ्खसाठी त्यांनी निवडलेले माध्यम अतिशय योग्य आणि राज्याच्या ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचणारे ठरले आहे. या संवादादरम्यान, नोव्हेंबर संपण्यापूर्वी आरक्षणाची वैधानिक प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची ग्वाही देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना एक प्रकारे आश्‍वस्तच केले आहे. आपल्या राज्याचे युवा, तडफदार मुख्यमंत्री योग्य वेळी सडेतोड आणि रोखठोक निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्याच कल्पनेतून जनतेशी संवाद साधला गेला. मुख्यमंत्र्यांचा संवाद गावागावांतील जनता कान देऊन ऐकत होती. त्यांचा निर्णय दूरगामी परिणाम करणारा राहणार असल्याने, त्यांचा शब्द आणि शब्द कानात साठवून ठेवला जात होता. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीही थांबवण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली. आंदोलन, संघर्ष पुरे झाले. आता संवादातून मार्ग काढू या. ही वेळ राजकीय कुरघोडी करण्याची नसल्याचेही त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री म्हणून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन जनतेला संयम पाळण्याच्या केलेल्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद देण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांचे आसन डळमळीत करण्याचे प्रयत्न मराठा आंदोलनाच्या निमित्ताने होत आहेत. शरद पवारांसारखे नेते आपली पोळी शेकून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवसेनेला तर चेवच आलेला आहे. आम्हाला गृहीत धरू नका, हे त्यांनी अविश्‍वासदर्शक प्रस्तावाच्या वेळी अनुपस्थित राहून दाखवूनच दिले आहे. येणार्‍या निवडणुकीत मराठा आरक्षणावरून सरकारची झालेली कोंडी विरोधकांना हवीच आहे. या मुद्यावरून युती तुटलेलीही त्यांना बघायची आहे. पण, भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केलेल्या मोर्चेबांधणीमुळे राज्यात तसे काही घडण्याची शक्यता आज तरी दृष्टिपथात नाही. मराठा आरक्षणासाठी अधीर झालेले लोक वटहुकूम काढण्याचा सल्ला देत आहेत. पण, वटहुकूम काढण्याचा आनंद फार काळ टिकण्याची शक्यता नाही. दोन दिवसांसाठी आनंद मिळू शकतो. त्यामुळेच सर्वंकष विचारविमर्श करून आरक्षणावर नोव्हेंबरपर्यंत तोडगा काढण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. जे बोलतो ते करून दाखवतो, अशी त्यांची आजवरची प्रतिमा आहे. त्यामुळे त्यांनी दिलेला शब्द खरा ठरेल, याची खात्री बाळगायला हवी. पूर्वीच्या नेत्यांप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी आश्‍वासने दिली आणि ती पाळली नाहीत, असे खचीतच झाले आहे. जीएसटीबाबत विशेष अधिवेशन बोलावून त्यात चर्चा घडवून आणत महाराष्ट्रानेच पुढाकार घेतला होता. त्याच धर्तीवर मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका घ्यायची, यावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याची तयारीदेखील मुख्यमंत्र्यांनी दर्शविली आहे. राज्यातील सर्वोच्च सभागृहात झालेल्या चर्चेतून निश्‍चितच यावर योग्य तो तोडगा निघू शकतो. राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगालाही शक्य तितक्या लवकर त्यांचा अहवाल देण्याची सूचना केली आहे. त्यामुळे हा अहवालही लवकरात लवकर येईल. पण, कायद्याची पूर्तता झाल्याशिवाय आरक्षण कठीण आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधताना आणखी एक महत्त्वाची घोषणा करून मेगाभरतीमध्ये मराठा समाजाच्या कोणत्याही युवकावर अन्याय होणार नाही, असे जाहीर केले आहे. त्यामुळे मराठ्यांची वाढती नाराजी कमी होऊ शकेल. एससी, एसटी समाजावर अन्याय न होता, मराठा समाजाला न्याय कसा देता येईल, हेदेखील सरकारतर्फे बघितले जाणार आहे. हे मुख्यमंत्री लोकप्रिय घोषणा करणारे नाहीत. भाजपाला पुढच्या वर्षी पुन्हा सत्तेत यायचे आहे, त्यामुळे ते कुठलाही धसमुसळेपणा करणार नाहीत, ही बाब जनतेने आणि मराठ्यांनीही पुरती ओळखून घ्यायला हवी. दुसरीकडे, आंदोलनाच्या निमित्ताने सरकारविरोधी वातावरणनिर्मिती करण्याचे विरोधकांचे प्रयत्न सपशेल अपयशी ठरल्याचे जळगाव आणि सांगली महापालिकांच्या निवडणुकांनी दाखवून दिले आहे. या महापालिकांमध्ये मराठ्यांनीच नव्हे, तर दलितांनीही भाजपा उमेदवारांच्या झोळीत भरभरून मते टाकून त्यांच्या हाती सत्ता सोपविली आहे. त्यामुळे मराठा आणि दलित समाजावर हक्क सांगणारे उघडे पडले आहेत.

https://tarunbharat.org/?p=59313
Posted by : | on : 7 Aug 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (374 of 787 articles)


तोरसेकर | आजही आपण बालेकिल्ला हा शब्द सहजगत्या वापरत असतो. आता किल्लेच राहिलेले नाहीत वा उपयोगाचे राहिलेले नाहीत, तर बालेकिल्ला ...

×