ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » बलात्कारी आमदाराची पाठराखण कशापायी?

बलात्कारी आमदाराची पाठराखण कशापायी?

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केरळमधील आमदार पी. के. शशी यांच्यावर, त्यांच्याच पक्षातील महिला कार्यकर्त्याने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे राज्यातील राजकीय वातावरण कलुषित झाले आहे, ढवळून निघत आहे. लिव्ह-इन-रिलेशनचे वारे वाहात असतानाच्या काळात महिलांनी पुरुषांवर लैंगिकतेचे आरोप करण्याची फॅशनच झाली आहे, असे म्हणून या प्रकरणाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जो पक्ष नीतिमत्तेचे गुणगान गातो, ज्या पक्षातर्फे सर्वांना समान वागणूक दिली जात असल्याचे नगारे वाजविले जातात, त्या पक्षात एका महिलेविरुद्धच्या तक्रारीला केराची टोपली दाखविली जात असेल, तर ही धिक्कार करण्यासारखीच घटना आहे. राजकीय पक्षांनी शुचिता पाळलीच पाहिजे आणि त्यात सत्ताधारी पक्षाला तर अधिक सावध राहण्याची गरज आहे. सत्ता ही अळवावरच्या पाण्यासारखी आहे. आजचे सत्ताधारी विरोधी पक्षात कधी दिसतील, याचा नेम नाही. त्यामुळे कुठलाही संवेदनशील विषय हाताळताना त्याबाबत सजग राहण्याची गरज आहे. आजकाल सोशल मीडिया अधिक सशक्त झाला आहे. अशात कुठल्याच गोष्टी फार काळ दडून राहू शकत नाही. त्यामुळे शोरनूर येथील माकपचे आमदार पी. के. शशी यांच्याविरुद्ध पक्षातील महिला नेत्याने केलेल्या आरोपाची शहानिशा होण्याची गरज आहे. महिला नेता आहे म्हणून हे प्रकरण लवकरात लवकर धसास लागले पाहिजे असे नव्हे, तर तो एका जागरूक महिलेने केलेला आरोप आहे. या महिलेने पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून हे प्रकरण प्रथम पक्षाच्या फोरमवर चर्चेला आणले. डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या या महिलेने प्रारंभी आपल्याविरुद्धच्या या अत्याचाराची तक्रार पोलिट ब्युरोचे सदस्य व पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात यांच्या पत्नी वृंदा करात यांच्याकडे केली. या तक्रारीच्या चौकशीसाठी पक्षाच्या पोलिट ब्युरोच्या मत्रिमंडळाच्या दोन सदस्यांची नियुक्ती केली आहे. पण, अजून चौकशीचा पत्ता नाही. खरेतर पक्षाच्या महिला सदस्याने केलेल्या तक्रारीची वृंदा करात यांनी तत्काळ दखल घ्यायला हवी होती. आमदाराला कारणे दाखवा नोटीस बजावायला हवी होती, वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी तिला पाचारण करायला हवे होते. डाव्या पक्षांना कुठल्या अखलाखच्या झालेल्या कथित हत्येची दखल घेण्यास वेळ आहे, कुठेशी जम्मूमधील कठुआ आणि उत्तरप्रदेशातील उन्नावमध्ये अल्पवयीन बालिकांवर झालेल्या कथित बलात्काराची घटना देशभर चर्चेत आणण्यासाठी वेळ आहे, पण त्यांच्याच पक्षाच्या एका महिला कार्यकर्तीवर झालेल्या बलात्काराची हा पक्ष साधी दखलही घेत नाही, म्हणजे हा पक्ष महिलांबाबत किती जागरूक आहे, हे दिसून आले. त्यांना महिलांच्या अब्रूची एवढीच किंमत असती, तर त्यांनी पोलिस ठाण्यामार्फत या प्रकरणाची चौकशी केली असती, आमदाराला कारणे दाखवा नोटीस बाजवली असती. पण, असे काहीएक झाले नाही. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समजताच, नागरी समितीने वृंदा करात यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. एक पीडित महिला तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी बयाण करीत असताना, तिला कायदेशीर मदत द्यायचे सोडून या पक्षाचे नेते तिच्यावर शिंतोडे उडवीत आहेत. केरळ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष एम. सी. जोसेफिन यांनी तर या प्रकरणात अकलेचे तारे तोडले आहेत. त्या म्हणतात- बलात्कार ही काही नवीन बाब नाही. कम्युनिस्ट पार्टी अस्तित्वात आल्यापासून हे प्रकार सुरू आहेत. त्यामुळेच अशा मानवी चुका होत आहेत. त्यांचे हे वक्तव्य निर्लज्जपणाचेच म्हणावे लागेल. त्यांनी या निमित्ताने माकपमधील कल्चरवरही करातरूपी ‘प्रकाश’ टाकला आहे. महिला या भोगासाठीच असतात, असाच निष्कर्ष त्यांच्या या वक्तव्यातून निघतो. महिलांबाबत हा पक्ष किती असंवेदनशील आहे, तेदेखील पुढे आले आहे. पक्षाच्या नेत्या वृंदा करात किंवा दस्तुरखुद्द जोसेफिन यांच्या घरच्या कुणा महिलेवर असा प्रसंग गुदरला असता, तर त्यांची प्रतिक्रिया ‘‘चलता हैं’’ अशीच राहिली असती का, असा प्रश्‍न या निमित्ताने उभा ठाकला आहे. पक्षातून दबाव वाढल्यामुळे वृंदा करात झुकल्या असून, त्यांनी हे प्रकरण वरिष्ठांच्या कानावर घातले आहे. तथापि, नागरी कृती समितीने तत्पूर्वीच पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यापर्यंत धाव घेतली. आता हे प्रकरण पोलिसांकडे गेले आहे. पोलिस योग्य ती चौकशी करतील. पण, ऑगस्टच्या महिन्यातील हे प्रकरण एका महिला नेत्यानेच दाबून एका स्त्रीचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो निषेधार्हच म्हणावा लागेल. पक्षातील महिला कार्यकर्तीविरुद्धच्या बलात्काराच्या या घटनेमुळे पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर दोन तट पडलेले आहेत. कठुआ आणि उन्नाव येथील बलात्कारांच्या घटनेचे भांडवल करणारे डावे पक्ष, आमदार पी. के. शशी यांच्याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सार्‍या देशाचे लक्ष लागले आहे. पी. के शशी यांना पदरात लपवण्याचे खरे कारण काय? हे जाणून घेण्याची या देशातील नारिकांची इच्छा आहे. खरेतर या आमदाराची गच्छंती होण्यास हे प्रकरण पुरेसे आहे. पण, माकपतर्फे तेवढे कठोर पाऊल निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उचलले जाईल, असे सध्यातरी दिसत नाही. पण लोकशाहीच्या, महिलांच्या स्वातंत्र्याच्या, त्यांच्या अधिकारांच्या, अभिव्यक्तीच्या मागण्या उच्चरवाने नोंदविणार्‍या या पक्षाकडून एका महिलेची चाललेली गळचेपी कदापि मान्य होऊ शकत नाही. आधीच हा पक्ष आक्रसत चाललेला आहे. एकेकाळी देशातील तीन राज्यांत असलेली या पक्षाची सत्ता केवळ केरळ राज्यापुरती मर्यादित राहिली आहे. पक्षातील कर्मठपणा अजूनही गेलेला नाही. धोरणांमध्ये लवचीकता नाही. तिहेरी तलाकबाबतही डावे पक्ष आग्रही नाही. शहाबानो प्रकरणातही या पक्षाची भूमिका बोटचेपीच होती. एकीकडे महिलांच्या अधिकारांसाठी लढा देणारा पक्ष म्हणून मिरवायचे आणि दुसरीकडे त्यांच्यावर अत्याचार झाला तर त्याकडे साफ दुर्लक्ष करायचे, ही भूमिका अयोग्यच म्हणावी लागेल. बलात्कारित व्यक्तींना शिक्षा होण्याची प्रकरणे अत्यल्प आहेत. प्रत्येक चार बलात्कारांमागे केवळ एका व्यक्तीला शिक्षा होते. म्हणजेच चारपैकी तीन आरोपी मोकळे सुटतात. बलात्काराच्या अनेक घटना पोलिसांपर्यंत पोहोचूच शकत नाहीत. नातेवाईकांचा दबाव, घरातील कर्त्या व्यक्तीची अथवा मुलीची होणारी बदनामी, ही कारणे बलात्काराच्या घटना पुढे न येण्यासाठी कारणीभूत ठरतात. डावे पक्ष केरळात उजव्या पक्षांना प्रवेश करू देण्याच्या विरुद्ध आहेत. आजवर त्यांनी केलेली काळी कृत्ये जनतेपुढे येऊ नयेत, हाच त्यांच्या या कृतीमागचा उद्देश आहे. पण, आता माकपच्या मुस्कटदाबीस न जुमानता केरळमध्ये उजव्या पक्षांच्या लोकांनी मुसंडी मारली आहे. या मुसंडीमुळेच माकप कार्यकर्तीविरुद्धच्या अत्याचाराविरुद्ध भाजपाच्या युवा शाखेने शख फुंकला आहे. त्यांच्या बुलंद आवाजाने झापडबंद माकपचे डोळे उघडावे आणि त्यांना बलात्कारी आमदाराविरुद्ध कारवाई करण्याची सुबुद्धी यावी!

https://tarunbharat.org/?p=61384
Posted by : | on : 7 Sep 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (137 of 727 articles)


वैद्य | ही कहाणी आहे, अर्णव नावाच्या एका अत्यंत हुशार तरुणाची. अर्णवचा अकरावीचा वर्गमित्र सौम्यदीप्त बॅनर्जी याने सांगितली आहे. अर्णव ...

×