ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » बलात्कारी बिशप…

बलात्कारी बिशप…

एका बलात्कारी बिशपविरुद्ध थेट व्हॅटिकनप्रमुखांना पत्र लिहून दाद मागण्याची एका ननवर आलेली वेळ, एकूणच माध्यमजगताकडून किंवा स्वयंघोषित पुरोगाम्यांकडून दुर्लक्षित राहिली नसती तरच नवल होते! हो! बलात्काराचे एक प्रकरण लागलीच जगजाहीर करायला, त्यावरून उच्छाद मांडायला, धिंगाणा घालायला, फडतूस लोकांना बोलावून त्यावर चर्चा घडवून आणायला हा बिशप म्हणजे काय आसारामबापू आहे? त्यावरून अकांडतांडव करायला आणि त्यांची धिंड काढायला ते काही हिंदू संत नाहीत. बहुधा त्यामुळेच चर्चशी संबंधित बिशपकृत बलात्काराचे हे प्रकरण कुणाच्याच लेखी महत्त्वाचे ठरलेले नाही. कित्येकांच्या तर खिजगणतीतही ते नाही. पण, कोट्टायमवरून पीडित ननची आर्त हाक, तक्रार व्हॅटिकनच्या भारतातील प्रतिनिधीच्या नजरेस आणून देण्यात आल्यानंतर प्रकरण, नाही म्हटले तरी चर्चेत आले. खरंतर या प्रकरणाकडे धर्माची चाळणी बाजूला सारून, एका महिलेवरील अन्याय, एवढ्या मर्यादित दृष्टिने बघितले तरी न्यायदानाची प्रक्रिया बर्‍याच अंशी सुकर होईल. झाली असती. पण, प्रत्यक्षात तसे घडले नाही. जालंधर प्रांताच्या बिशपकडून सतत दोन वर्षे आपले शारीरिक शोषण होत राहिल्याची एका ननची तक्रार दाखल होताच हवेत विरली. कुणाच्याच दृष्टीने ती दखलपात्र ठरली नाही. कारण यातील शोषक व्यक्ती पद, अधिकार, वकुबाने मोठी होती; तर पीडित व्यक्ती संपूर्ण व्यवस्थेतील जवळपास शेवटच्या टोकावरील एक दुवा. तो तुटला तरी कुणाचेच काही बिघडणार नव्हते. त्यामुळे कोणीच त्याची कीव केली नाही. पण, वरच्या श्रेणीतील कुणावर कारवाई झाली, तर मात्र संस्थाच धोक्यात येते. ती येऊ नये याची काळजी वाहण्याच्या नादात बिशप फ्रॅन्को मुलक्कल यांचा सर्व बाजूने बचाव होत राहिला. संस्थेनेही ननला वार्‍यावर सोडून बिशपला पाठीशी घालण्याची भूमिका स्वीकारल्याची वस्तुस्थिती पुरेशी लक्षात आल्यावर केलेल्या कृत्याची खंत वाटणे वेगळेच, बिशपांनाही आता मुजोरी करावीशी वाटू लागली आहे. या आरोपातून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी त्यांनी आता हुद्यापासून तर पैशापर्यंत सर्वच बाबींचा दुरुपयोग करीत विविधांगी क्लृप्त्या अनुसरणे आरंभले आहे. तसा आरोप खुद्द पीडित महिलेने केला आहे. वास्तविक, एका पुरुषाने एका महिलेवर केलेला अत्याचार, एवढ्या मर्यादित चाकोरीतून बघत हे प्रकरण हाताळणे योग्य ठरले असते. पण, तसे घडले नाही आणि मग एक एक करत कारनामे उघड होत गेले. पितळ उघडे पडत गेले. पवित्र प्रार्थनास्थळासाठी काम करण्याच्या निमित्ताने एकत्र जमलेला गोतावळा मानवतेचे गीत गात कसले अमानवी कृत्ये करतो, हे जगजाहीर झाले. ‘‘आपण सारी प्रभूची लेकरं आहोत अन् त्याच्यापुढे सारेच समान आहेत.’’ अशी शिकवण देणारी प्रार्थनापद्धती ही खरंतर या संस्थेची ओळख. पण, मनात जागलेल्या राक्षसी वृत्तीपुढे माणुसकी थिटी पडली अन् प्रभूची लेकरं बिथरली. सहमतीच्या पलीकडे जात फ्रॅन्को मुलक्कल यांनी आपल्याच एका महिला सहकार्‍याचे तिच्या मर्जीविरुद्ध शोषण आरंभले. हे कृत्य किंवा असला आरोप हा काही चर्चशी संबंधित संस्थांच्या संदर्भात पहिल्यांदा झालेला नाही. यापूर्वीही यासारखी कित्येक प्रकरणे उजेडात आली आहेत. फक्त आसाराम बापू, राम रहीम यांच्यासारखा बोभाटा त्यांच्या वाट्याला आला नाही, एवढेच. गाजावाजा कोणत्या बाबतीत करायचा, याची पुरेपूर कल्पना भारतीय प्रसारमाध्यमांना असल्याने हा चमत्कार घडू शकला, हे गृहीतक मान्य केले, तरी अंतर्गत व्यवस्थेतही या बिशपवर काडीचीही कारवाई होत नाही, हे मात्र अयोग्य आहे. केवळ अयोग्यच नाही, तर घातक आहे. बिशप पद सांभाळणार्‍या एका व्यक्तीवर कारवाई झाली तर सर्वदूर छी-थू होईल, मग संस्थेची प्रतिमा मलिन होईल, वगैरे ठोकताळे असतीलच वरिष्ठांच्या या असल्या भेकड वर्तणुकीमागे. पण, ननच्या भूमिकेत वावरत चर्च नावाच्या त्याच संस्थेसाठी आयुष्य वेचणार्‍या महिलेवरील अन्यायाचे काय? त्याचे निवारण कोणी करायचे? मानवी समूहासंदर्भातील निसर्गदत्त शारीरिक गरजा, भावभावनांचा कल्लोळ, त्यातून घडणार्‍या प्रमादाची शक्यता नाकारण्याचे प्रयोजनच नाही. पण, प्रमाद वेगळा अन् बलात्कार वेगळा. प्रमादाला एकवेळ माफी देताही येईल, पण बलात्कार? त्यासाठी तर शिक्षाच व्हायला हवी. इथे आणखी एक बाब व्यवस्थितपणे समजून घेतली पाहिजे. ती ही की, बिशपांवर आरोप कुण्या संस्थेबाहेरील व्यक्तीने लावलेला नाही. तसे असते तर एकवेळ राजकारणाचा गंध त्याला आला असता. पण, तो आरोप त्याच संस्थेत कार्यरत एका सहकार्‍याने केला आहे. केलेल्या गंभीर तक्रारीवर कारवाई होत नसल्याची खंतही त्यांनीच व्यक्त केली आहे. या बाबतीत शिष्टमंडळ तयार करून कारवाईच्या मागणीचा पाठपुरावा करायलाही बाहेरच्या कुण्या लोकांनी पुढाकार घेतलेला नाही. सर्व पातळींवर प्रयत्न करून थकल्यानंतर व्हॅटिकनच्या स्थानिक प्रतिनिधींच्या दरबारात हजर होण्याची भूमिकाही त्यांचीच. त्यामुळे इथे राजकारण, बदनामीच्या षडयंत्राची शक्यता पडताळून बघायला जराही वाव नाही. उलट, इतका गंभीर आरोप होऊनही बिशपवर कारवाई करायला कोणीच धजावत नाही, ही खरी खंत आहे. सरकार आणि चर्च, या दोन्ही पातळीवर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीचे खोबरे करण्यासाठी एका विशिष्ट स्तरावरून दबावतंत्रापासून तर पैशाच्या प्रवाहाचादेखील वापर होऊ लागल्याचा पीडितेचा आरोपही गंभीर म्हणावा असाच आहे. धमक्या आणि गुंडांचा वापरही निषिद्ध ठरलेला नाही इथे कुणाचसाठी. संस्थेकरिता अत्याचारीत महिलेच्या तुलनेत बिशप एवढे मोठे अन् महत्त्वपूर्ण ठरले असतील, तर ईश्‍वरापुढे सारेच समान असल्याच्या बाता करणे बंद करावे चर्चमधील सहकार्‍यांनी यापुढे. तिथेही स्त्री-पुरुष, सान-थोर, पदनिहाय भेद अस्तित्वातच नव्हे, तर सर्वमान्य असल्याचेही जाहीर करावे व्हॅटिकनचा कारभार चालविणार्‍या धुरिणांनी. अन्यथा मुलक्कल यांच्यावर कारवाई करून त्या ननला न्याय द्यावा. बरं, भारतात घडणार्‍या या प्रकारांबाबत न्यायाची भीक व्हॅटिकनकडे तोंड करून का मागावी लागावी, हा प्रश्‍नही आहेच. भारतातील न्यायव्यवस्थेवरचा हा अविश्‍वास मानायचा, की इथल्या प्रचलित व्यवस्थेला प्रमाण न मानण्याच्या मानसिकतेतून अस्तित्वात आलेली ती समांतर व्यवस्था आहे? तसे असेल, तर ती व्यवस्था कुणाच्या पुढाकारातून अस्तित्वात आलीय्, असा महत्त्वपूर्ण प्रश्‍नदेखील यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. भारतातील चर्च विदेशी आर्थिक मदतीतून चालतात, हे कालपर्यंतचे उघडसत्य होते. आता ते इथली कायदा व न्यायव्यवस्था झुगारून व्हॅटिकनच्या इशार्‍यावर चालत असल्याचेही स्पष्ट व्हायला बिशपांनी घातलेल्या घोळाचे निमित्त पुरेसे ठरले आहे. तक्रार व्हॅटिकनच्या दरबारात दाखल झाल्यावर, तरी त्या पीडितेला न्याय मिळतो की बिशपांचेच वर्चस्व सिद्ध होते, तेवढेच आता बघायचे!

https://tarunbharat.org/?p=61769
Posted by : | on : 13 Sep 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (125 of 727 articles)


जहागीरदार | रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी संसदेच्या अंदाज समितीसमोर साक्ष देताना, आर्थिक आघाडीवर काँग्रेसने घातलेला नंगानाच देशासमोर ...

×