ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक » बिहारमधील जागावाटप ही भाजपाची डोकेदुखी!

बिहारमधील जागावाटप ही भाजपाची डोकेदुखी!

श्यामकांत जहागीरदार |

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी रालोआतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल यांच्या भेटी घेतल्या आहेत. अकाली दल आणि भाजपा यांच्यातील संबंध नेहमीच सुरळीत आणि सौहार्दाचे राहिले आहेत. मात्र, तसेच संबंध केंद्रात आणि राज्यात भाजपासोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेसोबत राहिले नाहीत. अर्थात, याला भाजपा नाही तर शिवसेनाच कारणीभूत आहे.
अमित शाह आता बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयुचे नेते नितीशकुमार यांची भेट घेतील काय, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपा आणि शिवसेनेचे संबंध जेवढे तणावपूर्ण आहेत, तेवढे सध्या जदयुशी नाहीत. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाला आपल्या मित्रपक्षांना सांभाळणे गरजचे झाले आहे. नितीशकुमार यांचा जदयु हा भाजपाचा शिवसेनेइतकाच जुना मित्रपक्ष आहे.
२००९ ची लोकसभा निवडणूक जदयुने भाजपासोबत युती करून लढवली होती. यावेळी राज्यात जदयु मोठ्या भावाच्या, तर भाजपा लहान भावाच्या भूमिकेत होती. त्यामुळे राज्यातील ४० पैकी जदयुने २५ तर भाजपाने १५ जागा लढवल्या. जदयुने २५ पैकी २०, तर भाजपाने १५ पैकी १२ जागा जिंकल्या. म्हणजे लोकसभा निवडणुकीतील युती ही फक्त भाजपाचीच नाही तर जदयुचीही गरज आहे. २००९ मध्ये भाजपा सोबत होती म्हणूनच जदयुला २० जागा जिंकता आल्या, ही वस्तुस्थिती आहे. २०१४ मध्ये भाजपा सोबत नव्हती म्हणून जदयुला २० वरून दोन जागांवर समाधान मानावे लागले.
२०१४ ची लोकसभा निवडणूक राज्यात जदयु आणि भाजपाने स्वतंत्रपणे लढवली. याचा फटका भाजपाला नाही तर जदयुलाच बसला. तर बिहारमध्ये प्रथमच स्वबळावर निवडणूक लढवणार्‍या भाजपाने ३० पैकी २२ जागा जिंकत आपली ताकद दाखवून दिली. भाजपाने १० जागा आपल्या मित्रपक्षांसाठी म्हणजे रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीसाठी तसेच उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक समता पार्टीसाठी सोडल्या होत्या. लोजपाने ७ पैकी ६ जागा तर रालोसपाने ३ पैकी ३ जागा जिंकल्या होत्या.
विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी नितीशकुमार यांनी भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राजद तसेच काँग्रेससोबत महाआघाडी बनवली. यामुळे भाजपाचा पराभव झाला. मात्र, नितीशकुमार यांच्या जदयुला राजदपेक्षा कमी जागा मिळाल्या. नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करून महाआघाडीने ही निवडणूक लढवल्यामुळे राजदने नाइलाजाने नितीशकुमार यांना मुख्यमंत्री बनवले. राजदच्या भ्रष्टाचाराचे ओझे फार काळ आपल्या डोक्यावर वाहून नेणे नितीशकुमार यांना शक्य नव्हते. कारण नितीशकुमार यांची राजकारणातील स्वच्छ प्रतिमा! लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आल्यामुळे ही महाआघाडी जास्त काळ टिकू शकली नाही. नितीशकुमार यांनी भ्रष्टाचारशिरोमणी लालूप्रसाद यादव यांच्या राजदशी आघाडी केली तेव्हाच ही आघाडी फार काळ चालणार नाही, हे स्पष्ट झाले होते. उपमुख्यमंत्री असलेल्या तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर, नितीशकुमार यांनी राजदशी असलेली युती तोडण्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि अपेक्षेप्रमाणे भाजपासोबत सरकार बनवले.
आणखी एक राज्य आपल्याकडे आल्याचे समाधान भाजपाला मिळाले असले, तरी आता बिहारमधील जागावाटपाच्या मुद्यावरून भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. कारण आता बिहारमधील रालोआत चार पक्ष झाले आहेत. २०१४ मध्ये दोन पक्ष असताना भाजपाने स्वत:कडे ३० जागा ठेवून दोन मित्रपक्षांसाठी १० जागा सोडल्या होत्या. तिसर्‍या मित्रपक्षाला म्हणजे जदयुला जागा किती आणि कोणत्या द्यायच्या, हा आता भाजपासमोरील कळीचा मुद्दा झाला आहे.
रामविलास पासवान आणि उपेंद्र कुशवाह आपल्या हिश्शाच्या जागा सोडणार नाहीत, हे निश्‍चित आहे. म्हणजे जदयुसाठी आपल्या ३० जागांमधूनच भाजपाला जागा द्याव्या लागणार आहेत. भाजपाचे सध्या २२ खासदार आहेत, म्हणजे या जागा भाजपा सोडणे शक्य नाही, म्हणजे जदयुला भाजपा जास्तीत जास्त ८ जागा देऊ शकते. ८ जागा जदयु मान्य करेल असे वाटत नाही. सध्या जदयुचे दोन खासदार लोकसभेत आहेत, त्या तुलनेत जदयुला ८ जागा मिळाल्या तरी पुरेशा आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत आपल्याला ७१ जागा मिळाल्या, त्यामुळे आपल्याला किमान १२ जागा मिळाव्या, अशी जदयुची भूमिका आहे.
जदयुची दुसरी महत्त्वाची अट म्हणजे राज्यातील कोणतीही निवडणूक- मग ती लोकसभेची असो की विधानसभेची- नितीशकुमार यांच्या नेतृृत्वात लढवली पाहिजे. जागावाटपाचे २००९ चे सूत्र कायम ठेवावे, अशी जदयुची आणखी एक मागणी आहे, जी भाजपाला आता मान्य होऊ शकत नाही. कारण आता महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही भाजपा लहान भावाच्या भूमिकेतून मोठ्या भावाच्या भूमिकेत आली आहे. त्यामुळे आपल्याला मोठ्या भावाची भूमिका मिळावी, ही जदयुची मागणी भाजपाला मान्य करणे कठीण दिसते आहे.
मुळात नितीशकुमार यांच्या रालोआतील समावेशामुळे उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष दुखावला गेला आहे. त्यामुळे नितीशकुमार यांच्या नेतृृत्वात निवडणूक लढवणे कुशवाह यांच्या पक्षाला मान्य नाही. पुढच्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार नाही तर उपेंद्र कुशवाह यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर करावे, अशी त्यांच्या पक्षाची मागणी आहे. आपली नाराजी दर्शवण्यासाठी मागील गुरुवारी बिहार प्रदेश भाजपा अध्यक्ष नित्यानंद राय यांनी आयोजित केलेल्या रालोआच्या भोजनबैठकीवर उपेंद्र कुशवाह यांनी बहिष्कार घातला होता.
नितीशकुमार यांनाही याची कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी भाजपावर दबाव वाढवायला सुरुवात केली आहे. नोटबंदीचे समर्थन करणार्‍या नितीशकुमार यांनी आता नोटबंदीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे बिहारला विशेष दर्जा मिळावा, अशी मागणी लावून धरली आहे. विशेष राज्याचा दर्जा देता आला असता, तर भाजपाने आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देऊन तेलगू देसम् हा आपला मित्रपक्ष गमावला नसता. बिहारला विशेष दर्जा देण्याची नितीशकुमार यांची मागणी भाजपाने फेटाळली आहे. नितीशकुमार यांना हे माहीत नाही असे नाही, पण जागावाटपात जास्तीत जास्त जागा आपल्याकडे ओढण्यासाठी नितीशकुमार यांचे हे दबावतंत्र आहे.
भाजपाला बिहारमध्ये मित्रपक्षांना सांभाळण्यासाठी क्रिकेटसारखा ट्वेंटी-ट्वेंटीचा सामना खेळावा लागणार असे दिसते. म्हणजे लोकसभेच्या २० जागा आपल्याकडे ठेवत उर्वरित २० जागा आपल्या तीन मित्रपक्षांसाठी सोडाव्या लागणार आहेत. म्हणजे लोजपा आणि रालोसपा यांच्या १० जागा कायम राहून जदयुच्या हिश्श्याला १० जागा येतील. लोकसभा निवडणुकीत मोठ्या भावाची भूमिका घेऊन राज्यातील विधानसभा निवडणुकीत जदयुला मोठ्या भावाची भूमिका देण्याचा पर्यायही भाजपासमोर आहे. एकंदरीत, बिहारमध्ये मित्रपक्षांना सांभाळून जागावाटप करताना भाजपाला काही त्याग करावा लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
जितनराम मांझी यांनी रालोआ सोडल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एकेक मित्रपक्ष भाजपासाठी महत्त्वाचा झाला आहे. आता बिहारमध्ये एकही मित्रपक्ष गमावणे भाजपासाठी अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळेच भाजपाच्या या अडचणीच्या परिस्थितीचा फायदा म्हणा वा गैरफायदा जदयु घेत आहे. त्यामुळे मित्रपक्षांना न दुखावता जागावाटपात भाजपाची प्रतिष्ठा कायम ठेवण्याचे मोठे आव्हान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासमोर आहे.

https://tarunbharat.org/?p=55420
Posted by : | on : 14 Jun 2018
Filed under : उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक (745 of 1334 articles)


जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदी सरकारला बदनाम करण्याचे पद्धतशीर षडयंत्र आपल्या देशात रचले जात आहे, हे अतिशय दुर्दैवी ...

×