अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १६ ऑगस्ट – अटलबिहारी वाजपेयी…

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

►लाल किल्ल्यावर मोदी यांची घोषणा ►५० कोटी भारतीयांना मिळणार…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » भय्यूजी महाराजांचे जाणे…

भय्यूजी महाराजांचे जाणे…

भय्यूजी महाराजांचे जाणे मनाला चटका लावून गेले. ती हळहळ, ती अस्वस्थता मनाच्या कुठल्याशा कप्प्यात घर करून गेली. राजबिंडे व्यक्तिमत्त्व, स्वत: उभारलेल्या सूर्योदय आश्रमाचा व्याप आता आवरण्यापलीकडे चाललेला, सभोवताली भक्तांच्या गोतावळ्याचा परीघही दिवसागणिक विस्तारत चाललेला, ऐहिक म्हणावी अशी सारी सुखं भोगून झालेली, ती भोगण्याची आसक्ती निमाली असं नसलं, तरी त्यात कुठल्याही अडचणी नसताना, सामान्यातल्या सामान्य माणसाला सतावणारी चिंता, त्यांच्यासारख्या आध्यात्मिकतेच्या दृष्टीने एका विशिष्ट उंचीवर पोहोचलेल्या, संतपदाच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या व्यक्तीच्याही ठायी असू शकते, हे धगधगते वास्तव अनेकांच्या डोळ्यांवरची झापड बाजूला सारणारे ठरले आहेे. समोर बसलेल्या समुदायाला कालपर्यंत जीवनाचे सार सांगणार्‍या, अडचणींना खंबीरपणे सामोरे जाण्यासाठीचे धैर्य देणार्‍या भय्यूजी महाराजांना कुठल्याशा एका बेसावध क्षणी स्वत:चे आयुष्य अस्तित्वहीन करावेसे वाटणे, यातून अनेकानेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. मानवी आयुष्याच्या विवंचना अशा सर्वदूर विखुरल्या असताना, त्याच्याशी दोन हात करण्याचे सामर्थ्य कमावणे, खरंतर कुण्या येरागबाळ्याचे काम नव्हे. म्हणूनच, सामान्य माणसाच्या आकलनापलीकडची शक्ती ठायी बाळगून संतपदाच्या दिशेने मार्गक्रमण करणार्‍यांचा संघर्ष, त्यांची कहाणी काही और ठरते. त्याच मार्गाचे एक पांथस्थ ठरलेले भय्यूजी महाराज कित्येकदा वादग्रस्तही ठरले. त्यांच्या दुसर्‍या लग्नाचा मुद्दा असो, की राजकीय वर्तुळातील लोकांशी असलेली त्यांची जवळीक… कधीकाळी मॉडल बनायला म्हणून घराबाहेर पडलेल्या एका तरुणाचे, तेथून यू-टर्न घेऊन थेट अध्यात्माच्या मार्गावर येऊन थांबणे, त्या मार्गावरील प्रवासाचा त्यांचा दृढ निश्‍चय, समाजाच्या विविध स्तरातून त्यांना लाभलेला भक्तांंचा गोतावळा, ज्याचा डोलारा सांभाळणे जिकिरीचे व्हावे अशा एखाद्या आश्रमाची उभारणी, अशातच दुसरे लग्न करण्याचा निर्णय… लौकिकार्थाने भारदस्त, आश्‍चर्यजनक, कौतुकास्पद आणि क्वचितप्रसंगी संशयास्पदही… असा हा प्रवास अविरत सुरू राहिला. अध्यात्माच्या पलीकडे जाऊन विविध सामाजिक प्रकल्पांच्या उभारणीची सकारात्मक किनारही त्यांच्या कार्यकर्तृत्वाला लाभली आहे. असं सगळंच गुण्यागोविंदानं चाललेलं असताना, निदान आभास तरी तसाच असताना, अद्याप वयाची पन्नाशीही न गाठलेले हे व्यक्तिमत्त्व, एक दिवस लोकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत स्वत:ची ईहलोकीची यात्रा संपविण्याचा अत्याधुनिक मार्ग अवलंबून मोकळे होते… सारे प्रश्‍न मागे ठेवून… आपल्या कौटुंबिक समस्यांचा पसारा आवरणे अशक्य होत असल्याची खंत छोट्याशा डायरीत खरडलेल्या चार ओळींतून नोंदवत जगाचा निरोप घेण्याची त्यांनी अनुसरलेली तर्‍हा खरंतर कुणाच्याच मनाला भावलेली नाही. ज्यानं, सार्‍या बंधनातून मुक्त होण्याचा, विपरीत परिस्थितीशी लढण्याचा मार्ग जगाला दाखवायचा, तोच असा स्वत:च्या समस्यांपुढे ढासळलेला, पराजय पत्करलेला बघितल्यावर सामान्य माणसानं हतबल, केविलवाणं होणं स्वाभाविकच. हे खरंच की, आपल्या समाजातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाच्या मनातल्या संतपदाच्या कल्पनाही अगदीच वरच्या टोकाच्या. वस्त्रांच्या भगव्या रंगात संतत्वाचे सारे गुण, त्याचे माहात्म्य शोधण्याची सवय जडलेल्या समूहात भगवी वस्त्रं परिधान न करताही संतपदाचे तेच बिरूद लेऊन वावरण्याची तर्‍हा फार थोडी माणसं अनुसरू शकलीत. भय्यूजी महाराजांनी तो प्रयत्न करून पाहिला. त्यात काहीअंशी त्यांना यशही लाभले. देशाच्या कानाकोपर्‍यातून सभोवताल जमा झालेला भक्तसंप्रदाय उगाच थोडी एकवटता आला त्यांना… पण संन्यस्त आणि ऐहिक जीवनाची सांगड घालताना होणारी तारेवरची कसरत कमालीची जीवघेणी ठरली अन् कल्पनेपलीकडच्या विरक्तीवरही दुर्दैवाने मात करून गेली. त्या दिशेनं प्रवास करण्यासाठी धडपडणारं एक व्यक्तिमत्त्व स्मृतिशेष करून गेलं…
या संपूर्ण प्रकरणात दोष कुणाला द्यायचा? एखाद्याला श्रेष्ठत्व, देवत्व बहाल करून स्वत: मोकळं होणार्‍या अन् मग स्वत:च्या अपेक्षांचं ओझं समोरच्यावर लादून स्वत: मात्र नामानिराळं राहणार्‍या कथित भक्तांंच्या गर्दीला? की लग्नही करायचं, संसारही थाटायचा, ऐश्‍वर्यसंपन्न आणि विरक्त-संन्यस्त जीवनाची एकाच वेळी आस धरत उगाच फरफट करून घेत धडपडण्याच्या प्रयत्नांना? आपल्यापेक्षा काहीसे वेगळेपण सोबतीला घेऊन जगणार्‍या माणसांची समाजाला नेहमीच भुरळ पडते. तसेही, गर्दीचा एक भाग बनून कुणाचा तरी जयघोष करण्यात धन्यता मानणार्‍यांची कमतरता नाही येथे. त्या गर्दीपासून स्वत:ला जरासे वेगळे करीत वागण्याचा प्रयत्न करणार्‍यांच्या वाट्याला मात्र उगाच अशी फरफट येते. देखणं रूप, पैसाअडका, अफाट जनसंपर्क, गाठीशी असलेली उमेद, काहीतरी करून दाखवण्याची, स्वत:ला सिद्ध करण्याची जिद्द उराशी बाळगून मॉडेल बनण्यासाठी म्हणून बाहेर पडलेला एक तरुण स्वत:च्या कर्तृत्वाच्या बळावर स्वतंत्र विश्‍व उभारतो; पण एका गाफील क्षणी स्वत:चेच अस्तित्व पणाला लावून बसतो. लोकांच्या मनात स्वत:च स्वत:बद्दल निर्माण केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात एक दिवस स्वत:ला गमावून बसतो… सारेच अजब, अतर्क्य, अनाकलनीय… या प्रकरणाने अजूनही काही प्रश्‍न, काही मुद्दे उपस्थित केले आहेत. तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात मुठीत सामावेल इतक्या छोट्या झालेल्या जगात, इतस्तत: विखुरलेल्या समस्यांनी मानवी समूहासमोर निर्माण केलेली जगण्याची विवंचना, त्यातून निर्माण झालेली असुरक्षितता, त्या आडून आलेली आक्रमकता, स्वत:च्या अस्तित्वाची लढाई लढताना इतरांना धरातीर्थी पाडण्याच्या इराद्यातून नकळत बळावलेली कठोर मानसिकता, त्यानुरूप वागता आले तर ठीक, नच आले तर होणारी घालमेल, त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता, याचा तर हा परिणाम नव्हता? हिमांशु रॉय नावाच्या पोलिस अधिकार्‍याने काही दिवसांपूर्वी केलेली आत्महत्या असो, ज्याला आसरा दिला त्यानेच एका कुटुंबातील पाच जणांचा घात केल्याची परवाची नागपुरातील घटना असो, की भय्यूजी महाराजांचा दुर्दैवी अंत, बदललेली जीवनशैली आणि एकूणच आयुष्याबद्दलच्या धारणांची गल्लत तर होत नाहीय् ना? अपेक्षा आणि वस्तुस्थिती यातील अंतर कमी करण्याच्या नादात सामान्यजनांची तर ओढाताण होतेच आहे, पण बौद्धिक, आध्यात्मिक पातळीवर वरच्या स्तराला पोहोचलेल्यांनाही या परिस्थितीशी झगडता येत नसेल, तेही त्या स्थितीपुढे हतबल, पराभूत होणार असतील, तर सामान्यजनांची काय कथा? अध्यात्म, विरक्ती, संन्यस्त जीवन, सर्वसंगपरित्याग वगैरे बाबी इतक्या सहज नाहीत, हे सर्वप्रथम तर भक्तांंनी ध्यानात घेतले पाहिजे. त्यासंदर्भातील दावा करणार्‍यांची जबाबदारी तर त्याहून अधिक ठरते, एवढे तरी यानिमित्ताने समजून घेऊ या…!

http://tarunbharat.org/?p=55422
Posted by : | on : Jun 14 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (126 of 793 articles)


श्यामकांत जहागीरदार | लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ‘संपर्क फॉर ...

×