ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » भरकटलेले नक्षली अन वाहवलेले समर्थक…

भरकटलेले नक्षली अन वाहवलेले समर्थक…

ते राहतात याच देशात, पण त्यांना इथले नियम मान्य नसतात. स्वत:च्या संपूर्ण स्वातंत्र्यावर त्यांचा भर असतो. पण, इतरांचे वैचारिक स्वातंत्र्य मान्य करण्याची आणि स्वीकारण्याची दानत मात्र त्यांच्यात नसते. त्यांच्यालेखी स्वत:ची ती विचारधारा, इतरांची ती कचरापेटी असते. त्यांना या देशाचे संविधान मान्य नाही. असते, तर शस्त्रांच्या जोरावर आपल्याला हवे ते घडवून आणण्यासाठी सरसावलेल्या नक्षल्यांचे उघड समर्थन त्यांनी केले नसते. त्यांना नक्षलवाद मान्य असतो. खुलेआम त्याचे समर्थन करण्यातही त्यांना कमीपणा वाटत नाही. नक्षल्यांबद्दलच्या प्रेमापोटी यांच्या मनात फुटणारा मायेचा पाझर कधी लपून राहिलेला नाही. या चळवळीसाठी सीमेपलीकडून होणारा शस्त्रांंचा पुरवठा अन् त्याच्या इथल्या यंत्रणेविरुद्ध होणार्‍या वापराबाबाबतचे त्यांचे मौन अनाकलनीय ठरले आहे. नक्षलवाद्यांनी निरपराधांचे बळी घेतले तरी त्याबद्दल चकार शब्द काढायचा नाही कधी; पण चकमकीत पोलिसांच्या हातून नक्षलवादी मारले गेले की, मात्र देशभरातील पांढरपेशे नक्षलसमर्थक एकत्र येतात- नक्राश्रू ढाळायला, मानवाधिकाराचे रडगाणे गायला. माओच्या विचारांपासून तर नक्षली चळवळीबाबतची इत्थंभूत माहिती देणारी पुस्तकं जवळ उपलब्ध असली, तरी त्यावर कुणी आक्षेप नोंदवलेला खपत नाही त्यांना. तेव्हा मात्र वैचारिक स्वातंत्र्याचा पाढा आठवतो सगळ्यांना. पण, खोट्यानाट्या आरोपांचा राग आळवत आपल्याला नको असलेल्या सरकारविरुद्ध वातावरण तापविण्याच्या नादात भीमा-कोरेगावच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात दंगल पेटविण्यात पुढाकार घेताना जराशी लाज वाटत नाही कुणालाच. कोरेगावात आणि त्यानंतर सार्‍या महाराष्ट्रात हिंसाचार घडविण्याच्या षडयंत्राचा भाग म्हणून गेल्या जानेवारी महिन्यात पुण्यात पार पडलेल्या एल्गार परिषदेत ज्यांनी ज्यांनी प्रक्षोभक भाषणं करीत गरळ ओकत समाजमन पेटविण्याचा प्रयत्न केला, ती मंडळी सरळ सरळ नक्षली चळवळीशी संबंध ठेवून राहिली असल्याच्या निष्कर्षाप्रत तपासयंत्रणा आली आणि मग सत्र सुरू झाले ते धरपकडीचे. हैदराबादच्या वरवरा राव यांच्यापासून तर छत्तीसगढच्या सुधा भारद्वाजांपर्यंत आणि मुंबईच्या अरुण फेरिरापासून तर दिल्लीच्या गौतम नवलखांपर्यंत सारेच संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहेत आता. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाचा त्यांच्यावरील आरोप तर गंभीर आहेच, पण कोरेगावच्या दंगलीच्या षडयंत्राचा आरोप तरी कुठे अदखलपात्र ठरतो? गेल्या काही वर्षांत नक्षली चळवळ तशीही भरकटली आहे. त्याच्या स्थापनेसाठीच्या मूळ उद्देशांना तर केव्हाच तिलांजली मिळाली आहे. कधीकाळी गरिबांवरील अन्यायाविरुद्ध लढण्याची भाषा बोलणारे लोकच आता बंदुकींच्या टोकावर दहशत निर्माण करून त्याच गोरगरिबांचा छळ करीत आहेत. त्याच चळवळीचे शहरी पांढरपेशे समर्थकही त्यांच्या साथीला उभे राहिले आहेत. एरवीही ते माओवादाच्या आडून सशस्त्र नक्षलवाद्यांच्या पाठीशी उभे असतातच. पण, हे समर्थन उघड होऊ नये यासाठीचीही त्यांची धडपड चाललेली असते. पोलिसांकरवी पकडले गेले की, लागलीच लोकशाहीची मुस्कटदाबी होत असल्याचा साक्षात्कार होतो त्यांना. मानवाधिकाराचा सूर तर लागलीच आळवतात त्यातले काही गवई. कालपर्यंत दाभोळकरांच्या हत्येप्रकरणात सनातनच्या कुठल्याशा कार्यकर्त्याला अटक झाली, तर आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या यातल्याच कित्येकांना. हिंदू कसे कट्टरवादी आहेत, हे दाखवण्याची कशी धडपड चालली होती सर्वांचीच. पण वरवरा राव, सुधा भारद्वाज, वेर्नोन गोनसालविस, गौतम नवलखा हे तर काय लोकशाहीचे पुजारीच की नाही? त्यांना अटक होणे म्हणजे लोकशाहीवरचा आघात! मग, भीमा-कोरेगावच्या इतिहासाचे निमित्त साधून त्यांनी दंगली पेटविण्याचे षडयंत्र रचले, ते काय होते? लोकशाहीच्या कोणत्या तत्त्वात बसते, दंगली पेटविण्याचे कारस्थान? या पांढरपेशा, शहरी नक्षलसमर्थकांचे एक बरे आहे. त्यांना जंगलातल्या नक्षल्यांसारखे शस्त्र हाती धरावे लागत नाही, की भीतीच्या वातावरणात जगावेही लागत नाही. विचारांच्या नावाखाली माओ स्वीकारला काय नि स्वत:चे विचारस्वातंत्र्य जपण्याच्या हट्टापायी लोकशाही पायदळी चिरडली काय, काहीच फरक पडत नाही. इतरांनी आडकाठी केली तर लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचा आरोप करण्याचे स्वातंत्र्य उपभोगण्याइतके कायद्याच्या ज्ञानाचे गाठोडे बांधून ठेवलेले असतेच त्यांनी उशाला! सारी त्याच्या बळावरच मुजोरी चाललेली असते त्यांची. गेल्या वर्षी छत्तीसगडच्या दंतेवाड्यात नक्षल्यांविरुद्ध लढायला उभ्या ठाकलेल्या पोलिस निरीक्षकाला जो प्रश्‍नांचा भडिमार सहन करावा लागला अन् मानवाधिकाराच्या आडून नक्षल्यांचे समर्थन करायला निघालेल्या कथित हुशार लोकांना माध्यमांपासून तर राजकारण्यांपर्यंत जे समर्थन मिळाले, ते बघितल्यानंतर हा देश, हा समाज नेमका कोणाच्या साथीने उभा आहे, असा प्रश्‍न पडतो. पांढरपेशा नक्षलसमर्थकांची तर बातच काही निराळी आहे. त्या अरुंधती रॉय तर बर्‍याचदा तिकडे विदेशात बसून अक्कल पाजळत असतात. त्यांना, पोखरणचा अणुस्फोट झाला तरी वेदना होतात अन् स्वतंत्र काश्मीरच्या मुद्यावरही त्यांना भारत सरकारच्या बाजूने बोलावेसे वाटत नाही, तरीही स्वत:च्या देशभक्तीबाबत त्यांचे मत ठाम असते. दुसर्‍यांच्या देशभक्तीवर आक्षेप नोंदविण्याचा स्वत:चा अधिकार अबाधित राखून वावरत असते ही मंडळी. या देशातल्या तमाम माओवाद्यांची, नक्षली चळवळीची ताकद वाढविण्यासाठी आडमार्गाने प्रयत्नरत असलेल्या स्वयंघोषित पुरोगाम्यांची हीच गत आहे. संविधानातील सार्‍या तरतुदी त्यांना केवळ स्वत:च्या सोयीने वापरायच्या असतात. त्याचा उपयोग इतरांनी केला की मात्र यांना पोटशूळ उठतो. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे तर त्याचे धडधडीत उदाहरण आहे. हे स्वातंत्र्य केवळ आपण एकट्यानेच उपभोगायचे असल्याच्या गैरसमजात वावरत राहिल्याने, अनेकदा इतरांनी त्याचा उपयोग केलेला चालत नाही यांना. मध्यंतरी काही लोकांनी सर्वदूर आरंभलेली पुरस्कार वापसीची नौटंकी हा त्याचाच परिणाम होता. शिवाय, नक्षल चळवळ ज्या उद्देशांसाठी सुरू झाली, त्या उद्देशाचे तीनतेरा वाजल्याचेही दु:ख नाही इथे कुणालाच. मूळ सामाजिक उद्देश केराच्या टोपलीत टाकून सारेच राजकारणाच्या दिशेने पळत सुटलेत. सर्वसामान्यांचे हित खुंटीवर टांगून राजकारणाची गणितं सोडवणं सुरू झालं. गोरगरिबांच्या समस्यांपेक्षाही सत्तेत कोण असावं नि कोण नसावं, हा प्रश्‍न महत्त्वाचा ठरला. यात नक्षलवाद्यांची चळवळ आपसूकच दिशाहीन झाली अन् शहरातील त्यांचे रखवाले दंगली पेटविण्याच्या मनसुब्यात रमले. आता पितळ उघडे पडले, तरी चेहरे पडलेले नाहीतच कुणाचे. कारण, लोकशाहीरक्षणाचा नारा बुलंद करण्याची नाटकं नव्याने आरंभली जातील आता…

https://tarunbharat.org/?p=60814
Posted by : | on : 30 Aug 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (267 of 724 articles)


जहागीरदार | मुलायमसिंह यादव यांच्या समाजवादी पक्षात पुन्हा यादवीची स्थिती निर्माण झाली आहे. मुलायमसिंह यादव यांचे बंधू शिवपालसिंह यादव यांनी, ...

×