संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २४ जून – संसदेचे पावसाळी…

पंतप्रधान तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना

पंतप्रधान तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना

नवी दिल्ली, २४ जून – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज…

मानसरोवर भाविकांना चीनने प्रवेश नाकारला

मानसरोवर भाविकांना चीनने प्रवेश नाकारला

►रस्ता खराब असल्याचे कारण पुढे केले, गंगटोक, २४ जून…

दहशतवाद्यांना केलेल्या मदतीमुळे पाक अडचणीत

दहशतवाद्यांना केलेल्या मदतीमुळे पाक अडचणीत

►३६ विकसित देश घेणार झाडाझडती ►मुंबई हल्ल्यानंतर टाकले होते…

भारत हा सद्‌वर्तनी, सद्‌गुणी लोकांचा देश

भारत हा सद्‌वर्तनी, सद्‌गुणी लोकांचा देश

►डोनाल्ड ट्रम्प यांनाही सत्यता मान्य, वॉशिंग्टन, २४ जून –…

भारताला मिळणार २२ गार्डियन ड्रोन्स

भारताला मिळणार २२ गार्डियन ड्रोन्स

►पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा, नवी दिल्ली, २३ जून –…

शेतकर्‍यांचे चांगभले!

शेतकर्‍यांचे चांगभले!

►३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी ►देशाच्या इतिहासातील सर्वात…

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद/कोल्हापूर, २४ जून – पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद…

खासगी वाहनांनाही ‘स्कूल बस’ परमिट

खासगी वाहनांनाही ‘स्कूल बस’ परमिट

►परिवहन विभागाची हायकोर्टात माहिती, मुंबई, २४ जून – शाळेऐवजी…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 06:05 | अस्त: 19:19
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » भाजपाची मुसंडी!

भाजपाची मुसंडी!

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जितकी रंगत नसते त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी ती नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत असते. केंद्रात अथवा राज्यात कुणीही सत्तेवर आले वा पराभूत झाल्याचा थेट फायदा-तोटा गावखेड्यातील आम आदमीला नसतो. पण, ‘आपल्या गावात आपले सरकार’ यासाठी सारेच नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीत स्वतःला झोकून देत असतात. अगदी ‘चूल-मूल’पुरत्या मर्यादित असलेल्या गृहिणींचादेखील आपल्या वॉर्डातील लोकप्रतिनिधींच्या अथवा नगराध्यक्षाच्या जय-पराजयावर डोळा लागलेला असतो! या निवडणुका ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनमानावर थेट परिणाम करणार्‍या असल्याने तिची रंगत, त्यातील चुरस, त्यातील नाट्य, त्यातील भय, त्यातील आनंद आणि संघर्षामुळे पारावरील चर्चेचा विषय झाल्या असतात. कुठे एखाद्या जातीच्या मगरुरीविरुद्ध गाववाले एकवटले असतात, तर कुठे दारूच्या व्यवसायातून गब्बर झालेल्या राजकारण्याला पराभूत करण्यासाठी गाववाल्यांनी वज्रमूठ आवळली असते. कुठे महिलांच्या विजयासाठी महिलांना एकत्रित करून पुरुषसत्तेला आव्हान दिलेले असते, तर कुठे युवकांच्या प्रतिनिधींनी खुर्च्या उबवणार्‍यांविरुद्ध रणशिंग फुंकले असते… अशाच भिन्न भावनांचे पडसाद उमटवणार्‍या निवडणुका राज्यातील २५ जिल्ह्यांतील १४७ नगरपरिषदा आणि १८ नगरपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मोजणी सोमवारी पार पडली. आजवरच्या ग्रामीण भागातील या दंगलीचा इतिहास कॉंग्रेस-राष्ट्रवादी, भाजपा-शिवसेनेला धोबीपछाड देत आल्याचे सांगतो. पण, यंदा निवडणुकीचे पारडेच फिरले आणि ज्या प्रमाणे केंद्रात ‘नरेंद्रा’ला अन् राज्यात ‘देवेंद्रा’ला निवडून जनतेने ‘कमळ’ फुलविले, त्याच धर्तीवर, पुरोगामी परंपरा असलेल्या आणि शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या महाराष्ट्राने गाव-खेड्यात मल्टीकम्युनलांची सत्ता झुगारून भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधींची प्राधान्याने निवड केली. भाजपाने शहरी भागासह ग्रामीण भागात सर्वदूर मारलेली मुसंडी दृष्ट लागण्यासारखीच आहे! रात्री आठ वाजेपर्यंतच्या निकालानुसार भाजपाने नगराध्यक्षपदाच्या ५५ जागा जिंकून पहिला क्रमांक पटकावला आहे. शिवसेना २३ जागा जिंकून दुसर्‍या स्थानी, तर कॉंग्रेस (२१) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (१९) अनुक्रमे तिसर्‍या आणि चौथ्या स्थानी घसरले आहेत. अपक्षांनी २० जागा काबीज करून चुणूक दाखविली आहे. महापालिकांच्या निवडणुकीतही भाजपाने मित्रपक्ष शिवसेनेसोबत विजयी घोडदौड केलेली आहे. भाजपाने २२, सेनेने १५, कॉंग्रेसने २१, राष्ट्रवादीने १८, स्थानिक आघाड्यांनी १२ नगरपालिका काबीज केल्या असून, २६ ठिकाणी त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. या विजयाला अनेक कंगोरे आहेत. शहरी पक्ष, अशी भाजपावर होणारी टीका या विजयाच्या निमित्ताने थांबली पाहिजे. ग्रामीण भागातील जनतेनेही कमळाच्या फुलावर केलेले शिक्कामोर्तब हेच सांगते! नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयाच्या बाजूने दिलेला हा जनतेचा कौल आहे. ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे सरकारच्या बाजूने निर्माण झालेली ही सहानुभूतीची लाट आहे. राष्ट्रवादी विचारांच्या प्रभावाचा हा विजय आहे. राज्य सरकारने केलेल्या विकास कामांचा हा गौरव आहे. त्याच प्रमाणे राज्याने राबवलेल्या जलयुक्त शिवारवर जनतेने उठवलेली मोहोर, या दृष्टीनेदेखील या विजयाकडे बघितले जाऊ शकते. भाजपाचे यश जसे डोळ्यांत भरणारे आहे, तशीच शिवसेनेची कामगिरीदेखील स्पृहणीय आहे. तथापि, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा झालेला पराभव, त्यांचे पुढारी अजूनही जमिनीवर आलेले नसल्याचा पुरता पुरावा आहे! गेली १५ वर्षे या पक्षांची राज्यात एकहाती सत्ता होती. पण, आत्मकेंद्री राजकारण, खुशमस्करेपणा, भाऊ-भतिजावाद आणि जनतेच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करण्याची अरेरावी वृत्ती, जशी त्यांचा विधानसभेत पराभव करून गेली, तीच कारणे त्यांच्या याही निवडणुकीतील पराभवाला कारणीभूत ठरलीत. उलट, त्यात आणखी अवगुणांची भर पडली. दोन्ही पक्ष विसकळीत, असंघटित, नेतृत्वहीन आणि नियोजनशून्य होते. एकत्रित निवडणुका लढायच्या सोडून, गावकी टिकवून ठेवण्याच्या नादात त्यांनी एकमेकांवरच शरसंधान करत निवडणुकीत मित्रांचे रक्त सांडले. पराभवाचे ते आत्मपरीक्षण करतील, अशी अपेक्षा करू या! घरात बसून निवडणुका जिंकता येत नाहीत, असा नारायण राणेंनी पृथ्वीराज चव्हाणांना मारलेला टोला बरेच काही सांगणारा आहे. पैसे देऊन पदं वाटण्याच्या राणेंनी फोडलेल्या वाचेवर पृथ्वीराज चव्हाण यांनी शिक्कामोर्तब केले असले, तरी ती चूक दुरुस्तीची वेळ निघून गेलेली आहे. माजी प्रदेशाध्यक्ष माणिकरावांवर झालेले आरोप पक्षातील बेदिली सांगून गेले. राष्ट्रवादीला सोबत न घेणे आणि आक्रमकता नसणे, ही कॉंग्रेसने सांगितलेली पराभवाची कारणे पटण्यासारखीच आहेत. पण, हे ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणता येईल! पक्षाला मिळालेले यश हे कार्यकत्यार्र्ंनी केलेल्या श्रमाचे फळ असल्याची, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे. कुणा एका व्यक्तीमुळे नव्हे, कार्यकर्त्यांच्या संघटित शक्तीमुळेच विजय शक्य असतो, हेच या निवडणुकीने सिद्ध करून दाखविले आहे. भाजपाने विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम आणि बुलडाण्यापासून कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह पश्‍चिम महाराष्ट्रापर्यंत आगेकूच केली असली, तरी पंकजा मुंडे (परळी), रावसाहेब दानवे (भोकरदन), संजय काका पाटील (कवठे महांकाळ) आणि बबनराव लोणीकर यांच्या प्रभावक्षेत्रातील पराभव भाजपासाठी बोचरा ठरणारा आहे. पण, वर्धेत भाजपाने कमाल केली आहे. नगराध्यक्षपदाच्या आणि नगरपालिकांच्या प्रत्येकी ६ जागा या पक्षाने आपल्या खिशात घालून जिल्हा ‘कॉंग्रेसमुक्त’ केला आहे! या विजयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचा सिंहाचा वाटा आहे. कोल्हापूरमध्ये जनसुराज्य पक्षाच्या रूपात भाजपाला मोठेे यश मिळाले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना कराडमध्ये बसलेला धक्का आणि इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांची झालेली पीछेहाट, कॉंग्रेस-राष्ट्रवादीसाठी चिंतेची बाब ठरणारी आहे. पण, या पार्श्‍वभूमीवर राणेंच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने कोकणातील सावंतवाडी, देवगड नगरपालिकांमध्ये चांगले यश मिळवले आहे. उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसला छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीचा फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. राज्यातील सत्तांतरानंतर एवढ्या मोठ्या संख्येने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्याची सत्ताधारी भाजपा व शिवसेनेची ही पहिलीच वेळ होती. त्यात मुख्यमंत्र्यांची व्यूहरचना फळास आली. सत्ताधार्‍यांचे वाक्‌बाण परतवून लावण्यास विरोधक अपयशी ठरले. भाजपाने सत्तेचा आणि पैशांचा दुरुपयोग केल्याचा, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप पराभूत मानसिकता सिद्ध करणारा आहे. निवडणुकीचा हा पहिला टप्पा आहे. इतर ३ टप्प्यांतही भाजपाची विजयश्री कायम राहील, अशी आशा निर्माण करणारी ही मुसंडी आहे…!

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under अग्रलेख, संपादकीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अग्रलेख, संपादकीय (393 of 466 articles)


कटाक्ष : गजानन निमदेव | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजता पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा ...