हज सबसिडी बंद

हज सबसिडी बंद

►मुस्लिमांना प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार देणार ►नकवी यांची घोषणा, नवी…

चकमकीत मला ठार करण्याचा कट : तोगडिया

चकमकीत मला ठार करण्याचा कट : तोगडिया

►लवकरच पुराव्यांसह समोर येणार, अहमदाबाद, १६ जानेवारी – १०…

न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी दस्तावेज याचिकाकर्त्याला द्या

न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी दस्तावेज याचिकाकर्त्याला द्या

►सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश, नवी दिल्ली, १६ जानेवारी…

क्षेपणास्त्र डागल्याच्या संदेशामुळे गोंधळ

क्षेपणास्त्र डागल्याच्या संदेशामुळे गोंधळ

वॉशिंग्टन, १४ जानेवारी – अमेरिकेच्या हवाईक्षेत्रातील हवाई बेटावर क्षेपणास्त्र…

‘जम्मू-काश्मीरला जाणे टाळा’

‘जम्मू-काश्मीरला जाणे टाळा’

►अमेरिकेची पर्यटकांना सूचना, वॉशिंग्टन, ११ जानेवारी – अमेरिकेने भारतात…

ममतांच्या दौर्‍यातील संपादक ‘चमचे-चोर’?

ममतांच्या दौर्‍यातील संपादक ‘चमचे-चोर’?

लंडन, १० जानेवारी – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी…

भाजपाची तिरंगा रॅली

भाजपाची तिरंगा रॅली

►संविधान बचाव रॅलीला प्रत्युत्तर ►•रावसाहेब दानवे यांची घोषणा, मुंबई,…

ना. स. फरांदे कालवश

ना. स. फरांदे कालवश

पुणे, १६ जानेवारी – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधान…

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

सांगली, १६ जानेवारी – पश्‍चिम महाराष्ट्रात ‘रॉबिनहूड’ प्रमाणे आयुष्य…

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

॥ तरंग : दीपक कलढोणे | ‘हर्र बोला हर्र’…

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

॥ विशेष : मुकुल कानिटकर | एकीकडे जग भारताकडे…

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | हा वारस…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:12
अयनांश:
Home » उपलेख, श्याम परांडे, संपादकीय, स्तंभलेखक » भारतीयांनी बालीचा हिंदू धर्म समजून घेतला पाहिजे

भारतीयांनी बालीचा हिंदू धर्म समजून घेतला पाहिजे

सर्वसाक्षी : श्याम परांडे |

हिंदू धर्माचा अभ्यास करण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या माध्यमांपैकी एक लोंटार म्हणजे ताडपत्रावरील लिखाण. ताडपत्रे आणि बांबूच्या सालांवर लिहिण्याची प्राचीन परंपरा जपण्यासाठी धडपडणारी, कदाचित, जगातील बाली हिंदू ही एकमेव जमात असावी! पदवीपूर्व स्तरावर हिंदू धर्म शिकण्यासाठी जो अभ्यासक्रम आहे, त्यात लोंटारचा अंतर्भाव आहे. कौशल्यपूर्ण सुंदर हस्ताक्षरातील लोंतार लेखन बघून आम्ही थकित झालो. प्रथम पामपत्रांवर अक्षरे कोरायची आणि नंतर त्यात शाई भरायची… निष्कलंक लेखन! थक्क करणारा हा अनुभव होता. प्रत्येक विद्यार्थ्याला धार्मिक धडे लोंतारवर लिहावे लागतात. आयुष्याभरासाठी त्याने गिरवलेले धडे जपून ठेवायचे असतात. त्याच्यासाठी हे अत्यंत पवित्र असते. धार्मिक पूजापाठ करताना, प्रत्येकाला त्याने लिहिलेल्या व जपून ठेवलेल्या लोंतारमधून वाचायचे असते; इतरांसारखे छापील पुस्तकातून नाही.
रामायण काकविन (बालीमधील रामायण ग्रंथ) प्रत्येक कुटुंबासाठी बहुमूल्य असते. कुटुंबातील एखाद्या सदस्याने लोंतारवर रामायण लिहून त्याला पवित्र दर्जा देऊन जतन केले जाते. रामायणाचा पाठ करताना त्याचा उपयोग करण्यात येतो. मी स्वत:लाच विचारले, आम्हा भारतीयांना ताडपत्रावरील लेखनकौशल्य प्राप्त करण्याची संधी आमच्या देशात का नाही?
ध्वनिप्रदूषणाच्या बाबतीत कदाचित आम्ही सर्वाधिक आवाज करणारा देश असू; परंतु बालीमध्ये कमीतकमी ध्वनिप्रदूषण आहे. भेट देणार्‍याला हा अनुभव येतो. बालीमधील हिंदू समाज एक सण संपूर्ण शांततेत साजरा करतात- नायएपी दिन. या दिवशी हवाई वाहतुकीसह कुठलीच रहदारी नसते. कार्यालये नसतात. काम नसते. वाहने नसतात. टीव्ही नसतो. करमणूक नसते. रस्त्यांवर अत्यावश्यक अशी कमीतकमी वाहतूक असते. गेल्या वर्षभरात आपण काय काय केले, तसेच येणार्‍या वर्षात काय करायचे आहे, याचे नियोजन करण्यात प्रत्येक जण व्यग्र असतो. घरी बसून आणि अत्यंत शांततेत. अर्थातच, इष्टदेवतेची मौन पूजा करून. भारतातील कुणालाही हे सर्व अविश्‍वसनीयच वाटेल.
त्रिकाल संध्या, बालीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. ते बघणे आपण चुकवायला नको. प्रत्येक विद्यार्थी, अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून, त्रिकालसंध्या करतो आणि दिवसातून तीनदा गायत्री मंत्राचा जप करतो. बालीमधील बरीचशी आकाशवाणी केंद्र दिवसांतून तीन वेळा त्रिकाल संध्येचे प्रक्षेपण करतात.
रस्त्यावरील अपघातात तरुण मुलगा गमविलेल्या एक कुटुंबाला भेट देण्यासाठी आम्ही गेलो होतो. शोकमग्न वातावरणातही, अन्त्यक्रियेसाठी केलेली सजावट उच्च दर्जाची होती आणि त्या संपूर्ण दिवसांत मोठ्या प्रमाणात नातलग तसेच मित्र एकत्र येत होते. मृतदेह एका स्थानिक वनस्पतीच्या रसाने लेपलेला होता. यामुळे देह सडणे थांबते. मृतदेह रथासारख्या एका लाकडी गाडीत जपून ठेवला होता. या सुंदर रथासह अन्त्यविधी करण्यात येतात. संपूर्ण गाव किंवा शहर अन्त्ययात्रेत सहभागी होऊन त्या कुटुंबाचे दु:ख हलके करण्यासाठी त्यांचे सांत्वन करते. बाली देशातील मृत्यू, एक रमणीय उत्सव असतो. कुणाला आवडणार नाही, पण माझ्या मनात आलेला हा विचार मी झटकू शकलो नाही.
अनेक शतकांपासून बालीमधील हिंदू धर्म, बौद्ध धर्म आणि बालियागा नावाचा बालींचा पारंपरिक संप्रदाय समरसतेने एकत्र राहात आहेत. अगदी हिंदुपूर्व, बौद्धपूर्व काळापासून. आध्यात्मिक अनुभवांची देवाणघेवाण करीत इतरांच्या उत्सवांमध्ये ते सहभागी होत असतात. शैवपंथ आणि बौद्धपंथ एकत्र राहतात. कुठलाही संघर्ष किंवा कुरबुरीशिवाय. इतर समाजालाही असे राहायला आवडेल.
असे असले तरी, आजचे बाली लोकसंख्येच्या परिवर्तनामुळे काळजीत आहे. एका दशकात बाली येथील हिंदूंची संख्या ९४ टक्क्यांहून ८४ टक्क्यांवर आली आहे. बाली येथील हिंदू विचारवंत ही चिंता स्पष्ट शब्दांत व्यक्त करतात. जगात सर्वात जास्त पसंतीचे पर्यटन स्थळ म्हणून बाली प्रसिद्ध आहे. येथील रमणीय समुद्रकिनारे, विविध फुलांनी नटलेले नैसर्गिक हिरवेगार वनराईंचे गालीचे, वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचना असलेली येथील घरे आणि सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, हसमुख चेहर्‍याचे व आदरातिथ्यात प्रवीण असलेले बाली लोक… यामुळे जगभरातील पर्यटक इथे आकर्षित होतात. त्यामुळे इंडोनेशियाच्या इतर भागातील गुंतवणूकदार बालीमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असतात आणि म्हणून अधिकाधिक मुसलमान इथे स्थायिक होत आहेत आणि बालीतील लोकसंख्येचे गुणोत्तर बदलवीत आहेत. याची येथील लोकांना सर्वाधिक चिंता आहे. बाली येथील हिंदूंपुढे आज जे आव्हान आहे ते म्हणजे, त्यांच्या पूर्वजांपासून आतापर्यंत त्यांनी इथल्या ज्या परंपरा अतिशय निष्ठेने जपल्या, त्यांचे संरक्षण कसे करावे?
बाली येथील हिंदू समाज, प्रचंड अंतर्गत आव्हानेदेखील झेलीत आहे, हे नाकारता येणार नाही. काही दुष्ट प्रवृत्ती खुद्द बाली हिंदू समाजातूनच वर येत आहेत. हा समाज, बाली बेटांवर शतकानुशकते एकत्र राहात आला आहे आणि आतापर्यंत सुप्त असलेले काही अंतर्गत मतभेद डोके वर काढू लागले आहेत. बाह्य शक्तींना दूर ठेवण्यासाठी हा समाज त्वेषाने लढत आहे, त्यांच्या श्रद्धा आणि परंपरांचे रक्षण करीत आहे आणि इतके दिवस ते त्यात यशस्वीही झाले आहेत. असे असले, तरी एखाद्या कट्टर संप्रदायाभिमान्यांप्रमाणे धार्मिक कर्मकांड, धार्मिक विधी तसेच संप्रदाय यांवर आधारित मतभेद या समाजाला विभाजित करीत आहेत. गौरवशाली भविष्यासाठी या समाजाला अशा सर्व मतभेदांच्या वर उठावे लागेल. बाली लोकांचा हिंदू धर्म म्हणजे एक अमूल्य परंपरा आहे आणि या बेटावरील राज्याने ती कधीही गमविता कामा नये. बालीने हे गमविले तर तो मानवतेचा पराभव असेल.
मला इथे हे सांगायला अजीबात संकोच नाही की, बरेचदा भारतातील हिंदूंशी होत असलेला संवाद, बालीनिवासी हिंदूंना चिंताग्रस्त करणारा असतो. जरा थोडे स्पष्टच बोलतो. भारतातील विविध धार्मिक संघटना आणि संप्रदाय, बालीच्या हिंदू धर्माला समजून न घेता, वेगवेगळ्या प्रकारे मतप्रदर्शन करीत असतात आणि येथील लोकांनी ‘आमच्यासारखे’ व्हावे म्हणून सुधारणा सुचविण्याच्या प्रयत्नात असतात. बाली हिंदूंना अनुभवायला येणारा हा एक प्रकारचा धोकाच आहे. भारतातील हिंदूंनी समजून घ्यायला हवे की, धार्मिक कर्मकांडाचा भाग हा अगदी वरवरचा आहे आणि त्याचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न, त्यांना जवळ तर आणणार नाहीच, उलट बाली हिंदू भारतीयांपासून दूर जातील. त्यांच्या परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी बाली हिंदूंनी जे शौर्य व धैर्य दाखविले, त्याची आम्ही जाण ठेवली, प्रशंसा केली, तर त्याने या समाजाला प्रोत्साहन मिळेल आणि ते भारताच्या जवळ येतील. मला असे ठाम वाटते की, बालीला भारतीय हिंदू समाजाचे हेच एकमेव योगदान असेल. कदाचित, भारतीय परंपरा, बाली हिंदूंवर थोपविण्याचा प्रयत्न केला तर तेथील परंपरांचे सर्वात जास्त नुकसान होईल.
बालीला भेट देणार्‍या भारतीय पर्यटकांनी बालीला जाण्यापूर्वी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. नागपूर येथे मुख्य कार्यालय असलेल्या इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडिज या संस्थेमुळे बाली समाजातील ग्रामीण, शेतकरी, कोळी, विद्यार्थी, प्राध्यापक, हॉटेल व्यवसायी, राजकीय नेते, डॉक्टर्स, अभियंते इत्यादी विविध घटकांशी संवाद साधण्याची मला संधी मिळाली. या संस्थेने बाली येथील दोन विद्यापीठांमध्ये दोन शैक्षणिक अध्यासने स्थापन केली आहेत. एक विद्यापीठ खाजगी आहे, तर दुसरे सरकारी. तेथे अभ्यासाचे दोन विषय म्हणजे संस्कृत व आयुर्वेद. बाली हिंदूंशी संवाद व संपर्काची घनता गेल्या पंधरा वर्षांपासून सतत वाढत आहे. बालीला एकदा तरी भेट द्या. त्यांना शिकविण्यासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी.

शेअर करा

Posted by on Nov 22 2016. Filed under उपलेख, श्याम परांडे, संपादकीय, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उपलेख, श्याम परांडे, संपादकीय, स्तंभलेखक (1515 of 1622 articles)


इंदोर-पाटणा एक्सप्रेसचे १४ डबे रुळावरून घसरून जो भीषण अपघात घडला, त्यात ११५ पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत ...