ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » भारत-अमेरिका संबंध…

भारत-अमेरिका संबंध…

आंतरराष्ट्रीय संबंधांचे सगळे संदर्भ वरचेवर बदलत चालले आहेत. एकेकाळी जगात कोणत्याही आंतरराष्ट्रीय संबंधांना संयुक्त अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा संदर्भ लावला जात असे. मात्र, जागतिकीकरणानंतर रणांगणातील युद्धापेक्षा बाजारपेठांमधील युद्धाचीच चर्चा जास्त जोरात चालू झाली आहे. सोव्हिएत रशियाच्या विभाजनानंतर शीतयुद्ध जवळजवळ संपले. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतर अमेरिकेेला, दहशतवादाचे आव्हान सार्‍या जगासमोर असल्याचा साक्षात्कार झाला! तालिबानवर कारवाई करण्यापूर्वी अमेरिकेने जागतिक समुदायाचे दहशतवादाच्या विरोधात सामूहिक मत तयार करण्याला सुरुवात केली, तेव्हा रशियाचे अध्यक्ष पुतीन, अमेरिकेची वकिली करत जगातील काही देशांना भेटी देताना जगाने पाहिले आहेत. इस्लामिक दहशतवादाचे आव्हान भारताला भेडसावत असताना, जगाला या दहशतवादाची झळ अजून लागलेली नव्हती. अमेरिकेसारखे देश भारतातील दहशतवादी कारवायांकडे पाहताना, त्यांना सोयीचा असणारा आशिया खंडातील दोन देशांतील एक खेळ, असे त्याकडे पाहात होते. पाकिस्तान आणि भारत दोघांनाही न दुखावता मोघम विधाने करत झुलवीत होते. मात्र, अमेरिकेला दहशतवादाचा दणका बसला आणि दहशतवादाकडे पाहण्याच्या जागतिक दृष्टिकोनाला एक कलाटणी मिळाली. इस्लामिक दहशतवादाचा झोत सद्दाम हुसैन, ओसामा बिन लादेन आणि आता आयएसआयएस अशा पद्धतीने बदलत गेला, तसे तसे या दहशतवादाचे स्वरूप आणि त्यामुळे ग्रस्त होणार्‍या जगातील देशांची व्याप्ती विस्तारतच गेली आहे. नेमक्या याच काळात जगातील इस्लामिक दहशतवादाच्या विरोधात तात्त्विकदृष्ट्या आणि प्रात्यक्षिक पातळीवर संघर्ष करणारी राजकीय शक्ती भारतात सत्तारूढ झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी इस्लामिक दहशतवादाच्या विरोधात लढण्याचा भारताचा आणि विशेषत: मोदी ज्या चळवळीचे नेतृत्व करत आहेत त्या चळवळीचा दृष्टिकोन प्रार्थनापद्धतीच्या विरोधाशी निगडित नाही, तर प्रार्थनापद्धतीच्या अतिरेकी आग्रहाच्या विरोधाशी निगडित आहे, हे जगाला पटवून देण्यात वरचेवर यशस्वी होत चालले आहेत. प्रार्थनापद्धतीच्या अतिरेकी आग्रहाला विरोध करताना भारतातील मोठ्या समुदायाचा दृष्टिकोन आपल्या एकाच एक उपासनापद्धतीचा तसाच अतिरेकी प्रचार करण्याशी काहीएक संबंध नाही, तर मानवतेच्या कल्याणाशी, प्रत्येकाच्या जगण्याच्या हक्काशी, प्रत्येकाच्या उपासनेच्या किंवा उपासना न करण्याच्याही स्वातंत्र्याशी निगडित असा हा सहिष्णू दृष्टिकोन आहे, ही भारतीय तत्त्वज्ञानाची मूळ बैठक जगासमोर आग्रहाने, शब्दाने आणि कृतीनेही मांडण्यात मोदी सरकार वरचेवर यशस्वी होत चालले आहे. अर्थात, या यशामागे जगाच्या कल्याणाचा निखळ आणि शुद्ध अस्सल भारतीय विचार, हे एक मोठे कारण आहे; तसेच कोणताही विचार पटवून देण्यासाठी त्या विचारामागे संघटित शक्तीचे सामर्थ्य असावे लागते. हे सामर्थ्य भारतीय जनतेने स्पष्ट बहुमत देत २०१४ साली नरेंद्र मोदी यांच्या मागे उभे केले, हे मोठे कारण आहे. त्यानंतर मोदी यांनी भारतातून जगाच्या कानाकोपर्‍यात जाऊन आपल्या गुणवत्तेच्या जोरावर ठसा निर्माण करणारे जे भारतीय आहेत, त्यांच्यामध्ये जाणिवेचे एक स्फुरण निर्माण केले. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर परदेशातील त्यांच्या दौर्‍यांवर सवंग टीका करण्यापर्यंत विरोधकांची मजल गेली. प्रत्येक दौर्‍यात अमेरिकेच्या मेडिसन स्क्वेअरपासून ते दुबईपर्यंत तेथे असलेल्या भारतीयांनी ‘‘मोऽदीऽऽऽ मोऽदीऽऽऽ’’ असे नारे लावत, भारतीय विचारांच्या या प्रवक्त्यामागे सद्भावनेची जी ताकद उभी केली, त्यामुळे मोदी आणि मोदी सरकार यांच्या भूमिकेचे महत्त्व जगाच्या लेखी काही पटीने वाढले आहे. मोदी यांनी आंतरराष्ट्रीय संबंधातील भारताची भूमिका, एकशेवीस कोटींची बाजारपेठ किंवा शांततेचे पाठ सांगणारा देश किंवा आगामी काळातील दुर्लक्ष न करण्याजोगी एक सामरिक शक्ती, इतकीच मर्यादित ठेवली नाही. त्याच्याही पुढे जाऊन ‘आंतरराष्ट्रीय योगदिवसा’सारखा विषय जगासमोर मांडला आणि जगाला देण्यासारखे भारताकडे आणखीही काही आहे, हे जगाच्या नजरेत आणले. भारतीय उपखंडातील देशांना शपथविधीपासून महत्त्व देऊन, या देशांत दौरे करून, या देशांना अंतराळातील भारतीय कौशल्याचा लाभ मिळवून देत भारताला आशियाई देशांचे नव्हे, तर या देशातील जनतेचेही नेतृत्व करणारी ताकद, अशा स्वरूपात जगासमोर स्थापित केले आहे. या सर्व पृष्ठभूमीवर, संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीकरिता जाताना भारताने त्याला जोडून भारत-अमेरिका संबंध दृढ होण्यासाठी एक कार्यक्रम आखला. त्याचा पहिला टप्पा, गतकाळात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी आणि भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यातील बैठकीच्या रूपाने यशस्वी रीत्या पार पडला. भारतातील पाक-प्रायोजित दहशतवादाच्या नावाने गळे काढत अमेरिकेशी चर्चा करणे, एवढेच भारत-अमेरिका संबंधाचे रूप जगासमोर मनमोहन सिंग सरकार असताना पुढे येत असे. पहिल्यांदा भारत-अमेरिका संबंधाला याशिवाय अनेक अन्य आयाम जोडले गेले आहेत. भारत-अमेरिका यांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत धोरणात्मक आणि व्यापारविषयक चर्चा झाली होती. दहशतवादाच्या विरोधातला लढा अधिक तीव्र आणि परिणामकारक करण्याचे एक कलम तर अनिवार्य आहे. भारत आणि पाकिस्तान दोघांनाही मोघम शांततेचे उपदेश करण्याच्या एक पाऊल पुढे जात, पाकिस्तानच्या पदराआडून भारताच्या विरोधात अतिरेकी कारवाया करणारे दाऊद इब्राहिम, हाफिज सईद आणि लखवी यांचा बंदोबस्त करण्यासाठी कार्यक्रम आखण्यापर्यंत विषय पुढे नेऊन ठेवला आहे. भारत-अमेरिका यांच्यात मागे एकदा झालेल्या संयुक्त बैठकीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात, भविष्यात परस्पर व्यापारीसंबंधांमध्ये शंभर अब्ज डॉलर्सपासून पाचपटीने वाढ करत, भविष्यात हा व्यापार पाचशे कोटी अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याची घोषणा करण्यात आली होती, हे थोडके नव्हे! इतक्या बारीक तपशिलात आणि इतक्या स्पष्टपणे अमेरिकेने पाकिस्तानविरोधात भूमिका मांडणे, हे भारतीय मुत्सद्देगिरीचे खरे यश म्हटले पाहिजे! भारताचे परराष्ट्रधोरण केवळ जागतिक मुत्सद्देगिरीपुरते े मर्यादित नसून भारताला या संबंधांचा व्यापार, ऊर्जा या विकासाच्या प्रक्रियेमध्ये कसा उपयोग करून घेता येईल, याचाही उद्देश त्यामागे आहे, हे स्पष्ट झाले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायम सदस्यत्व देण्याचा विषय आगामी काळातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यक्रमपत्रिकेवरचा प्रमुख विषय राहिला पाहिजे, यासाठी भारताचा आग्रह कायम आहे. या पृष्ठभूमीवर, भारताचे जगातील वाढत चाललेले महत्त्व, मोदी यांचे आंतरराष्ट्रीय संबंधातील योगदान, भविष्यात भारताला अधिक सुरक्षित आणि अधिक समृद्ध करण्याकडे चाललेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत…

https://tarunbharat.org/?p=62161
Posted by : | on : 18 Sep 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (242 of 737 articles)


कल्याणकर | ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरण काही कारण नसताना संसदेत पोहोचवून संसदेचं कामकाज ठप्प करणं, हा काँग्रेसचा शुद्ध स्वघातक कांगावा होता, ...

×