ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » मंदिरनिर्मितीच्या प्रतिज्ञेची पूर्तीच हवी!

मंदिरनिर्मितीच्या प्रतिज्ञेची पूर्तीच हवी!

अयोध्येतील रामजन्मभूमीवर भव्य मंदिर व्हावे, ही भारतातील हिंदू समाजाचीच नव्हे, तर या देशावर, या देशातील मातीवर, या देशाच्या संस्कृतीवर, या देशाच्या परंपरांवर प्रेम करणार्‍या प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाची भावना आहे. त्याच भावनेला हात घालत, सोरटी सोमनाथप्रमाणेच राममंदिराचे लोकार्पण व्हावे, असे प्रतिपादन करून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह डॉ. मनमोहनजी वैद्य यांनी ठाणे येथील अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने, केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारला याची जाणीव करून दिली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या चार वर्षांत अयोध्या विवादाबाबत हिंदूंच्या बाजूचा निर्णय येणे अपेक्षित होते. पण, न्यायालयीन प्रक्रियेच्या चालढकलीमुळे ना अयोध्येत मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे, ना ती वादग्रस्त जमीन रामजन्मभूमी आंदोलन समितीच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया पूर्ण होताना दिसत आहे. रामभक्त जनता मात्र रामजन्मभूमीवर भव्य मंदिर उभारण्यासाठी आसुसलेली आहे. न्यायालयाचा निर्णय येण्याचीच वाट, की मंदिर उभारणीचे काम प्रारंभ होण्यास क्षणाचाही विलंब होणार नाही! जनतेच्या मनातील ही खदखदच डॉ. वैद्य यांनी माध्यमांपुढे मांडून एका अर्थी संघाचीच भूमिका विशद केली आहे. चार वर्षांत मोदी सरकारने अनेक कामे केलीत. जमेच्या अशा अनेक बाबी सांगता येतील. आर्थिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र अथवा कुठलेही अन्य क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रात काही ना काही महत्त्वाचे निर्णय झाले असून, त्याचे दूरगामी परिणाम येत्या काळात दिसणार आहेत. अल्पावधीत जनताजनार्दनाला लाभ देणारेही अनेक निर्णय झाले आहेत. पण, या निर्णयांसोबतच रामजन्मभूमीवर भव्य मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा होणे गरजेचे होते. तसे आश्‍वासन भारतीय जनता पक्षाने निवडणूक जाहीरनाम्यातही दिले आहे. अयोध्येत रामजन्मभूमीवर मंदिर होते, ही बाब लपून राहिलेली नाही. न्यायालयाने जरी ही बाब निकाली लावली नसली, तरी भारतीय पुरातत्त्व विभागाने त्या जागेवरील हिंदू मंदिरांच्या पुराव्यांवर शिक्कामोर्तब केलेले आहे. मंदिर पाडून मशीद उभारण्यात आल्याचेही स्पष्ट केले आहे. बाबराचा सेनापती मीर बाकीने ज्या वेळी पहिल्यांदा अयोध्येतील रामजन्मभूमीवरील मंदिराचा विध्वंस करून तेथे बाबरी ढाचा उभारला, तेव्हापासूनच अयोध्या अस्वस्थ आहे. हिंदू मने प्रक्षुब्ध आहेत. त्या वेळी हिंंंदू समाजाची प्रतिकारक्षमता नसेलही, उठाव करण्यासाठी योग्य ते वातावरण नसेलही, पण तेव्हापासून आजतागायत या जागेवर ताबा मिळविण्यासाठी हिंदूंचे प्रयत्न सुरू आहेत. वेळोवेळी निरनिराळ्या राजा-महाराजांनी लढे उभारून ही जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केल्याचे भारताचा इतिहास सांगतो. या लढ्यांमध्ये हिंदूंनी केलेल्या बलिदानांनी इतिहासाच्या पुस्तकांची पाने भरलेली दिसतात. बाबराचा अयोध्येतील मंदिराचा विध्वंस करणे, यामागचा उद्देशच मुळी या देशाची संस्कृती नष्ट करण्याचा होता! अयोध्येत सर्वत्र इतकी मोठी जागा असताना, बाबराने राममंदिराच्या जागेवरच मशीद उभारण्याच्या घेतलेल्या निर्णयामागे हिंदूद्वेष हेच कारण होते. या देशातील मंदिरे नष्ट केली गेली, येथील लोकांच्या आस्थांना तडे दिले की, आपोआपच येथील लोक धर्मांतराला बळी पडतील, अशी भावना त्या वेळी मुस्लिम शासकांची होती. मुळात बाबराचे आणि या देशातील नागरिकांचे काही नाते असण्याचे कारण नाही. पण, देशातील काही मुस्लिम संघटनांना बाबराचा पुळका आला आहे. बाबरी मशीद पाडून रामजन्मभूमीवर मंदिर उभारणे म्हणजे मुस्लिमांची नाचक्की होणे, असा समज त्यांनी करून घेतलेला आहे. मुस्लिम समाज अयोध्येची वादग्रस्त जागा कदापि हिंदूंना सोपवणार नाही, अशी भूमिका ते वारंवार घेत असून, प्रसंगी त्यांची टोकाची भूमिका घेण्याचीही तयारी आहे. १९९४ मध्ये केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारने, अयोध्येतील वादग्रस्त जागेवर मंदिरच असल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्यास आम्ही तिथे पुन्हा एकदा मंदिर उभारू, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे न्यायालयाने तसा निर्वाळा दिल्यास या पक्षाचा विरोध मावळू शकतो. मंदिर निर्माणाबाबतचे संघर्ष आपल्या देशात कमी का झाले? पण त्यावर तोडगे निघाले. कधी आपसी चर्चेतून, तर कधी न्यायालयीन निर्णयातून अशा समस्या मार्गी लागल्या. राममंदिराबाबतही तसाच निर्णय अपेक्षित आहे. सोरटी सोमनाथचेच उदाहरण बघा ना! भारत स्वतंत्र झाल्यावर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने सोरटी सोमनाथ येथील शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण झाले होते. ही बाब पुरेशी बोलकी आहे. याच धर्तीवर अयोध्येतील वादग्रस्त जमीन अधिग्रहित करून, तेथे भव्य राममंदिराची उभारणी होण्याची गरज डॉ. मनमोहनजी वैद्य यांनी प्रतिपादित केली आहे. न्यायालयाच्या पायर्‍या चढलेल्या या प्रश्‍नामुळे देश ढवळून निघत आहे. एमआयएमचे नेते असदुद्दिन ओवैसी यांचे याबतचे विचार मात्र विखारी आणि कुत्र्याच्या वाकड्या शेपटीप्रमाणे आहेत. अयोध्येतील भूमी हिंदूंना सोपविण्याची मागणी होत असताना, त्यांचा तसे करण्यास विरोध आहे. ते तर रामाचे अस्तित्वच मान्य करण्यास तयार नाहीत. या देशावर हिंदूंप्रमाणेच मुस्लिमांचाही हक्क असल्याचा त्यांचा दावा असला, तरी कर्तव्याबाबत आपण किती जागरूक आहोत, याचे उत्तर त्यांनीच द्यायला हवे. निवडणुका येताच अशा बातम्या माध्यमांकडे कोण पोहोचवतो, याची कारणमीमांसा केली जायला हवी. वारंवार चिथावणीखोर भाषणे देऊन ओवैसी यांना मुस्लिम समाजाची मते हवी आहेत. पण, या बोलघेवड्या नेत्याने एका बाबीची नोंद घेणे गरजेचे आहे. हिंदूंना येथील मुसलमानांना भारतातून घालवायचे नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आपसी सौहार्दाने हा समाज राहिला, तर येथील लोक मुस्लिम नेत्यांनाही डोक्यावर घेऊन नाचतात, ही बाब आता लपण्यासारखी राहिलेली नाही. त्यामुळे मुस्लिमांनीच पुढाकार घेऊन ही जागा हिंदूंच्या ताब्यात देणे आणि मशिदीसाठी अयोध्येच्या जवळपासची जमीन पदरात पाडून घेण्याची गरज आहे. अनेक शिया नेत्यांनी तर तेथे नमाजच पढला जात नसल्याने बाबरी ढाच्याचे औचित्यच मान्य करण्यास नकार दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर, अयोध्येसाठी झगडणार्‍यांनी त्यांना संघर्ष हवा की तोडगा, हे जगजाहीर करायला हवे. वादग्रस्त जागेवरील हक्क सोडून, कुठेतरी जवळपासच भव्य मशीद उभारल्यास मुस्लिमांना, हिंदू समुदायाकडून निश्‍चितच साधुवाद मिळाल्याशिवाय राहायचा नाही. मंदिर उभारणीचे कार्य सुरू होणे हे मोदी सरकारसाठीही गरजेचे आहे. लक्षावधी हिंदू मतदारांचे आशीर्वाद मिळवायचे असतील, तर जी प्रतिज्ञा म्हणून मंदिरनिर्मितीचे कंकण बांधले, त्या प्रतिज्ञेची पूर्ती करण्याची वेळ आलेली आहे, एवढे निश्‍चित!

https://tarunbharat.org/?p=66917
Posted by : | on : 2 Nov 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (33 of 727 articles)


वैद्य | घटनात्मक अधिकार आणि धार्मिक अधिकार यांच्यात संघर्ष निर्माण झाल्यावर त्यातून मार्ग कसा काढायचा, असा प्रश्‍न केंद्रीय अर्थमंत्री अरुण ...

×