ads
ads
भारत-पाक चर्चा रद्द

भारत-पाक चर्चा रद्द

►इम्रान सरकारचाही खरा चेहरा दिसला ►भारताचा स्पष्ट आरोप, वृत्तसंस्था…

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

►अमित शाह यांचा आरोप, वृत्तसंस्था रायपूर, २१ सप्टेंबर –…

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

►भारतीय जवानांची मोठी कामगिरी, वृत्तसंस्था श्रीनगर, २१ सप्टेंबर –…

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

इस्लामाबाद, २० सप्टेंबर – आम्ही दहशतवादाचे पाठीराखे नाहीत, असा…

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

►पाकने उपलब्ध केली सुरक्षित भूमी ►अमेरिकेची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

वृत्तसंस्था मुंबई, २१ सप्टेंबर – मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील…

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

►सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, तभा वृत्तसेवा मुंबई, २० सप्टेंबर…

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

तभा वृत्तसेवा – मुंबई, २० सप्टेंबर राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:21
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » मग न्यायाधीशांसाठी तरी का उभे राहायचे?

मग न्यायाधीशांसाठी तरी का उभे राहायचे?

जर एखाद्या चित्रपटगृहात राष्ट्रगीताची धून सुरू असताना लोकांनी उठून उभं राहण्याची सक्ती करायची नसेल, तर मग कोर्टात न्यायाधीशांचे आगमन झाल्यावर तरी का उभं राहायचं लोकांनी? देईल कुणी या प्रश्‍नाचं उत्तर? खरं तर हा, प्रचलित पराभूत व्यवस्थेचा परिपाक आहे, की लोक ऊठसूठ न्यायालयात धाव घेऊन वेगवेगळ्या गोष्टींवर दाद मागू लागले आहेत अलीकडे. त्यामुळे लोकांच्या वैयक्तिक जीवनापासून तर सामाजिक आशयाच्या मुद्यांपर्यंत, सर्वदूर न्यायालयेच ठरवू लागली आहेत कोणी कसं वागायचं ते. रिकामटवळे लोक कुठलाही मुद्दा घेऊन न्यायालयात जातात आणि न्यायालयेही अनेकदा स्वत:च्या कार्यकक्षेचा परीघ, त्याची व्याप्ती याचा फारसा विचार न करता, त्या मुद्यावर आपले मत नोंदवून, पुष्कळदा तर थेट निकाल देऊन मोकळे होतात. त्यामुळे लोकनिर्वाचित सरकारनं कामं कशी करायची, हेही न्यायालयच सांगू लागले आहे अन् लोकांनी त्यांच्या घरात कसं राहायचं, त्यांनी एकमेकांशी वागायचं, हेही न्यायालयच ठरवू लागले आहे. चित्रपटगृहात चित्रपटाच्या सुरुवातीला वाजविली जाणारी राष्ट्रगीताची धून, हेही एक असेच, म्हटलं तर वादग्रस्त प्रकरण. मुळात अशी धून चित्रपटगृहात वाजविण्याची गरज काय, इथपासूनचा मुद्दा इथे सखोल चर्चेचा ठरू शकतो. पण, आता एकदा ती धून चित्रपटगृहात वाजवायचीच असं ठरलंय् म्हटल्यावर त्या वेळी उठून जागेवर उभे राहण्याबाबत कसली आलीय् चर्चा? अन् न्यायालयाने तरी कशाला लक्ष घालायचं अन् काय निर्णय द्यायचा त्यात? पण, जगातल्या सर्वच गोष्टी ठरविण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त असल्याच्या गैरसमजातून कुणी वागत असेल आणि आपल्याला प्राप्त असलेल्या अधिकारांच्या मर्यादांचे भान जपण्याचीही गरज इथे कुणाला वाटत नसेल, तर मग समजूतदारीच्या चार गोष्टी कोण, कोणाला अन् काय सांगणार? राष्ट्रगीत हे प्रत्येकाने, त्याच्या मनातील राष्ट्राप्रतीच्या भावना प्रकट करण्याचे जगभरातील प्रभावी माध्यम. त्यामुळे ते गीत गाताना ऊर अभिमानाने भरून यावा, भावना उंचबळून याव्यात, गीत गाताना राष्ट्राप्रतीच्या आदरभावनेने कुणी उठून उभे राहावे याबाबतचे बंधन कुणी घालून द्यायची गरज नाहीच. आपसूकच घडत जातात या सार्‍या गोष्टी. म्हणूनच मग, राष्ट्रगीताची सुरुवात झाली की माणूस जागेवर उभा राहतो. मान अभिमानाने ताठ होते, गीत संपल्यावर सॅल्यूट दिला जातो. सार्‍या बाबी आपोआप घडत जातात. ‘भारत माता की…’ एवढेही कुणी म्हटले, तरी आवळलेल्या मुठी उंच झेपावत जयजयकाराचा नारा आसमंतात गुंजायला हवाय् कुणाला इथे न्यायालयाचा आदेश? पण, सार्‍या सीमारेषा पार करून लोकांच्या खाजगी, सार्वजनिक जीवनाचे नियमनच करायला निघाली आहेत आपली न्यायालये आताशा. त्यामुळे चित्रपटगृहात राष्ट्रगीताची धून वाजविण्याची सक्ती करण्यापासून तर त्या वेळी लोकांनी उठून उभे राहिले पाहिजे हे सांगणारेही न्यायालयच आणि आता राष्ट्रगीताची धून वाजत असतानाही लोकांनी उभे राहण्याची गरज नसल्याचे सांगणारेही न्यायालयच. धून सुरू असताना आदर व्यक्त करण्यासाठी लोकांनी उठून उभे राहण्याची गरज नसल्याची उपरती केव्हा झाली बरं न्यायव्यवस्थेला? लोकं चित्रपटगृहात मनोरंजनासाठी जातात, म्हणून तिथे उभे राहण्याची सक्ती नको असे जर न्यायालयाला वाटत असेल, लोकभावनेची एवढीच दखल न्यायव्यवस्थेकडून घेतली जाणार असेल, तर मग चित्रपटगृहात धून वाजविण्याची सक्तीतरी कशासाठी? न्यायालयाच्या आदेशावरून गेले कित्येक दिवस प्रत्येक चित्रपटगृहात राष्ट्रगीताची धून वाजविली जात आहे. बहुतांश लोक त्या वेळी उठून उभे राहतात. काही निलाजर्‍या नतद्रष्टांना मात्र तेवढीही तसदी घ्यावीशी वाटत नाही. इतर लोक उभे असले तरी ते आपले बसलेलेच असतात जागेवर. ढिम्म. इतरांना मूर्खात काढत. ते नेमके कोण असतात, हे वेगळ्याने सांगायचीही आता गरज उरलेली नाही, इतके जगजाहीर झाले आहे आता ते. साहजिकच संताप होतो अशा वेळी बाकीच्यांचा. मग कधी नुसते खडे बोल सुनावून, तर कधी चांगला चोप देऊन अशांना धडा शिकवण्याचा प्रकार घडतो. त्यातून वाद उद्भवतात. हा प्रकार घडतो तो लोकांच्या स्तरावर. या देशातल्या सामान्यातल्या सामान्य माणसालाही जर कळते, की राष्ट्रगीत सुरू असताना उभं राहिलं पाहिजे, तर मग न्यायालयाचे हे घूमजाव तरी कशासाठी अन् नेमक्या कुणासाठी? हो! राष्ट्रगीत सुरू असताना आपण उठून उभे राहिले पाहिजे, हे सांगायलाही न्यायालयाची गरज पडावी इतकी काही भीषण अवस्था निर्माण झालेली नाहीय्, या देशात अद्याप. हां! उभे राहायची गरज नाही, हे सांगायला मात्र न्यायव्यवस्थेची निश्‍चितच गरज आहे! अन्यथा, कुणासाठी जारी झालाय् हा ‘लोकप्रिय’ आदेश? जे लोक राष्ट्रगीताची धून सुरू झाली की उत्सफूर्तपणे उभे राहतात त्यांच्यासाठी, की ज्यांना धून सुरू असतानाही उठून उभे राहावेसे वाटत नाही, त्यांच्यासाठी? खुद्द न्यायालयाच्या आदेशानेच वाजविल्या जाणार्‍या राष्ट्रगीताच्या वेळीही आदर व्यक्त करण्याकरिता लोकांनी उभे राहण्याची गरज का नाही, याचेही स्पष्टीकरण न्यायव्यवस्थेकडे उपलब्ध असेल, तर मग चित्रपटगृहातून ही धूनच बाद करण्याचीही अनेक कारणे लोकांकडेही उपलब्ध आहेत. धून सुरू असताना उभे राहिल्यानेच राष्ट्रभक्ती सिद्ध होत नसल्याचा, त्या वेळी बसून राहणार्‍या लोकांच्या मनातील राष्ट्रभक्तीची भावना कमी असल्याचा निष्कर्षही काढता येणार नसल्याचा, ‘समजूतदारपणा’ दाखवण्याइतपत न्यायव्यवस्था प्रगल्भ झाली असेल, तर मग कोर्टात न्यायाधीशांचा प्रवेश होतो, तेव्हातरी लोकांनी का म्हणून उठून उभे राहायचे, हेही स्पष्ट व्हावेच एकदा. आदर व्यक्त करण्यासाठी? पण, ज्याची राष्ट्रगीताच्या वेळीही गरज नाही, असे खुद्द न्यायालयाचेच म्हणणे आहे, त्याची गरज न्यायाधीशांच्या आगमनाच्या वेळी तरी का पडावी? तसेही, बसून राहिल्याने मनातला अनादर काही सिद्ध होत नाहीच. हो ना? कारण नसताना, स्वत:च असले निर्णय द्यायचे आणि मग हसे झाले की स्वत:च त्यातून अशी आडमार्गाने माघार घ्यायची? राष्ट्रगीताची धून वाजविण्याची सक्ती करण्याची ताकद असलेल्या न्यायव्यवस्थेला, हे ठणकावून का सांगता आले नाही या देशातील तमाम जनतेला, की हो! राष्ट्रगीत सुरू असेल, तेव्हा उभे राहिलेच पाहिजे प्रत्येकाने. पण, यासाठीही न्यायालयीन आदेशाची सवलत अपेक्षिणार्‍यांच्या मानसिकतेची वासलात लावायचे सोडून ती टुकार मानसिकता कुरवाळत बसण्याची गरज राजकारण्यांना वाटत असेल, तर एकवेळ समजताही येईल, पण न्यायालयांना केव्हापासून भासू लागली ती गरज? तसे नसेल, तर मग कुणाचीतरी बूज राखण्यासाठी असले कथित ‘लोकप्रिय’ निर्णय घेण्याची वेळ सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर का यावी? धून वाजविण्याची सक्तीही करायची अन् ‘काही’ लोकांचे बेदरकार वागणे ध्यानात घेऊन उभे न राहण्याची त्यांच्यासाठीची सवलतही मान्य करायची, हे राजकारण झाले, न्याय थोडीच झाला! बहुधा म्हणूनच मग, या संदर्भात लोकांच्या मनात उमटलेल्या संतप्त सवालाचे उत्तर गवसत नाहीत कुठेच. अगदी न्यायाधीशांच्या कृतीतूनही…

http://tarunbharat.org/?p=37693
Posted by : | on : Oct 26 2017
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

1 Responses to

मग न्यायाधीशांसाठी तरी का उभे राहायचे?

  1. SAMB Reply

    26 Oct 2017 at 6:30 pm

    YES,COURT SHOULD NOT DICIDE SUCH THINGS,GOOD ARTICLE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (632 of 860 articles)


वार्तापत्र : श्यामकांत जहागीरदार | गुप्तचर खात्याचे माजी प्रमुख दिनेश्‍वर शर्मा यांची वार्ताकार म्हणून नियुक्ती करत, जम्मू-काश्मीरची समस्या सोडवण्याच्या दृष्टीने ...

×