ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » मरणे सन्मानाने…

मरणे सन्मानाने…

अनिल बर्वे यांचे गाजलेले नाटक आहे, ‘थँक्यू मिस्टर ग्लाड!’ त्यात त्यांनी एक कविता दिली आहे-
मूत्यू… असा दबलेल्या पावलांनी येऊ नकोस
मारेकर्‍यासारखा… यायचंच असेल तर ये पण,
ज्याला त्याला साजेलसं रूप तेवढं घेऊन ये…
मरण हे अटळ आहेच, पण जो जसा जगला तसे त्याला मरण यायला हवे. आपला जन्म जसा आपल्या हातात नाही, तसे मरणही नाही. परवा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा असंच काहीसं म्हणाले. प्रत्येकाला सन्मानाने मरण्याचा अधिकार आहे. सन्मानाने जगण्याचा अधिकार तर आहेच; पण कायद्याने प्रत्येकाला सन्मानाने मरण्याचाही अधिकार दिला आहे. प्रत्येकाला सन्मानाने मरण्याचा अधिकार असल्याचा पुनरुच्चार दीपक मिश्रा यांनी केला. पुण्यात ‘बॅलन्सिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनल राइट्स’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अनिल बर्व्यांची नाटकं खूप जिवंत असायची. नेमक्या अवकाशात ते पात्राचं भावविश्‍व खूप ठळकपणे उभं करायचे. ‘ग्लाड’मध्येही वीरभूषण पटनायक या नाटकाचा नायक फाशीचा कैदी असतो. डॉक्टरही असलेला वीरभूषण महापुराच्या स्थितीत जेलर ग्लाडच्या मुलीचे बाळंतपण सुखरूप करून देतो. त्याच पहाटे त्याला फाशीही द्यायचे असते. बाळंतपण करून दिल्यावर त्याला फाशी देण्यासाठी नेत असताना जेलर ग्लाड त्याच्या छातीवर समोरून गोळ्या झाडतो अन् कोसळत असताना वीरभूषण त्याला म्हणतो, ‘थँक्यू मिस्टर ग्लाड…!’ फाशीवर लटकून मरण्यापेक्षा छातीवर गोळ्या झेलत आलेलं हे मरण वीरभूषणसारख्या क्रांतिकारकला साजेलंसं असतं… न्या. दीपक मिश्रा यांनी नेमकं तेच म्हटलेलं आहे. अर्थात, याच वर्षी १० मार्चला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वाचा अन् ऐतिहासिक निर्णय दिला आहे. इच्छा मृत्यूला (पॅसिव्ह इथुनेशिया) सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे मरणासन्न अवस्थेत असलेल्यांना इच्छा मृत्यूचा अधिकार मिळाला आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. के. सिकरी, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निकाल दिला आहे. या निर्णयाने शेवटचा श्‍वास कधी घ्यायचा, हे ठरविण्याचा अधिकार मरणासन्न व्यक्तीला मिळाला….आताही आत्महत्या हा गुन्हाच आहे. कृत्रिम श्‍वासोच्छ्वासावर एखाद्याला त्याच्या इच्छेच्या विरुद्ध ठेवणे गैरच आहे, हे न्यायालयाने मान्य केले. अरुणा शानबाग प्रकरणात इच्छामरण या विषयावर खूप मंथन झाले. या निर्णयाने तिला न्याय मिळाल्याची भावना देशभरात व्यक्त झाली. प्रत्येकच निर्णयाला दुसरी बाजू असते. कायद्यातून पळवाटा आणि त्याचा दुरुपयोग होतोच. ते रोखण्यासाठी त्या कायद्याची तटबंदी नीट असायला हवी, याचेही भान राखले गेले पाहिजे. जगात ते राखले जातेच. या निर्णयाचा दुरुपयोग होऊ नये म्हणून इच्छामरणाबाबतचे निकष ठरविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होतेच. इच्छा मृत्युपत्र मॅजिस्ट्रेटसमोरच केलं जावं. त्यासाठी दोन साक्षीदार असावेत, असं त्या वेळीच न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. त्यासाठी मरणाचेही इच्छा मृत्युपत्र करता येते. मरण मागण्याचा अधिकार केवळ त्या व्यक्तीलाच आहे. तो त्या स्थितीत नसेल तर त्याच्या नातेवाईकांनी तशी इच्छा डॉक्टरांकडे व्यक्त करायला हवी. तशी इच्छा व्यक्त झाल्यानंतर न्यायालयाच्या कक्षेतच हा निर्णय घेतला जाईल. तज्ज्ञ डॉक्टरांनी तसा निर्वाळा दिल्यावर त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. या प्रकारात त्या रुग्णाचे मरण हे जगण्याच्या यातनांपेक्षा कमी यातनामय असावे, ही अट फार महत्त्वाची आहे. ज्यांना जगणेच छळ वाटू लागले आहे अशांची मरणाने सुटका करण्यासाठी हा निर्णय आहे. त्यानंतर देशात अशी मागणी कुणी केल्याचे ऐकिवात नाही. जगातही अनेक देशांत अजूनही हा कायदा नाही. अशा बाबी धर्माच्या पातळीवरच घासून पाहिल्या जातात. जगातला कुठलाही धर्म माणसांचे जगणे सुकर आणि सुखी करण्यासाठीच असतो. धर्म जगायला सांगतो. जगण्याला ग्लानी आल्यावर परमेश्‍वर अवतार घेतो, असेही धर्मचिंतन आहेच. धर्मांमध्ये जगण्याची चिंतने आहेतच, पण मरणही अटळ आहे. त्यामुळे मरणाचीही चिंतने आहेत. स्वत:ला आणि दुसर्‍यालाही मारू नका, असेच धर्म सांगत असतात. कुठल्याही अवस्थेत मरण मागण्याचे धाडस ज्याला जगणे कळले आहे, अशीच व्यक्ती करू शकते. ऑस्ट्रेलियातील १०४ वर्षांचे शास्त्रज्ञ डेव्हिड गुडॉल यांनी गुरुवार, ११ मे २०१८ ला स्वित्झर्लंडमध्ये देहत्याग केला. ऑस्ट्रेलियात इच्छामरणाचा कायदा नाही. त्यामुळे जगण्याला आता कंटाळलोय्, असे सांगत गुडॉल हे इच्छामरणासाठी ऑस्ट्रेलियाहून स्वित्झर्लंडमध्ये गेले होते. जगणे परिपूर्ण झाले, असे ते मरणापूर्वी म्हणाले. भारतात अद्याप तसे काही झालेले नाही. तशी वेळ खरोखरीच कुणावरही येऊ नये, हेही तितकेच खरे! मात्र, मरण हे अटळ वास्तव असेल, तर आता आपण जगणे थांबवायला हवे, असे वाटणार्‍या व्यक्तीला इच्छामरणाचा अधिकार हा माणुसकीचाच आहे. खूप ज्येष्ठ व्यक्तींच्या वाट्याला जगण्याचा असा छळ येत असतो. आता केंद्र सरकारने सामान्यांसाठीही आरोग्य योजना सुरू केली आहे. सुदृढ आरोग्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र, आर्थिक स्थिती चांगली असूनही एका ठिकाणी सगळेच कसे थांबत असते. मागे यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकरी दाम्पत्याने पोटच्या मुलांनी नाकारले म्हणून स्वत:ची तेरवी करून घेतली होती! त्या वेळी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे इच्छामरणाची मागणी करणारे पत्र दिले होते. आपल्या जन्मदात्यांना इकडे एकटे टाकून परदेशात गेलेल्या मुलांचे पोरके मायबाप खूप आहेत. त्याच्याही कथा आहेत. अगदी आपल्या जन्मदात्यांच्या मरणालाही ही मुलं येत नाहीत. त्यांना असे पोरकेपणाचे आयुष्य कंठावे लागते, हे वास्तव आहे. मात्र, इच्छामरण हा त्यावरचा मार्ग अजीबातच नाही. भारतीय कुटुंबव्यवस्था खूपच सुदृढ आहे. तो संस्काराचा भाग आहे. जगणे अधिक आनंदी करणे, हा त्यावरचा मार्ग आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यासाठी एक कार्यक्रमच हाती घेतला आहे. राष्ट्र म्हणजे व्यक्ती आणि तिचे सुखाने जगणे, हेच असते आणि त्यासाठी बळकट कुटुंब, स्नेह हाच उपचार आहे. हेच संघाचे या संदर्भातले ब्रीद आहे. मात्र, जिथे कृत्रिम उपायांनी यातनामय जगणे जिवंत ठेवले जाते, तिथे मरण स्वीकारण्याचा अधिकार न्यायालयाने दिला आहे. वैद्यक व्यवसाय आता काही प्रमाणात ‘धंदा’ झाला आहे. तुमच्या खिशात पैसा आहे तोवर व्हेंटिलेटरवर ठेवले जाते. रुग्ण सुदृढ जगण्याच्या वाटेवर परत येऊच शकत नसेल, तर त्याला लाचार जिणे जगण्यापेक्षा सन्मानाने मरण मिळविण्याचा हा अधिकारही माणुसकी उन्नत करणारा आहे!

https://tarunbharat.org/?p=61649
Posted by : | on : 11 Sep 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (362 of 843 articles)


कहू | चालू महिन्यात शिकागो येथे पार पडलेल्या विश्‍व हिंदू संमेलनाने जगभरातील हितचिंतकांचे, अभ्यासकांचे आणि टीकाकारांचे लक्ष संघाकडे वेधले गेले ...

×