ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » मल्ल्या-जेटली भेटीचा धुराळा…

मल्ल्या-जेटली भेटीचा धुराळा…

भारतीय लष्कराला ‘सर्जिकल स्ट्राईक्स’चे पुरावे मागणारे राहुल गांधी यांचा, विजय मल्ल्याच्या एका वाक्यावर एकदम विश्‍वास बसला आहे. हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करून विदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्या सत्यच बोलणार, याबाबत राहुल गांधी यांची ठाम खात्री दिसते. भारतातील सर्वात जुन्या व सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची ही अशी बुद्धी आहे आणि या नेत्याला २०१९ साली पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा चंग काँग्रेस पक्षाने बांधला आहे. असो. सध्या विजय मल्ल्या अडचणीत सापडला आहे. भारतीय राजकारणाचे बारकावे माहीत असलेला हा गडी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आकलन करण्यात साफ चुकला आहे. पैशाच्या बळावर आणि आतापर्यंत पाळीव कुत्र्यांप्रमाणे पोसलेल्या काही दलाल पत्रकारांमुळे आपण या प्रकरणातून सहीसलामत सुटू, याची मल्ल्याला खात्री असली पाहिजे. परंतु, जसजसा त्याच्या भोवतीचा फास आवळू लागला आहे, तसतसा तो आता सुटण्याची प्राणांतिक धडपड करू लागला आहे. काल-परवा, इंग्लंडच्या न्यायालयात त्याच्याविरुद्ध सुनावणी झाल्यावर पत्रकारांशी बोलताना त्याने एक खुलासा केला- भारतातून पळून जायच्या आधी मी तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटलो होतो आणि बँकांशी तडजोड करण्याची तयारी दाखविली होती, असे तो म्हणाला. त्यावर जे काही करायचे असेल ते थेट बँकांशी बोलून कर, असे आपण म्हटल्याचा खुलासा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. भारतातील राजकीय स्तर इतका खाली घसरला आहे की, पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या राहुल गांधींना एका आरोपीवर विश्‍वास आहे, परंतु स्वच्छ चारित्र्याच्या, कर्तृत्ववान अरुण जेटलींवर नाही! याची संगती कशी लावायची? पचवलेला पैसा तर असे बोलायला उद्युक्त करत नाही ना! मुळात मल्ल्याचे हे विधान भारतातील सार्वजनिक चर्चेचा विषयच होऊ शकत नाही. दुधात पडलेल्या माशीला तिटकार्‍याने फेकावे, तसे हे विधान कचर्‍याच्या टोपलीत फेकण्यालायक आहे. पण, तसे न करण्याची काहीतरी मजबुरी राहुल गांधींची असली पाहिजे. मुळात, किंगफिशर एअरलाइन्स डबघाईला आली असताना, या कंपनीला हजारो कोटी रुपयांचे कर्ज, संपुआच्या काळात कसे काय देण्यात आले, असा प्रश्‍न भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी, संपुआ सरकारच्या काळात ‘फोन बँकिंग’ सुरू असल्याचा गंभीर आरोप केला होता. अर्थमंत्र्यांनी राष्ट्रीयीकृत बँकांच्या सर्वोच्चपदी खास मर्जीतील अधिकार्‍यांची नियुक्ती करायची आणि नंतर त्याची परतफेड म्हणून, या अधिकार्‍यांनी फोनवरून आलेला तोंडी आदेश पाळत, ते म्हणतील त्याला हजारो कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करायचे. या प्रथेला मोदींनी ‘फोन बँकिंग’ असे उपरोधिक नाव दिले होते. मल्ल्याच्या किंगफिशरच्या बाबतीतही असेच फोन बँकिंग कर्ज देण्यात आल्याचे रविशंकर प्रसाद यांनी सुचविले आहे. पैशाच्या थैलीचे तोंड सैल करताच, भारतातील राजकीय पक्ष आशाळभूत नजरेने लाळ गिटकत, आपण म्हणू ते करायला एका पायावर तयार होतात, हा इतिहास असल्यामुळे, विजय मल्ल्या, बँकेचे अधिकारी, फोन करणारे मंत्री आणि मंत्र्यांना तसे सुचविणारे राजकीय पक्षाचे सर्वेसर्वा यांना कायद्याची भीती वाटली नसणार. त्यातही वर ‘मी नाही त्यातली अन् कडी लावा आतली’ वृत्तीचे बिनबुडाचे अधिकारी नियामक बँकेच्या शिखरावर असतील तर मग बघायलाच नको! पण, नरेंद्र मोदी व अरुण जेटली यांचा राजकीय मंचावर प्रवेश झाला अन् सर्व मुसळ केरात गेले. या सर्व प्रकरणावरून अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी रेटण्यात येत आहे. राहुल गांधींनी आपला थिल्लरपणा आणखी वरच्या पातळीवर नेत, विजय मल्ल्याला पळून जाण्यास तुम्ही सांगितले की, तुमच्या बॉसने आदेश दिला, असा प्रश्‍न अरुण जेटलींना केला. हा सर्व अनावश्यक धुराळा उडविण्याचे काही कारण नव्हते, असेच कुणी म्हणेल. परंतु, राहुल गांधींची ती मजबुरी आहे. याचे कारण, त्यांच्या गळ्याशी आलेले नॅशनल हेरॉल्ड व यंग इंडियनचे प्रकरण. हे प्रकरण नसते, तर कदाचित विजय मल्ल्याच्या या विधानाचे इतके राजकारण झालेही नसते.
विजय मल्ल्या पत्रकारांशी नेमका काय बोलला, याची माहिती घेण्याचीही तसदी कुणी घेतली नाही असे दिसते. मल्ल्याच्या नुसार, ही भेट अनौपचारिक होती. मला जिनेव्हाला एका बैठकीला जायचे होते, म्हणून मी जेटलींना भेटून, कर्जाबाबत तडजोड करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यासाठी बँकांशी चर्चा करण्याची विनंती केली. ही काही आमची ठरलेली बैठक नव्हती. त्यांच्याशी माझी भेट संसदभवनात नेहमीच व्हायची आणि मी त्यांना कर्जाबाबत तडजोड करण्याची विनंती करायचो. परंतु, यावरून भारतात वाद उसळण्याचे काय कारण आहे, हे मला समजत नाही. मल्ल्याच्या या विधानानंतर, तसेच अरुण जेटली यांच्या स्पष्ट खुलाशानंतर, हा वाद शमायला हवा होता. पण, तसे झाले नाही आणि होणारही नाही. संसदेत मंत्र्यांना खासदार येता-जाता केव्हाही भेटू शकतात, या विशेष सवलतीचा विजय मल्ल्याने गैरफायदा घेतला, असे जेटली यांचे म्हणणे आहे आणि ते खरेही आहे. भेट झाल्याचे जेटली नाकारत नाहीत. पण, तरीही काँग्रेस पक्षाने पत्रकारपरिषदेत राहुल गांधींच्या बाजूला काँग्रेसचे एक खासदार पी. एल. पुनिया यांना बसवून, ही भेट झाल्याचे मी बघितले आहे. कारण अनायासे मी तिथे आसपास होतो, असे त्यांच्याकडून वदवून घेतले. जेटली व मल्ल्या दोघेही भेट झाल्याचे म्हणत असताना, या पुनियाच्या साक्षीची काय गरज होती? आता अधिकाधिक नवीन माहिती समोर येत आहे. दुसरा एक घोटाळेबाज उद्योगपती नीरव मोदी भारत सोडून पळण्याच्या आधी राहुल गांधींना एका अलिशान हॉटेलात भेटला होता असा दावा, एकेकाळी राहुल गांधींचे निकटवर्ती शेहजाद पूनावाला यांनी केला आहे. एवढेच नव्हे, तर उत्तरप्रदेशातील वक्फ बोर्डाची जमीन बळकावली म्हणून विजय मल्ल्यांविरुद्ध तक्रार करण्याची तयारी करणार्‍या बोर्डाच्या अध्यक्षावर, तक्रार करू नको म्हणून गुलाम नबी आझाद यांनी दबाव आणला होता, असे बाहेर आले आहे. हा आरोप खुद्द त्या अध्यक्षांनीच केला आहे. म्हणजे, एका खोट्या प्रकरणात मोदी-जेटली यांना अडकविण्यास निघालेले राहुल गांधी, आता स्वत:च या प्रकरणात फसत चालले आहेत. किंगफिशर कंपनीत राहुल गांधींची काही भागीदारी आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे. निवडणुकीपूर्वीच्या काळात, सत्तारूढ पक्षाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याची प्रथा आहे. पण, इथेतर प्रत्येक पावलावर विरोधी पक्षच आरोपीच्या पिंजर्‍यात फेकला जात आहे! पूर्वी भारतातील राजकारण बघून लोकांना चीड येत असे. परंतु, आजकालचे हे असले राजकारण बघून लोकांना हसे यायला लागले आहे, एवढाच या प्रकरणाचा निष्कर्ष आहे…

https://tarunbharat.org/?p=61942
Posted by : | on : 15 Sep 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (356 of 845 articles)


कुहीकर | मुळातच भाबड्या असलेल्या भारतीय समाजाला मूर्ख कसे बनवायचे, ते या देशातील सर्वच क्षेत्रातल्या ‘व्यापार्‍यांना’ खूप चांगले उमजले आहे. ...

×