ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक » महागठबंधन नावाचा एनपीए!

महागठबंधन नावाचा एनपीए!

भाऊ तोरसेकर |

तीन महिन्यांपूर्वी कर्नाटकात भाजपाचे अल्पमती सरकार कोसळले आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने कुमारास्वामी यांचे सरकार सत्तेवर आले तेव्हाची गोष्ट आहे. तिथे शपथविधीच्या मंचावर देशभरचे बिगर भाजपा नेते एकत्र आले होते आणि त्यांनी हातात हात गुंफून उंचावले होते. त्याविषयी चर्चा रंगल्या होत्या आणि खुद्द त्या पक्षांपेक्षाही माध्यमात दबा धरून बसलेल्या अनेकांना चक्कडोहाळे लागले होते. काही जणांना तर प्रसूतिकळाही सुरू झालेल्या होत्या. अशाच एका चर्चेमध्ये मी सहभागी होतो आणि वास्तवाचे भान असल्याने, या आघाड्या क्षणभंगुर असल्याचे विधान मी केलेले होते. त्यामुळे माझे विधान पूर्ण व्हायच्या आधीच प्रसूतिवेदनांनी व्याकुळ झालेल्या तिथल्या अँकरला इतका संताप झालेला होता, की आपले बाळ जन्म घेत असतानाच हा त्याच्या नरडीला नख कशाला लावतोय्, म्हणून शिव्याशापच द्यायचे त्याने बाकी ठेवले होते! त्यातून एक गोष्ट साफ झाली, की आजकालच्या असल्या पॅनेल चर्चा योजणार्‍यांना वा त्यात सहभागी होणार्‍यांना बहुधा वापरले जाणारे शब्द वा त्याचे अर्थही ठाऊक नसावेत! कारण त्याने ‘नरडीला नख’ हा शब्द वापरला होता आणि तसे कृत्य कुणी परका करत नसतो, तर घरातलाच कुणी करत असतो. एवढेही त्या विद्वानाला माहिती नसावे. काश्मिरातली पीडीपी-भाजपा आघाडी असो किंवा साठ वर्षांपूर्वीची महाराष्ट्रातली पहिलीवहिली संयुक्त महाराष्ट्र समिती आघाडी असो, तिच्या नरडीला नख त्यात सहभागी असलेल्या पक्षांनीच लावलेले आहे. बाहेरचा कुणी येऊन तो उद्योग केलेला नाही. अगदी ज्याला हे लोक नवजात अर्भक म्हणून कौतुक करत होते, त्या कुमारास्वामीनेच चौदा वर्षांपूर्वी कर्नाटकातच अशा जनता दल-काँग्रेस आघाडीच्या नरडीला नख लावलेले होते. मग एका मंचावरून हात गुंफून उंचावले म्हणून आघाडीची अर्भके जगणार कशी? आताही महागठबंधन नावाचे अर्भक कुपोषणाने मरू घातले आहे.
त्या मंचावर शरद पवार आणि सोनिया गांधी बाजूबाजूला उभे होते. पण, एकमेकांचे हात मिळवायलाही लागू नयेत, याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली होती. दुसरीकडे, त्याच मंचावर शाळकरी मैत्रिणीसारखे डोक्याला डोके लावून बिलगलेल्या सोनिया व मायावतींनी नंतर एकमेकांकडे ढुंकूनही बघितलेले नाही. त्या हात उंचावण्याने देशभर जी महागठबंधन म्हणून प्रक्रिया सुरू व्हायची होती, तिची पहिली कसोटी, डिसेंबरपूर्वी व्हायच्या तीन विधानसभांच्या निवडणुका ही होती. त्यासाठी कितीही आटापिटा केला, तरी काँग्रेससोबत कुणाचीही युती-आघाडी होऊ शकलेली नाही. त्यापैकी एक असलेल्या सोनियांच्या बालमैत्रीण मायावतींनी परस्पर तीन राज्यांत काँग्रेसला बाजूला ठेवून मतदारांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोनियांना फरक पडलेला नाही. त्या उठून परदेशी दौर्‍यावर गेलेल्या आहेत. त्यांचे सुपुत्र राहुल गांधींना तर राफेल विमानातून उतरून तीन राज्यांच्या विधानसभेच्य दारी जाण्याची बुद्धीही झालेली नाही. मोठ्या हिरिरीने प्रत्येक मोदीविरोधी मोर्चात पुढाकार घेणार्‍या बंगालच्या ममतादीदी सगळ्यापासून अजीबात अलिप्त झाल्या आहेत. मग महागठबंधनाचे काय? त्या नवजात अर्भकाला पान्हा पाजायला कुणी माउली समोर आलेली नाही, की दुधाची बाटली घेऊन कुणी बाप्या पुढे सरसावलेला नाही. ते अर्भक त्या तीन राज्यांत टाहो फोडून कुपोषणाच्या वेदनांनी व्याकुळ झालेले आहे. कारण त्याच्या जन्मदात्यांपासून कुटुंबकबिल्यानेच त्याच्या नरडीला नख लावलेले आहे. अशा आघाड्या म्हणजे गाजराच्या पुंग्या असतात आणि वाजल्या नाहीतर मोडून खाता येतील, अशीच त्या बनवण्यामागची कल्पना असते. पण, त्याच पुंग्या वाजवून सनईचे सूर काढायला उतावळे झालेल्यांना कुणी समजवायचे? त्यामुळे त्यांना अर्भक टाहो फोडून आक्रोश करतानाही आवाज ऐकू येईनासा झाला आहे. राफेलच्या डीजेचा गोंगाट त्यांच्या कानठळ्या बसवून गेला आहे.
अर्थात, असे कुठलेही अर्भक जन्माला आलेले नाही वा येण्याची शक्यताही नाही. त्या सगळ्या मनाच्या कपोलकल्पित गोष्टी आहेत. असे झाले तर तसे होईल आणि मग तसे झाल्यावर अमुक होऊन जाईल; अशा दिवास्वप्नाच्या आहारी जाण्याचा तो परिणाम असतो. त्याचा कधीच वास्तवाशी संबंध नसतो. असता तर निदान यापैकी कुणी कान पकडून काँग्रेस व राहुलना तीन राज्यांतील अन्य पक्षांशी हातमिळवणी करायला भाग पाडले असते. काँग्रेसच त्या तीन राज्यांतील प्रमुख विरोधी पक्ष आहे आणि म्हणून त्यांनीच अन्य पक्षांना सोबत घेण्यासाठी पुढाकार दाखवला पाहिजे. ते स्टुडिओत आलेले काँग्रेसचे प्रवक्ते किंवा त्यांचे आऊटसोर्स केलेले डावे पुढारी यांच्या डोक्यात घातले गेले असते, तरी तीन विधानसभांच्या तयारीला भरपूर वेळ मिळाला असता. पण, गर्भधारणेपूर्वीच डोहाळे लागलेल्यांची काय गोष्ट सांगावी? त्यांना नरडीला नख लागण्यापर्यंतची स्वप्ने पडू शकतात, पण गर्भधारणेची गरजही वाटत नाही. या वर्षाखेरीस तीन विधानसभा निवडल्या जातील आणि त्यांचे निकाल पुढल्या लोकसभेची दिशा ठरवून जाणार आहेत. त्यात लोकांचा व मतदारांचा विश्‍वास संपादन करण्याची ही उत्तम संधी असते. जिंकल्यावर सर्वच पक्षात सत्तेतला हिस्सा मागण्यासाठी हाणामार्‍या होत असतात. पण, ज्या जागा अजून जिंकायच्या आहेत वा गमवाल्या जाणार आहेत, त्यासाठीही हाणामारी वा हमरातुमरी होणार असेल, तर आघाडी वा गठबंधन व्हायचे कसे? पंधरा वर्षे काँग्रेसला छत्तीसगड व मध्यप्रदेशात सत्तेपासून वंचित राहावे लागलेले आहे. तीनदा ज्या हरलेल्या जागा आहेत, त्यापैकी काही जागा मित्रपक्षांना देण्याचेही औदार्य त्या पक्षात नसेल, तर सत्ता मिळाल्यावर काय होईल? सामान्य मतदार असा विचार करीत असतो. त्यामुळे नरडीला नख लावून आघाड्या होत असतील, तर अर्भक मृतच पैदा होणार ना?
मागील साठ वर्षांत देशाच्या विविध निवडणुकांत अनेक आघाड्या झाल्या व डाव्यांची केरळ व बंगालमधली कारकीर्द सोडली, तर कुठल्या आघाड्या टिकलेल्या नाहीत. काही सत्ता हातात असताना मोडल्या, तर काही सत्ता संपताना मोडलेल्या आहेत. डावी आघाडी दीर्घकाळ टिकून राहिली, कारण ती वैचारिक पायावर आणि भूमिकेवरच झालेली आघाडी होती. केंद्रातील सरकारला डाव्यांनी दोनदा पाठिंबा दिला, तरी सत्तेत सहभाग घेतला नव्हता. देवेगौडांचे सरकार हा त्यातला एक अपवाद आहे. त्या वेळी कम्युनिस्ट सत्तेत सहभागी झाले होते आणि मार्क्सवादी मात्र हट्टाने बाहेर राहिले होते. पण मुद्दा असा, की मार्क्सवादी भूमिकेसाठी हिस्सा नसतानाही सत्तेला पाठिंबा देऊ शकतात आणि भाजपानेही सत्तेबाहेर राहून व्ही. पी. सिंग सरकारला पाठिंबा दिलेला होता. काँग्रेस यातले उलटे टोक आहे. आपल्याला सत्तेत हिस्सा मिळणार नसेल, तर काँग्रेस सरकार स्थापनेला पाठिंबा देते. नंतर यथावकाश सरकार कोसळून टाकते, असा इतिहास आहे. कागदावरचे गठबंधन आणि व्यवहारातले गठबंधन यात मोठाच फरक असतो. म्हणूनच अशा एकजुटीच्या वल्गना करणे सोपे आहे आणि त्याचा व्यवहारी प्रयोग दुसरे टोक आहे. ती तारेवरची कसरत असते. जी बिहारमध्ये नितीशकुमारनी वा महाराष्ट्रात शरद पवार व देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवली आहे. अणुकराराच्या वेळी समाजवादी पाठिंबा घेऊन सरकार वाचवले आणि नंतर मुलायमना काँग्रेसने टांग मारलेली होतीच ना? हा महागठबंधनाचा डीएनए आहे. आजच्या आर्थिक भाषेत त्याला एनपीए म्हणजे दिवाळखोरीतले बँक खाते नक्की म्हणता येईल. आगामी विधानसभा निवडणुकीत या महागठबंधनाची कसोटी लागायची आहे आणि मतदान होऊन निकालही लागण्याची गरज नाही. उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपेल, त्याच दिवशी या अर्भकाला आयुष्य आहे किंवा नाही, त्याचा निकाल लागलेला असेल…

https://tarunbharat.org/?p=64627
Posted by : | on : 30 Sep 2018
Filed under : उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक (368 of 1315 articles)


इस्लामचा अभिन्न भाग आहे का, या प्रश्‍नावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय, हिंदू व मुस्लिमांना दिलासा देणारा असला, तरी सेक्युलर ...

×