ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » मायावतींनी काँग्रेसला दिलेला झटका!

मायावतींनी काँग्रेसला दिलेला झटका!

काँग्रेस पक्षाचा सत्ता परत आणण्याचा निर्धार, राहुल गांधी यांनी सेवाग्राम येथे पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर केला. त्याच्या दोनच दिवसांनंतर बहुजन समाज पक्षाच्या नेत्या बहेन मायावती यांनी काँग्रेसच्या निर्धाराला तडे देण्याची भूमिका घेतली आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बसपा स्वतंत्रपणे निवडणुका लढेल, या मायावतींच्या घोषणेने काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली नसती तरच नवल! ज्या ज्या वेळी धोरणात्मक निर्णय घेण्याची पाळी येते, त्या त्या वेळी मायावती उत्तप्रदेशातील लखनौची निवड करतात. याही वेळी त्यांनी लखनौच्याच भूमीचा वापर करून, सत्तेसाठी सुरू असलेल्या काँग्रेसच्या प्रयत्नांना खीळ घातली आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस पक्ष जोरकसपणे प्रयत्न करीत आहे. त्यासाठी हा पक्ष नवे मित्र मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. मोठा भाऊ या नात्याने त्याला तसे करणे क्रमप्राप्त आहे. पण, ज्या पक्षाचा पाया हिंदीभाषक प्रदेशात मजबूत आहे, त्या बहुजन समाज पक्षानेच काँग्रेसला झिडकारल्याने काँग्रेस पक्षाची स्थिती चिंताजनक झाली आहे. बहुजन समाज पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा कर्मठ पक्ष आहे. दलितांच्या उत्थानाचे नारे देऊन कितीतरी रिपलब्लिकन पक्ष महाराष्ट्रात उगवले. अगदी ए पासून झेडपर्यंत रिपब्लिकन पक्षाची शकले झाली. पण, यांपैकी एकाही पक्षाला सत्तास्थानी पोहोचण्यात यश आले नाही. नेत्यांच्या अहंभावामुळे ना हे पक्ष वाढले, ना त्यांचे कार्यकर्ते घडले. कायम कुणाच्या तरी वळचणीला बसण्याचा शापच या चळवळीला आणि त्यातून बाहेर पडलेल्या नेत्यांना लागला. पण, मायावतींनी मात्र कार्यकर्त्यांच्या बळावर आणि पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्या दूरदृष्टीतून उत्तरप्रदेशात एक-दोन वेळा नव्हे, तर तब्बल चार वेळा सत्ता स्थापन केली आणि राज्याचे मुख्यमंत्रिपदही भूषविले. २००७ च्या निवडणुकीत तर त्यांना दोनतृतीयांश बहुमत मिळाले होते. त्यांनी दलित नेतृत्वाचे एक वेगळेच समीकरण निर्माण केले. उत्तरप्रदेशात ब्राह्मण-दलित युती करून त्यांनी सोशल इंजिनीअरिंगचे एक नवे समीकरण दिले. समाजवादी पार्टीलाही आपटी दिली. प्रारंभी या समीकरणाने काम केले, नंतर मात्र ते अपयशी ठरले. पण, म्हणून काही मायवतींची लोकप्रियता दलित समाजात कमी झाली नाही. आज बसपाजवळ उत्तरप्रदेशात २० टक्के मते आहेत. त्याच बळावर हा पक्ष भाजपा आणि काँग्रेससारख्या बलाढ्य पक्षांना नित्य आव्हान देत असतो. कालची घोषणा मायावतींना, काँग्रेसने युतीसाठी सन्मानजनक तोडगा न काढल्याने करावी लागली आहे. देशाची सत्ता मिळवायची आहे, मग त्यानुसार धोरणांची गरज नाही का? हा प्रश्‍न काँग्रेस पक्षानेच स्वतःला विचारायला हवा. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यात आणि अजून महाआघाडी कशा स्वरूपाची असेल, लोकसभा निवडणुकीतील युती विधानसभा निवडणुकीतही कायम राहणार का? युती झाली तर जागावाटप कसे होणार? निवडून आल्यानंतरची रणनीती कशी ठरेल? किती राजकीय पक्षांना महाआघाडीत सामावून घ्यायचे? महाआघाडीचा निमंत्रक कोण राहणार?… अशा एक ना अनेक प्रश्‍नांची उत्तरे काँग्रेसने दिलेली नाहीत. येणार्‍या काळात योग्य धोरण आखले नाही, तर उमेदवारांच्या निवडून येण्याची खात्री कशी देणार? हा प्रश्‍न सुजाण राजकीय पक्षांना पडणारच. पण, तो काँग्रेसला न पडल्याने मायावतींनी महाआघाडीतून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. काँग्रेस आणि भाजपाला वगळून त्यांचा पक्ष राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि डाव्या पक्षांसोबत हातमिळवणी करू शकतो. मायावतींच्या ‘एकला चलो रे’मुळे विरोधकांच्या आघाडीला एकापाठोपाठ बसलेला हा तिसरा धक्का आहे. छत्तीसगढमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी त्यांनी यापूर्वीच अजित जोगी यांच्या पक्षासोबत युतीची घोषणा केली. मायावतींच्या घोषणेमुळे काँग्रेसवरच या तिन्ही राज्यात ‘एकला चलो’ म्हणण्याची पाळी येणार, असे दिसत आहे. मायावतींनी मध्यप्रदेशात पहिल्या २२ उमेदवारांची घोषणा करून भविष्यातील काँग्रेससोबतच्या तडजोडीची संभावनादेखील आधीच संपुष्टात आणली आहे. काँग्रेस कार्यकारी समितीच्या सेवाग्राममधील बैठकीनंतर छत्तीसगढ, राजस्थान आणि मध्यप्रदेश या तीन मोठ्या हिंदीभाषक राज्यात काँग्रेसला मिळालेला हा ‘प्रसाद’ गोडच करवून घ्यावा लागणार आहे. काँग्रेसला, मायावती यांच्या धरसोड वृत्तीची कल्पना नाही असे नाही, तरीदेखील हा पक्ष बसपासोबत युतीसाठी एवढा इच्छुक का आहे, हे राजकीय पंडितांच्या नजरेतून सुटलेले नाही. देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाची लोकप्रियता ओसरू लागली आहे. देशातील केवळ चार राज्यांत या पक्षाची सत्ता उरलेली आहे. बहुतांश राज्यांमध्ये त्यांना कुणाच्या तरी कुबड्या घेऊन विजयाच्या दिशेने पावले टाकायची आहेत. काँग्रेसला मायावतींनी जेवढे ओळखले तेवढे इतर भाजपेतर पक्षांनी ओळखले नाही, असेदेखील आपण म्हणू शकतो. काँग्रेसचा एकही नेता पक्षाला निवडणुकीत विजय मिळवून देण्यास सक्षम नाही, मग इतरांना ते काय विजय मिळवून देऊ शकतील? हा प्रश्‍न मायावतींनी थेट विचारला नसला, तरी तिसर्‍या आघाडीसाठी प्रयत्न करण्याच्या त्यांच्या भाषेचे शब्द हेच आहेत, हे कुणाही राजकारण्याला सांगण्याची गरज नाही. दिग्विजय सिंह यांच्यावरील त्यांचे शरसंधान या नेत्याला त्याची जागा दाखवून देणारे आहे. काँग्रेसने आता मायवतींना लक्ष्य करण्याऐवजी स्वतःच्या नेत्यांच्या चाल, चरित्रावर लक्ष देण्याची गरज आहे. याच मायावती, राहुल आणि सोनियांचा हात धरण्यासाठी इच्छुक असताना माशी कुठे शिंकली, हा प्रश्‍न उपस्थित होणारच आहे. पक्षातही यावर व्यापक चर्चा व्हायला हवी. शेवटी पक्षातील ज्येष्ठांना म्हणा वा नवोदितांना, शिस्तीची धडे कोण देणार? मायावतींपाठोपाठ भाकपनेही तिसर्‍या आघाडीचे संकेत दिले असून, हा पक्ष आता मायावतींच्या सातत्याने संपर्कात आहे. डाव्या पक्षांनी यापूर्वीच धर्मनिरपेक्ष जनता दल आणि समाजवादी पार्टीशी हातमिळवणी केली आहे. त्यांनाही काँग्रेसच्या बुडत्या जहाजाची सोबत नको आहे. म्हणूनच तेदेखील बसपाला सोबत घेण्यास इच्छुक आहेत. राजस्थान प्रदेश काँग्रेस मायावतींशी युती करण्यास इच्छुक नाही. कारण त्यांना राज्यात यावेळी काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्‍वास आहे. येथील सत्तेत कुणाला वाटेकरी करण्याची त्यांची इच्छा नाही. पण, निवडणुकीत बेरजेचे राजकारण करावे लागते, हे काँग्रेस नेत्यांना कोण सांगणार? युती केल्यास दुसर्‍या पक्षांची मते आयतीच काँग्रेसला मिळणार असताना, जर काँग्रेस पक्षाचीच आयती मते घेण्याची तयारी नसेल, तर मग या पक्षाचा कपाळमोक्ष ठरलेला आहे! एकंदरीत, मायावतींनी अंगठा दाखविल्यामुळे काँग्रेसची पंचाईत झाली आहे, हे मात्र खरे!

https://tarunbharat.org/?p=65013
Posted by : | on : 5 Oct 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (265 of 791 articles)


वैद्य | केरळमधील भगवान अय्यप्पा यांच्या शबरीमलै मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशाचा व पूजेचा अधिकार असल्याचा निर्णय, सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर, ...

×