ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक » मायावती : राजकारणातील नवे सत्ताकेंद्र!

मायावती : राजकारणातील नवे सत्ताकेंद्र!

श्यामकांत जहागीरदार |

बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांचे नशीब सध्या जोरात आहे. राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून काहीशा बाजूला फेकल्या गेलेल्या मायावती पुन्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी येत आहेत. विरोधी पक्षांच्या मोदीविरोधाच्या आणि त्यामुळेच महाआघाडीच्या राजकारणात मायावती यांचे महत्त्व वाढत आहे. दलितांवरील वाढत्या अत्याचाराच्या मुद्यावरून मायावती यांनी आपली राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपण्याच्या वर्षभर आधी खासदारकीचा राजीनामा दिला होता. अशा मायावती यांच्या नावाची आता पंतप्रधानपदासाठीही चर्चा होत आहे.
देशात हाताच्या बोटावर मोजता येणार्‍या राष्ट्रीय पक्षांमध्ये मायावती यांच्या बसपाचा समावेश आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत त्यांचा प्रभाव कमी झाला की काय, असे वाटायला लागले होते. बसपा हा राष्ट्रीय पक्ष असला तरी तो उत्तरप्रदेशपुरताच मर्यादितही झाला आहे. गेल्या तीन निवडणुकांत उत्तरप्रदेशात बसपाला सातत्याने पराभवाचे तोंड पाहावे लागले. २०१२ मध्ये उत्तरप्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसपाचा पराभव झाला. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत तर त्यांच्या पक्षाला उत्तरप्रदेशात आपले खातेही उघडता आले नव्हते! २०१७ मध्ये उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत बसपाचा पुन्हा पराभव झाला आणि बसपा संपली, अशी चर्चा सुरू झाली.
मायावती या हार मानणार्‍या नेत्या नाही, त्या योग्य संधीची वाटत पाहात होत्या. आपल्या राजकीय अस्तित्वासाठी उत्तरप्रदेशमध्ये मायावती यांच्या बसपाला आणि अखिलेश यादव यांच्या सपाला आघाडी करावी लागली. या आघाडीचा चांगला परिणाम दिसून आला. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत बसपाने सपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. आश्‍चर्य म्हणजे या दोन्ही ठिकाणी भाजपा उमेदवारांचा पराभव झाला आणि अचानक मायावती यांचे राजकारणातील अच्छे दिन सुरू झाले. उत्तरप्रदेशपाठोपाठ अन्य राज्यांतही मायावती यांच्या बसपाशी आघाडी करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली. आपल्या राजकीय अस्तिवाची लढाई लढणार्‍या काँग्रेसला तर मायावती यांच्या रूपात जादूचा दिवाच सापडला होता! मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बसपाशी आघाडी करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. मात्र, मायावती या अतिशय धूर्त आणि चलाख अशा नेत्या आहेत. आपल्यासोबत येण्याशिवाय अन्य राजकीय पक्षांना पर्याय नाही, याची पूर्ण कल्पना असल्यामुळे मायावती यांनी सन्मानजनक जागा मिळाल्याशिवाय आघाडी नाही, अशी भाषा सुरू केली.
मायावती यांचा सन्मान किती जागांमध्ये सामावला आहे, हे त्याच सांगू शकतात. त्यामुळे उत्तरप्रदेशात सपाचे अखिलेश यादव, मायावती यांच्या बसपाशी आघाडी करण्यासाठी उतावीळ झाले असताना आणि त्यासाठी आपल्या हक्काच्या काही जागा सोडण्याची त्यांची तयारी असताना उत्तरप्रदेशात सपा आणि बसपा यांची आघाडी होईल काय, याचे उत्तर फक्त मायावती यांच्याजवळ आहे! दुसरीकडे, मायावती यांनी छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी न करता अजित जोगी यांच्या जनता काँग्रेससोबत मायावती यांच्या बसपाने आघाडी केली आहे आणि याची किंमत मायावती यांच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीला पाठिंबा देऊन जनता काँग्रेसने तातडीने चुकवलीही. मात्र, मायावती शेवटपर्यंत आपल्यासोबत राहतीलच, याची अजित जोगी यांनाही खात्री नाही. मध्यप्रदेशात आता मायावती काय करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, मध्यप्रदेशातही मायावती आपला हत्ती काँग्रेसच्या पंजात देतील, असे वाटत नाही. मायावती कधी काय करतील, याचा नेम नाही. मायावती या लहरी आणि बेभरवशाच्या राजकारणी आहेत. राजकारणातील त्यांची विश्‍वसनीयता शून्य अशी आहे. मायावती यांनी एखाद्या राजकीय पक्षाशी आघाडी केली तरी ती त्या टिकवतील, याची कोणतीही खात्री नाही. मायावती आपल्या राजकीय स्वार्थासाठी कोणत्याही पक्षाशी आघाडी करू शकतात, मात्र आपला राजकीय स्वार्थ पूर्ण झाला की आघाडी तोडण्यासाठी त्या एका क्षणाचाही विलंब लावत नाही.
भाजपाने याचा चांगलाच अनुभव घेतला. उत्तरप्रदेशात काही वर्षांपूर्वी बसपा आणि भाजपा एकत्र आले होते. अडीच-अडीच वर्षं सत्ता वाटून घेण्याचा करार त्यांच्यात झाला होता. त्यानुसार मायावती पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या. मायावती यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होण्याची वेळ आली असता मायावती यांनी भाजपाच्या सरकारला पाठिंबा देण्याचा आपला शब्द पाळला नाही. मुळात राजकारणात असो की अन्य कोणत्याही क्षेत्रात शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व असते. तुम्ही कोणाला एखादा शब्द दिला तर तो पाळला पाहिजे. शब्द न पाळण्यामुळे आपला तात्कालिक लाभ होतो असे त्यांना वाटत असले, तरी दीर्घकालीन नुकसानही होत असते, त्याची त्यांना जाणीवही नसते.
अशा भूमिकेमुळेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशातून बसपाचा एकही खासदार निवडून आला नाही. उत्तरप्रदेश विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही उत्तरप्रदेशात बसपाचे फक्त १९ आमदार विजयी झाले. मायावती यांच्या अशा कार्यपद्धतीला कंटाळून दलित समाजाने भाजपाला जवळ केल्याचे २०१७ मध्ये राज्यात भाजपाला मिळालेल्या जागांवरून दिसून येते आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सध्या वेगवेगळ्या राज्यांत महाआघाडीचे जे राजकारण सुरू आहे, ते पाहता राजकारणात कुणीच कुणाचा कायमस्वरूपी मित्र वा शत्रू नसतो, याची प्रचीती येते. वर्षानुवर्षांचे मित्र एकदुसर्‍याला सोडून जातात, तर छत्तीसचा आकडा असलेले राजकीय पक्ष एकदुसर्‍याच्या गळ्यात गळा घालतात.
कधीकाळी समाजवादी पार्टी आणि बसपा यांच्यात उत्तरप्रदेशात छत्तीसचा आकडा होता. राजधानी लखनौतील व्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये काही वर्षांपूर्वी समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मायावती यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला होता. पण, आज त्याच समाजवादी पार्टीशी मायावती सत्तेसाठी हातमिळवणी करत आहेत. राजकारणात शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या भूमिकेतून निर्णय घेतले जात असतात, आघाड्या होत असतात.
२००२ मध्ये बसपाने राज्यात २०.०८ टक्के मते मिळवत ८८ जागा जिंकल्या होत्या. २००७ मध्ये तर बसपाचा हत्ती जोरात होता. बसपाने ३०.४३ टक्के मतांसह २०६ जागा जिंकल्या होत्या. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत बसपाला २५.९१ टक्के मतांसह फक्त ८० जागा जिंकता आल्या. २०१७ मध्ये बसपाला तर २२.२३ टक्के मतांसह फक्त १९ जागा जिंकता आल्या. म्हणजे बसपाच्या राजकीय कामगिरीचा हा नीचांक आहे. उत्तरप्रदेशात बसपाची सरासरी २० ते ३० टक्के मते आहेत, मतांच्या कायम असलेल्या याच टक्केवारीमुळे मायावती यांचे राजकीय महत्त्व वाढले आहे. राजकीय पक्षाचा त्यांच्याकडचा ओढा वाढला आहे. मायावती यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा खूप आहेत. आपल्या राजकीय ताकदीपेक्षा त्यांना नेहमीच जास्त हवे असते. यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असते. मायावती यांच्या पक्षात अधिकार असलेला दुसरा कोणताही नेता नाही. पक्षांतर्गत लोकशाही तर दूरदूरपर्यंत नाही. बसपात उमेदवाराची निवड ही त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कामगिरीवर नाही, तर आर्थिक ताकदीवर होत असते. एकखांबी तंबूसारखी बसपाची वाटचाल सुरू आहे. स्वत:च विणलेल्या कोषात त्या मग्न असतात. मात्र, दलितांच्या मतांच्या मोठ्या सौदागर म्हणून राजकारणातील एक मोठी ताकद मायावती झाल्या आहेत, ज्याकडे कोणत्याच राजकीय पक्षाला दुर्लक्ष करता येत नाही. आपल्या राजकीय स्वर्थासाठी का होईना, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मायावती यांचे राजकीय ओझे सर्व राजकीय पक्षांना सोयीनुसार वाहावे लागणार आहे, याचाच फायदा मायावती उचलत आहेत.

https://tarunbharat.org/?p=62761
Posted by : | on : 27 Sep 2018
Filed under : उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक (566 of 1507 articles)


शेजारचे दोन मोठे देश-पाकिस्तान आणि चीन- भारताविरुद्ध मोठे कारस्थान करीत आहेत. या दोन देशांमध्ये झालेली युती ही अभद्र आहे. सर्व ...

×