ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » मुख्यमंत्र्यांवर विश्‍वास!

मुख्यमंत्र्यांवर विश्‍वास!

सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव या दोन महत्त्वाच्या महानगरपालिकांवर भाजपाचा झेंडा फडकल्यामुळे, मतदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्‍वास दाखविला, हे सिद्ध झाले आहे. भाजपाचा विकास अजेंडा आणि सत्ताधार्‍यांवर विश्‍वास दर्शवून जनतेने भाजपाला भरभरून मते दिली. यावरून वार्‍याचा प्रवाह कोणत्या दिशेला वाहात आहे, हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या चांगले ध्यानात आले असेल. आगामी विधानसभा निवडणुकीची ही छोटीशी झलक आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत चमत्कार घडला. मराठा आंदोलन पेटलेले असताना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करून शासनाच्या विरोधात विषारी प्रचाराची राळ उडवून दिली असताना, भाजपाने ७८ पैकी ४१ जागा जिंकत महापालिकेवर भगवा फडकावला. काँग्रेसला १५ आणि राष्ट्रवादीला २० जागांवरच विजय मिळविता आला. येथे शिवसेनेला खातेही उघडता आले नाही. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आणि मराठाबहुल असलेला जिल्हा म्हणूनच ओळखला जायचा. पण, भाजपाने मारलेल्या जोरदार मुसंडीमुळे जयंत पाटील, विश्‍वजीत कदम, सतेज पाटील या तिघांनाही जोरदार धक्का बसला. सांगलीत सर्वच समुदायाचे लोक राहतात. पण, राष्ट्रवादीचे जितेन्द्र आव्हाड यांनी विषारी भाषण करून आगीत तेल ओतले. त्याचीही तीव्र प्रतिक्रिया उमटली. दोन्ही पक्षांना गटबाजी भोवली. भाजपाने मराठा, धनगर, मुस्लिम, दलित अशा सर्वच समुदायांना तिकिटे देऊन त्यांना निवडून आणले. भाजपाचे ९ पैकी ७ मुस्लिम उमेदवार विजयी झाले. सर्व स्तरातील जनतेने भाजपावर विश्‍वास दर्शवून कौल दिला. भाजपाने अगदी नियोजनबद्ध रीतीने प्रचार केला. फार आधीपासून व्यूहरचना आखली. निवडणूक घोषित झाली, तेव्हा त्यांच्या प्रचाराचा एक टप्पा पूर्ण झाला होता. त्यामुळे नंतर त्यांना अधिक वेळ मिळाला. घरोघरी जाऊन भाजपा कार्यकर्त्यांनी प्रचार केला. जे अन्य पक्षात असंतुष्ट आत्मे होते, त्यांना प्रवेशही दिला. पण, निवडणूक कमळाच्या चिन्हावरच लढावी लागेल, अशी अट घातली. येथे चंद्रकांतदादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे. जि. प. अध्यक्ष, सदस्य, पदाधिकारी मैदानात उतरले. काँग्रेसमध्ये मात्र गटबाजीचे एवढे प्रदर्शन झाले की, अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती लढाव्या लागल्या. जयंत पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाले आणि तेेथे काँग्रेसची उपेक्षा सुरू झाली. राष्ट्रवादीची काँग्रेससोबत युती करण्याची अजीबात इच्छा नव्हती. पण, वरून आदेश आला आणि तोंडदेखली युुती झाली. शिवाय जो तो नेता आपल्या गटाचे किती उमेदवार निवडून येतील, याचेच गणित करीत बसला. भाजपाने मात्र विकासाचा अजेंडा पुढे करीत, शांतपणे प्रचार केला. तो मतदारांना भावला. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर अविश्‍वास दर्शवून भाजपाला पसंती दिली. सांगलीच्या निकालांंनी आता काँग्रेसचा उरलासुरला बालेकिल्लाही ढासळला आहे. आधी लोकसभा, विधानसभा, जि. प. आणि आता महापालिकेवरही भाजपाचाच झेंडा लागल्याने सर्व विरोधी नेते गर्भगळीत झाले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आपलेच घर सांभाळू शकत नाहीत, असा संदेश पक्षात गेला आहे. राज्यात मराठा आंदोलन सुरू होते व काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे पक्ष प्रेतांच्या टाळूवरचे लोणी खाण्यात मशगूल होते. भाजपाला कसेही करून पराभूत करण्याचे मनसुबे रचत होते. पण, सर्वच समुदायाच्या मतदारांनी ते पार धुळीस मिळविले आणि विकासाचा अजेंडा पसंत केला. विखारी प्रचाराला गाडून टाकले. जळगावातही सुरेशदादा जैन यांचे ४० वर्षांपासूनचे साम्राज्य भाजपाने उद्ध्वस्त केले. महापालिकेसाठी भाजपाने यावेळी मोठ्या संख्येत महिलांना तिकीट दिले. ७५ पैकी ३३ महिला भाजपाच्या निवडून आल्या. त्यात दोन मुस्लिम भगिनींचा समावेश आहे. याचा अर्थ, भाजपाने खर्‍या अर्थाने महिलांचा सन्मान केला, सशक्तीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल उचलले. याकडे जळगावकरांचे लक्ष होते. एकूण १९ प्रभागांपैकी १३ प्रभागात सर्वच्या सर्व उमेदवार भाजपाचे निवडून आले. या निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी प्रचार केला नाही. मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्री प्रचारासाठी येऊ शकले नाहीत. तरीही गिरीश महाजन यांनी एकहाती धुरा सांभाळून सुरेशदादा जैन यांचे ४० वर्षांचे साम्राज्य तर संपवलेच, शिवसेनेलाही चारीमुंड्या चीत केले. तब्बल ५७ जागांवर विजय संपादन करून सर्वांच्या तोंडचे अक्षरश: पाणीच पळविले. शिवसेना-सुरेशदादा युतीला फक्त १५ जागा मिळाल्या. राष्ट्रवादीला यावेळीही खाते उघडता आले नाहीच पण काँग्रेसलाही जनतेने पूर्ण नाकारले. त्यांनाही शून्य मिळाला. यावेळची निवडणूक तशी पाहता भाजपा आणि शिवसेनेतच झाली. जैन यांच्या काळात कर्जाचा डोेंगर वाढतच चालला होता, परिणामी केवळ हुडकोचेच कर्ज ७०० कोटीपर्यंत गेले. त्यांच्या काळात शहर बकाल झाले होते. अतिक्रमणाचा विळखा प्रचंड वाढला होता. त्यामुळे जनतेचा त्यांच्यावर प्रचंड राग होता. त्यातच अण्णा हजारे यांनी सुरेशदादांवर घरकूल घोटाळ्यात भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले. दादांना आणि राष्ट्रवादीचे मंत्री गुलाबराव पाटील यांना अटक झाली. चार वर्षे ते जेलमध्ये होते. सुरेशदादा व राष्ट्रवादीच्या कपाळी काळा डाग लागला. शिवसेनेला वाटले, दादांच्या मदतीने आपण जळगाव महापालिकेवर कब्जा करू. जनतेने शिवसेनेलाही अशी काही पटकनी दिली की, त्यांना दिवसाच तारे दाखवले! जळगाव तशी मोठी व्यापारपेठ, पण विकासच झाला नसल्याने जनता नाराज होती. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले आणि तेथे विकासाचे नवे पर्व सुरू झाले. जळगावच्या विकासासाठी २०० कोटी रु. आणण्याची ग्वाही गिरीश महाजन यांनी दिली. चिंचोलीजवळ एक मोठे मेडिकल हब होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातीलच विद्यार्थ्यांना सर्व वैद्यकीय शाखांचा लाभ होणार आहे. समृद्धी महामार्ग जळगावमधून जात असल्याने त्याचा मोठा फायदा व्यापार्‍यांना होणार आहे. तसेच जळगाव-सूरत, जळगाव-नागपूर, जळगाव-नाशिक, जळगाव-औरंगाबाद या चारही महामार्गांचे चौपदरीकरण केल्यामुळे व्यापाराला मोठी चालना मिळाली आहे. जामनेरजवळ ६०० एकरात नवीन एमआयडीसी, टेक्सटाईल पार्क उभारण्यात येत आहे. याशिवाय जळगावमधील संसाधनात वाढ करण्याच्या दृष्टीने अनेक योजना हाती घेण्यात आल्या आहेत. जनता हे सर्व पाहात होती. विरोधक विषारी प्रचारात मशगूल होते, तर भाजपा विकासाचा अजेंडा राबवीत होती. निकाल समोर आहेत. गिरीश महाजन यांचे जळगावात व चंद्रकांतदादा पाटील यांचे सांगलीत वजन वाढले आहे. आज सांगलीसह राज्यात २७ पैकी १४ महापालिकांमध्ये भाजपाची सत्ता आहे. आगामी काळात दोन्ही जिल्ह्यात केवळ भाजपाच असेल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही!

https://tarunbharat.org/?p=59261
Posted by : | on : 6 Aug 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (376 of 787 articles)


दाणी | सर्वोच्च न्यायालयात अखेर संघर्षविराम झाला. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. जोसेफ यांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्याच्या मुद्यावर ...

×